इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?
I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh
नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे . UPA-2 च्या काळात जेंव्हा रोज भ्रष्टाचाराचे नवनवीन सुरस कथा कानावर यायच्या तेंव्हा विरोधकांनी सिंग यांची तुलना आपल्या मुलांच्या दुष्कृत्याकडे डोळेझाक करणाऱ्या धृतराष्ट्राशी करायला सुरुवात केली . यापूर्वी एकदा यशवंत सिन्हा यांनी सिंग याना शिखंडी ची उपमा दिली होती . पण बारू यांनी या आपल्या एके काळच्या बॉस ची तुलना भीष्म या व्यक्तिरेखेशी केली आहे . चुकीच्या पक्षात असलेला एक अत्यंत प्रामाणिक , विद्वान माणूस . भीष्माच्या आयुष्याची जरी शोकांतिका झाली असली तरी ते महानायक होते . मनमोहन सिंग यांच्या बद्दल असे म्हणता येईल का? . स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर ज्या काही थोड्या लोकांनी आपला न पुसणारा ठसा उमटवला आहे त्यात सिंग यांचे नाव नक्की येईल . १९९१ मध्ये देश आर्थिक गर्तेत सापडला असताना नरसिंह राव यांच्यासोबत सिंग यांनी हा आर्थिक शकट सांभाळला . इतकेच नव्हे तर या देशातल्या लाखो तरुणांना जागतिकीकरणाचे फायदे होतील अशी धोरण राबवली . दुर्दैवाने ज्या लोकाना या चे सर्वाधिक फायदे झाले तेच लोक आज त्यांच्यावर प्रच्छन्न टीका करताना दिसतात . दुसऱ्या महायुद्धात अविस्मरणीय विजय मिळवून दिल्यानंतर चर्चिल यांनी लोकांनी सार्वत्रिक निवडणुकीत घरी बसवलं होत . बर्यापैकी सरकार चालवून पण वाजपेयी यांच्यापेक्षा सोनियांना लोकांनी २००४ मध्ये पसंती दिली होति. लोकशाहीत जन मानसाचा अंदाज येणे कठीणच . आणि त्यात पण भारतासारख्या खंडप्राय , बहुविध , बहुभाषिक देशात तर अजूनच अवघड .
मनमोहन यांच्या कारकीर्दीच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत . अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू . आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . पण जेंव्हा विरोधक मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन करतात तेंव्हा सरसकट त्यांच्या १० वर्ष पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला मोडीत काढतात . पण हे खरे आहे का ? UPA-१ च्या काळात विकासदर ९ % वर पोहोंचला होता . सरकार साम्यवाद्यांच्या पाठीम्ब्यांवर असताना पण अमेरिकेसोबत अणुकरार करताना सिंग यांनी राजकीय धाडस दाखवून त्याना फाट्यावर मारल .( देशात तो पर्यंत काही भागात का होईना साम्यवाद्यांचे वर्चस्व होते त्याला ओहोटी लागण्याची प्रक्रिया तिथून सुरु झाली असे माझे निरीक्षण . चूभू द्या घ्या . या पतनाची सुरुवात करण्याचेश्रेय सिंग यांना द्यावे का ? )
२००९ मध्ये कॉंग्रेस ने जो विजय मिळवला आणि स्वतःच्या जागा मध्ये भर घातली त्याचे श्रेय बारू पूर्णपणे मनमोहन यांना देतात . यासंबंधी चे एक छान उदाहरण त्यांनी पुस्तकात दिले आहे . 'द हिंदू ' या दैनिकाच्या विद्या सुब्रमन्यम यांनी ग्रामीण तसेच मुस्लिम जनतेला प्रश्न केला होता . तुमच मत कुणाला ? त्यावर त्यांनी एकमुखाने उत्तर दिले होते . ' सरदार को '. ते सर्व जण सिंग याना नेक आदमी संबोधत असतो . सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते . विरोधक कायम सिंग यांच्यावर उत्तम अर्थ तज्ञ पण वाईट राजकारणी म्हणून टीका करायचे . पण नंतर दिग्विजय सिंग म्हणाले तसे सिंग यांच्यातल्या चलाख राजकारण्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले . सिंग हे राजकारण करण्यात पारंगत होते हे अमान्य करण्यात काही अर्थ नाही . १० वर्ष पक्षांतर्गत विरोधक , सत्ताबाह्य केंद्र , विरोधक यांना तोंड देऊन सरकार चालवणे काही खायचे काम आहे का ?
बाह्य सत्ताकेंद्र हि भारतीय राजकारणाची खासियत बनत चालली आहे का ? गोविन्दाचार्यानी वाजपेयी यांना 'मुखवटा ' म्हणून संबोधले होते . सिंग यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द सोनिया यांच्या सावली खाली गेली हे नाकारण्यात अर्थ नाही . अनेक धोरण निव्वळ पक्ष संघटनेच्या (पक्षी -सोनिया ) आग्रहामुळे राबवावी लागली . सोनिया वरचा स्वयंसेवी संस्थांचा प्रभाव बहुश्रुत आहे . मंत्री मंडळातले अनेक ज्येष्ठ सदस्य प्रणव मुखर्जी , अर्जुन सिंग हे आपले reporting थेट सोनियांना करायचे . अनेक लोकांच्या मते राहुल गांधी यांनी जेंव्हा राजकारणाच्या गुन्हेगारीचे विधेयक 'nonsense' म्हणून फाडून फेकला होते तेंव्हा तरी आत्म सम्मान दाखवून सिंग यांनी राजीनामा द्याला पाहिजे होता . पण सिंग यांनी त्यावेळेस आपल्या पदाला चिकटून राहणेच पसंद केले
२००९ नंतर आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात मनमोहन सिंग यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर हल्ले झाले . सरकार ची धोरण , भ्रष्टाचार , अकार्यक्षमता यांच्यावर होणारी टीका हि बर्याच अंशी स्वाभाविक असली तरी त्यानिम्मिताने मोठ्या लोकांवर अतिशय घाणेरडी वैयक्तिक टीका करण्याचा ट्रेंड भारतीय राजकारणात रुजला हि खरी घातक बाब . म्हणजे सिंग हे एका 'बाई ' चे ऐकतात म्हणून त्यांच्यावर टीका करणारे लोक मी पाहिले आहेत . त्यांना सत्ताबाह्य केंद्र हा मुद्दा महत्वाचा वाटत नसून एक पुरुषासारखा पुरुष एका बाई चे कसे मुकाटपणे ऐकतो हा मुद्दा महत्वाचा वाटायचा . सर्वात धक्कादायक म्हणजे काही स्त्रिया पण हा मुद्दा हिरीरीने मांडायच्या . मनमोहन सिंग आणि सोनियांची आक्षेपार्ह morphed photograph सगळ्यांनीच पाहिली आहेत . इतिहासातले स्थान वैगेरे राहूच दे पण या देशाच्या अर्थकारणाला कायमचे वेगळे वळण देणाऱ्या सिंग यांचा सरसकट एकेरी आणि मन्नू वैगेरे उल्लेख करणे कितपत योग्य आहे .
देशातील बहुतांश जनसमुदाय हा फारवेळ कुठल्याच लाटेखाली राहत नाही . कदाचित अजून काही वर्षांनी नकारात्मकते चे ढग विरून सिंग यांचे वास्तविक मूल्यमापन हा देश करेल हि अपेक्षा . इतिहास च माझे खरे मूल्यमापन करेल असे विधान करण्यामागे हाच मनमोहन सिंग यांचा उद्देश असेल कदाचित .
वाचने
28417
वाचनखूण
प्रतिक्रिया
79
इतिहास, मनमोहन सिंग आणि मिपा.
In reply to इतिहास, मनमोहन सिंग आणि मिपा. by एस
सहमत !!! स्वॅप्सशी !!
In reply to इतिहास, मनमोहन सिंग आणि मिपा. by एस
मनमोहन सिंग यांनी पुस्तक लिहीले तर ?
लेख
In reply to लेख by तिमा
फायली
In reply to फायली by नितिन थत्ते
आँ????????
In reply to आँ???????? by प्यारे१
हॅ हॅ हॅ
In reply to फायली by नितिन थत्ते
त्याना कळत नसेल. पण त्यांनी
In reply to लेख by तिमा
सहमत
मोदी तरी काय करत आहेत,
In reply to मोदी तरी काय करत आहेत, by नानासाहेब नेफळे
.....जियो....पंडीत नानासाहेब.......
In reply to मोदी तरी काय करत आहेत, by नानासाहेब नेफळे
नगरसेवकपदी निवडुन आलेले लोक
In reply to नगरसेवकपदी निवडुन आलेले लोक by मृत्युन्जय
कसले किंगमेकर नि कसले काय
In reply to मोदी तरी काय करत आहेत, by नानासाहेब नेफळे
काहीतरी गैरसमज होतोय…
In reply to काहीतरी गैरसमज होतोय… by एक स्पष्टवक्ता..
प्रश्न भागवत वा गांधींच्या
In reply to प्रश्न भागवत वा गांधींच्या by नानासाहेब नेफळे
मुळात जेंव्हा आपण एखाद्याचा
In reply to मुळात जेंव्हा आपण एखाद्याचा by एक स्पष्टवक्ता..
नानासाहेब ..
In reply to नानासाहेब .. by विटेकर
भारत देश प्रजासत्ताक आहे,
In reply to भारत देश प्रजासत्ताक आहे, by नानासाहेब नेफळे
नानासाहेब
In reply to भारत देश प्रजासत्ताक आहे, by नानासाहेब नेफळे
मला वाटते धर्म शब्दाचा अर्थ
In reply to मुळात जेंव्हा आपण एखाद्याचा by एक स्पष्टवक्ता..
एक्सपर्ट अँडव्हाईस घेणे
In reply to एक्सपर्ट अँडव्हाईस घेणे by नानासाहेब नेफळे
हे बघा आता विरोधाला विरोधंच
In reply to हे बघा आता विरोधाला विरोधंच by एक स्पष्टवक्ता..
कृपया "साला" च्या ऐवजी "सल्ला
In reply to हे बघा आता विरोधाला विरोधंच by एक स्पष्टवक्ता..
ठीकाय मग, मनमोहन गांधी
In reply to ठीकाय मग, मनमोहन गांधी by नानासाहेब नेफळे
फक्त गांधी घराण्यामुळे एक्सपर्टाईज मिळतो??
In reply to काहीतरी गैरसमज होतोय… by एक स्पष्टवक्ता..
संघ कार्य
In reply to संघ कार्य by चित्रगुप्त
आता माळीन मध्ये देखील संघ
In reply to आता माळीन मध्ये देखील संघ by खटपट्या
संघाचे लोक आपत्तीकाळात काम
In reply to संघाचे लोक आपत्तीकाळात काम by नानासाहेब नेफळे
प्रसिद्धी नको पण अनुल्लेख हि
In reply to संघाचे लोक आपत्तीकाळात काम by नानासाहेब नेफळे
नानासाहेब ..
In reply to काहीतरी गैरसमज होतोय… by एक स्पष्टवक्ता..
संघवाले लगेच आपत्तीच्या ठिकाणी पोचतात !
In reply to मोदी तरी काय करत आहेत, by नानासाहेब नेफळे
नानासाहेब नमो हे संघाचे ऐकत
In reply to नानासाहेब नमो हे संघाचे ऐकत by प्रतापराव
मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते
In reply to मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते by नानासाहेब नेफळे
नेफळेसायेब, हे दोनही नेते
In reply to नेफळेसायेब, हे दोनही नेते by डॉ सुहास म्हात्रे
बर्याच अंशी सहमत, परंतु फक्त
In reply to बर्याच अंशी सहमत, परंतु फक्त by नानासाहेब नेफळे
जे कोणी खरोखर चांगले काम
In reply to नेफळेसायेब, हे दोनही नेते by डॉ सुहास म्हात्रे
कपाटातून ओघळलेली अजून काही
In reply to मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते by नानासाहेब नेफळे
धन्य धन्य ते नानासाहेब..
In reply to मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते by नानासाहेब नेफळे
ज्यांची नगरसेवकपदी निवडून
In reply to ज्यांची नगरसेवकपदी निवडून by आनन्दा
या न्यायाने गोबेल्सही
In reply to मोदी तरी काय करत आहेत, by नानासाहेब नेफळे
मोदी ह्यांनी अनधिकृत बांधकामे
अर्थमंत्री आणि UPA-१ चे
अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू.हे श्रेय अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग याना जितके आहे त्यापेक्षा जास्त त्यावेळचे पंतप्रधान राव यांना आहे. ज्या "दैदिप्यमान" किंवा "धाडसी" सुधारणांचे निर्णय त्या काळात घेतले आणि राबवले गेले ते (एक्झेक्युटीव्ह सत्ताकेंद्राच्या) पंतप्रधानाच्या निर्णयाशिवाय आणि सक्रिय पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते.आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक .जेव्हा तेच किंवा तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी पंतप्रधान म्हणून अंगावर पडली तेव्हा मनमोहन निर्णय पक्षाघाताची (डिसिजन पॅरॅलिसिस) ची शिकार झाले. एवढेच नव्हे तर "मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे आणि त्याच्याकडून भ्रष्टाचार न होण्याची काळजी घेत लोकोपयोगी कामे करून घेणे" हे पंतप्रधानांचे मुख्य कर्तव्य करण्यात ते असमर्थ ठरले. म्हणजे "शासक म्हणून असलेल्या कार्यक्षमतेचा / पात्रतेचा अभाव" ही अपकिर्ती त्यांना स्विकाराविच लागेल. त्यांच्या कार्यकालात पंतप्रधानावर नियंत्रण ठेवणारे अशासकिय सत्ताकेंद्र होते हे मान्य करूनही; मनमोहन यांच्या सारख्या विव्दानाला त्याचा अर्थ आणि त्यामुळे त्यांच्यावर येणारी अधिक जबाबदारी कळली नसावी हे म्हणणे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान होईल. हे सत्य जमेस धरूनही मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार याबातीतची शासकिय व नैतीक जबाबदारी पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर होती हे त्यांना माहित असणारच. पण त्यांनी अश्याबाबतीत शासकिय तर सोडाच पण नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी कोणतेही ठाम पाऊल उचलल्याचे दिसले नाही... केवळ शक्य तेवढे मौन पाळणे पसंत केले. अश्या कृतींमुळे त्यांच्या अग्रक्रमसूचीत इतर काही गोष्टी देशाच्या हितसंबंद्धांच्या वरच्या जागी होत्या हेच सूचीत होते. उत्तम शासकाच्या गुणधर्मसूचीत शैक्षणिक आणि बौधिक पात्रता महत्वाची असते, पण प्रशासकीय आणि नैतिक पात्रता त्यापेक्षा खूप वरच्या जागी असणे आवश्यक असते. मनमोहन यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अग्रक्रमसूचीत या विकल्पांची जागा उलटी झालेली दिसते. त्यामुळे कारणांच्या बाबतीत मतभेद असले तरी इतिहासात, "एक विद्वान (अॅकॅडेनिशियन) असलेला चांगला नोकरशहा (ब्युरोक्रॅट) पण शासन करण्यात असफल व सत्तेतून केव्हा पायउतार व्हावे हे ठरवण्यात असमर्थ ठरलेला शासक" अशीच त्यांची नोंद होईल.In reply to अर्थमंत्री आणि UPA-१ चे by डॉ सुहास म्हात्रे
@इस्पिकचा इक्का उत्तम
In reply to @इस्पिकचा इक्का उत्तम by पिंपातला उंदीर
मला वाटते युपीए १ च्या
In reply to मला वाटते युपीए १ च्या by मृत्युन्जय
माझ्या अल्प माहितीनुसार युपीए
In reply to माझ्या अल्प माहितीनुसार युपीए by संपत
नक्की?
In reply to नक्की? by पुण्याचे वटवाघूळ
इतकी अनागोंदी का माजली?
In reply to मला वाटते युपीए १ च्या by मृत्युन्जय
बाकी २जी स्कॅम आणि मिळकत
In reply to मला वाटते युपीए १ च्या by मृत्युन्जय
बाकी २जी स्कॅम आणि मिळकत
सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली
@अनुप ढेरे थोडी mistake
छान लेख.मी स्वतः गोंधळात आहे
सगळे श्रेय काळाला
आवाज नसलेले कळसुत्र बाहुले !
इतिहास
In reply to इतिहास by चित्रगुप्त
खरे आहे
In reply to इतिहास by चित्रगुप्त
अगदी खरी गोष्ट.
In reply to अगदी खरी गोष्ट. by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणताही 'इतिहास' म्हटला, तर
manmohan singh was never succesed in any time
माननीय मनमोहन सिंग एक
माझे मूल्यमापन
In reply to माझे मूल्यमापन by हुप्प्या
निवडणुकीपूर्वीच्या
In reply to निवडणुकीपूर्वीच्या by डॉ सुहास म्हात्रे
ते मफलरलाल खोकचंद कुठे असतात
In reply to निवडणुकीपूर्वीच्या by डॉ सुहास म्हात्रे
कोणती लेखमाला?
In reply to कोणती लेखमाला? by पुण्याचे वटवाघूळ
बाकी यावर्षी आता ३१ जुलै
In reply to बाकी यावर्षी आता ३१ जुलै by आनन्दा
हहपुवा
मनमोहन सिंगांचे श्रेय
ममो..
ममो द ग्रेट !!
द इकॉनॉमिस्ट
मनमोहन सिंग यांची काही खास
In reply to मनमोहन सिंग यांची काही खास by स्पार्टाकस
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून
मनमोहन सिंग - पंतप्रधान
कसे का करेना...
धाग्यावर Score Settling होत
In reply to धाग्यावर Score Settling होत by पिंपातला उंदीर
हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे
मोलाचे पण
देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या