शीर्षक मनाला साशंकीत करावयास लावत, पण ती माझ्या मनाचा मळभ आहे जो मला सतत पिणे शब्द पाहीला की नाही त्या गोष्टीची आठवण देतो ? शीर्षक भरकटलेल्या अशुद्ध मनाला आकर्षीत करून आणत आणि सन्मार्गाला नेऊन सोडत. या अर्थाने शीर्षक धक्का तंत्राचा उपयोग करत, पण ते भयानक नाही मार्मिक आहे.
काव्य तंत्र आणि समीक्षेबद्दल मला काहीच कल्पना नाही. या काव्यावर काव्यातील भावात्मकते सोबत काव्यतंत्राचा प्रभाव जाणवत राहतो. काव्याच तंत्र असावयास हरकत नाही, भावोत्कटता, सोअत चपखल शब्द सुचणे एवढी असली पाहीजे की तांत्रीकता जाणवली नाही पाहीजे. अर्थात कविची अभिव्यक्त होतानाची भावोत्कटता आणि स्फूर्ती ह्यास गणितीय नियम लागू होऊ शकत नाहीत ते जुळूनच याव लागत अस कुठेतरी वाटल. (चूभु.दे.घे.)
हे असूनही भरकटणार्या मनांना, तसेच महाराष्ट्रातील अल्कोहोलीक अॅनॉनिमस लोकांकरता हे काव्य एक ऊत्तम पाठ आहे.
अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठीच वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो.
अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्या आणि वैचारिक मांडणी करणार्या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो.
भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते. :)
पंढरपूरच्या वेशीबाहेर
आहे एक छोटी शाळा
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल!
-
विंदा करंदीकर
त्याच्या कंपणीत बसने लैच अवघड असते राव! तरीही लाखो लोकं खुशीने पायीपायी जातात हो कंपनीत बसायला.
शिवाय एकदा चढली की गावे आणि नाचावे पण लागते बरं का!
जमेल तुम्हाला? ;)
बिरुटे सर,
ज्याला विठ्ठल कळत नाही आणि विद्यार्थीही कळत नाही,
ज्याला स्वार्थ कळत नाही आणि परमार्थही कळत नाही,
ज्याला चांगले कळत नाही आणि वाईटही कळत नाही,
अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे.
त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.
...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्य
शक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते.
पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही.
माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ?
कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ?
म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.
मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेला 'चराचरात विठ्ठल (इश्वर) पाहणे' हा सुद्धा भारतीय अध्यात्म विचार आहे या बाबत आपलेही दुमत असणार नाही. करता करविता सर्वकाही परमेश्वर आहे. मुलाचा दंगा, मस्ती, अट्टल खोड्या हे सर्वकाही इश्वर निर्मित मायाजालच आहे. इश्वराच्या निर्मीत कोणत्याच गोष्टीला इश्वरेतर म्हणून मी नाकारत नाही त्यातही मी निस्पृहतेने इश्वरच (इश्वरी लीला) बघतो. असा काहीसा तो 'अत्रुप्त आत्मा' निर्देशिक करु इच्छित असलेला विचार असावा असे मला वाटते.
अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश कृष्ण असं आहे. कृष्णाची बायको रुक्मिणी आहे ना?
हा काळा, तो काळा.
खट्याळपण आणि खोड्या करणं हे कृष्णचरित्रातनं घेतलेलं आहे. कदाचित आता समीकरणं जुळतील.
बाकी कीस बाई कीस चालू द्या!
अशा तर्हेनेच समर्थन करायचे झाले तर
ही कविता विठ्ठलावर नव्हे तर येशू ख्रिस्तावर बेतलेली आहे, आणि तो बालक म्हणजे बजरंगबलीचा अंश आहे हेही सिद्ध करून दाखवता येईल. :D
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.
अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय!
साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला.
गांधीजींना जनसेवेत देव दिसला.
गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला.
तुकडोजींना मानवतेत देव दिसला.
भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला.
संतांना भूतदयेत देव दिसला.
साधूपुरूषांना चरचरात देव दिसला.
.
.
.
.
या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो!
बरोबर?
हम्म हाही अँगल महत्वाचा आहे खासकरून अत्रुप्त आत्मा यांच्या मांडणी सोबत वाचला म्हणजे पटतो असे वाटते. मला वाटते या कवितेकडे बर्याच अँगलनी बघता येते किंवा आपण सर्व मिपाकरांनी पाहिले.
@ बिरुटेसर, धन्यवाद, तुमच्या या कवितेस पोस्टवण्यामुळे एक चांगल्या कवितेस वाचण्याची संधी मिळाली. (मी कीस जरा जास्तच पाडला असेल तर क्षमस्व.)
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.
याला मुस्कटदाबी म्हणतात.
प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे.
कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही.
तरी पण इथेच थांबतो.
या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही.
तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!
@ सूड,
तुम्ही एकीकडे बळजबरीने माझे तोंड दाबून धरले. शब्दबान चालवून मी पुढे लिहिणार नाही याचा बंदोबस्त केला. आता पुन्हा "जशी तुमची इच्छा!!" म्हणताय? :D
माझी इच्छा तर कवितेविषयी लिहायची होती. :)
शब्दबान चालविण्याऐवजी तुम्ही त्या कवितेचा सविस्तर रसग्रहण करून अर्थ उलगडून दाखवला असता तर मी आपोआपच उघडा/तोंडघशी पडलो असतो ना? त्यासाठी माझी मुस्कटदाबी करायची गरजच नव्हती!
जाऊ द्या. आता तरी तुम्हीच अर्थ उलगडून दाखवा. *bye*
अहो लोकांनी वर स्वतःला उमजलेले अर्थ सांगितले आहेत. तुम्हीही सांगा तुम्हाला काय उमगलं. काहीच उमगलं नसेल तर राहुद्या. आणि एकच अर्थ असेल कवितेला असही नाही. एकहून अधिक अर्थ असू शकतात.
विंदांच्या अष्टदर्शनेच्या प्रस्तावनेत कोणत्याही विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या विपर्यस्त लेखन होत नाही आहे हे दुसर्या समीक्षकाकडून तपासून घेण्याचे भान विंदा दाखवताना दिसतात. दुसरा मुद्दा विंदांची हि कविता कोणत्या काव्य संग्रहातून आहे कल्पना नाही पण त्यांच्या साहित्य लेखनाचा एक मोठा भाग बाल साहित्य आणि बाल कवितांचा असावा. कवितेच्या काँटॅक्स्टची आपल्याला काहीच कल्पना नाही. बर्याचदा कविता एखाद्या घटनेवरून सुचलेल्या असू शकतात, किंवा लहान मुलांकरता वरवर लिहिलेल्या कवितेला आपण फारच खोदतोय असे असे तर नाही ना ?
जय हरी विठ्ठल...!!
--/\--
चित्र
शीर्षक भयानक आहे.
असहमत, भयानक नव्हे मार्मिक
धन्यवाद
काव्यतंत्राचा प्रभाव
सहमत
गीतरचना ओघवती
तुमचं टोपण नाव का बदललं? अभय
अरविंद हे उपनाव
जय हरी
मोहमाया ! बाकी काही नाही !
विट्ठल कोणा रुपातही भेटू शकतो ! विंदा म्हणतात-
हा हा... मस्तं कविता!
+१+
@मास्तर म्हणतात करणार काय?
हायला! जबरीच हो कविता.
क्या बात! मस्त!
मस्त कविता !
जमेल तुम्हाला?
शरसंधान विठ्ठलावर कि मास्तरवर?
@त्यामुळे कवीने शरसंधान
...अशी तारांबळ उडालेल्या
साधच बघायच झालं तर,विंदांनी
सहमत
तुमच्या मताचा आदर
मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा'
माहितगारजी,
व्हाय णॉट?
पोरगा "काळा" म्हणून विठ्ठल
अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश
समर्थन
बरं तसं करता येईल.
कविता फक्त आपल्यालाच कळतात
गोर्या" पोरांमध्ये विठ्ठल नाही?
(No subject)
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी
दृष्टी-सापेक्षतेनुसार...तुमचं
मास्तला काळा रंगात देव दिसतो
काळ्या मुलात दिसला.
हम्म हाही अँगल महत्वाचा आहे
अहो, कवितेवर छान चर्चा.
वाह...
मुस्कटदाबी
>>या कवितेवियी एक शब्दही आता
बळजबरी
अहो लोकांनी वर स्वतःला
विंदांच्या अष्टदर्शनेच्या
विंदांना आज अम्मळ हसू आलं