
साहित्यः
ताजे मश्रूम - २०० ग्रॅम
कांदे - २ मध्यम
टोमॅटो - १ मध्यम
लसूण - ८ पाकळ्या
आलं - १ इंच
अख्खी काळी मिरी - ४-५
लवंगा - २-३
दालचिनी - १इंच
हिरवी वेलची - २-३
दही - अर्धी वाटी
धणे पावडर - १ टी स्पून
जिरे पावडर - १/२ टी स्पून
गरम मसाला - १ टी स्पून (सपाट)
हळद - १/२ टी स्पून
तिखट - १ ते १-१/२ टी स्पून
कसूरी मेथी पावडर - १/२ टी स्पून
मीठ - चवी नुसार.
कोथिंबीर - सजावटी साठी
तेल.
तयारी:
मश्रूमचे प्रत्येकी ४ ते ६ तुकडे करून घ्या.
कांदे आणि टोमॅटो लांब - लांब चिरून घ्या.
लसूण आणि आलं सोलून चिरून घ्या.
दही फेटून घ्या.
कृती:
कढईत ३-४ टेबल स्पून तेल गरम करा. तेल गरम झालं की आलं-लसूणाचे तुकडे त्यात टाकून परता. लसूण लाल झाला की काळीमिरी, लवंग, दालचीनी , वेलची घालून परता. मसाला चांगला तळला गेला की कांदा टाकून परता. कांदा गुलाबीसर झाला की टोमॅटो टाकून परता. पाणी न घालता टोमॅटो परतून शिजवून घ्या. आता हे सर्व मिश्रण एका ताटलीत काढून थंड होऊ द्या.
पुन्हा कढईत २-३ टेबल स्पून तेल टाकून गरम करा. तेल गरम झालं की फेटलेले दही त्यात घाला. त्यावर धणे-जिरे पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, कसूरी मेथी पावडर, मीठ घालून तेल सुटे पर्यंत परता. तेल सुटले की चिरून ठेवलेले मश्रूम त्यात घालून परता. अगदी अर्धी वाटी पाणी घालून मश्रूम शिजवून घ्या.
मश्रूम शिजेपर्यंत, थंड झालेले कांदा, टोमॅटो आणि अख्ख्या मसाल्याचे मिश्रण मिक्सर मधून गंधासारखं मुलायम वाटून घ्या.
मश्रूम शिजले की त्यात हे कांदा, टोमॅटो, मसाल्याचे वाटलेले मिश्रण टाकून किंचित पाण्याने मिक्सरचे भांडे धुवून ते पाणी मश्रूममध्ये टाका.
आता मश्रूम मसाला छान उकळून दाटसर करा.
एखद्या सर्व्हींग बाऊल मध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर भुरभूरून सजवा.
शुभेच्छा....!
वॉव...
:(
In reply to :( by विसोबा खेचर
अगदी हेच
In reply to अगदी हेच by केशवसुमार
हरकत नाही...
In reply to :( by विसोबा खेचर
अवश्य...
मस्त
जोरदार...
In reply to जोरदार... by प्राजु
प्राजुतै,
In reply to प्राजुतै, by घाटावरचे भट
अरेच्च्या! होय की..
In reply to जोरदार... by प्राजु
चालू शकेल...
मस्तच
व्वा..
धन्यवाद..
काका,
आज केली होती ही भाजी...लेकाला
प्रथम पंजाबी पध्दतीने जाऊन
छान आहे पा कृ
तुमची ही पाक कृती दोन
In reply to तुमची ही पाक कृती दोन by स्रुजा
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
(No subject)
आज करुन बघतो.
करून बघितला.
In reply to करून बघितला. by खटपट्या
धन्यवाद.
आजच
In reply to आजच by मुक्त विहारि
येसर?
In reply to येसर? by प्रभाकर पेठकर
येसर
In reply to येसर by मुक्त विहारि
मिळाली.
In reply to मिळाली. by प्रभाकर पेठकर
येसर एकदा करून ठेवले की...
In reply to येसर एकदा करून ठेवले की... by मुक्त विहारि
आजच केले.
In reply to आजच केले. by प्रभाकर पेठकर
मी वरण किंवा इतर काही न मिसळता..
In reply to मी वरण किंवा इतर काही न मिसळता.. by मुक्त विहारि
नक्की करेन.
आवडले!!!
काका,आज तुमच्या पद्धतीने भाजी
In reply to काका,आज तुमच्या पद्धतीने भाजी by अजया
धन्यवाद.