सेन्सेक्स १०,००० च्या खाली
सेन्सेक्स १०,००० च्या खाली
शेवटी ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले.
सेन्सेक्स आज बंद कदाचित १०,००० च्या वर होईलही. पण आज सेन्सेक्स ने १०,००० च्या खाली बुडी मारली .आत्त्ता मी पाहीले तेव्हा सेन्सेक्स (९९४१) वर होता.
काल जगात सगळीकडेच शेअरबाजारांनी दाखवलेली निराशा आपल्या बाजाराने दाखवली नाही तर नवलच.
गुंतवणुकदारांनी काय करावे? हा खूप मोठा प्रश्न पडला असेन.
मागच्या आठवड्यातच मी म्हटले होते की सेन्सेक्स १०,००० च्या खाली येण्याचे स्पष्ट संकेत असतानाही सेन्सेक्स लगेच ह्या मर्यादेच्या खाली जाणार नाही. तेव्हा २ दिवसातच सेन्सेक्सने परत ११,००० च्या वर उसळी मारली. आणि तेव्हा जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. सगळ्याच घडामोडी निराश करणार्या आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांना एव्हाना परिस्थिती हाताबाहेर चालली आहे हे स्पष्टपणे कळून येत आहे. तेव्हा आर्थिक मंदीचे स्वरुप मर्यादीत असेन की भीषण असेन हे येणारा काळच सांगेन. तरी साधारणपणे २००९ च्या मार्च - जून पर्यंत जगाला परिस्थितीचे स्पष्ट संकेत मिळून जातील.
जगातले सर्व शेअर बाजार कोसळण्याचे प्रमुख कारण म्हणजे गुंतवणुकदारांची गमावलेली विश्वासार्हता....
आणि बाजारात असलेला तरलतेचा (लिक्विडिटी) अभाव.
अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांनी हात आखडता घेणे हेच योग्य राहीन. कारण अशीच परिस्थिती राहिली तर नाना म्हणतात तसे सेन्सेक्स जोरात कोसळेलच पण आपला देश मोठ्या आर्थिक संकटातून जाईन हे ही तितकेच खरे.
कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे हे खरे आहे. पण आपल्या देशाचा बराच रोजगार विदेशी कंपन्यांवर आणि व्यवसाय विदेशी बाजारांवर अवलंबून आहे. तेव्हा अमेरिका , ब्रिटन व तत्सम युरोपिय देश यांना जागतिक मंदीची जेवढी तीव्र झळ बसेन तेवढी आपल्याला बसणार नाही. पण बाजारातली आर्थिक तरलता अदृष्य होईल यात मात्र शंका नाही. यामुळे रोजचे जीवनमान प्रभावित होईल. ज्यांच्या डोक्यावर कसलीही कर्जे नाही त्यांना चिंता नाही. पण जे कर्जबाजारी आहेत त्यांना मात्र मोठ्या संकटातून जावे लागेल. तेव्हा सुज्ञ पणा यातच राहीन की सुरक्षित ठिकाणी तुमच्या ठेवी ठेवाव्यात व पैसा सध्या साठवून ठेवावा. विपरित परिस्थितीत त्याचा योग्य तो उपयोग होईलच.
जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली आहेत तेव्हा तेव्हा माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यावर विजय मिळवलेला आहे असा इतिहास आहे. तेव्हा हे भीषण संकट लवकरच टळेल आणि जगाची घडी सावरेल असा विश्वास वाटतो.
तात्या, नाना, देव काका व इतरही सर्व जाणकारांनी येथे या समस्येवर काथ्याकूट करावा ही नम्र विनंती...
(मानवाच्या कर्तृत्वावर विश्वास असणारा आशावादी ) सागर
>>जेव्हा
सेन्सेक्स ९,९७५.३५ वर बंद झाला
पुनःश्च हरीॐ
In reply to पुनःश्च हरीॐ by विसुनाना
देवा शपथ
पुनरपि
In reply to पुनरपि by अवलिया
असुरक्षित
ज्यादा नाही पण ८००० येणार
In reply to ज्यादा नाही पण ८००० येणार by वेताळ
लाखाचे बारा हजार
विसुनाना
खरच
वॉरेन बफे
In reply to वॉरेन बफे by विकास
जरा कळ काढा
भारतातील नौकर्यांची स्थिती काय असेल?
In reply to भारतातील नौकर्यांची स्थिती काय असेल? by कलंत्री
काळ बिकट आहे..... संयम ठेवावा
Hong Kong HSI-HANG SENG
चार्ट बघीतला.
हे घ्या
अजुन खुप वाईट ऐकायची तयारी ठेवा.
अच्युत गोडबोलेंचा अतिशय सुंदर लेख..
वर आणण्यासाठी