साहित्यः
दूधी - अर्धा किलो
आलं - १ इंच
लसूण - ४ पाकळ्या
धणे - २ मोठे चमचे (टेबल स्पून)
जीरे - १ मोठा चमचा (टेबल स्पून)
तिखट - १ लहान चमचा (टि स्पून)
हळद - अर्धा लहान चमचा (टि स्पून)
कोथिंबीर - मुठभर
खायचा सोडा - अर्धा लहान चमचा (टी स्पून)
मीठ - चवीपुरतं
तेल - अर्धी वाटी.
चण्याचे आणि तांदूळाचे पीठ समप्रमाणात.
तयारी:
दूधीची साल काढून टाका. दूधी उभी चिरुन (दोनच भाग करायचे) चमच्याने आतल्या बिया काढून टाका. आता दूधी जाड किसणीवर किसून घ्या. दूधीला मीठ लावून दहा मिनिटे ठेवा.
आलं-लसूण वाटून घ्या. धणे-जिर्याची पुड करून घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
कृती:
किसलेल्या दूधीत आल-लसूण पेस्ट, धणे-जिरे पुड, तिखट, हळद, खायचा सोडा, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्या. आतात त्यात मावेल एव्हढे चण्याचे आणि तांदूळाचे पिठ समप्रमाणात मिसळा (साधारणपणे दोन्ही ३-४, ३-४ मोठे चमचे लागेल). मुटका वळता आला म्हणजे झाले.
एका मोठ्या पातेलात बसेल अशी ताटली घेवून त्याला तेल लावा आणि त्यावर हे वरील मिश्रणाचे, मुठीने वळून मुटकुळे/मुटके
बनवा आणि नीट मांडून घ्या. एकच थर लावा. एकावर एक ठेवू नका. पातेल्यात पाणी घालून त्यावर एक चाळणी पालथी ठेवा आणि त्या चाळणीवर मुटकुळ्यांची ताटली ठेवून, पातेल्यावर झाकण ठेवून, १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्या. पातेल्यात उकळणारं पाणी ताटलीच्या आंत येणार नाही एव्हढेच ठेवा. आंच बारीक ठेवा.
नंतर पातेल्यातून ताटली बाहेर काढून मुटकुळे थंड होऊ द्या.
आता एका फ्राय पॅन मध्ये अर्धीवाटी तेल घेऊन मध्यम आंचेवर तापवा. तेल तापले की एका वेळी पॅन मध्ये मावतील एव्हढेच मुटकुळे, चरचरीत फ्राय करून घ्या.
तांबूस रंगावर फ्राय केलेल्या मुटकुळ्यांचा, गरम असतानाच, दही आणि लोणच्या बरोबर अस्वाद घ्या. हे जेवणात भाजी ऐवजीही खाल्ले जातात किंवा वन डिश मील म्हणूनही खाता येतात.
दूधी प्रमाणेच मेथीच्या पानांचे, मुळ्याचे किंवा दूधी, मुळा, मेथी असे मिश्र मुटकुळेही छान लागतात.
शुभेच्छा...!
प्रतिक्रिया
आहाहा !!
मस्त पाकृ काका.. नक्की करुन
बल्लव असावा तर असा.
विस्मृतीतील पदार्थ.
In reply to बल्लव असावा तर असा. by गणपा
+१
In reply to बल्लव असावा तर असा. by गणपा
+२
In reply to बल्लव असावा तर असा. by गणपा
मस्त !
वा वा! आमच्यासाठी पाकृ आली
वा.... छान! तुमची ताई
झक्कास...नक्कीच बनवून खाणार.
भाऊ
एक विचारणा
प्रयत्न करायला हरकत नाही.
हा मला करता येण्याजोगा पदार्थ
एक आगाऊ सूचना -- याला लौकी
सन्मानित मराठी पदार्थ आणि जाहिरातबाजी.
In reply to एक आगाऊ सूचना -- याला लौकी by सुबोध खरे
पाकृ आवडली पेठकर काका, करुन
सूड, Mrunalini , गणपा, वल्ली,
पेठकरकाका, माझी आजी मस्त
छान..
हो...
In reply to छान.. by स्वाती दिनेश
मस्तं
(No subject)
हॄदयमित्र दुधी !
पेठकर काका,
काही लिक्विड पण हवं ब्वा....
In reply to पेठकर काका, by प्यारे१
खूपच मस्त पाकृ.
मस्त पाकॄ काका
सहमत.
In reply to मस्त पाकॄ काका by दिपक.कुवेत
पदार्थाचे नाव आणि आमचे आडनाव
मस्त!
काका
काका मस्तच एकदम.
पाकृचा फोटो फ्लिकर वरुन इथे
इथे पहा http://www.misalpav
In reply to पाकृचा फोटो फ्लिकर वरुन इथे by सूड
असं करा.
In reply to पाकृचा फोटो फ्लिकर वरुन इथे by सूड
आहाहा
मस्त एकदम ....
वा एकदम मस्त आठवणी आहेत ह्या
काका, मी केले आज हे मुटके.
पाकृ आवडली