नवरात्रामध्ये मी इथल्या साऊथ इंडियन ग्रुप मध्ये ललितासहस्त्रनाम वाचन करायला जात होते. तिथे प्रसाद म्हणून मिळणार्या पोंगल, खीर इ. गोड पदार्थांसोबतच हे वडे केले होते. मला आवडले. मी रेसिपी विचारून घेतली. खवय्ये मिपाकरांसाठी रेसिपी इथे देत आहे.
तांदूळ - २ कप
चणा डाळ- १ कप
उडिद डाळ - १ कप.
कडीपत्ता
कोथिंबीर
आलं साधराण १ इंच. (बहुतेक प्रसाद होता म्हणून लसूण घातला नसावा. आपण घालायला हरकत नाही)
मिरच्या ४-५.
धणे-जिरे पावडर २ टीस्पून
मेथीचे दाणे १ टीस्पून
ओवा चिमूटभर
मिठ चवीप्रमाणे
लाल मिरची पावडर आवडीप्रमाणे
१. प्रथम डाळी , तांदूळ , आणि मेथीचे दाणे स्वच्छ धुवून ४ तास भिजत घालावेत.
२. पाणी पूर्णपणे काढून मग तांदूळ, डाळी, मेथीचे दाणे, आलं, कोथिंबीर, मिरच्या, कडीपत्ता सगळे एकत्र वाटून घ्यावे. शक्यतो पाणी घालू नये. लागल्यास खूप थोडे घालावे.
३. या मिश्रणात लाल मिरची पावडर, ओवा, धणे जीरे पावडर आणि मिठ घालावे. चांगले हलवून साधारण अर्धा तास तसेच झाकून ठेवावे.
४. यात आता चिमूट भर सोडा घालून चमच्याने किंवा जमत असेल तर हाताने गोल आकार देउन वडे तळून घ्यावेत.
अतिशय स्पाँजी होतात हे वडे. आणि कोणत्याही चटणी, सॉस सोबत मस्त लागतात.
करून पहा आणि आवडले तर माझ्या दक्षिण भारतीय मैत्रिणीला धन्यवाद द्या.
- प्राजु
वाचने
9452
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान पाककृती!
याला अळु
In reply to छान पाककृती! by ललिता
नाही बहुतेक ....
In reply to याला अळु by विजुभाऊ
आलु बोंडा
In reply to याला अळु by विजुभाऊ
बोंडा किंवा ऊलुंधू
काय माहीती...
In reply to बोंडा किंवा ऊलुंधू by मानस
सहमत
In reply to काय माहीती... by प्राजु
होय तर...
In reply to काय माहीती... by प्राजु
हाहाहा..
In reply to होय तर... by रेवती
ऊलुंधू
In reply to बोंडा किंवा ऊलुंधू by मानस
अतिशय
फोटो
In reply to अतिशय by विसोबा खेचर
मस्त ग.
नाही गं..
In reply to मस्त ग. by शितल
करून बघायला हवेत.
मस्त्त्त्
पाणी
In reply to मस्त्त्त् by शिप्रा
मस्त..
तात्या हे वागण बर नव्हं
मिश्र डाळींचे वडे...
..
तिथे खाताना
टोमॅटोची चटणी कि लोणचं
अग ह्याला
छान