पुरुषांचं डायेटिंग -- माझा अनुभव
लेखनप्रकार
आमची प्रेरणा
(अनघाताई, कृपया ह घ्यावे.)
बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चार कप्पी डबा घेवून जातेय (अर्थात माझं डायेटिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं डब्याचे जे कप्पे असतात ते हलका आहार संयमितपणे पोटात जाण्यासाठी असतात, आणि त्यानंतर चहा-वडा इ. अबर-चबर टाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. आहाराच्या शर्ती या पाळण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी असतात. अन या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते मागेपुढे कोणी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ हादडायला सुरु करतात. वय आणि ढेरी वाढत असताना चमचमीत खाणे कमी करणे, किंवा वडा, भजी या प्रकारांना फाटा देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , बुफेच्या मागच्या रांगेत असलेल्या डायेटिंगवाल्या बायकांना काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग लग्नघर/हॉटेल स्वता:च्या मालकी हक्काचे असल्यासारखे दणकून खातात. थोडेच, पण पोटभरीचे खाणे खाण्याची यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मधल्या टेबलवरचे सामोसे, कटलेट किंवा उजवीकडील टेबलवरची बिर्याणी अन चिकन आणि कडेच्या टेबलवरचे आईस्क्रीम अन फ्रुटसॅलड सर्वांवर सारखाच हात चालवतात. जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते.
सर्व लोक्स डेझर्ट खात असताना मधेच यांना तंदुरी खाण्याची हुक्की येते. यात ढेरीवाले, मसल्सवाले पण आले. आपण दोन्ही प्रकारच्या खाण्याचे पोटात कॉकटेल करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. व्हेज-नॉनव्हेज दोन्हीकडची महागाई आपल्यामुळे भडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे चिकन संपल्याबद्दल बुफेवाल्या बेअराशी हुज्जत घालणे .अहो मान्य आहे यांना थोडसं नॉनव्हेज आवडत असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे खाणं जीथल्यातीथे थांबवणार, प्लेटी हातात धरणार अन्ही मागच्या बिर्याणीवाल्याशी किंवा पुढच्या रस्सावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या बायका आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी पंगत थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. प्लेटा बाजूला ठेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री वजन कमी करून आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते खिल्ली उडवतील , आजूबाजूच्या ढेरीवाल्यांना ना कॉम्प्लीमेंटस देतील, पण त्या स्त्री डायेटिंग वाली च्या मनोनिर्धाराला खच्ची करून टाकतील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री खाद्यप्रेमीं पार्टीत गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला गर्दी माजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
वाचने
26769
वाचनखूण
प्रतिक्रिया
136
हिहिहि .. मज्जा आली बै !
ढेरी सुटलेल्या अल्पसंख्यांक
In reply to ढेरी सुटलेल्या अल्पसंख्यांक by प्रभाकर पेठकर
+१
In reply to +१ by बॅटमॅन
सत्याला त्याने फरक थोडीच
In reply to सत्याला त्याने फरक थोडीच by विजुभाऊ
हम्म, तेही आहेच म्हणा.
In reply to ढेरी सुटलेल्या अल्पसंख्यांक by प्रभाकर पेठकर
+१०००
In reply to +१००० by विटेकर
एखाद्याचे असे खाणं काढणं
हा हा हा
In reply to हा हा हा by दिपक.कुवेत
घे..घे.. मजा करून.
In reply to घे..घे.. मजा करून. by प्रभाकर पेठकर
एकदा पोट सुटले की फक्त पाठीवर
In reply to एकदा पोट सुटले की फक्त पाठीवर by प्रसाद गोडबोले
.
In reply to एकदा पोट सुटले की फक्त पाठीवर by प्रसाद गोडबोले
अरे देवा..
In reply to अरे देवा.. by चिगो
पोज
In reply to अरे देवा.. by चिगो
(No subject)
In reply to एकदा पोट सुटले की फक्त पाठीवर by प्रसाद गोडबोले
... अगदीच तसं काही नाही ...
... अगदीच तसं काही नाही ... पोटावरही झोपता येते...कोणाच्या पोटावर?In reply to ... अगदीच तसं काही नाही ... by स्थितप्रज्ञ म्हैस
स्वतःच्यच हो
In reply to घे..घे.. मजा करून. by प्रभाकर पेठकर
काका, एक शंका
In reply to काका, एक शंका by भाते
व्यनि...
वेडीये ही.
पूर्णपणे बाडिस
लिखाणासाठी स्नेहातैला चार
In reply to लिखाणासाठी स्नेहातैला चार by प्यारे१
नक्को मला !
In reply to नक्को मला ! by सस्नेह
.
In reply to . by प्रभाकर पेठकर
कोण गेलं म्हणे?
In reply to . by प्रभाकर पेठकर
ते "आमी नै ज्जा" असे असेल तर?
सॉल्लिड !!
१००
मस्त विडंबन
छान
चुकुन पुरुषांचे डेटींग असे
In reply to चुकुन पुरुषांचे डेटींग असे by ज्ञानोबाचे पैजार
डिश शिगोशीग भरुन घ्या.
ह्या जगात चारचं प्रकारची लोकं
In reply to ह्या जगात चारचं प्रकारची लोकं by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही हं.
In reply to नाही हं. by प्रभाकर पेठकर
कालाय तस्मै नमः
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by सुजल
आँ!
तुमच्या ऑफिस मधल वेगळ
In reply to तुमच्या ऑफिस मधल वेगळ by सुजल
हा तेही बरोबरे
In reply to हा तेही बरोबरे by पैसा
खी: खी:
In reply to खी: खी: by प्रभाकर पेठकर
शंभरी कधीच भरलीय
In reply to तुमच्या ऑफिस मधल वेगळ by सुजल
सुजलम्याडम,
In reply to सुजलम्याडम, by एस
-
In reply to सुजलम्याडम, by एस
अरे, अरे, मुख्य मुद्दा
भरुदे कि शंभरी
सालों साल की मेहनत और पैसा
एक सून्दर उदाहरण