मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुप्त भिमाशंकर नेचर ट्रेल

नांदेडीअन · · भटकंती
शेकरूने यावेळीसुद्धा दगा दिला. अगदी ५० फुटांपेक्षाही जवळून आवाज येत होता, पण दर्शन मात्र झाले नाही. :( त्या दिवशी खूप ढगाळ वातावरण होते आणि फोटोग्राफीसाठी जंगलात पुरेसा प्रकाश नव्हता, त्यामुळे फोटो क्वालिटीसाठी आत्ताच माफी मागतो. Orange Headed Ground Thrush - श्वेतकंठी कस्तुर Red Whiskered Bulbul - लालगाल्या बुलबुल भिमाशंकरवरून परतताना

वाचने 8970 वाचनखूण प्रतिक्रिया 16

नांदेडीअन 12/07/2014 - 17:41
गेल्या महिन्याभरापासून ‘कलादालन’ विभागात हा धागा काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण एरर येत होता. EntityMalformedException: Missing bundle property on entity of type taxonomy_term. in entity_extract_ids() (line 7734 of /home/misalone/public_html/includes/common.inc). म्हणून आज ‘भटकंती’ विभागातच टाकल्या फोटो.

कंजूस 12/07/2014 - 18:52
कस्तुर आवडला .या ट्रेलला पक्षी ऐकू येतात फार ,दिसतात कमी .खाली झाडीच्या वाटेला दिसतात .७ जूननंतर शेकरू दूर जातात कच्ची फळे संपल्यामुळे .

In reply to by कंजूस

प्रचेतस 13/07/2014 - 20:48
आजच पाहिलंय. दोन वेळा. एकदा झाडाच्या उंच फांदीवर आणि दुसर्‍यांदा अगदी समोर जेमतेम ५ फूटांवर...ते ही अगदी निर्धास्तपणे फळे खात असताना तेही अगदी ७/८ मिनिटे. :)

नांदेडीअन 13/07/2014 - 15:46
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. @ मदनबाण पहिल्यांदाच कुणीतरी मला फोटो एडिटिंगबद्दल प्रोत्साहन देतंय. धन्यवाद. :) यात पहिल्या, दुसर्‍या आणि शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा प्रयत्न केलाय. बाकी सगळ्या फोटोंमध्ये लेव्हल ऍडजस्टमेंट, सॅच्युरेशन आणि शार्पनेसवर काम केलेलं आहे.

In reply to by नांदेडीअन

मदनबाण 18/07/2014 - 07:00
शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा प्रयत्न केलाय. हो ते लगेच कळलं आणि म्हणुनच एडिटिंगबद्दल सुद्धा लिहावं अशी विनंती केली. :) जालावर एचडीआर फोटोच्या नावावर फोटोंची अशी काही लेव्हल करुन ठेवली असते की ते फोटो पाहु सुद्धा नये असे वाटते. पण तुमच्या एचडीआरच्या फोटोत तो भडकपणा जाणवला नाही. :) ज्यावेळी एचडीआरवर प्रयोग करत होतो त्यावेळी एचडीआरसाठीच असलेले Photomatix चे नाव बर्‍यापैकी वाचनात आले होते..... तुम्ही कशाचा वापर केला आहेत ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

इरसाल 14/07/2014 - 12:17
शेकरु बाबतीत मय बहुतच लकी हय. एकदा भीमाशंकरला तर एकदा अतिरापल्ली/अथिरापल्ली वॉटरफॉल केरळ इथे मनसोक्त पहायला मिळालाय.