भारत व इंग्लंड यांच्यात इंग्लंड येथे २६ जून २०१४ ते ७ सप्टेंबर या दरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
या मालिकेत भारत इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ५ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने व एक २० षटकांचा सामना खेळेल. तसेच स्थानिक संघांविरूद्ध दोन ३-दिवसीय सामने व १ एकदिवसीय सामना आयोजित केलेला आहे.
भारत २६ जून पासून लिस्टरशायर विरूद्ध ३ दिवसांच्या सामन्याने मालिकेचा शुभारंभ करेल व ७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या २० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्याने मालिकेची सांगता होईल. एकूण ७४ दिवसांचा प्रदीर्घ दौरा आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर भारत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यापूर्वी भारत ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका १९९१-९२ मध्ये खेळला होता. त्यानंतर बहुतेक सर्व मालिका २, ३ किंवा जास्तीत जास्त ४ कसोटींच्या होत्या.
भारताचा कसोटी संघ असा आहे.
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), वरूण एरॉन, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, गौतम गंभीर, रविंद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईश्वर पांडे, पंकज सिंग, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा, मुरली विजय
दौर्याचे वेळापत्रक
सराव सामने
२६ जून - २८ जून वि. लिस्टरशायर
१ जुलै - ३ जुलै वि. डर्बीशायर
कसोटी सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होतील)
पहिला कसोटी सामना : ९ जुलै - १३ जुलै (स्थळ - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
दुसरा कसोटी सामना : १७ जुलै - २१ जुलै (स्थळ - लॉर्ड्स, लंडन)
तिसरा कसोटी सामना : २७ जुलै - ३१ जुलै (स्थळ - रोझ बाऊल, सदम्पटन)
चौथा कसोटी सामना : ७ ऑगस्ट - ११ ऑगस्ट (स्थळ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
पाचवा कसोटी सामना : १५ ऑगस्ट - १९ ऑगस्ट (स्थळ - केनिंग्टन ओव्हल, लंडन)
एकदिवसीय सराव सामना
२२ ऑगस्ट - वि. मिडलसेक्स
५० षटकांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होतील)
(१) २५ ऑगस्ट (ब्रिस्टल)
(२) २७ ऑगस्ट (कार्डिफ)
(३) ३० ऑगस्ट (ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
(३) ०२ सप्टेंबर (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
(३) ०५ सप्टेंबर (हेडिंग्ले, लीड्स)
आंतरराष्ट्रीय ट-२० सामना (भा.प्र.वे. नुसार संध्याकाळी ७:३० वाजता)
(१) ०७ सप्टेंबर (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
भारतीय संघात एकूण ६ मध्यमगती गोलंदाज आहेत (वरूण एरॉन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, पंकज सिंग, ईश्वर पांडे, ईशांत शर्मा). या व्यतिरिक्त स्टुअर्ट बिन्नी हा देखील मध्यमगती गोलंदाजी टाकतो. अश्विन व जडेजा हे दोनच फिरकी गोलंदाज संघात आहेत. रोहीत शर्मा देखील कामचलाऊ फिरकी गोलंदाजी करतो आणि विराट कोहलीच्या गोलंदाजीत काहीही दम नसला तरी धोनी त्याला प्रत्येक सामन्यात काही षटके तरी गोलंदाजी करायला लावतो. स्वतः धोनीसुद्धा रनअप् घेऊन गोलंदाजी टाकू शकतो.
संघात धोनीव्यतिरिक्त वृद्धिमान साहा व अजिंक्य रहाणे असे दोन यष्टीरक्षक आहेत. जडेजा व काही प्रमाणात अश्विन हे अष्टपैलू खेळाडू आहेत. उरलेले सर्व निखळ फलंदाज आहेत.
गौतम गंभीरचे पुनरागमन झाले आहे. परंतु मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी इ. ची निवड धक्कादायक आहे. मुरली विजय परदेशात फारसा यशस्वी ठरलेला नाही. रोहीत शर्मा देखील परदेशात फारसा यशस्वी नाही. ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. परंतु नुकत्याच संपलेल्या न्यूझीलँड विरूद्धच्या मालिकेत त्याने परदेशात २ वेळा एका डावात ६ बळी मिळविल्याने त्याची वर्णी लागली असावी. महाराष्ट्राच्या केदार जाधवने रणजी स्पर्धेत धावांचा रतीब ओतला होता. पण त्याला कसोटी संघात न घेता नुकत्याच संपलेल्या बांगलादेश विरूद्ध झालेल्या एकदिवसीय संघात घेतले व एकही सामन्यात न खेळविता परत आणले. मुरली विजयऐवजी तो चालला असता. तसेच अजून एखादा फिरकी गोलंदाज हवा होता (अमित मिश्रा, हरभजन सिंग किंवा अक्षर पटेल). अश्विन हा भारतीय खेळपट्ट्यांवरचा वाघ आहे. त्याने आतापर्यंत मिळविलेल्या बळींपैकी ८० टक्क्यांहून अधिक बळी भारतात मिळविलेले आहेत. परदेशात तो चालत नाही. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलँडमधील मालिकेत ५ एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त २ बळी मिळविले होते. कसोटी सामन्यात देखील तो निष्प्रभ ठरला होता. एकंदरीत मुरली विजय, शिखर धवन, रोहीत शर्मा, अश्विन, जडेजा इ. मंडळी भारताबाहेर अनेकवेळा निष्प्रभ ठरलेली आहेत. मध्यमगती गोलंदाजात विनयकुमारला संधी हवी होती. पण त्याला, मोहीत शर्माला व उमेश यादवला संधी मिळालेली नाही. विनयकुमारने रणजी स्पर्धेत त्याने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्याऐवजी तब्बल ५ महिने क्रिकेट न खेळलेल्या ईशांत शर्माला घेऊन निवडसमितीने काय मिळविले खुदा जाने.
कसोटीत साधारणपणे खालील संघ असेल असे वाटते.
गंभीर, धवन/मुरली विजय, पुजारा, कोहली, रहाणे, धोनी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरूण एरॉन्/ईशांत शर्मा.
इंग्लंड सध्या वाईट अवस्थेतून जात आहे. ६ महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मायदेशात ५-० असा सपाटून मार दिला. त्यानंतर न्यूझीलँड मध्ये इंग्लंडला न्यूझीलँडला हरविण्यात यश आले नाही. कालच संपलेल्या मायदेशातील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत श्रीलंकेने इंग्लंडला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-२ व कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी मात दिली. इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा फारच वाईट ठरला. ०-५ असा मानहानिकारक पराभव झाला. पण त्याबरोबर अपयशामुळे व नैराश्यामुळे जोनाथन ट्रॉट दौरा अर्धवट सोडून परतला, तर ग्रॅमी स्वॅनने अकाली निवृत्ती घेतली. कुक गेल्या ९ कसोटी सामन्यात बहुतेक डावात अपयशी ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियातील अपयशामुळे केव्हिन पीटरसनला डच्चू देण्यात आला. अँडरसन व ब्रॉडला मायदेशी खेळत असूनही गोलंदाजीत फारसे काही करून दाखविता आलेले नाही. सध्या फक्त इयान बेल व काही प्रमाणात जो रूट सातत्य टिकवून आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविण्याची भारताला सुवर्णसंधी आहे.
२०११ व २०१२ च्या कटू आठवणी अजून ताज्या आहेत. इंग्लंडमधील २०११ च्या मालिकेत भारत सर्व म्हणजे ४ कसोटी सामने हरला होता. ५ एकदिवसीय सामन्यांपैकी भारत ३ सामने हरला होता, एक बरोबरीत सुटला होता व एक पावसामुळे रद्द झाला होता. त्या संघातील फारच थोडे खेळाडू आताच्या संघात आहेत. धोनी, अश्विन, गंभीर, जडेजा, कोहली, ईशांत शर्मा वगळता इतर खेळाडू आताच्या संघात नाहीत. त्यानंतर २०१२ मधील भारतातील मालिकेत इंग्लंडने भारताला २-१ अशी मात दिली होती. सध्या भारताच्या फलंदाजीची मदार फक्त पुजारा, कोहली व काही प्रमाणात रहाणे यांच्यावर आहे. बाकीच्यांची अजिबात खात्री नाही. गोलंदाजीत फक्त भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी हेच काहीतरी करून दाखवतील. इतर फारसे प्रभावी पडतील असे वाटत नाही. फिरकी गोलंदाजांचा तर आनंदच आहे.
या कटू आठवणींच्या पार्श्वभूमीवर २०१४ मध्ये भारत विजयी व्हावा हीच अपेक्षा आणि सदिच्छा!
वाचने
28796
प्रतिक्रिया
129
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावी कटू आठवणी!
+१
In reply to भावी कटू आठवणी! by एस
लायकी नाही ह्यांची भारतीय क्रिकेट संघ म्हणवून घ्यायची
In reply to भावी कटू आठवणी! by एस
अश्विन आणि जडेजा फुलटाईम
ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे
>>> बाकी कालची कसोटी थरारक
In reply to ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मोठा लेख
लॉर्ड्सची व्दिशताब्दी !
लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष
In reply to लॉर्ड्सची व्दिशताब्दी ! by पामर
भारताविरूद्धच्या मालिकेसाठी
झहीर?
>>> झहीर ला का डच्चू दिला
In reply to झहीर? by फारएन्ड
पठाण बद्दल सहमत. प्रवीण कुमार
In reply to >>> झहीर ला का डच्चू दिला by श्रीगुरुजी
अश्विन आणि जडेजा फुलटाईम गोलंदाज नाहीयेत.
भारताचा इंग्लंड दौरा
सुरूवात तर चांगली झाली.
वा वा!
पहिला सराव सामना पावसामुळे
This is very useful
कालपासून भारताचा दुसरा सराव
दुसरा सराव सामना भारताने
In reply to कालपासून भारताचा दुसरा सराव by श्रीगुरुजी
ईशांत शर्मा??
In reply to दुसरा सराव सामना भारताने by श्रीगुरुजी
कितीही खराब खेळले तरी शर्मा
In reply to ईशांत शर्मा?? by पैसा
अवांतर : उद्या MCC 11 vs Rest
MCC 11 vs Rest of world
स्टार स्पोर्ट्स १/२/३ वर
In reply to MCC 11 vs Rest of world by कपिलमुनी
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व
In reply to MCC 11 vs Rest of world by कपिलमुनी
आफ्रीदी आणि दिग्गज ??
+१
In reply to आफ्रीदी आणि दिग्गज ?? by स्पार्टाकस
हरो किंवा जिंको, पण
पहिली कसोटी सुरु झालीय..
पहिली कसोटी सुरु झालीय..
पहिल्या कसोटीत आतापर्यंत बरी
दुसरा दिवस, जेवण ३४२/५.
धोनी उपखंडाबाहेरचं पहिलं शतक
गिलेस्पी-मॅकग्राथ प्रयोग
भारताला हा सामना जिंकण्याची
टू अर्ली टु से थिस.. खेळपट्टी
In reply to भारताला हा सामना जिंकण्याची by श्रीगुरुजी
अनिश्चितता!
भारतीय गोलंदाज विशेषत: इशांत
चमत्कार ....
११ व्या फलंदाजाबद्दल हा एक
चांगला धागा.
In reply to ११ व्या फलंदाजाबद्दल हा एक by आतिवास
मी तरी नाय हजर ब्वी इकडे.
In reply to चांगला धागा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामना अनिर्णित होणार हे नक्की
आजपासून दुसरा कसोटी सामना
जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून
सहमत ..
In reply to जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून by स्पा
- जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
In reply to जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून by स्पा
कसोटीत क्षेत्र रक्षण टी२०
In reply to - जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक by श्रीगुरुजी
तेंडुलकरांच्या सचिनला पण परत
In reply to कसोटीत क्षेत्र रक्षण टी२० by स्पा
भारताची फलंदाजी
शिखर धवनला पुढच्या कसोटीत घेतील?
रहाणे काल मस्त खेळला. त्याला
***सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.
In reply to रहाणे काल मस्त खेळला. त्याला by श्रीगुरुजी
कूक का क्या होगा?
जर कुकची कामगिरी सुधारली नाही
In reply to कूक का क्या होगा? by तुषार काळभोर
सामना चांगल्या अवस्थेत आहे.
मस्त सामना चाललाय. इंग्लंडला
भारताचा इंग्लंड्वर अद्भुत,
मस्त जिंकलो. कालच
तीच गोष्ट ईशांत शर्माची.
In reply to मस्त जिंकलो. कालच by श्रीगुरुजी
काल ईशांतने चांगली गोलंदाजी
In reply to तीच गोष्ट ईशांत शर्माची. by असंका
परंतु गेली काही वर्षे तो
In reply to काल ईशांतने चांगली गोलंदाजी by श्रीगुरुजी
सहमत.
In reply to परंतु गेली काही वर्षे तो by बाळ सप्रे
सहमतीला अनुमोदन.
In reply to सहमत. by अत्रुप्त आत्मा
बर्याच लोकांना धक्का बसला
In reply to सहमतीला अनुमोदन. by नाखु
त्याने पॉंटिंगची एकाच डावात
In reply to बर्याच लोकांना धक्का बसला by असंका
फॉर्म इज टेंपररी, क्लास इज
In reply to त्याने पॉंटिंगची एकाच डावात by श्रीगुरुजी
जिंकले..
पंचांचे काही निर्णय
कूक-धवन-बिन्नी
धवनला अजून एका कसोटीत संधी
भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला
In reply to धवनला अजून एका कसोटीत संधी by श्रीगुरुजी
>>> त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे
एक शंका: खेळपट्टी आणि पबातला
In reply to >>> त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे by श्रीगुरुजी
दारूच्या नशेत खेळपट्टीवर
In reply to एक शंका: खेळपट्टी आणि पबातला by प्यारे१
तिसर्या कसोटीसाठी इंग्लंडने
पाटा खेळपट्टीवर भारताची वाट
रहाणे पण गेला.
फॉलॉअन च्या छायेत.
फॉलोऑनची परिस्थिती असली तरी
In reply to फॉलॉअन च्या छायेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
४०० पुरेसे नाहीत
In reply to फॉलोऑनची परिस्थिती असली तरी by श्रीगुरुजी
तेव्हा फॉलोऑनची परिस्थिती
In reply to ४०० पुरेसे नाहीत by तुषार काळभोर
जिंकायला ४४५ करायच्यात.
४/१०२
कसल्या बेक्कार विकेटा टाकल्या.
In reply to ४/१०२ by मंदार कात्रे
+१
In reply to कसल्या बेक्कार विकेटा टाकल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोण देव?
In reply to +१ by श्रीगुरुजी
नाय हो
In reply to +१ by श्रीगुरुजी
लॉर्ड्सवर भारतीय फास्ट
>>> बाकी भारत परदेशात
गेल्या दोन दशकात म्हणायचं
In reply to >>> बाकी भारत परदेशात by श्रीगुरुजी
हरलो.......
हम्म
पुढच्या सामन्यात धवन आणि
In reply to हम्म by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अजून एक बदल अपेक्षित आहे.
In reply to पुढच्या सामन्यात धवन आणि by श्रीगुरुजी
2012 नंतर एकदम 2014 आले का हो
In reply to पुढच्या सामन्यात धवन आणि by श्रीगुरुजी
>>> 2012 नंतर एकदम 2014 आले
In reply to 2012 नंतर एकदम 2014 आले का हो by असंका
सचिन आणि युवराजनंतर सर्वात
In reply to >>> 2012 नंतर एकदम 2014 आले by श्रीगुरुजी
रोहीतच्या कसोटी डावांची
In reply to सचिन आणि युवराजनंतर सर्वात by असंका
नाही हो, असं नाही. तीन
In reply to रोहीतच्या कसोटी डावांची by श्रीगुरुजी
जडेजाने सोडलेला CATCH आणि
वृध्दीमान साहा भारतात परतणार
वा टीम इंडिया!
आम्ही आता प्रो-कबड्डी बघायला
In reply to वा टीम इंडिया! by भाते
६-७ दिवस मिपा संकेतस्थळ बंद
लज्जास्पद पराभव.
उद्यापासून शेवटचा कसोटी सामना
पुन्हा एकदा तेच रडगाणं.
भारतीय संघाला शिव्या द्यायची
+१
In reply to भारतीय संघाला शिव्या द्यायची by श्रीगुरुजी
>>> 'ते' काम करणारा वळु
आजपासून भारत वि. इंग्लंड ५
काल चक्क जिंकलो आपण. तब्बल
>>> कोहलीला आता काही काळ
In reply to काल चक्क जिंकलो आपण. तब्बल by श्रीगुरुजी
हाच का तो संघ ३ सामने लढत न
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे
In reply to हाच का तो संघ ३ सामने लढत न by बाळ सप्रे
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे
In reply to हाच का तो संघ ३ सामने लढत न by बाळ सप्रे
आणि ह्या इंग्लिश संघाबद्द्लही
In reply to सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे by श्रीगुरुजी
इंग्लंडचा एकदिवसीय संघ आणि
In reply to आणि ह्या इंग्लिश संघाबद्द्लही by असंका
मुरली विजय आणि गौतम गंभीरने
In reply to इंग्लंडचा एकदिवसीय संघ आणि by श्रीगुरुजी
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते
In reply to मुरली विजय आणि गौतम गंभीरने by असंका
माझा काहीही दावा नाहिये. आपण
In reply to तुम्हाला काय म्हणायचे आहे ते by श्रीगुरुजी
हा संघ कसोटीत पुन्हा एकदा
In reply to माझा काहीही दावा नाहिये. आपण by असंका
चौथी वन्डे- भुवनेश्वर कुमार
भारताने लागोपाठ ३ रा सामना
ओक्के श्रीगुरुजी
In reply to भारताने लागोपाठ ३ रा सामना by श्रीगुरुजी
शेवटचा सामना हरून भारताने