नमस्कार मंडळि,
काश्मीर....भुतलावरील नंदनवन/स्वर्ग. खरं तर हे एक ईयर द राउंड डेस्टिनेशन म्हटलं तर वावगं ठरु नये. वेगवेगळ्या ऋतुतलं काश्मीर पहाणं हा नक्किच एक वेगवेगळा अनुभव असतो. एक वेळ आपली नजर तोकडि/थीटि पडेल ह्याच्या सौदर्यांपुढे....
असं एकलयं कि एप्रिल ते ऑगस्ट हा काश्मीर भेटिसाठि उत्तम ऋतु मानतात. एकदम योग्य हवामान, बहरलेल्या बागा, थोडासा उरलेला बर्फ....फॅमीली टुर च्या दृष्टीने एकदम अॅप्ट असा हा सीजन. पण माझ्या मते खरा जातीवंत भटका तोच जो ह्याच रुळलेल्या वाटा जरा वेगळ्या नजरेने बघतो. वेल आता जास्त पाल्हाळ न लावता आणि उत्सुकता अधीक न ताणता मुख्य मुद्द्याकडे येतो.
तर येत्या २५ डिसेंबर'१४ ते २ जानेवारी'१५ ह्या कालावधीत मी काश्मीर ट्रिप प्लॅन केलेय. उद्देश फक्त आणि फक्त बर्फ अनुभवणे आहे जो वरचा कालवधी बर्फासाठि एकदम पीक सीजन आहे. सध्या तरी मी एकटाच चाललोय पण जर कोणी ईच्छुक मिपाकर सोबत असेल/असतील तर अजुन मजा येईल. आत्तापर्यंत आपण सगळे एकदिवसीय कट्ट्याच्या निमित्ताने भेटत होतो आता जरा फुल टु धमाल पिकनीक होउन जौदे.
ब्रीफ टुर डिटेल्स खालील प्रमाणे:
१. माणशी ३०-३२ हजार खर्च अपेक्षीत आहे
२. वरील खर्चात दिल्ली-श्रीनगर-दिल्ली परतीचं विमान भाडं, हॉटेल स्टे विथ ब्रेकफास्ट अॅन्ड डिनर, ऑल ट्रान्सफर्स/पिक अप्स, साईट्सीईंग, ऑल हॉटेल, ट्रान्सपोर्ट, गव्हनर्मेंट टॅक्सेस ईनक्ल्युडेड आहेत
३. विमान भाडं आणि विमान प्रवास कुठुन सुरवात होतोय त्याने कॉस्ट कदाचीत खाली/वरती होउ शकते. मी कुवेत-दिल्ली असं तिकिट बुक केलय
४. स्टे डिटेल्सः १ रात्र हाउसबोट-श्रीनगर, १ रात्र गुलमर्ग, २ रात्री पहेलगाम आणि ३ रात्री परत श्रीनगर (पण ह्या वेळि हॉटेल मधे)
५. श्रीनगर हुन सोनमर्ग आणि युसमर्ग ह्या एकदिवसाच्या ट्रिप वरील खर्चातच समाविष्ट आहेत
वानगीदाखल एक यु ट्युबची आणि फोटोंची लींक देत आहे. ज्याने पोस्ट केली आहे त्या श्री. राजीव ह्यांच्याशी ईमेल नी बोललो आहे ज्याने माझा जायचा हुरप वाढला आहे. कुणी हा व्हिडिओ ईथे नीट पोस्ट करेल काय? माझ्याच्याने होत नाहिये.
Winter in Kashmir
फोटो लिंक: http://www.bcmtouring.com/forum/travelogues-north-india-f61/kashmir-hea…
अधीक माहिती हवी असल्यास व्यनी करा.
डिस्क्लेमरः थंडि सोसत असेल (कारण तापमान कधी कधी -४ ते -१० पर्यंत जातं असं एकलयं) तरच वरील टुरचा विचार करा अन्यथा जेव्हा फोटोसहित वर्णन येईल तेव्हा बर्फात खेळल्याचा आनंद मानुन घ्या *biggrin*
चला तर मग....येताय का??
वाचने
5524
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय .एकदम धागा बदलला .छान
एक विचारायचं राहिलंच
विडिओ बघतांनाच हुडहुडी भरली!
शुभेच्छा.
तुझ्या बरोबर इतर कुठेही यायचा मनापासून प्रयत्न केला असता...
खास आठवणी पुसायच्या नाहीयेत
In reply to तुझ्या बरोबर इतर कुठेही यायचा मनापासून प्रयत्न केला असता... by मुक्त विहारि
कसल्या खास आठवणी....अन कसले काय...
In reply to खास आठवणी पुसायच्या नाहीयेत by टवाळ कार्टा
ट्रिपला शुभेच्छा, इथे गेल्या
दिपकशेठ, सध्या खिशात तंगी आणि
+007
In reply to दिपकशेठ, सध्या खिशात तंगी आणि by पिंगू
काश्मीर सहलीला शुभेच्छा
(No subject)