लोहगडला आतापर्यंत कितीवेळा गेलोय याची गणतीच नाही. दरवर्षी पावसाळ्यात किमान दोन भटकंती तर येथे हमखास असतातच. घाटमाथ्याजवळ हा सातवाहनकालीन किल्ला असल्याने येथे निसर्गाने अगदी भरभरून दिलेय. यंदा पाऊस तसा उशिराच चालू झाला, येथेही उशिरानेच पण सध्या मात्र तो अगदी धुव्वाधार कोसळतोय. मागच्याच आठवड्यात येथे पुन्हा एकदा जाउन आलो.
लोहगडाचे वर्णन तसे बर्याच वेळा मिपावर येऊन गेल्याने फक्त पाऊस आणि हिरवाई अनुभवा.
१. तुडुंब भरलेली भातखाचरे आणि पेरणीच्या तयारीत असलेले वाफे.
२. पवनेच्या पार्श्वभूमीवरील तुंग किल्ला
३. धुक्यात हरवलेला लोहगड
४. पवनेच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस
५. पायथ्याचा परिसर
६. बुलंद तटबुरुज
७. गणेश दरवाजा
८. धुकटात हरवलेला गड
९. धुकटात हरवलेला गड
१०. धुकं धुकं
११. गडाचा पायरीमार्ग
१२. गडमाथ्यावर
गडमाथ्यावर हल्लीच उत्खनन झालेलं आहे. दोन महिन्यापूर्वीच प्रशांत आणि चौराकाकांबरोबर गेलो होतो तेव्हा इथे फक्त मातीचे ढिगारे होते. पण त्या ढिगार्यांच्या उत्खननातून वाड्यांची जोती, भिंती, खापरी कौले अगदी शौचकूपही नव्याने बाहेर आलेले दिसतात. चर खोदण्याचे काम अगदी सुनियोजितपणे चालू आहे.
१३. नुकत्याच झालेल्या उतखननासाठी खोदलेले चर
१४. खापरी कौलांचे अवशेष
१५. खापरी कौले
१६. वाड्यांची जोती आदी अवशेष
१७. हे सर्व आधी ढिगार्यांखाली गाडलं गेलें होतं
१८. गडावरील सातवाहन गुहा. ह्यांचा वापर कोठारं म्हणून होत असावा.
१९. हिरवाई
२०. प्रचंड पाऊस आणि ढगांच्या आवरणामुळे विंचुकाट्यामुळे जेमतेम २/३ वेळाच अर्धवट दर्शन दिलं.
२१. विंचुकाटा
२२. विंचुकाटा
विंचुकाटा पाहिल्यावर तेथून निघालो. पाऊस कोसळतच होता, आताही कोसळतोय.
वाचने
16382
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त मजा आली चिंब भिजलेला लोहगड बघुन
रविवारीच गेलो होतो.
In reply to मस्त मजा आली चिंब भिजलेला लोहगड बघुन by ज्ञानोबाचे पैजार
अर्र्र.. गेल्या रविवारी तर मी
In reply to रविवारीच गेलो होतो. by प्रचेतस
अरे सहीच.
In reply to अर्र्र.. गेल्या रविवारी तर मी by यसवायजी
अहाहा क्या बात है
आपण जाउ ..
In reply to अहाहा क्या बात है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनी आमी पन येव.
In reply to आपण जाउ .. by चौकटराजा
मना पन येयाचा हाय !! ;)
In reply to आनी आमी पन येव. by धन्या
येयाचा = यायाचा :)
In reply to मना पन येयाचा हाय !! ;) by सूड
चला चला. आम्ही तयार आहोतच.
In reply to येयाचा = यायाचा :) by धन्या
आधी सरांना पुण्यात येऊदे तर.
In reply to चला चला. आम्ही तयार आहोतच. by प्रचेतस
मस्त! सर्व फोटो आवडले...!
In reply to अहाहा क्या बात है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त सहल, छान माहिती आणि फोटो
अर्रे व्वा!! उत्खनन सुरू केलं
पाऊस चुकवून कसेबसे मोजके फोटो
In reply to अर्रे व्वा!! उत्खनन सुरू केलं by किसन शिंदे
मस्त! फोटो आवडले.
सुंदर फोटो,जावंसं वाटायला
झक्कास हो वल्लेश.
मस्तच फटू
दिलखुष!
छान .त्या भुलेश्वरचं काय झालं
भुलेश्वर रद्द झालं ओ. :(
In reply to छान .त्या भुलेश्वरचं काय झालं by कंजूस
एक नंबर!!!! उत्खनन सुरू आहे
ते कोण करतंय काही कल्पना नाही
In reply to एक नंबर!!!! उत्खनन सुरू आहे by बॅटमॅन
स्वयंसेवी संस्थांना अशी गडावर
In reply to ते कोण करतंय काही कल्पना नाही by प्रचेतस
माहित नाही पण जोपर्यंत गडावर
In reply to स्वयंसेवी संस्थांना अशी गडावर by धन्या
ओह अच्छा. स्वयंसेवी संस्था
In reply to ते कोण करतंय काही कल्पना नाही by प्रचेतस
वावा..
+१
In reply to वावा.. by स्वाती दिनेश
वल्लीशेठ, नेहमीप्रमाणे फोटो
किल्ल्याचे आज जे बांधकाम
In reply to वल्लीशेठ, नेहमीप्रमाणे फोटो by सुहास झेले
म्हणजे
In reply to किल्ल्याचे आज जे बांधकाम by प्रचेतस
नाय ब्वॉ.
In reply to म्हणजे by चौकटराजा
ओ चौराकाका, वल्ल्याच्या
In reply to म्हणजे by चौकटराजा
शक्य आहे
In reply to ओ चौराकाका, वल्ल्याच्या by किसन शिंदे
बाउन्सर नाय हो.
In reply to शक्य आहे by चौकटराजा
अचानक हे कबरींचे पेव का आणि
In reply to किल्ल्याचे आज जे बांधकाम by प्रचेतस
एक छोटीशी कबर होती मूळात.
In reply to अचानक हे कबरींचे पेव का आणि by यशोधरा
असंच होत असतं, आधी चारेक
In reply to एक छोटीशी कबर होती मूळात. by प्रचेतस
परमेश्वर निर्गुण आहे असं मानत
In reply to असंच होत असतं, आधी चारेक by सूड
कठोर पावले उचलणे गरजेचे आहे
In reply to असंच होत असतं, आधी चारेक by सूड
उचलणार कोण ब्याट्या, लग्गेच
In reply to कठोर पावले उचलणे गरजेचे आहे by बॅटमॅन
होय, म्हणून जर-तरची भाषा केली
In reply to उचलणार कोण ब्याट्या, लग्गेच by सूड
मस्त रे वल्ली.
विंचुकाटा भारीच!
नाय ओ.
In reply to विंचुकाटा भारीच! by अत्रुप्त आत्मा
विसापूर माझा आवडता किल्ला...
In reply to नाय ओ. by प्रचेतस
तुला 'आता' जमेल यायला? ;-)
In reply to विसापूर माझा आवडता किल्ला... by सुहास झेले
तुला जमतंय की लेका... तूच
In reply to तुला 'आता' जमेल यायला? ;-) by किसन शिंदे
जायच्या आधी सांगा रे!!
In reply to तुला 'आता' जमेल यायला? ;-) by किसन शिंदे
अजून वेळ आहे.
In reply to जायच्या आधी सांगा रे!! by सूड
विंचुकाटा भारीच!
In reply to विंचुकाटा भारीच! by अत्रुप्त आत्मा
बुवा तासभर पुरेसा होतो
In reply to विंचुकाटा भारीच! by अत्रुप्त आत्मा
सुस्स्स्स्स्साटच फोटो !
उत्खननाचे फटू काढायला परत कधी
अनवट वाटांनी
आई गं चिंब भटकंती
वा!!
लय भारि पन गुहेत गेला नहित
हल्ली तिथं जावेसे वाटत नाही
In reply to लय भारि पन गुहेत गेला नहित by सुहास पाटील
मला पण ..