खारवलेले शेँगदाणे
खारवलेले शेंगदाणे
साहित्य:
शेंगदाणे ,मीठ (+अर्धीवाटी भाजण्यासाठी) .स्टीलची चाळण ,जुनी अॅल्यु०ची कढई इ०
कृती :
(१)वाटीभर दाणे बोलमध्ये घेऊन एक छोटा चमचाभर पाणी टाका .मिसळून अर्धाएक तास ठेवल्यावर सर्व पाणी शोषले जाईल .ओलसरपणा गेला पाहिजे .
(२)दोन चमचे पाण्यात चमचाभर मीठ टाकून विरघळवा .थोडे तसेच राहील .हे एक चमचा पाणी एका मोठ्या थाळ्यात टाकून बाजूला ठेवा .
(३)एका कढईत वाटीभर कोरडे मीठ टाकून भाजायला सुरुवात करा .चांगले तापले की क्र १ मधले दाणे टाकून हलवत राहा .पाच एक मिनीटांनी दाणे फुटल्याचा आवाज येईल .आणखी पाच मिनी दाणे लालसर दिसू लागल्यावर पटकन सर्व मिठासकट एका चाळणीवर टाकून मीठ बाजूला करा (आणखी भाजल्यास दाणे जळतात )आणि लगेच गरम दाणे क्र २ मधल्या थाळ्यात टाकून घोळवा . त्यातले खारे पाणी दाण्यांना चिकटून पांढूरका मिठाचा थर चढेल .
झाले खारवलेले दाणे तयार .
सूचना :
(अ)दाणे अथवा मीठ ओलसर असल्यास कढईला भोके पडतात .कढई गार झाल्यावर लगेच धुवून कोरडी करा .
(ब)दाणे थोडे मऊ राहीले तरी चालेल पण तापलेल्या मिठातून योग्यवेळीच बाजूला न काढल्यास करपतात .
(ड)सालंवाल्या काजूंसाठी हीच कृती फार सावधतेने करावी .
वाचने
16402
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
खारे दाणे नक्की कसे करतात हे
In reply to खारे दाणे नक्की कसे करतात हे by रेवती
फोटोची लिंक देतो .
In reply to फोटोची लिंक देतो . by कंजूस
चित्रे पाहिली. चांगली आलीयेत.
बाजारात मिळतात ते 'खारे 'दाणे
अरे वा
कढईत वाळू तापवून त्यावर हे
होय लै भारी.दाणे ,लाह्या
In reply to होय लै भारी.दाणे ,लाह्या by कंजूस
ते मात्र खरे.
चकणा तयार झाला...
लै भारी!
वा..
मध्यांतरी दाणे भाजण्याचं इलेक्ट्रीक मशिन घेतलं आहे
खा.....रे दाणे
विकतचे करता करता मिळाले तर
नवा प्रयोग.
In reply to नवा प्रयोग. by प्रभाकर पेठकर
(क) चे रहस्य .दाणे
In reply to (क) चे रहस्य .दाणे by कंजूस
धन्यवाद.
कंजूसमामा एकदम हटके पाकॄ दिली
छान पाकृ
मस्त
बुरुड आळी
झकास घरगुती चकणा
दाणे मस्तच.
आमची धाव शेंगदाण्यापर्यँतच
In reply to आमची धाव शेंगदाण्यापर्यँतच by कंजूस
+१
(No subject)
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by कंजूस
मस्त फोटो
src ''http://i1366
झक्कास पा कृ
मस्त
शेवटच्या दोन फोटूं मुळे चव