✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सेलिब्रेटी येती घरा

अ
अम्रुता आफले यांनी
Wed, 07/09/2014 - 14:57  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी , हा उतारा लिहायचं कारण म्हणजे परवा आमच्या घरी एक मराठी नावाजलेले कवी आले होते आणि तो अनुभव मला लिहावासा वाटला . माझ्या नवऱ्याच्या मित्राचे सासरे येणार एवढाच मला निरोप होता .ते घरी यायच्या आधी ५ मिनिट अहोंनी सांगितला कवी आहेत त्यांचे बरेच ब्लोग्स वगेरे आहेत . एक तर मला त्यांचा नाव माहित नव्हता आणि माझा नवरा गूगल कर त्यांना म्हणाला. मी त्याला नाव विचारला तर त्याचं नाव शोधण्यात त्याचा १ मिनिट गेला गूगल करून त्यांचा एक एपिसोड बघावा इतक्यात त्यांची गाडी पार्किंग मध्ये आली . माझा नवरा त्यांच्या स्वागतासाठी गेला. त्यांना घरी घेऊन आला . त्यांना आमच घर UK मध्ये असूनही जुनाट पद्धतीच नाही म्हणून खूप आवडलं. नमस्कार करून झाला ,त्यांनी विचारल तू कुठल्या गावाची. मी सांगितला सासर सातारा माहेर इचलकरंजी . ये खुश झाले एकदम …. ते म्हणाले तुमच्या इथे dkte कॉलेज आहे न तिथे मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होता, मी पण अगदी हसत हसत हो का असा म्हणल . पुढे ते म्हणाले तुमच्या इथे आपटे वाचनालयात मला कविता वाचायला बोलावलं होता …परत मी मन हलवत हो का… मग ते कोकण संमेलन का अधिवेशन काय ते त्याचे काही काळ अध्यक्ष होते आणि हस्यसम्राट मध्ये ते परीक्षक होते ते तू बघितलाच असशील असा म्हन्ल्याबरोबर माझ खूप जास्त अज्ञान त्यांच्या बाबतीतल झाकून टाकण्यासाठी आणि पुढा अजून काहीतरी त्यांनी माझ्याकडून अपेक्ष्याभंग करून घेण्याआधी मी त्यांना सांगितला आताच आम्ही तुमचा खुपते तिथे गुप्ते बघितला …मश्य वाक्यात सुधारणा करून माझा नवरा म्हणाला आम्ही तुमचा खुपते तिथे गुप्ते तला एपिसोड बघितला तुमचा कीर्ती कॉलेजातला भाषण आईकला. त्याचे वाक्य संपला कि लगेच ते म्हणाले ते काही येवढा खास नव्हता ंअग तुम्ही अमुक अमुक बघितला का वगेरे सुरु झाला …मग पटकन मी त्यांना चहा करते म्हणून सांगून आत गेले त्यांच्या बायकोला मेनू सांगितला …मग त्यांचा चहा घेण वगेरे चालाल होता मग मी ते एखादी कविता म्हणतील या आशेने बाहेर आले ।नो कविता ।ते कुठे कुठे कुठल्या कुठल्या देश्यात त्याचा कार्यक्रम झाला हे सांगण्यात व्यस्त होते ।हे चालाल असताना अहो मधेच म्हणाले मग तुम्हाला लिखाणासाठी बराच माल मिळाला असेल. । त्याची गुगली करत ते म्हणाले मी कवी आहे प्रवास वर्णन लिहिणारा लेखक नाही … माझा नवरा काय बोलणार तो इतकाच म्हणाला आम्हाला लिखाण म्हणजे कविता ,धडे असा वेगळा कसा कळणार आम्ही त्यातले अज्ञानी . मी तो विषय तितेच ठेवून त्याच्या जेवण्याची तयारी करण्यासाठी आंत गेले काकू म्हणाल्या मदत करते म्हणून आत आल्या ।मग गप्पा मारत ,त्याच्या मुलीशी बोलत त्यांनी तिला माझी मदात करायला सांगितल. मग गप्पा मारतना त्या तू हि सिरिअल बघितली का, त्या होमे मिनिस्टर च्या साड्या तथास्तु मधल्या असतात , त्या जान्हवीच लग्न झाला त्या सिरियल मधला कुणाशीतरी आता मला नाव आठवत नाही त्यांनी सांगितलेले … मग शेवटी न राहवून काकू खरा सांगू मी आणी माझ्या घरातले T.V सिरियल्स बगह्त नहि. आणि मी इथे ,पुण्यात कधीही T.V घेतला नाही कारण आम्हांला घरात कुणालाच T.V बघायला वेळ नसतो .ओफ़्फ़िचेमधुन घरी आल्यावर आम्ही एकमेकींशी गप्पा मारायला वेळ मिळावा घरातलं वातावरण चांगला रहाव म्हणून अजून तरी तव घेतला नाही . सासू सासरे सातारला असतात त्यांना पण त्यांचे उद्योग(सामाजिक) इतके आहेत कि ते सुद्धा आठवला तर T.V लावतात ,केबल नाही घरी तिथे . त्यामुळे sorry पण मला तुम्ही सांगितलेले पेपर मध्ये वाचलेलं ते लग्न आठवते आहे आणि मी काकांचा त्यांनी सांगितलेले कार्यक्रम नंतर नक्की youtube वर बघेन . त्यांना मी खरा बोलल्यावर बरा वाटला । मग त्यांची मुलगी म्हणाली तू आता नोकरी सोडली आहेस मग आता वेळ कसा जातो । मी म्हणाला अफल्याना वेळ कसा घालवायचा हे विचार करायला वेळ नसतो । मी त्यांचीच सून, पुस्तक वाचायचा खूप नाद ,कधी कधी नवरा म्हणतो बाई तुमचा झाला असेल तर आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करा इतकी मी माझ्याच गोष्टींमध्ये रममाण असते. त्यांचा खाणं झाल,त्यांनी भरभरून कौतुक केले smoothy ,छोले त्यांना खूप आवडले माझ्या मुलाच्या मराठी बोलण्यावर ते खूप खुश झाले ।मे पण त्या काकाचं कौतुक करण्यापेक्ष्या माझ्या मुलाच कौतुक जास्त करत होते (ज्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहित त्याच्याबद्दल आपण ज्यास्त बोलतो तसाच काहीतरी ) । मग मी त्यांना एखादी कविता आईकवा म्हणून विनंती केली ते म्हणाले ७-८ लोक असती तरी मी चांगली मैफिल केली असती (खुपच वाईट वाटला मला ….हे ऐकून ). मी काकांना म्हणाmanchester मध्ये असताना जर आपली भेट झाली असती तर मला हे शक्य झाला असत ७-८ मराठी मानसं जमवणं । गेले वर्ष्याभर मी इथे मराठी मानसं शोधण्याचा प्रयत्न केला एक जन भेटला सुद्धा पण त्यालाच मराठी बोलायची लाज वाटत होती … अश्या बर्याच गप्पा झाल्यानंतर जाताना मी काकांना म्हणाले काका तुमची एकही कविता आईक्ण्याचा लाभ नाही मिळाला आम्हाला . ते पुन्हा म्हणाले मी भारतात जायच्या आधी तू मराठी लोक गोळा कर मी करेन तुझ्याघरी कार्यक्रम … असा आम्ही त्यांचा निरोप घेतला … त्या रात्री मला इतका वाईट वाटला आणि झोप पण नाही आली … त्यांची कविता त्यांच्या कडून आईकायला नाही मिळाली । भले त्यांनी मध्ये मध्ये एखादि ओंळ म्हणाली ती पण दुसर्या कवीची … खूप वाईट वाटला … दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीला मी फोन करून सांगितला ती म्हणाली असू दे ग त्या लोकांना कौतुक करून घेण्याची सवय झाली असते तू वाईट वाटून घेऊ नकोस .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19914 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

हाहाहा! होना!

एस
Tue, 07/15/2014 - 17:21 नवीन
मी छायाचित्रण करतो हे सांगितल्यावर पुढचेमागचे बरेच अविचारी प्रश्न येतात. समोरचा एकदम 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' असा चेहरा करून तुमच्याकडे आशेने पाहू लागतो. आधी फारसे ओळख न देणारेही उगाच भाव द्यायला लागले की समजायचे ह्यांचा प्रश्न काय असणार ते. त्यावरही नेहमीच कोणीही ठरलेला प्रश्न विचारतोच. तुमच्याकडे कोणता कॅमेरा आहे? त्यावर विचारणार्‍याचा प्रश्न कसा एकदम अतिस्वस्त पॉइन्ट-अ‍ॅण्ड-शूटसारखा आहे असा दृष्टिक्षेप टाकूनही त्याला कटवता येत नाही. मग 'कोणता क्यामेरा घेऊ', 'चानचान फोटू कसे काढू' इ. इ. ससेमिरा चालू झाला की समजायचे आपणच गिर्‍हाईक बनलोय. (प्रतिसादविषय: विनोद). ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बरे आहे हो.

विजुभाऊ
Tue, 07/15/2014 - 17:53 नवीन
बरे आहे हो. एखाद्याने " मी खरजेचा किंवा गुप्तरोगांचा डॉक्टर आहे " असे सांगितल्यावर लोक नक्की काय शम्का विचारतील हो?
  • Log in or register to post comments

रोचक शंका

चलत मुसाफिर
Sun, 07/20/2014 - 00:40 नवीन
घरी नारायणमूर्ती आले तर त्यांना तुम्ही पीसीमध्ये अँटीव्हायरस टाकून द्या असं सांगाल बहुतेक! किंवा पॉवरपॉईंटचे कीबोर्ड शॉर्टकट्स शिकवा वगैरे!
  • Log in or register to post comments

लंडन मध्ये आम्हा हॉटेल

निनाद मुक्काम …
Sun, 07/20/2014 - 01:58 नवीन
लंडन मध्ये आम्हा हॉटेल व्यवस्थापनाच्या मुलांच्या कंपू कडे पुष्कर , भारती ताई, श्रेयस ,क्रांती आले होते , आमची मस्त धमाल मैफील जमली होती. ह्या सर्वांनी आपल्या क्षेत्रातील किस्से आम्हाला स्वतःहून सांगितले आम्हीसुद्धा पंचतारांकित किस्से सांगून परतफेड केली. पुढे अजून दोन तीन वेळा आमची भेट झाली , विजू खोटे , किशोर प्रधान ह्यांच्याशी छान गट्टी जमली , इतर अनिवासी भारतीयांच्या अवघडून जाणारे हे सेलेब्रिटी आमच्याकडे मस्त खुलले होते कारण रात्रभर चालणाऱ्या मेजवान्या ह्या आम्हा दोन वेगवेगळ्या शेत्रातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय तेव्हा एकदा मी भारती आचरेकर ह्यांना त्यांच्या आईचे गाणे म्हणण्यास सांगितले , त्यांनी घन निळा म्हटले ते झाल्यावर माझ्या मित्रांनी विचारले , हे कोणाचे गाणे होते. नशीब हे भारती ताईने ऐकले नाही. पुढे भारतात आल्यावर ह्या लोकांशी भेटीगाठी होतच राहिल्या.
  • Log in or register to post comments

अरे वा! ह्यावर एक मस्त लेख

यशोधरा
Sun, 07/20/2014 - 02:04 नवीन
अरे वा! ह्यावर एक मस्त लेख लिहिता येईल की निनाद. होऊनच जाउंदे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

आयला क्रांती???

टवाळ कार्टा
Sun, 07/20/2014 - 11:49 नवीन
आयला क्रांती??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

मागच्या दिवाळी पहाट च्या

निनाद मुक्काम …
Sun, 07/20/2014 - 02:08 नवीन
मागच्या दिवाळी पहाट च्या कार्यक्रमात सलिल कुलकर्णी ला काही चाहत्यांनी इतर कलाकारांची गाणी गाणी चक्क तुमचे हे गाणे मला आवडते एकदा म्हणून दाखवा असे सांगून वात आणला ह्यावर सलिल ह्यांनी पुणेरी खाक्या दाखवत त्यांना आई शप्पथ हे गाणे माझे नाही आणि ते मी म्हणून शकत नाही कारण त्यांच्या ओळी माझ्या लक्षात नाही राहिल्या. असे सांगितले , मैफल म्हणावी तशी रंगली नाही , एकदा कलाकार बरा, वाईट कसाही गात असला तरी आता आलाच आहे समोर तर गा काहीबाही अशी फर्माईश करणारे श्रोते वात आणतात तसेच अनेक कलावंत हे आपण जागतिक कीर्तीचे असल्याचा आव आणत प्रत्येक माणसाने त्यांच्या कलेचा आस्वाद घेतलाच आहे असा एक दुराग्रह धरतात व अपेक्षाभंगाचे दुक्ख नाहक पदरी पाडून घेतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा