
भुलेश्वर, १२/१३ व्या शतकात खोदले गेलेले यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर.
भूमिज शैली असलेल्या ह्या मंदिरावर चालुक्य शिल्पकलेचा दाट प्रभाव आहे. यादवांनंतर ह्या मंदिराला वाईट दिवस आले. आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात ह्या मंदिराभोवतीच्या टेकडीवर कोट उभारून त्यास दौलतमंगळ हे नाव देण्यात आले. कोटाचे बुरुज आजही दृश्यमान आहेत. औरंगजेबाच्या दख्खन स्वारीत ह्या मंदिराची तोडफोड करण्यात आली, इथली अतिसुंदर शिल्पे घणांचे घाव घालून भग्न करण्यात आली पण इतकी तोडफोड झाली असूनही आजही त्यांचे मूळचे सौंदर्य काही लपत नाही.
१८ व्या शतकात ह्या मंदिराचे भाग्य पुन्हा उजळले. पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे मंदिराचा बाह्य भाग हा पेशवेकालीन आणि इस्लामिक अशा मिश्र शैलीचा बनला तर अंतर्भाग मूळ शैलीतच राहिला. पण ह्या जीर्णोद्धारात काही शिल्पपट चुकीच्या ठिकाणी बसवले गेले. मंदिरात बारकाईने पाहायला जाता हे चुकलेले शिल्पपट आपल्या नजरेस पडतात.
काय आहे ह्या शिल्पसमृद्ध मंदिरात?
विभिन्न शैलींचे मिश्रण, कोरीव स्तंभ, स्तंभावरील छत तोलून धरणारे विविध मुद्रांतील भारवाहक यक्ष आणि यक्षिणी, रामायण आणि महाभारतातील शिल्पपट, सप्तमातृका, प्रतिहारी आणि सुरसुंदरी
तर आपण येणार ना हे मंदिर पाहायला आमच्याबरोबर शनि. २६ जुलै २०१४ रोजी?
वेळ:
शनि. सकाळी साधारण ११.३० पर्यंत पोहोचणे अपेक्षित. पुण्याहून आम्ही ९.३० च्या दरम्यान निघू.
जावे कसे:
पुणे- सोलापूर महामार्ग
हडपसर - लोणी काळभोर - उरुळीकांचन करून यवतच्या अलीकडच्या टोलनाक्याच्या (दुसरा टोलनाका, पहिला लोणी काळभोरच्या जवळ लागतो) सुमारे दिड किमी पुढे उजवीकडे वळणारा फाटा आहे. त्या रस्त्याने आत गेल्यावर भुलेश्वर मंदिर साधारण ८ किमी. (हडपसरपासून ४५ किमी)
टोलनाक्याजवळ आल्यावर टेकाडावरील भुलेश्वर मंदिर त्याच्या सन्निध असलेल्या रेडियो टॉवर मुळे सतत खुणावत राहते.
आम्ही बाईकने जाणार आहोत. जे बाईकने येतील त्यांच्यासाठी हेल्मेट अत्यंत आवश्यक. चारचाकीने येणारे थेट मंदिरापाशी आम्हास गाठू शकतील.
मंदिर पाहण्यास तासभर पुरेसा आहे. तिथून साधारण ३ वाजता परत निघून ५ पर्यंत पुण्यास पोहोचणे अपेक्षित आहे.
आतापर्यंत सहभाग नक्की केलेले सदस्य
धन्या
सूड
प्रसाद गोडबोले
तर येणार ना आमच्याबरोबर सुरसुंदरींच्या राज्यात भटकायला?
मी पयला..
वाचतोय .
हुकला....
In reply to हुकला.... by मुक्त विहारि
+१
In reply to +१ by एस
वेळ तशी ढोबळमानानेच दिली होती
In reply to वेळ तशी ढोबळमानानेच दिली होती by प्रचेतस
:-)
In reply to :-) by एस
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रचेतस
मी पण येणार - स्पॅप्स कॅमेरा
In reply to मी पण येणार - स्पॅप्स कॅमेरा by मनिष
@वल्लीशेट
In reply to @वल्लीशेट by एस
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
"पयला"
In reply to "पयला" by एस
करा आता आयडी 'स्वॅप'
In reply to करा आता आयडी 'स्वॅप' by प्रचेतस
किंवा जीवनभौंच्या भाषेत
In reply to किंवा जीवनभौंच्या भाषेत by बॅटमॅन
नशीब 'स्वाँप' नाय म्हणलात!
In reply to वेळ तशी ढोबळमानानेच दिली होती by प्रचेतस
सुंदर फोटो.
काही कामामुळे २६ ला येणे
वा...
येतो म्हटलं खरं पण जरा साशंक
शुभेच्छा!!!
सहीच... शुभेच्छा
खुप वेळा जाऊन आलोय सुंदर आहे.
मस्त बेत आहे,अगोदर भेट दिलेली
In reply to मस्त बेत आहे,अगोदर भेट दिलेली by प्राध्यापक
गाभार्यातील शिवपिंडि चा वरचा
In reply to गाभार्यातील शिवपिंडि चा वरचा by प्रचेतस
मूर्तिभंजक
In reply to मूर्तिभंजक by एस
माहिती म्हणजे अशी काही खास
कटाप
चला वल्लीबुवांची लाडकी पल्सार
बर्याच मिपाकरांना शनिवारी
शेवट्चा धागा बघुन आनद झाला.
In reply to शेवट्चा धागा बघुन आनद झाला. by ताल लय
ओ ताल लय
मी पण
In reply to मी पण by बाबा पाटील
पाटलानुं, रद केलांय तां
कधी जायाचं?