मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाउमकुखन (ट्री केक)

Mrunalini · · पाककृती
"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल. साहित्यः केक साठी: मैदा - १/२ कप साखर - १/२ कप थोडेसे ब्राउन केलेले बटर - १/२ कप अंडी - २ बेकिंग पावडर - १/२ टी.स्पुन रम इसेन्स - १/४ टी.स्पुन व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन दुध - ३ चमचे चॉकलेट टॉपिंग साठी - कुकिंग ७०% डार्क चॉकलेट - २०० ग्रॅम heavy cream - १/२ कप जिलेटीन - १ चमचा रम इसेन्स - १/४ टी.स्पुन व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन गरम पाणी - १/४ कप साखर - १ चमचा कृती: १. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन यावे. २. एका बाउल मधे २ अंडी, साखर, व्हॅनिला इसेन्स, रम इसेन्स एकत्र फेटुन घ्यावे. c1 ३. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे.पाण्याला उकळी आल्यावर त्यावर ते अंड्याचे मिश्रण असलेले बाउल ठेवुन ३ मिनिटे परत फेटावे. (double boiler method वापरावी) ४. हे बाउल खालील गरम पाण्यास लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. नाहितर अंड्याचे scrambelled egg तयार होईल. ;) c2 ५. ३-४ मिनिटे चांगले फेटल्यावर त्यात थोडेसे brown केलेले पण खुप गरम नसलेले बटर ह्या अंड्याच्या मिश्रणामधे ओतुन निट मिक्स करावे. ६. निट मिक्स झाल्यावर त्यात चाळुन घेतलेला मैदा व बेकिंग पावडर टाकावे. हलक्या हाताने हे एकत्र करावे. ७. हे मिश्रण डोश्याच्या पिठाएवढे किंवा पॅनकेकेच्या पिठासारखे असले पाहिजे. जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको. c3 ८. ओव्हन २०० degree celcius ला preheat करुन घ्यावा. ९. एक केकचे भांडे घेउन त्याला बटर व मैदा लावुन घ्यावा व त्यावर बटर पेपर लावावा, त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही. c4 c5 १०. आता ह्या भांड्यामधे वरच्या मिश्रणातील १ पळी मिश्रण ओतावे. ते पुर्ण भांड्यात निट पसरुन घ्यावे व ओव्ह्नमधे ठेवुन ५ मिनिटे बेक करावे. c6 c7 ११. ५ मिनिटात तो एक लेयर तयार झाला असेल. भांडे बाहेर काढुन त्यात अजुन १ पळी मिश्रण ओतावे व परत ओव्हनमधे ५ मिनिटे बेक करुन घ्यावे. c8 १२. अशा प्रकारे सर्व मिश्रण संपेपर्यंत करावे. शेवटचा लेअयर तयार झाल्यावर केक बाहेर काढुन थंड होवुन द्यावा. c9 १३. केक थंड होईपर्यंत चॉकलेटचे टॉपिंग बनवुन घेवु. १४. एका भांड्यामधे क्रिम गरम करुन घ्यावे. त्यात चॉकलेटचे तुकडे, साखर, रम इसेन्स व व्हॅनिला इसेन्स टाकुन एकत्र करावे. १५. वाटीमधे थोडे गरम पाणी घेउन त्यात जिलेटीन निट विरघळवुन घ्यावे. हे पाणी वरील चॉकलेटच्या मिश्रणामधे टाकुन निट मिक्स करावे. १६. हे मिश्रण आता थंड झालेल्या केकवर ओतावे. सर्व बाजुने हे चॉकलेट लागले पाहिजे व वर चाचॉकलेटचा लेयर thick असला पाहिजे. c10 १७. आता केक १-२ तास फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावा. १८. केक खायला तयार आहे. c11 c12 c13

वाचने 9388 वाचनखूण प्रतिक्रिया 35

हे असे प्रकार फक्त बेकरी मध्ये पाहिलेत आजवर इकडे. केवढा तो उत्साह आणि पेशन्स. अगदी प्रोफेशनल दिसतोय. खासच. फोटो पण सुंदर.

स्वाती दिनेश Wed, 07/16/2014 - 03:42
मस्त.. बाउमकुकन, डोनाववेलं टोर्ट आदि प्रकार खूप वेळखाऊ असल्याने करायचा कंटाळा केला गेला.. पण तुझा केक भारी टेम्टिंग आहे..(आता नवीन केक करावाच लागणार असं दिसतय..) स्वाती

प्रभाकर पेठकर Wed, 07/16/2014 - 10:47
पाककृती जरा वेळ खाऊ आणि कष्टप्रद वाटली तरी शेवटचा थरांचा थरार पाहूनच श्रमपरिहार होईल. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

Mrunalini Wed, 07/16/2014 - 11:02
अगदी खरं काका. तसा केक बनवायला सोपा आहे पण थोडा वेळ जास्त लागतो. तरी शेवटी ते जे लेयर्स दिसतात, दिल खुष हो जाता हे! :P तरी माझा केक पॅन छोटा असल्यामुळे जास्त लेयर्स नाहि करता आले.

In reply to by Mrunalini

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:47
पण पाककृती खल्लास. वर ते फोटोपण कातिल. तुमच्या 'अहों' ना आमच्यातर्फे दाद द्या! शेवटून तिसरा फोटो तर वा क्या बात है!

हसरी Wed, 07/16/2014 - 12:55
सही दिसतोय केक. हे हेवी क्रिम म्हणजेच भारतात इळतं ते फ्रेश क्रिम का? ते गरम म्हणजे किती गरम करायच? चॉकलेटचे तुकडे इत्यादी सामान घातल्यावर परत गरम करायचं नाही का?

In reply to by हसरी

Mrunalini Wed, 07/16/2014 - 13:08
हो. हेवी क्रिम म्हणजे तेच फ्रेश क्रिम जे फेटुन आपण whipped cream करतो. ते क्रिम उकळी येईपर्यंत गरम करायचे. गॅस बंद करुन त्यात मग बकिचे सामान टाकुन मिक्स करुन घ्यायचे. क्रिम गरम असल्यामुळे चॉकलेट सहज वितळते. शेवटी त्यात गरम पाण्यात मिक्स केलेले जिलेटिन टाकायचे. :)

दिपक.कुवेत Wed, 07/16/2014 - 13:17
Photo छान आलेत. Layerचा केक पाहुन गोव्याच्या बिबिनका Sweet ची आठवण झाली. ते हि असचं Layerचं असतं आणि अप्रतिम Taste असते.

केक जबराट दिसत आहे गं , खरचं मला जाम कौतुक वाटतं जेव्हा आपण इतका वेळ घालून एखादी पाककृती बनवतो व ती हिट होते, मेहनतीचे फळ्चं ते. आय अ‍ॅम ड्रुलिंग हियर ;) ___/\__

सविता००१ Wed, 07/16/2014 - 16:21
क्लासिक. मस्त केक. आता तू आणि सानिका पटापट इकडे यायचा प्रोग्रॅम करा म्हणजे आमची चंगळ.

In reply to by सविता००१

सखी Wed, 07/16/2014 - 18:12
सविता त्या दोघी व्हाया अमेरिका येणार आहेत (१-२ वर्ष तरी लागतीलच इथे), रेवाक्कानेच फर्मान काढलयं :) मृनालिनी - केक सुरेखच दिसतोच आहे, सगळेच फोटो छान आलेत, मला तो चॉकलेट घालण्याआधीचा अखंड केकचा फोटोही आवडला.