लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काल दिनांक २८ जून २०१४ रोजी उत्साही मिपाकर पळसदरी येथे वर्षा सहलीसाठी गेलो. पण वर्षा नसल्याने तिला नुसती सहल म्हणत आहोत हि नोंद घ्यावी. अर्थात मूळ कल्पना मुवि यांची होती आणि त्यानी सौदी मधुन व्यनि करून आमच्यासारख्या आळशी लोकांना जागे केले. ७. ४२ ला डोंबिवली ला येणारी कर्जत गाडीच्या कल्याण डब्यात ठरले. नूलकर साहेब कुर्ल्याहून आले आणि गाडीच्या स्थितीचे धावते समालोचन असल्याने गाडीत शोधाशोध करण्याची गरज पडली नाही
नूलकर साहेब एकटेच होते. माझी मुलगी चि. शमिका कॉमर्स च्या तिसर्या वर्षाला आहे ती पण यात सहभागी झाली. नंतर डोंबिवलीला मुवि सह कुटुंब (सौ आणि दोन मुलगे) भाते, कंजूस चढले. शनिवार असला तरी गाडीला थोडी फार गर्दी होती त्यामुळे सुरुवातीला इकडे तिकडे विखुरलेले मिपाकर कल्याण ला एकत्र बसले
अंबरनाथला भटक्या खेड्वाला आपल्या सौ बरोबर चढले आणि गाडीतून येणाऱ्या लोकांची गणना पूर्ण झाली
सर्व जण गप्पा मारत मारता कर्जत केंव्हा आले ते कळले नाही. सगळे गाडीतून खाली उतरलो त्यानंतर अजया ताई येणार म्हणून त्यान फोन लावला तर त्या थेट पळस दरीला गेल्याचे समजले. आता पळस दरीच्या गाडीला साधारण एक तास होता म्हणून सर्व जण खादाडी करायला कर्जत स्टेशन च्या बाहेर पडले. कंजूस आणि भटक्या खेडवाला यानी ठरवलेल्या हॉटेलात शिरलो. हॉटेलचे नाव आठवत नाही( काय फरक पडतो). आणि सर्वांनी मिसळ पाव मेदू वडा आणि बटाटे वडा सांबर या पदार्थांचा आस्वाद घेतला
डावीकडून अनुक्रमे शमिका खरे आणि श्री व सौ मु वि
भाते आणि भटक्या खेड वाला
चि. मु वि आणि सौ वैद्य (खेड्वाला)
मिसळ पाव माझी प्लेट
कंजूस उजवीकडे
सर्वांनी भरपेट खाल्ले आणि चहा कॉफी ची ऑर्डर दिली चहा घेईपर्यंत लक्षात आले कि आपला एक तास झाला आहे आणि गाडीची वेळ झाली आहे. अर्थात सर्वजण घाईघाईने स्टेशन कडे निघाले. मुवि नि फर्मान काढले होते कि ते सत्य नारायण करणार होते आणि ब्राम्हणांना दक्षिणा देऊन पुण्य मिळवणार होते पण त्यांनी मिपाकरांना अन्न दान करून पुण्य मिळवण्याचे ठरवले अर्थात अशा पुण्य कमावण्याच्या कामाला कोण कशाला हरकत घेईल?
पोट पूजेनंतर घाईने सर्व जन गाडी पकडून पळसदरीला उतरले
दाढीवाले नूलकर साहेब
पळसदरी धरण
पळसदरी धरणा वरून दिसणारे उद्यान एक्स्प्रेस चे विहंगम दृश्य
धरणाचा जलाशय
शमिका खरे
धरणावर चालणारे मिपाकर
सर्व जण पळसदरी धरणावर पोहोचले आणि तेथील निसर्गदृश्य पाहून खुश झाले. अर्थात पाऊस असता तर फारच मजा आली असती. तेथून दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर स्वामी समर्थांचा मठ आहे. अजया ताई तेथे साडे आठ पसुन्येउन स्वामींच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. सर्व मिपाकर त्यांच्या बरोबर स्वामींच्या चरणी लीन झाले. थोडा वेळ तेथे बसून गप्पा मारल्या. मग पुढील भटकंतीस सुरुवात झाली. पळसदरी च्या आसपास सर्वत्र हिरवेगार आहे आणि बाजूचे डोंगर डोळ्याला सुखवणारे आहेत. जागा रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. अगदी कमी कष्टात पोहोचण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. परत आलो तेंव्हा पर्यंत माझा खर्च १०० रुपये फक्त (रेल्वेच्या रिटर्न तिकिटाचे दोघांचे) इतर सर्व खर्च मुवि यांचा.
(मागून आवाज --मुवि परत सत्यनारायण केंव्हा करत आहेत कोण रे तो चावट?)
पाउस नसल्याने तेथील धबधब्यास आणि ओहोळास पाणी नव्हते. पण पाउस सुरु झाल्यावर येथे नक्की परत येण्याचे सर्वांनी ठरवून टाकले. बाकी वर्णन आणि फोटो नूलकर साहेब टाकतील आणि इतर मिपाकर माझ्या अर्धवट वर्णनाचे बांधकाम पूर्ण करतील अशी त्यांना मी विनंती करीत आहे
प्रतिक्रिया
व्वा!! मस्तच झाली की सहल.!
अरे वा!
अरे वा!
झाले का मुविंचे कट्टे आणि सहली सुरु??
(No subject)
कालच बुवा आणि धन्याबरोबर
??
पळसदरीच मूळ नाव आहे.
धन्यवाद.
छे, छे!
रेल्वे नावात नेहमी गोंधळ
झक्कास झाली हो सहल !!!
अरे सहीच झाली पिकनिक
अरे वाह.
आणखी फोटो इथे आहेत
छोटीशी सहल आवडली. फोटू
मस्त सहल!
छान झाली की सहल...
झक्कास
क्लाअसच! फूड बाकी गुड ! जबर!
सहलीचा पुढच्या अर्ध्या भागाचा
म्हणजे मस्त कट्टा करता येईल व
उत्तम झाली सहल!
मस्त कट्टा. वीकांतास मिपाकर व
:ड
शिवाय लील्याच्या कवितांचा
धन्यवाद!
वृतांत व फोटो आवडले
नूलकर साहेबांचे काही फोटो
छान आलेत, फक्त शेवटून चौथा
वाळलेली सफरचंद असावीत की काय
रातंबे
रातांब्यांची (कोकमांची) सालं
ते वाळलेले अळु असावेत
ते भटक्या खेडवाला यांनी
मस्त व्रुत्तांत.....
खंत.
भाऊ