आडवाटेवरील रियासी
रियासी हे नाव ऐकून कदाचित डोक्यात प्रकाश पडणार नाही. ते साहजिक आहे, कारण जम्मू-काश्मीरमध्ये असूनही रियासी हे ना तीर्थक्षेत्र आहे ना हिलस्टेशन. किंबहुना, कटरा (वैष्णोमाता मंदिर) हा अतिप्रसिद्ध शेजारी लाभल्यामुळे रियासीचे नाव अधिकच विसरले जाते. पण तरीही एकदा जाऊन पहावी (अगदी दोन दिवस राहून) अशी जागा आहे.
शिव खोरीच्या रस्त्यावर लागणारे रियासी गाव चिनाब नदीच्या तीरावर वसलेले आहे. पीरपंजाल पर्वतरांगा इथे सपाट मैदानाला येऊन मिळतात. त्यमुळे नदीचा प्रवाह सुसाट असतो. सिंधु पाणीकरारानुसार चिनाबवर धरण बांधता येत नाही. नदीच्या वेगवान प्रवाहावर "राफ्टिंग" करण्याची सोय आहे.
फोटो पाहून कदाचित रियासी हे एक थंड हवेचे ठिकाण असावे असा समज झाल्यास नवल नाही. पण तो चुकीचा ठरेल. उन्हाळ्यात येथील तापमान उत्तर भारतातील अन्य शहरांशी स्पर्धा करत ४० डिग्रीच्याही वर जाते. पण त्याही दिवसांत येथील रात्री सुखद असतात.
रियासीपासून सलाल जलविद्युत प्रकल्प अगदी जवळ आहे. पर्वतरांगांनी वेढलेले हे धरण फारच सुंदर दिसते. विशेष परवानगी घेतल्यास अगदी भूगर्भात पाच मजले खाली बसवलेली जनित्रे पाहता येतात. चिनाब नदीचा प्रवाह एका प्रचंड भुयारातून वळवून, जनित्रांद्वारे विद्युतनिर्मिती करून, ते पाणी ४ किलोमीटर खाली पुन्हा नदीपात्रात सोडले जाते. पण छायाचित्रणावर प्रतिबंध असल्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत.
रियासी गावातून बाहेर पडून चिनाब पार केली की लगेच येते सिहाड बाबाची गुहा. येथील जलप्रपाताची उंची पाहून डोळे फिरतात.
शहरापासून १० किलोमीटरवर धनसर बाबाची गुहा हे आणखी एक नितांतसुंदर स्थळ आहे. अमाप नितळ पाणी, शांतता आणि स्वच्छता यामुळे मन प्रसन्न होते. (धनसर बाबा मंदिर-गुहा कटरापासून फक्त १५ किलोमीटरवर आहे).
रियासी गावाला लागूनच भीमगड किल्ला आहे. खरेतर लहानखुरा असल्यामुळे त्याला गढी म्हणणे योग्य होईल. पण दिसायला फार छान आहे. राज्यसरकारने विशेष प्रयत्न करून पर्यटकांसाठी या किल्ल्याची डागडुजी केली आहे. अशा वेळी न चुकता महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुर्दशा आठवून अफाट वाईट वाटते.
माझ्या लटपटत्या मराठीची अधिक दुर्दशा पाहून मिपाकरांना वाईट वाटू नये, म्हणून इथेच थांबतो आणि राहिलेले वर्णन छायाचित्रांवर मर्यादित ठेवतो..!
इकडे आलात तर जरूर भेटा..! जय माता दी!!!! :) :)
-----
अंतर: कटरापासून ३० किलोमीटर. जम्मूपासून सुमारे १०० किलोमीटर.
प्रवासः रस्त्याने. लवकरच कटरा - उधमपूर रेल्वे सुरू होईल. (रियासीवरून जाते).
हवामानः तीव्र उन्हाळा. अन्य दिवसांमध्ये सुखद हवामान.
जवळपास अन्य पाहण्याजोगे: सिहाड बाबाची गुहा, नौदेवी मंदिर, धनसर बाबाची गुहा, सलाल जलविद्युत प्रकल्प, शिव खोरी.
------
रियासीची काही अन्य छायाचित्रे:
१. बहरलेला आंबा
२. रंगात आलेला खोखोचा सामना (किल्ल्यावरून काढलेला फोटो)
३. मधाची शेती
४. देवाचा पार

वाचने
10717
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
लेख संक्षिप्त आहे
In reply to लेख संक्षिप्त आहे by चलत मुसाफिर
खूप भारी लिहिलंय.
In reply to खूप भारी लिहिलंय. by एस
रोचक विषय
In reply to रोचक विषय by चलत मुसाफिर
मस्त लिहीलंयत!! नवीन असलात
टेंन्शन नका घेऊ, मस्त जमतय.
In reply to टेंन्शन नका घेऊ, मस्त जमतय. by लॉरी टांगटूंगकर
धन्यवाद.
क्लासिक!
In reply to क्लासिक! by पैसा
जरूर
जाम भारी आहे हे.
अरे वा
In reply to अरे वा by दिपक.कुवेत
बायकोच्या हौसेखातर
In reply to अरे वा by दिपक.कुवेत
काश्मीर नव्हे
चलत मुसाफिरजी, आपले टंकन,
छानच
छान फोटू.. आणी वर्णन!
आवडलं
छान !
वाह... नविन ठिकाण कळाले.
हैन दणका!!!!! भारीच की ओ.
मस्त
मस्त ठिकाण आहे. सुंदर फोटो.
वॉव!!!
सुसाट !!!!!!!!
सुरेख फोटो. रियासीची ओळख
छान