सद्ध्या देव, धर्म, ईश्वर, पुराण असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ. बारीक टा.) असे विचारवंत लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धर आपटणे सुरु असते ते 'बर्याचदा' ज्या कौटुंबिक, सामाजिक वातावरणात वाढलो गेलो त्यातून आलेली भोळसट श्रद्धा असणारे, सारासार विचार न करण्याची, तसा विचार करु न देण्याची दडपशाहीची, भीतीची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (देवाचे ना करायलाच हवे असे मत, का कशासाठी ते ठाऊक नसले तरी चालेल )
जुन्या भारतीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच वैदिक्/हिन्दू) बरेच मतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूळाकडे जाण्याची प्रेरणा जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व मार्गांमध्ये आढळतो. मी कोण, जग्/सृष्टी कशी निर्माण झाली इ.इ. चा शोध मानवाने सातत्याने घेतला. त्यातूनच दृश्य स्वरुपात आढळणारे, अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली. सामान्यांपेक्षा अधिक शक्ति, युक्ति, बुद्धी आणि अगदी नाश करण्याचे सामर्थ्य असलेले हे देव मग 'माणसळव'ण्याचे काम सुरु होऊन त्यांना मनुष्य रुपात आणून त्यांनाच जास्तीचे हात, पाय, डोके इ.इ. जोडले गेले. हाती अनेक शस्त्रे दिली गेली. आणि कृतज्ञतेपोटी त्यांची भक्ति सुरु झाली.
सुरुवातीला अस्सल असलेले हे तत्वज्ञान हळूहळू आलेल्या बर्याच कारणांमुळे टिकेचे लक्ष बनले.
काळाच्या ओघात आलेली आणि मजबूत झालेली,जन्म इ. निकष मानून मजबूत केली गेलेली वर्णव्यवस्था ह्यातून धर्म आणि त्याचे ध्येयस्थान असलेला परमार्थ सातत्याने कैदेत राहिले. सातत्याने होणारी परकिय आक्रमणे, गुलामगिरी, अकारण अहिंसा, करुणा यामुळे त्या काळातील समाज खर्या परमार्थापासून सतत वंचितच राहिला.
याउप्पर मानवी बुद्धीला जात्याच असलेले आणि कधीही न जाऊ शकणारे भ्रम (इल्यूजन),प्रमाद(चुका करण्याचा स्वभाव), करणापटव (लिमिटेशन्स), विप्रलिप्सा (लोभीपणा) हे दोष आपल्याला आपल्या मूळ रुपाचा ठाव घेण्यास अटकाव तर करतातच पण त्यातही एखाद्या वर्णाच्या फायद्यापोटी इतर समाजाला तसा अभ्यास करण्यापासूनही वंचित ठेवतात.
असा वंचित, गुलाम, लाचार, झापडे लावला गेलेला, स्वतंत्र विचार न करु शकणारा समाज कर्मकांडांच्या आहारी गेला तर नवल काय? शिक्षण नाही, कुठल्याही प्रकारची मनोरंजनाची साधने नाहीत, माध्यमे नाहीत, ग्रंथ मिळालाच तर पारायणांपलिकडे आणि भरड वाचना पलिकडे त्यातला कूटार्थ कळत नाही अशा परिस्थितीत करणार काय? तेव्हा हे सगळे भाकड सुरु झाले. रुपके सांगताना त्यातला घ्यायचा भाग कुठला ते न कळालेले निरुपणकार, किर्तनकार देखील त्याच त्या अनावश्यक गोष्टी रंगवून सांगू लागले आणि त्यावर विश्वास ठेवला गेला.
खरे तर समोर बसलेल्या व्यक्तिंनुसार, श्रोतृ वर्गानुसार फरक करणे अपेक्षित आहे. पुराणांची, वेदांची मांडणी खरे तर ८०% कर्मकांड, १६% उपासना आणि ४% ज्ञान अशीच केलेली आढळते. समाजातला ८०% भाग हा परमार्थाची माहिती नसलेला असा आहे. त्यांना प्रेमाने, काहीतरी मिळेल असे आमिष दाखवून, काही तरी संकट येईल अशी भीती घालून परमार्थाकडे वळवणे त्यांच्याकडून काही यज्ञ, व्रते, उपास, असे काहीतरी करवून एक सुसूत्रता ये ईल अशा परिस्थितीत आणणे हे कर्मकांडाचे मुख्य काम. त्यानंतर त्यातील टिकलेल्या लोकांना दिलेले नाम, ग्रंथ वाचन, पूजा ही उपासना आणि त्यानंतर ज्ञान कांड असे अपेक्षित आहे.
२१ व्या शतकात उपलब्ध माहिती, चांगल्या वाईटाचा किमान व्यवहारात विचार करण्याची आलेली क्षमता यामुळे या पुराणातल्या गोष्टी /वानग्या तिथेच रहाव्यात असे वाटले तर नवल ते काय? पण त्यापुढचे टप्पे आहेत आणि ते अत्यंत तर्कशुद्ध आहेत हेही समजून घेतले पाहिजे.
दुरितांचे तिमिर जाओ। विश्वस्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांच्छील तो ते लाहो। प्राणिजात॥
वाचने
7526
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपले जवळजवळ सगळे मुद्दे पटतात
रॅन्डम सर्च
आणि...
पण वाचने ७००च्या वर आहेत,
हाकानाका!
In reply to पण वाचने ७००च्या वर आहेत, by कवितानागेश
वाढे वाढे प्रतिसाद...
In reply to हाकानाका! by यशोधरा
अगदी
In reply to वाढे वाढे प्रतिसाद... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या मते
In reply to वाढे वाढे प्रतिसाद... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कशावरुन ?
In reply to माझ्या मते by प्रसाद गोडबोले
'मला असं असं वाटतं'
In reply to कशावरुन ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै नै.
In reply to 'मला असं असं वाटतं' by बॅटमॅन
ते इतक्या सोपेपणे दाखवता आलं
In reply to नै नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं कसं.
In reply to ते इतक्या सोपेपणे दाखवता आलं by बॅटमॅन
बिरुटे सरांचा आवलेकाकांना
In reply to वाढे वाढे प्रतिसाद... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मान्य.
In reply to बिरुटे सरांचा आवलेकाकांना by कवितानागेश
>>> खर्रच असं काही असतं का ?
In reply to मान्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहं
In reply to >>> खर्रच असं काही असतं का ? by प्यारे१
>>>> अजिबात तसं काही नसतं !
In reply to अहं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to >>>> अजिबात तसं काही नसतं ! by प्यारे१
देव ह्या संदर्भात आपली नेमकी
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्हाला काय माहिती ?
In reply to देव ह्या संदर्भात आपली नेमकी by प्यारे१
>>>
In reply to आम्हाला काय माहिती ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डिबी, विस्मरण बरं नव्हे!
In reply to आम्हाला काय माहिती ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझं मत?
In reply to वाढे वाढे प्रतिसाद... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला तर हल्ली जे वाचेन ते
In reply to माझं मत? by यशोधरा
पटकन एक कल्ट काढ. यशस्वी भव!
In reply to मला तर हल्ली जे वाचेन ते by कवितानागेश
प्रतिवाद व्हावा भांडन नव्हे...
In reply to माझं मत? by यशोधरा
व्यक्तिगत रोखाकडे चर्चा
In reply to प्रतिवाद व्हावा भांडन नव्हे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to व्यक्तिगत रोखाकडे चर्चा by यशोधरा
त्याच ट्रेनिंग अजून घेतलेलं
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देव आहे का?
In reply to प्रतिवाद व्हावा भांडन नव्हे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख प्रतिसाद!
In reply to देव आहे का? by प्रभाकर पेठकर
देव मानणार्या लोकांचे मोठे
In reply to देव आहे का? by प्रभाकर पेठकर
सुंदर प्रतिसाद !!!
In reply to देव आहे का? by प्रभाकर पेठकर
गेले ते व्यष्टी, समष्टी,
मा. प्रसाद गोडबोले, ज्येष्ठ
धागा हलवा
>>> संपादकांच्या कंपूमधे
In reply to धागा हलवा by पैसा
अभ्यास वाढवा!
In reply to >>> संपादकांच्या कंपूमधे by प्यारे१
>>> जालीय वजनदार
In reply to अभ्यास वाढवा! by पैसा
हॉय रे हॉय!
In reply to >>> जालीय वजनदार by प्यारे१
जालं तुटलं नाय? व्यक्तिमत्व
In reply to अभ्यास वाढवा! by पैसा
त्रिवार सहमत!!
In reply to धागा हलवा by पैसा
झालं माउ चा डोळा बरोबर
In reply to त्रिवार सहमत!! by कवितानागेश
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2प्रतिसादांनी डोळे भरुन आले आणि डोळ्यांपुढे हे दिसले
देव ,म्हणजे व्यक्ती नसून
पण असं काही 'आहे की नाही?'
कारण माणूस हाच फक्त अशा
In reply to पण असं काही 'आहे की नाही?' by कवितानागेश
म्हणजे इतर प्राण्यांमध्ये असं
In reply to कारण माणूस हाच फक्त अशा by प्यारे१
कर्मकांड- माझी संकल्पना
१+
In reply to कर्मकांड- माझी संकल्पना by सुबोध खरे
@याचे तात्पर्य एकच-- कोणतीही
In reply to कर्मकांड- माझी संकल्पना by सुबोध खरे
डॉक्टर साहेब, कंडीशनिंगचे छान
In reply to कर्मकांड- माझी संकल्पना by सुबोध खरे