मी आणि माझा मित्र परिवार भिमाशंकर भ्रमंतीला जाणार आहोत, आम्हाला सर्वाना गणेश घाटातून चढाई करण्याचा ५-६ वर्षाचा अनुभव आहे. परंतु सध्या ६-७ वर्षांचा खंड पडला आहे चढाई करण्यात.
ह्या वेळेस पहिल्यांदाच गणेश घाट सोडून "शिडी घाटाने" जाण्याचा मनसुबा आहे, परंतु शिडी घाट मार्गाचा कोणालाही अनुभव नाहीये. आता पर्यंत बर्याच जणांकडून वेगवेगळी माहिती मिळाली आहे, तसेच जालावर देखील बर्याच चित्रफिती आणि छायाचित्रे बघून झाली आहेत. त्यावरून तरी शिडी घाट मार्ग जर कठीणच आहे अस जाणवतंय. मुख्य म्हणजे मध्ये जो "रॉक पॅच" लागतो त्याबद्दल सर्वांच्या मनात थोडी दहशत, उत्सुकता आणि खुमखुमी देखील आहे (असायलाच हवी ना?).
तर मुद्दा असा आहे कि मिपा तील कोणीतरी नक्कीच "शिडी घाट" मार्गाने भीमाशंकरला गेलेले असतीलच, तेव्हा अनुभवी गिर्यारोहकांनी आम्हा पामरांना "शिडी घाट" मार्गाविषयी थोडे सविस्तर मार्गदर्शन करावे, गरजेच्या सूचना द्याव्यात हि विनंती. तसेच स्वताच्या दुचाकी नेल्यास त्या कुठे पर्यंत नेता येतील आणि गावात वाहनस्थळाची विश्वासार्ह सोय कुठे आहे ते देखील सुचवावे.
वाचने
7888
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
पावसाळ्यात शिडी घाट...!
धन्यवाद स्वॅप्स
In reply to पावसाळ्यात शिडी घाट...! by एस
खरं आहे .जाऊ नका
"शिडी घाटाने" जाऊ नका
शिडी घाटाची जितकी दहशत घातली
भीमाशंकर वृतांत लिहिणारच होतो
आपण लवकरच वृतांत प्रकाशित
In reply to भीमाशंकर वृतांत लिहिणारच होतो by विअर्ड विक्स
संपर्क
विअर्ड विक्स: आपण दिलेली
In reply to संपर्क by विअर्ड विक्स
पावसाल्यात शिडी घाट बन्द
त्या भागांत अतिवृष्टी झाली
'राष्ट्रीय आपत्ती' जाहीर झालेली नाही.
In reply to त्या भागांत अतिवृष्टी झाली by डॉ सुहास म्हात्रे
शिडी घाट
सर्व मिपा सदस्यांचे मनपूर्वक
या तथाकथीत भविकांनी भिमाशंकर
सोमवार आणि विशेषतः सुट्टी
In reply to या तथाकथीत भविकांनी भिमाशंकर by शैलेन्द्र
मुंबई हायकर्सचा ग्रुप त्या
किसन भाऊ..... भूस्खलन हे
डासांनी फोडले याचा अनुभव
ठाणे -वाशी TMT बस नं ११
भिमाशंकर
जय२७८१ ,श्रावण महिना आणि सुटी
कंजूस, धन्यवाद....