चिकन शाकुती (मराठीत सागुती) Xaukuti
गोव्याला पोर्तुगीजांच्या प्रभावामुळे शाकुती लॅटिनमध्ये 'X'ने लिहितात. काही बड्या पंचतारांकित हॉटेलात ही डिश Xaukuti नावाने मेन्युकार्डात मिरवताना पाहिली आहे, मागवली नाही... कारण बडी हाटिलं अस्स्ल पाकक्रियेला न्याय देत नाहीत. :''(
तुमचा काय अनुभव?
ही पाकृ. ओरिजिनल गोव्याची आहे असा माझा दावा आहे.... ;;)
१ किलो कोंबडी (तुकडे करुन)
१ लिंबाचा रस (कॅथलिक व्हिनेगर वापरतात)
- लिंबाचा रस चोळून कोंबडीचे तुकडे कमीत कमी अर्धा तास मुरवत ठेवा)
२ मोठे (tblsp) चमचे धने
१ लहान (tsp) जिरें
१ लहान (tsp) बडीशेप
२ मोठे चमचे खसखस
२ सेंमी दालचिनी
३ लवंगा
४ मिरे
पाव चमचा जायफळाची पूड
असल्यास अर्धा चमचा जायपत्री
१० सुक्या मिरच्या (लाल तिखट चालतं)
- हा मसाला मंद आचेवर तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजावा. अजिबात करपता कामा नये. सुक्या मिरच्यांऐवजी तिखट घेतले तर मसाला कुरकुरीत झाल्यावर तिखट तव्यावर घालून तवा लगेच आचेवरुन उतरवा, नाहीतर तिखट जळकट होतं. ग्राईंडरमधून पावडर करून घ्या.
अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे
२ मोठे कांदे (उभे पातळ चिरुन घ्या)
४ ते ६ लसूण पाकळ्या (ठेचून घ्या)
२ सेंमी आलं (बारीक चिरून)
तेल
- तळण्याइतपत तेल कढईत टाकून चिरलेला कांदा लाल तळून घ्या. त्यात लसूण व आलं परतून खोबरं घाला. खोबर्याचा रंग गुलाबी होईपर्यंत परतत रहा. निवल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटताना पाणी शक्यतो कमीच घाला.
- वरील मसाल्याची पावडर या वाटणात नीट मिक्स करा.
थोडी कढिलिंबाची पाने व किंचित हिंगाची तेलावर फोडणी करून त्यात मसाला मिश्रण तेल सुटेतो परतून घ्या, खमंग वास सुटला पाहिजे. तयार मसाल्यात चिकनचे तुकडे लिंबाच्या रसासकट घालून छान परतून घ्या. मीठ व गरम पाणी घालून (जसा रस्सा पाहिजे तेवढं) चिकन मध्यम आचेवर शिजवून घ्या.
टीपः शिळी (आदल्या दिवशीची) व मुरलेली शाकुती मस्तच लागते खायला. :)
याद्या
7175
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
सही....Yummy!!
वा ... झकास
हाय्य्यला.....
तोंडाला पाणी सुटले....
व्वा! काय
आभारी आहे
हे घ्या फोटो!!!
जीवघेणे
In reply to हे घ्या फोटो!!! by पांथस्थ
+१
In reply to जीवघेणे by विसोबा खेचर
वा मस्त
मस्तच
कारण बडी
In reply to मस्तच by मनीषा
मनापासून खूष!
:)
In reply to मनापासून खूष! by ललिता
मानलं! मानलं! मानलं!
In reply to :) by सरपंच