Virtual जगात चतुर माणसाने दुकाने थाटली आणि Online Shopping उदयास आले आणि माणसाची Window Shopping ची हौस एका Click वर येउन टेपली.
Online Shopping ने इतर Online सोयीप्रमाणे ब-याच गोष्टी सोप्या केल्या पण विश्वासहर्ता संपादन करण्यात अपयशी ठरल्या आहेत
खरंच Online Shopping विश्वासहर्त आहे का?, तुमचे चांगले वाईट अनुभव share करा.
वाचने
16818
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
जालावरुन काय घ्यावे आणि काय
जालावरुन काय घ्यावे आणि काय घेउ नये ह्याची समज असली तर काहीच अडचण येत नाही.
पुस्तके, मोबाईल, इलेक्ट्रिनिक गोष्टी, शूज्, पडदे अश्या अनेक गोष्टी जालावर मस्त मिळतात.
शक्यतो मिंत्रा.कॉम ,
शक्यतो मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम वर फसगत होत नाही हा माझा वैयक्तीक अनुभव
नक्कीच आहे
नक्कीच आहे. आणि खरं बघायला गेलं तर धोका प्रत्यक्ष खरेदीतही आहे की. त्यामुळे ऑनलाईन खरेदी म्हणजे मग किती सेफ वगैरे असे प्रश्न एकांगी होतात. तेंव्हा,
१. प्रचलित संकेतस्थळांवरूनच खरेदी करणे
२. संकेतस्थळाचा पत्ता एचटीटीपीएस ने सुरू होतो याची खात्री करणे (पेमेंट गेटवे)
३. शक्यतो सायबर कॅफेतून खरेदी न करणे
या खबरदा-या घ्याव्यात.
आता उरला वस्तूबाबत फसगतीचा भाग. तर मला तरी असा वाईट अनुभव नाही. अन्नेक गोष्टी मी ऑनलाईन घेतो. एक दोन वेळा गोष्ट तुटकी आली होती, वर्णनाप्रमाणे नव्हती, तेंव्हा ती परत केली. तीही प्रक्रीया अतिशय स्मूथ होती. गोष्ट घरून पिकअप करून नेली, व पैसे क्रेडिट झाले (पॉइंट्स च्या स्वरूपात). अर्थात मी इतर गोष्टी घेताना ते वजाही झाले.
बूट्/चपला, कपडे अशा गोष्टी मी घेत नाही. त्यात साईझ चा लफडा होतो. बाकी इलेक्ट्रॉनिक्स, पर्फ्यूम्स, आणि सानस/फिटिंग ची भानगड नसणारं काहीही घेण्यात प्रॉब्लेम नाही उलट सोयच आहे.
आवडत्या साईट्स
१ स्नॅपडील
२ फ्लिपकार्ट
३ अमेझन
४ ईबे
या बेस्ट
२ फ्लिपकार्ट
In reply to आवडत्या साईट्स by वेल्लाभट
ही दोन खरेदी-स्थळे अगदी डोळे झाकून खरेदी करावीत ईतपत चांगली आहेत.
आपल्याला उत्तम वस्तू मिळावी याची काळजी जेव्हढी खरेदीदाराला असते तेव्हढीच खरेदीदाराचा आपल्याकडे खरेदी करण्याचा अनुभव सुखद असेल याची काळजी या दोन खरेदी-स्थळांना असते.
मात्र अॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रीटेल" सप्लायर असणार्या वस्तू खरेदी कराव्यात.
मात्र अॅमेझॉन इंडीयावर खरेदी
In reply to २ फ्लिपकार्ट by धन्या
मात्र अॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रील" सप्लायर असणार्या वस्तू खरेदी कराव्यात.> धन्यवाद
फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली.
In reply to २ फ्लिपकार्ट by धन्या
फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे.
फ्लिपकार्टी =)) =)) धन्य _/\_
In reply to फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. by आदूबाळ
फ्लिपकार्टी =)) =)) धन्य _/\_
धंद्याचा विचार करावा लागतो
In reply to फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. by आदूबाळ
धंद्याचा विचार करावा लागतो मालक. Amazon Fullfilled वर रकमेचे बंधन नाही कारण त्यांचा अजून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत जम बसायचा आहे.
सहमत.
In reply to फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. by आदूबाळ
फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे.
१०० ट्क्के सहमत.
-दिलीप बिरुटे
कोणाला गमट्री या वेबसाईटचा
कोणाला गमट्री या वेबसाईटचा अनुभव आहे का?
(आयला! स्वसंपादन!)
खरं की काय?!
In reply to कोणाला गमट्री या वेबसाईटचा by आदूबाळ
खरं की काय?!
खरंच की!!!!
गेलं आता. इट वॉज टू गुड टू बी
In reply to खरं की काय?! by पिलीयन रायडर
गेलं आता. इट वॉज टू गुड टू बी ट्रू...
खरंच की काय???
In reply to गेलं आता. इट वॉज टू गुड टू बी by आदूबाळ
खरंच की काय???
(ह्याच्या खाली खरंच की! अशी ओळ असेल तर.. सॅडली इट्स ट्रू)
नसेल तर*...
In reply to खरंच की काय??? by पिलीयन रायडर
नसेल तर*...
द्या की राव संपादन.. बरं नव्हतंच द्यायचं तर थोडावेळ तरी कशाला सुरु केलं?
+१
In reply to नसेल तर*... by पिलीयन रायडर
नै तं काय? उगा एस एस पी डी (स्वसंपादन पे धोका) केला राव आमचा.
>>एस एस पी डी __/\__
In reply to +१ by बॅटमॅन
>>एस एस पी डी
__/\__
online खरेदीसाठी Filpkart
online खरेदीसाठी Filpkart बेस्ट... वेल्लाभट यांनी सांगितल्याप्रमाणे Sizecha घोळ होतो खरा... पण मला Quechua चे shoes ची Size replacement दोन दिवसात कोणताही खर्च न करता मिळाली. याचे कारण FLIPKART चे स्वतःचे Logistics आहे.
online shopping चा चांगला
online shopping चा चांगला अनुभव आहे.
amazon and homeshop18 चा चांगला अनुभव आहे.
cash on delivery चा पर्याय कायम आवडतो.
होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी
होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी करु नका. डुप्लिकेट वस्तु गळ्यात मारतात. बाकी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडिल्स मस्त आणि विश्वासार्ह आहेत. शक्यतो कॅश ऑन डिलीव्हरीच घ्या.
शक्यतो कॅश ऑन डिलीव्हरीच घ्या.
In reply to होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी बराबर.
मलाही चांगला अनुभव
आलाय,मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम नेहमी ३७ % ते ४०% ओऑफ देतात् +अऑथेंटीक प्रॉड्क्ट्स
मज्जानु लाइफ
अॅमेझॉनने माझी दोन छोटी
अॅमेझॉनने माझी दोन छोटी पार्सले एक ८ महिन्यांपूर्वी व दुसरे ३ महिन्यांपूर्वी मागवलेले अजून दिले नाहीये. त्या वस्तू ष्टॉकमध्ये नाहियेत म्हणे!
त्यांच्या संमंला...आपले
In reply to अॅमेझॉनने माझी दोन छोटी by रेवती
त्यांच्या संमंला...आपले कस्टमर केअरला इचारून बघा ना.
उडणार बहुदा!!
In reply to त्यांच्या संमंला...आपले by विश्वनाथ मेहेंदळे
उडणार बहुदा!!
पण तरी... खिक्क!!!
त्यांच्या संमंने ष्टॉक आला की
In reply to त्यांच्या संमंला...आपले by विश्वनाथ मेहेंदळे
त्यांच्या संमंने ष्टॉक आला की पाठवतो, हितं दुसरी कामं न्हैत काय? सारखं इच्चारायचं काम नै, आपल्याला आसलं आयकून घ्याची सवे न्हाई! असं उत्तर पाठीवलय.
सगळीकडं एकाच दुकानातनं एकाच
In reply to त्यांच्या संमंने ष्टॉक आला की by रेवती
सगळीकडं एकाच दुकानातनं एकाच मजकुराचे श्ट्याम्प जातेत काय? ;)
हाव! तसं ट्रेनिंगच आस्तय!
In reply to सगळीकडं एकाच दुकानातनं एकाच by प्यारे१
हाव! तसं ट्रेनिंगच आस्तय! नाईतर लोकं जगू द्याची न्हाईत!
तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू
In reply to त्यांच्या संमंने ष्टॉक आला की by रेवती
तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू करा ना त्याना.
त्याना सांगायचा, मी आर्डर ठेवली तवा तुमच्या शिष्टीमनी वस्तू हायेत म्हनून दाकवलान. आता ष्टॉकमदी नाय तं तो तुमचा प्रॉब्लेम हाय.
आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे
In reply to तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू by धन्या
आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे झाकण आणि अशीच दोन की तीन डॉलरची एक मिक्सरची रिंग (गास्केट) एवढेच र्हायलेय म्हणून गप्प बसलेय. एकदा तर अनेक वस्तूंबरोबर मागवलेली सन ग्लासेसची केस ५$ असून त्यांनी चायनातून पाठवली. वाईट वाटले की त्याच्या प्याकिंगवर जास्त खर्च केला होता त्यांनी. आता बहुतेक मिक्सर मोडणार आणि नवा घेतल्यावर यांच्या वस्तू येणार. जाऊ दे! क्यानसल करते.
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला
In reply to आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे by रेवती
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मनाच्या श्लोकांमधली "दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू ॥" ही ओळ आठवली. :)
धन्या, लग्न झालं की कळेल.
In reply to तुमचा हा प्रतिसाद वाचून मला by धन्या
धन्या, लग्न झालं की कळेल.
दीनाचा दयाळू की नव्याचा आशाळू ते. ;)
प्यारे काकांना आज लैच गफ्फा
In reply to धन्या, लग्न झालं की कळेल. by प्यारे१
प्यारे काकांना आज लैच गफ्फा मारायच्यात जनु!
ईद मुबारका जी ईद मुबारका! ;)
In reply to प्यारे काकांना आज लैच गफ्फा by रेवती
ईद मुबारका जी ईद मुबारका! ;)
छे! कनवाळू काय? ५$ च्या
In reply to तुमचा हा प्रतिसाद वाचून मला by धन्या
छे! कनवाळू काय? ५$ च्या वस्तूला इतके प्याकिंग होते! किंवा अनेक वस्तूंबरोबर पोष्टाची तिकिटेही मागवली. तर ८ लहान वस्तूंची ८ छोटी बॉक्सेस आली. काय उगीच वाया घालवायचं! असं वाटलं. पोस्टाच्या तिकिटांच्या एका पट्टीला एक साधे पाकीट, दोन जाड पुठ्ठ्याची पाकिटे आणि हे सगळे एका बॉक्समध्ये! हे म्हणजे पार्सल नको पण पॅकिंग आवर म्हणावेसे वाटते. ;) शूज मात्र ऑनलाईन मागवायला आवडतात कारण तिथे जास्त व्हरायटी असते. दुकानात इतके प्रकार बघायला मिळत नाहीत.
ऑनलाईन खरेदीचा काही अनुभव
ऑनलाईन खरेदीचा काही अनुभव अजुन तरी नाही...
पण या ऑनलाईन खरेदीच्या मागे असणार्या सिस्टमवर थोडे फार काम केलं आहे, ज्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट { TMS } आणि इआरपी असे म्हणतो ... अमेरिकेतली मोठी आणि जगातल्या सगळ्यात मोठी होलसेल टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट डिस्ट्रुब्युटर असलेल्या कंपनीसाठी हे काम केल आहे, त्यामुळे अॅमॅझॉन किंवा फ्लीपकार्ट बॅक एंड ला कसे काम चालते याचा थोडाफार अंदाज आहे... अगदी उदा. द्यायचे असेल तर ख्रीसमस असेल, थॅक्स गिव्हींग असेल किंवा फलाणा फलाणा ऑफर चालु असेल तर नेहमीच्या वस्तुंचे दर हे कमी केलेले असतात, आता हे दर कुठे तरी अपडेट केले जातात, हे ज्या ठिकाणी केले जातात त्या सिस्टीमचा किंचीतसा भाग मी पाहिला आहे...
आता हा ऑनलाईन शॉपिंगचा विषय असल्याने ४ ओळी खरडण्याचे कष्ट घ्यावे म्हणतो... ;)
तर जालावर सध्या चर्चा आलु आहे ती म्हणजे अलिबाबाची... अलिबाबा आणि चाळीस चोरवाला हा अलिबाबा नव्हे बरं का...
तर या अलिबाबाचा आयपीओ येणार आहे, जो सध्या काही काळ लांबणीवर गेल्याची चर्चा आहे....या आयपीओ मधुन अलिबाबा १५ ते २० बिलीयन युएस डॉलर्स जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेण्या आणि ठेवण्यासारखे आहे की एकट्या अलिबाबाचा सेल्स हा अॅमॅझॉन + ईबे सारख्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे.
आता... इथे बरेच खिलाडी आहेत...त्यात गुगल सुद्धा आहे. {गुगल कुठे नाही ? ;) } मध्यंतरी गुगले ने त्यांचा सर्च अल्गोरिदम बदलला होता आणि त्याचा फटका ईबे ला बसला होता. हे सगळं झालं ते गुगल ने पांडा ४.० रोलआउट केल्यामुळे.
हे सगळ असं का झालं ? या सगळ्या बद्धल इथे माहिती मिळेल :-
Deconstructing eBay.com’s Organic Loss Using SEMrush
How Google's Latest Algorithm Update Hurt eBay
बरं ईबे ची स्थिती अजुन एका गोष्टीमुळे खराब झाली होती की त्यांच्या जवळपास १४५ मिलीयन युजर्सची अकाउंटस हॅक केली गेली, आणि ईबे ला आपल्या युजर्सनी त्यांचे पासवर्ड बदलावे ही सांगण्याची वेळ आली.
संदर्भ :- EBay asks 145 million users to change passwords after cyber attack
बरं इथे अलिबाबाचे वेगवेगळे डील करण्याचे उध्योग चालुच आहेत त्यातलीच एक याहु बरोबरची रिस्ट्रक्चरींग्ची डील.
संदर्भ :- Alibaba ClosesUS$7.6 BillionShare Repurchaseand Restructuring of Yahoo! Relationship
थोडक्यात :- चीनी अलिबाबा येत आहे. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu
वर धान्याने सांगितल्याप्रमाणे
वर धान्याने सांगितल्याप्रमाणे अमेझोन वर डोळे झाकून खरेदी करावी.
होमशॉप १८ टाळा
होमशॉप ग्राहक सेवेचा वाइट अनुभव आहे, फक्त आश्वासने देतात, तसेच नकारात्मक रिवव्हू पोस्ट करत नाहित.
कोनतिहि online खरेदि करन्यापुर्वि https://www.mouthshut.com वर वस्तु किंवा साईट चे रेटिंग व रिव्हू तपासुन पहा उपयोग होतो.
flipcart, amazon, infibeam चा अनुभव उत्तम, shopclues, tradus वस्तु हलक्या quality च्या असतात.
फ्लिपकार्ट्चा अनुभव उत्तम..
फ्लिपकार्ट्चा अनुभव उत्तम.. चक्क २४ तासात सुद्धा पुस्तकं मिळाली आहेत.. किमती पण कमी असतात..
+१
In reply to फ्लिपकार्ट्चा अनुभव उत्तम.. by पिलीयन रायडर
असेच म्हणतो. अॅमेझॉनचाही अण्भव अत्युत्तम. आम्रविका आणि भारत दोन्हीकडून पुस्तके मागवली. ऑनलाईन वर्णनास सुसंगत प्रॉडक्ट होता.
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात.
बाकी online shopping करताना सर्व संकेत स्थळांवर वस्तूची तुलना करून ती विकत घ्या. Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे.
शक्यतो cash on delivery चा पर्याय निवडा. जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर
In reply to पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर by मोग्याम्बो
सहमत.
याच्याशीही सहमत. Flipkart ऑनलाईन खरेदी करताना ती वस्तू आमेझॉन इंडीया वर उपलब्ध आहे का पाहावे. अॅमेझॉनवर वस्तू फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त मिळतात असा माझा आमेझॉन इंडीया सुरु झाल्यापासूनचा अनुभव आहे. :)
हे कशासाठी?
>>हे कशासाठी
In reply to पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर by धन्या
>>हे कशासाठी
मनाचे समाधान. शिवाय वेब applications कशी चालतात याबद्दलचे गैरसमज वगैरे वगैरे.
अॅमेझॉन वर बाकी वस्तु पण
अॅमेझॉन वर बाकी वस्तु पण चांगल्या मिळतात का?
आम्ही आमच्या एका भटजी
In reply to अॅमेझॉन वर बाकी वस्तु पण by पिलीयन रायडर
आम्ही आमच्या एका भटजी मित्रासाठी मोटो ई फोन मागवला होता. चांगला चालतोय म्हणे.
पुस्तके खरेदीसाठी अॅमेझॉन इंडीया सारखे दुसरे खरेदीस्थळ नाही.
मोटो इ फ्लिपकार्ट वर
In reply to आम्ही आमच्या एका भटजी by धन्या
मोटो इ फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव आहे. तुम्हास तो अमेज़न वर कसा काय मिळाला?
हाच प्रश्न पडला...
In reply to मोटो इ फ्लिपकार्ट वर by प्रचेतस
हाच प्रश्न पडला...
माफी असावी. गडबड झाली.
In reply to हाच प्रश्न पडला... by पिलीयन रायडर
माफी असावी. गडबड झाली.
भटजी च्या ...
In reply to मोटो इ फ्लिपकार्ट वर by प्रचेतस
भटजी कडे असलेल्या तोफखान्याला फ्लिप्कार्ट घाबरले व त्यानी एक्स्क्लूजिव्ह चा क्लेम सोडून दिला अशी शिंव्हगड रस्ता नेटवर्क वर न्यूज आहे म्हणे.
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्लीपकार्ट आणि अमेझॉन चा चांगला अनुभव आहे - विश्वासार्ह अश्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स.
स्नॅपडिल चा मात्र अनेकदा वाईट अनुभव आला आहे. त्यांच्या प्रोडक्ट च्या किमती तुलनेने कमी असतात पण क्वॉलीटीशी फार कॉम्प्रमाईज करून घ्यावं लागतं. अत्ता पर्यंत मागवलेले क्वील्ट, पर्स काही खेळण्या फार कमी दर्जाच्या आहेत. हिम्मत करून एकदा मायक्रोव्हेव मागवला तर अक्षरशः एका बाजूने तो चेपला होता. अर्थात हे कुरीयर वाल्यांकडून झालं असावं पण तो परत करता करता आणि 'रिफंड' मिळवता मिळवता नाकी नऊ आहे आणि हाती काही न येता खूप काम वाढ्लं (ते डॅमेज प्रोडक्ट चे फोटो काढा, पाठवा, फोन वर फॉलोअप घ्या, त्यांच्या दिवसातून येणार्या ४-४ कॉल्स ला तीच तीच उत्तरं द्या) .. त्या अनुभवा नंतर स्नॅपडील चं नाव यादीतुन कायमचं वगळलं.
कपड्यांच्या बाबतीत मिंत्रा, जेबाँग शिवाय 'झोवी' zovi ह्या साईट वर ही चांगला अनुभव आला. फास्ट डिलीवरी आणि एक्स्चेंज्/रिटर्न खुप सोप्प विना कटकट :)
आजच्या म.टा. मधील बातमी:
आजच्या म.टा. मधील बातमी: ऑनलाइन शॉपिंगमध्ये ‘फ्लिपकार्ट’चं लय भारी!
Group on deals
Group on deals चा अनुभव असल्यास कृपया share करा.....