संत ज्ञानेश्वर व आपण
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी धर्मज्ञान प्राकृतात असावे असा आग्रह धरला व आपले धर्मविषयक विचार `पाली’ या तत्कालीन लोकभाषेतून लोकांसमोर मांडले. धर्मज्ञान सर्वांसाठी खुले करून समानतेची शिकवण दिली.
यासारख्या महापुरुषांच्या शिकवणीतून काही गोष्टी आपल्या सगळ्यांना शिकता येतील का ?
माणसाची योग्यता, जन्मावर आधारित नसून, ती त्याच्या गुणांवर, चारित्र्यावर, मनोवृत्तीवर व सदाचारावर असते.
माणसाची योग्यता, जशी वंशपरंपरेने ठरवली जाऊ नये तशीच ती त्याच्या बोलीभाषेच्या शुद्धतेवरुन ठरवली जाऊ नये.
प्रतिक्रिया
.
चांगला विचार आहे.
यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद:
तो पॅरेग्राफ जरा मराठीत लिहाल
मराठी!
@ धर्मज्ञान सर्वांसाठी खुले
ज्ञानेश्वर
बाकी मला असे वाटते की सारे
सारे वैज्ञानिक ज्ञान कोणत्याही एकच एकमेवाद्वितीय भाषेत नाही
ऑन सेकंड थॉट
तुमचे
आजच्या संस्कृतीतील हीच ऐक ज्ञानगंगा …