बटाटा+कांदा+टोमॅटो उत्तरप्रदेशी भाजी
बनारस च्या बाजूला अशा प्रकारची बटाटा+कांदा+टोमॅटो ची भाजी करतात. आमच्या एका बनारसी मैत्रिणीची ही रेसिपी.(मैत्रिणीचे वय असेल ६६,६७-- मैत्रीला मात्र वय नसतं,:))
साहित्य -
५ ते ६ मध्यम आकाराचे बटाटे, २ कांदे,२ टोमॅटो,तेल २ चमचे, हिंग, हळद, थोडे आले, कोथिंबीर
धने पावडर २ चमचे, २ हिरव्या मिरच्या,मीठ
कृती -
बटाटे साले काढून मोठे तुकडे करुन घेणे,कांदे,टोमॅटोचे ही मोठे तुकडे करणे.बटाटा , कांदा, टोमॅटो यांचे मोठ्ठे तुकडे करावे नाहीतर लगदा होतो.एका बटाट्याच्या ४ फोडी आणि कांदा व टोमॅटोचे ही मोठे तुकडे करावे.
तेल गरम करणे,त्यात हिंग घालणे.हळद घालणे.बटाट्याचे तुकडे घालणे.थोडे आले किसून घालणे,धने पावडर घालणे,हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणे,मीठ घालणे,पाउण कप पाणी घालणे. झाकण ठेऊन मंद आचेवर ठेवणे. जेव्हा बटाटे अर्धे शिजतील तेव्हा कांदे व टोमॅटो घालणे व परत झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवत ठेवणे.पूर्ण एकजीव व्हायला हवे.
आपण नेहमी तेलावर आधी कांदा टाकतो,मग इतर भाज्या..पण इथे मात्र उलट आहे.
वरून कोथिंबीर घालून सजवणे.

याद्या
7399
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
वेगळी
मी जेव्हा
In reply to वेगळी by मीनल
हाहाहा.
In reply to मी जेव्हा by घाटावरचे भट
हाहाहा.
In reply to मी जेव्हा by घाटावरचे भट
.
भाजी सोप्पी दिसते करायला.
वाटते तितकी सोप्पी नाही ही भाजी करायला....
काय
In reply to वाटते तितकी सोप्पी नाही ही भाजी करायला.... by ललिता
स्वातीवहि
हाहाहाहा...
उत्तर प्रदेशिय भाजी
आम्ही रोज