सकुरा अर्थात जपानचा चेरी ब्लॉसम
जपान मधले एक मुख्य आकर्षण म्हणजे हनामी. हना म्हणजे फूल आणि हनामी म्हणजे शब्दश: फूल पाहणे. साधरणपणे वसंत ॠतु (स्प्रिंग) च्या सुरुवातीला जेव्हा बर्फ पडायचा बंद होतो आणि चेरीची झाडे नव्याने बहरायला सज्ज होतात, या झाडांना असंख्य फुले येतात. हि फुले फक्त १० ते १५ दिवसच राहतात त्यामुळे याला आणखीनच महत्व प्राप्त होते. यांनाच ईकडे सकुरा म्हणतात. जपान मधे मुळातच बागकाम आणि आकर्षक झाडे यांना महत्व दिले जाते. त्यामुळे फार पुर्वीपासुनच हि झाडे विहंगम दिसावीत अशी मुद्दाम लावण्यात आली आहेत.
हनामी च्या काळात जपानी लोक सकाळीच अशा ठिकाणी खाण्यापिण्याचे सामान घेऊन एकत्र जमतात (चटया टाकून जागा पण पकडतात :) ) आणि दिवसभर हि झाडे पहात खाणे-पिणे गप्पा चालू असतात. फार आधिच्या काळी फक्त उच्च वर्गाला याची परवानगी होती परंतु नंतर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याची परवानगी मिळाली.
सध्या जपान मधे याचा काळ चालू आहे जो आणखिन काही दिवस चालेल. २-४ दिवस पाऊस असून सुद्धा आम्ही हनामी साठी युएनो उद्यानात जाण्याचे ठरवले जी यासाठी बरीच प्रसिद्ध जागा आहे. युएनो हा टोक्यो मधला फार जुना व मोठा भाग आहे जिथे सध्या उद्यान, प्रचंड प्राणिसंग्रहालय आणि टोक्यो राष्ट्रीय संग्रहालय आहे. तर आम्ही युएनो मेट्रो स्टेशन वर पोहोचून बाहेर आलो. युएनो उद्यान स्टेशनच्या समोरच होते परंतु आज नेहमीपेक्षा फारच जास्त गर्दि होती सकुरा पाहण्यासाठी.
१. युएनो स्टेशनच्या बाहेर सकुरा साठी झालेली गर्दि
२. इकडे एक जुनी शिंटो श्राईन पण आहे
३. श्राईन चा मागचा भाग
४. श्राईन बाहेरची थोडीशी वेगळ्या पद्धतीने वाजवायची घंटा
५. हनामी साठी जमलेले जपानी लोक
६. फिकट गुलाबी रंगाचे चेरी ब्लॉसम
७. चेरी ब्लॉसम
८. जपानमधे दारू पिण्यावर फार बंधन नसल्यामुळे पेताड्यांची सुद्धा गर्दि असते
९. चेरी ब्लॉसम
१०. पांढरी फुले :)
११. सकुरा डोरी अर्थात सकुरा चा रस्ता
१२. असाच एक काढलेला फोटो
१३. असाच काढलेला आणखिन एक फोटो :)

१२. असाच एक काढलेला फोटो
वाचने
7778
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
क्या बात है
सर्वच फोटो
छान फोटो !
उत्तम !!!
In reply to उत्तम !!! by मितान
हा आणखिन भर घालता आली असती.
निसर्गाने खरच खूप सुंदर किमया
सुंsssssssssssssssssssssssssद
झक्कास!
In reply to झक्कास! by सोत्रि
अरे वा
सुरेख! २ नंबरचा फोटो खूप
सुरेख!
मस्त !
खूप छान. फुले पाहणे साजरे
In reply to खूप छान. फुले पाहणे साजरे by पिशी अबोली
हो ना
In reply to हो ना by इरसाल
मग फुलपाखरं बघा किंवा सौंना
In reply to मग फुलपाखरं बघा किंवा सौंना by प्यारे१
घ्या
मस्त
आल्हाददायक...!!!
लेख अन फटू दोन्ही मस्त.
In reply to लेख अन फटू दोन्ही मस्त. by बॅटमॅन
खास सांगली-मिरजेकडचा शब्द आहे
साकुरा आणि साके... वा वा एकदा
फोटो मस्तच..!!!
वाह. सोत्रींच्या सकुराच्या
सगळीच छायाचित्रे
वाह!
सकुरा नाही हो, साकुरा.
फुले पाहणे साजरे करायचे ही संकल्पनाच खूप सुंदर आहे.