Skip to main content

टि टाईम स्नॅक्स प्रकार ३ - राजस्थानी तिक्कर

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 22/07/2014 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
Tikkar1 साहित्यः १. मक्याचं पीठ - १ बाउल २. बीया काढुन बारीक चीरलेले टोमॅटो - १ बाउल ३. पेस्ट - १ बाउल (पेस्ट साठि १ मध्यम कांदा, ३ पाकळ्या लसुण, पेरभर आलं आणि २ हिरव्या मिरच्या) ४. साजुक तुप - २ मोठे चमचे ५. गव्हाचं पीठ - १ बाउल ६. मुठभर बारीक चीरलेली कोंथिंबीर ७. बारीक किसलेलं गाजर - १ बाउल ८. चवीनुसार मीठ ९. तिक्कर भाजण्यासाठि साजुक तुप किंवा बटर Sahitya कृती: १. एका बाउल मधे मक्याचं आणि गव्हाचं पीठ एकत्र करुन त्यात साजुक तुप घालुन सारखं करा. तुप सर्व पिठाला लागेल असं बघा. असं केल्याने तिक्कर आतुन खुसखुशीत होतो peeth & tup २. आता त्यात अनुक्रमे बारीक चीरलेले टोमॅटो, वाटलेली पेस्ट, कोंथिंबीर, गाजर आणि चवीनुसार मीठ घालुन गोळा मळा. शक्यतो पाण्याची गरज भासत नाहि. टोमॅटो आणि वाटलेल्या पेस्ट्चा अंगभुत ओलावा पीठ मळण्यास पुरेसा होतो mix all gola ३. पोळपाटावर पीठ पसरुन थालीपीठ थापतो त्या प्रमाणे तिक्कर थापा. स्टिलचं उलथण्यानी अलगद काढुन नॉन स्टिक तव्यावर साजुक तुप / बटर घालुन दोन्हि बाजुनी खरपुस भाजा thapa kadha bhaja ४. गरमागरम तिक्कर आवडत्या चटणी, सॉस, लोणचं किंवा चहासोबत सर्व करा. हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात (हो हो...निदान मला तरी थालीपीठ चहात बुडवुन खायला आवडतं *smile* Final 2 टिपः १. ह्यात वेगवेगळ्या भाज्या घालुन वेगवेगळ्या प्रकारे तिक्कर करता येईल. उदा. बारीक चीरलेल्या कांद्याची पात + पालक घालुनहि छान लागेल

वाचने 13689
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

अरे व्वा! राजस्थानी थालीपिठ करून पाहिलेच पाहिजे. मला हे लोणच्या बरोबरच, दहि किंवा/आणि लोण्याबरोबर जास्त आवडेल.

In reply to by मनिष

काका लोण्याबरोबर तर कशाचीच सर येणार नाहि. गर्मागरम तिक्करवर लोण्याचा गोळा....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं

@हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात>>> फोटो पाहूनच खात्री पटली होती..आणि अत्ता दुपारच्याला (आजच्या पावसाळी वातावरणात..) हे मिळावं अशी लै लै विच्छा होते आहे!

आज एकादशी असल्यामुळे आम्ही आजच्या दिवस तूर्तास साबुदाणा वडे आणि चटणी इतकुश्याच अन्नावर जिवंत रहायचे ठरवलेले आहे. म्हणून धागा वाचला तरी वाचला नाही असे समजून पास करत आहे. ;-)

खासच आहे ही पाकॄ! फोटो ही छान आलेत. घटकही उत्त्म आहेत खाण्यासाठी. धन्यवाद. तिक्कर हा शब्द प्रथमच ऐकतो आहे. राजस्थानात नेमक्या कोणत्या प्रांतात होतो हा पदार्थ? कारण मेवाड, मेवात आणि मारवाड मध्ये असतांना नाही ऐकला/खाल्ला कधी! त्यामूळे उत्सुकता आहेच. (दिल्ली/पंजाबातही "सरसोंदा साग और मकईदी रोटी" हमखास बनतो.)

In reply to by आयुर्हित

हा राजस्थान मधल्या नक्कि असा कुठल्या प्रांताचा पदार्थ आहे माहित नाहि. खैर छोडो हम सिर्फ आम खाते है.....क्युं?

आता पावसाळ्यात खमंग पदार्थाँचा पाऊस पडतोय मिपावर .दिपक मला चहात थालीपिठ ही कल्पना आवडली ,शिवाय दही आणि लोणचे (कच्छी)ची पारंपारिक पध्दत आवडतेच .कुरमा बाटी जशी पाच डाळींच्या वरणात बुडवून खातात तसेही करायला हरकत नाही कारण यांत गहू आणि मकापिठ आहे ,डाळींची पिठं नाहीत . चहात बुडवायची रीत : एक तिक्कर एका बशीसारख्या खोलगट डिशमध्ये ठेवायचे .सुरीने वड्या कापतो तसे लहान तुकडे करायचे .चहा यावर ओतायचा .भिजले की एक एक तुकडा चमच्याने उचलायचा .चीज सैनविजला असे खाता येते . दिपकराव आता राजस्थानी हल्लाबोल होणार काय ?रोज एक पदार्थ दिलात तरी वर्षात संपायचे नाहीत .

In reply to by कंजूस

मोडुनच चहात बुडवुन खायचा. बशीत ठेवुन त्यावर चहा ओतला तर लगदा होईल मग मजा जाईल त्यातली. तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.

In reply to by दिपक.कुवेत

@तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/smile/smiley-says-yes-emoticon.gif त्यात ते शिळं झालं की अजुन! *good*

रेशिपी मस्त!! चहा थालीपीट म्हटल्याबरोबर दोन weird प्रकार आठवले. शेजारची एक ताई चहासोबत भात खात असे. मूळचा एमपीचा असलेल्या एका कलिगने आमरस-भात साजूक तूपासोबत खायला सुचवलं होतं ते आठवलं. ;)

In reply to by सूड

शेवटि पसंद अपनी अपनी. माझी मावशी तर फोडणीभातावर दुध घालुन खाते. वर जे म्हणाला आहेस तसा आमरस-भात साजूक तूपासोबत खाला आहे. आवडला होता *ok*

ए मस्तचं रे दिपक, तिक्कर करुन बघावेसे वाटत आहे :) मस्तं पाकृ +१

धन्यवाद दीपक आज तिखट आणि सोपी पाककृती टाकल्याबद्दल. रविवारी मक्याचे पीठ आणल्यावर करून पाहीन. तसेच आम्हा वयोवृद्ध लोकांना जमतील अशा रेसीपी आल्या की करून बघता येतात.

नवी पाकृ. मक्याच्या पिठामुळे कडक होत नाहीत ना मक्याच्या रोट्यांसारख्या?