लेखकदिपक.कुवेतयांनी सोमवार, 07/07/2014 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः
१. संत्री - ५ ते ६
२. लिक्वीड क्रिम - २५० मिलि
३. साखर - संत्र्यांच्या गोडिनुसार कमी / जास्त
४. टँग च अर्ध पाकिट (चित्रात आहे ते १०२ ग्रॅम चं आहे)
५. सुख्या लाल मिरच्या - २ किंवा चीली फ्लेक्स १/२ चमचा (कश्या तिखट आहे त्या प्रमाणात)
६. ऑरेंज कलर - १/२ चमचा
७. एका लिंबाचा रस (to cut the sharpness of chilli)
८. लिंबाची/संत्र्याची किसलेली साल - प्रत्येकि १ चमचा
९. सजावट आपल्या आवडिप्रमाणे
कॄती:
१. लिंबु आणि सत्र्यांच साल किसुन घ्या
२. सत्र्यांचा ज्युस काढुन घ्या. थोडा पल्पहि वेगळा ठेवा. सालं फेकुन देउ नका. सालींचा पांढरा भाग दिसेस्त ती चमच्याने स्कुप करुन घ्या आणि पाण्यात घालुन ठेवा जेणेकरुन सुकणार नाहित. फायनल स्टेप ला आपल्याला आईसक्रिम ह्यातच सेट करायचं आहे
३. लिक्वीड क्रिम मधे चवीप्रमाणे साखर घालुन व्हीप्ड करुन घ्या. मिक्सर मधे मिरच्या भरडसर वाटुन घ्या
४. आता क्रिम व्हिप्ड केलेल्या भांड्यात अनुक्रमे ऑरेंज ज्युस+पल्प, ऑरेंज+लेमन झेस्ट, लिंबाचा रस, टँगचं अर्ध पाकिट आणि ऑरेंज कलर घालुन हलक्या हाताने मिक्स करा. लहान मुलांचा पोर्शन वेगळा काढुन बाकिच्या मिश्रणात भरडसर वाटलेल्या मिरच्या घालुन मिक्स करा.
५. प्लॅस्टिक फॉईल लावुन फ्रिजर मधे सेट होण्यास ठेवा. एक ३-४ तासानी सेट झालं कि बाहेर काढुन परत एकदा चमच्याने मिक्स करुन सेट होण्यास ठेवा. हिच स्टेप अजुन २ वेळा रीपीट करा. असं केल्याने आईस क्रिस्टल्स फॉर्म होत नाहित.
६. चौथ्या वेळी पाण्यात घालुन ठेवलेले ऑरेंज कप्स पेपर टॉवेल किंवा टिश्युनी हलक्या हाताने पुसुन घ्या. सेट झालेलं आईसक्रिम ह्या रीकाम्या कप्स मधे भरुन कप्स परत सेट होण्यास ठेवा.
७. आईसक्रिम पुर्ण सेट झालं कि मस्त आंबट, गोड, तिखट ईनोव्हेटिव्ह ऑरेंज आईसक्रिम तितक्याच ईनोव्हेटिव्हली पेश करा.
टिपा:
१. सजावटिसाठि सर्व करण्याआधी भरलेल्या ऑरेंज कप्स मधे एक छोटासा खड्डा करुन त्यात संत्र्याचे गुच्छ / पुदिना पान
लावुन सर्व करु शकता. माझ्याकडे चेरीज होत्या त्या मी अर्ध्या करुन डेकोरेट केल्या
२. सर्व करतेवेळि ह्या कप्सच्या खाली टिश्यु पेपेर किंवा पेपेर टॉवेल ची घडि करुन द्यायला विसरु नका अन्यथा कप्स प्रचंड थंड असल्या कारणाने हात बधीर होतील
३. ऑरेंज ईसेंन्स असेल तर जरुर घाला
आली का नवीन पाकृ. चिली फ्लेवर च्या आइस क्रीम बद्दल फक्त ऐकले आहे. कधी खाल्ले नाही. हे बरेच वेळखाऊ काम वाटते आहे तेव्हा करून बघेन वगैरे असे काही म्हणत नाही. पण सादरीकरण आणि फोटो फारच भारी.
दाढ काढली म्हणून एव्हढ्याशा मिरच्यांनी कांही होत नाही. (मी मिरच्यांचे लोणचे खाल्ले होते, ते असो.)
आईस्क्रिम मुळे उघडलेल्या रक्तवाहिन्या बंद व्हायला मदत होईल. मिपावर कोणी दंतवैद्य असतील तर सांगतीलच.
कातिल पाक कृती.
पण या दिपकशेठच्या पाक कृती घरी दाखवायची चोरी असते. ते हापुस अंब्याचे आईस्क्रीम माझ्यावरच बुमरँग झाले होते.
दिपकशेठ तुम्ही नाव बदला. सध्यातरी तुमचे पदार्थ आम्हाला फोटोत बघुन मिटक्या माराव्या लागतात.
पैजारबुवा,
आलं लिंबू आणि मिरची अशा दोन फ्लेवरचं आईस्क्रीम आमच्या बदलापूरात आनंद (आताचं चितळे आईस्क्रीम) आईस्क्रीममध्ये मिळत असे एके काळी!! आता का बंद केलंनीत देव जाणे.
सुमारे १० वर्षांपुर्वी ठाण्याला राम मारुती रोड वर टेम्पटेशन मध्ये आलं लिंबू , मिरची आणि शहाळ्याच्या स्वादातले आईसक्रिम मिळायचे. शहाळ्याचं आईसक्रिम खाल्याचं आठवतंय. तेव्हा मिरची वैगरे खायची हिंमत झाली नाही. अजुनही तिकडे हे स्वाद मिळतात का याची कल्पना नाही.
मस्त...आइसक्रिम छानच दिसते आहे, लगेच उचलून खावेसे वाटते आहे.
-असे संत्र पोखरुन त्यात संत्र्याचे आइसक्रिम, लिंबू, अननस इ. पोखरुन ते ते आइसक्रिम तर करवंटीत टेंडर कोकोनट आइसक्रिम ही फिरेन्सच्या गिलेटोरियांची खासियत!
स्वाती
मला दिसलेला हा धागा कोरा आहे.काळ्या ट्रे मधले सुंदर तीन ओरेंज मला दिसतच नाहियेत.चिलि घातलिये का चेरी सज वलिये ...काय नाविन्यपुर्ण रेसेपी आहे ..काहि म्हणजे काहिच दिसत नाहिये.
मी सुखी आहे.. *wink*
पाकृ थोडिशी खटपटिची / वेळखाउ असली तरी एकदा तरी नक्कि करुन बघा. आखीर अच्छा खाने के लीये कुछ मेहनत तो करनी पडती हहै भाई| मस्त रिफ्रेश व्हायला होतं आणि खाताना जो मिरचीचा मधुनच हलका झटका लागतो....अहाहा वर्णन करुन उपयोग नाहि तो अनुभव घ्याच.
पाककृति आणि फोटो छान आहेत.
अमेरिकेत गार्लिक नावाची हॉटेल्स ची चेन आहे. त्यांच्याकडे सर्व पदार्थ लसुण घातलेले मिळतात . मी
सानफ्रांसिस्को मधील त्यांच्या हॉटेल मधे या स्वादाचे आईसक्रिम खाल्ले आहे.
हे पहा तुम्ही गोडच्याच पाककृती देता नेहमी.
पण आम्हा तिखट आवडणार्यांचाही विचार करावा ही विनंती. पाकृ मस्तच पण हल्ली ईतक्या खटपटीच्या पाककृती नाही जमत वयोमानामुळे.
प्रतिक्रिया
भारी
'सादरीकरण आणि फोटो फारच भारी'
In reply to भारी by मधुरा देशपांडे
'सादरीकरण आणि फोटो फारच भारी'
In reply to भारी by मधुरा देशपांडे
मस्त
आला का हा दुष्ट माणूस?!
सुपर्ब ! मस्त दिसतंय !!
दुष्टा, अतिशय दुष्ट माणसा,
यशोतै
In reply to दुष्टा, अतिशय दुष्ट माणसा, by यशोधरा
दाढ काढलीये आज!! तुम्हीच खा.
दाढ काढली म्हणून एव्हढ्याशा
In reply to दाढ काढलीये आज!! तुम्हीच खा. by सूड
आता मँगो चिली आईस्क्रिम
In reply to दाढ काढली म्हणून एव्हढ्याशा by प्रभाकर पेठकर
अहाहा सुडा
In reply to आता मँगो चिली आईस्क्रिम by सूड
दु... दु... दु...
अहाहाहा! येकदम ब्येस!
कसं सुचतं सर्व ?
आता काय सांगायचं गाडगीळ साहेब
In reply to कसं सुचतं सर्व ? by कंजूस
कातिल पाक कृती.
पैजारबुवा
In reply to कातिल पाक कृती. by ज्ञानोबाचे पैजार
_/\_
तुम्ही दिलेल्या रेशिपीप्रमाणे
सही आहे..
पहिल्यांदाच या प्रकारचे
जेवढ्या पाकृ टाकाल तेवढ्या
अरे जरुर आवले साहेब
In reply to जेवढ्या पाकृ टाकाल तेवढ्या by प्यारे१
आईस्क्रीम आणि मिरची ??
आलं लिंबू आणि मिरची अशा दोन
In reply to आईस्क्रीम आणि मिरची ?? by सस्नेह
टेम्पटेशन
In reply to आलं लिंबू आणि मिरची अशा दोन by सूड
अगंग्ग्ग मेलो
वेगळेच कॉम्बीनेशन!
आपण
मुवि
In reply to आपण by मुक्त विहारि
वॉव..
हो अगदि बरोब्बर
In reply to वॉव.. by स्वाती दिनेश
नेहमी सारखीच.
स्स्स्स
जबरा पाकृ.
मला दिसलेला हा धागा कोरा आहे
हा माणुस जरा वेडाय का??
पिरा.....
In reply to हा माणुस जरा वेडाय का?? by पिलीयन रायडर
तू भारतात येतोयस ना? थांब
In reply to पिरा..... by दिपक.कुवेत
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद
अफलातुन !
अफलातून आहे. संत्र्याची
हा हा हा
In reply to अफलातून आहे. संत्र्याची by तुमचा अभिषेक
लई भारी दीपकराव
लसुण आईसक्रिम
Wah kya baat hai....lai bhari
हे पहा तुम्ही गोडच्याच
आँ पाकृ नुसतीच गोड नाहि
(No subject)
In reply to आँ पाकृ नुसतीच गोड नाहि by दिपक.कुवेत