Skip to main content

मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???

लेखक मारवा यांनी गुरुवार, 19/06/2014 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांपुर्वी मराठी संस्थळावर एक धागा माझ्या वाचण्यात आला होता. त्याचा विषय मला पडलेले प्रश्न अशा स्वरुपाचा होता. यात धागाकर्त्याने त्याला भेडसावणारे काही प्रश्न विचारले होते व त्याची उत्तरे ही अत्यंत अभ्यासपुर्ण अशी इतर सभासदांकडुन त्या धागाकर्त्याला मिळाली होती तेव्हापासुनच एक तीव्र इच्छा माझ्या ही मनात होती की आपण ही आपल्याला भेडसावणारे/पडणारे प्रश्न विचारुन बघावेत कदाचित आपल्याला ही आजतागायत माहीत नसलेली उत्तरे या निमीत्ताने सापडतील. अखेर आपला अनुभव माहीती ज्ञान हे इतक मर्यादीत आहे की त्यामुळे प्रश्नांना इतर ज्ञानी व्यक्तींसमोर मांडणे व उत्तर मिळतात का बघणे हा एक उत्तम पर्याय आहे. अर्थात मला पडलेले प्रश्न काहींना क्षुल्लक बिनमहत्वाचे वाटु शकतात पण माझ्यापुरते तरी मला त्यांची उत्तरे जाणुन घेण्याच कुतुहुल आहे. हे कुतुहल मिटवण्याच्या आकांक्षेने मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न आपणासमोर मांडतो. जाणकारांनी कृपया उत्तर देउन उलगडा कराव ही नम्र विनंती. १-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का? २-महाराष्ट्राच्या कले च्या इतिहासात लावणी तमाशा या लोककला दिसुन येतात मात्र भरतनाट्यम-कुचीपुडी सारख्या अभिजात शास्त्रीय (ज्यामध्ये सखोल नियमावली-ताल-संगीत-वेशभुषा-साधना-चिंतन अंतर्भुत असते) असे स्वरुप असलेली नृत्य कला महाराष्ट्रात का निर्माण वा विकसीत झाल्या नाहीत?यामागे कुठली मनोसामाजिक कारणे आहेत ? ३-अमेरीकेत एखाद्या कंपनीने लॉबींग करणे कायदेशीर आहे व वॉलमार्टने काही कोटी रुपये भारतात लॉबींग साठी खर्च केले अशी बातमी होती. राडीया टेप्स मधील नीरा ताइ या देखील लॉबींग करत होत्या. तर लॉबींग करता म्हणजे नेमक काय व कस करतात ? याची काही उदाहरणे मिळु शकतील काय ? की लॉबींग म्हणजे गावठी भाषेत संबधीत अधिकारी व्यक्तीचे हात ओले करुन काम फ़त्ते करणे इतकाच साधा असतो? व असे असल्यास तो अमेरीकेत कायदेशीर कसा मानला जातो? व भारतात या लॉबींग वरील खर्चाला मान्यता आहे का ? लॉबींग मध्ये काही चांगल्या अर्थाने ही इतर काही बाबी समाविष्ट असतात का ? ४- संपादित ५-नेसकॉफ़ी च्या व्हेंडीग मशीन मध्ये कॉफ़ी ज्यातुन पडते त्या नळीतुन सतत आत घुसुन साखरयुक्त पावडर खाण्यास चटावलेल्या मुंगळ्यांचा बंदोबस्त कसा करावा ? ६- घरी बनवलेल आईसक्रिम बाजारातल्या आईसक्रीम सारख मउ मउ का बनत नाही ? घरच आईसक्रीम नेहमी बर्फ़ाळ का बनत? घरी आइसक्रीम बनवतांना बाजारातल्या सारख बिनबर्फ़ाळ बनवण्यासाठी काय उपाय आहे ? नेमक काय केल तर आईसक्रीम कमी बर्फ़ाळ बनतं? ७- हिंदी सिनेमात नायिकेने “ मै तुम्हारे बच्चे की मॉ बननेवाली हु “ असे उच्चारल्यावर नायक तिला नेहमी सच ? अस का विचारतो ? यात स्वनिर्मीती क्षमते बद्दलचा अविश्वास असतो की अजुन काय रहस्य असत ? ८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये जिभेतील टेस्ट बड्स कमजोर होउनही सारख चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना का वाढीस लागते? त्यांना या खाण्याचा आनंद टेस्ट बड्स ची साथ नसतांनाही कसा घेता येतो? ९- मोटरसायकल मध्ये मागील व पुढील टायर मध्ये हवे चे प्रेशर वेगवेगळे मेंटेन करण्याची सुचना असते. असे वेगवेगळे प्रेशर ने हवा भरण्याच्या सुचनेमागे कोणते शास्त्रेय कारण असते ? याने काय साधले जात असते? दोन्ही टायर मध्ये समान प्रेशरने हवा भरल्याने काय व कशी हानी होउ शकते ? 10- पोलिसांचे खबरी असतात व ते अनेक गुन्हेगारांविषयी गुन्ह्यांविषयी महत्वाची अशी माहीती पोलीसांना पुरवित असतात असे ऐकुन वाचुन आहे. ते स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुळात हे काम का करतात ? ही कोण लोक असतात ?त्यांना या मोबदल्यात काय मिळते? व हा मोबदला पोलिस देतात तर ते स्वत:च्या पगारातुन देतात का ? ही खबरयांची यंत्रणा कुठल्या मोटीव्हेशनने ही धोकादायक कामे करते? ११- फ़ॅशन विक मध्ये एक ड्रेस डीझायनर कलेक्शन सादर करतो त्यानंतर त्याच्या कपड्यांची विक्री कशा पद्धतीने होत असते? म्हणजे हा बिझीनेस कसा चालतो नेमका ? एका कलेक्शन मध्ये समजा एक कुर्ता सादर करण्यात आला तर मग ऑर्डरनुसार त्याच्या अनेक कॉपीज विकण्यात येत असतात की काही वेळेस एखादा एकच पिस बनविण्यात आलेला असतो ? जे खरेदीदार असतात ते कोण असतात ? म्हणजे ते रेडीमेड गारमेंट विकणारया कंपनीचे प्रतिनीधी असतात की आणखी कोण ? व ते ती कंसेप्ट डिझाइन खरेदी करतात की आणखी काही? आणि या धंद्यात पेटंट कींवा कॉपीराइट असतो का ? नसल्यास कोणाचीही डीझाइन कोणीही कॉपी केली तर चालत का ? १२- आय बी एम कंपनी ही सध्या जो धंदा करते तो नेमका कशाचा करते ? काय बनविते काय विकते काय सेवा पुरविते ? कारण या कंपनीच्या जाहीराती काही काळापुर्वी टीव्ही वर येत असत त्यांचा अर्थ काय होता तो आजपर्यंत फ़ार च कमी लोकांना कळलेला आहे अतिशय गुढ अशा जाहीराती आय बी एम कंपनीच्या होत्या. १३- मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये एकाच वेळेस तीन तीन रुग्णांवर डॉक्टरांच्या तीन टीम कडुन शस्त्रक्रिया करण्यात येते म्हणजे एक टीम एका रुग्णाचे हार्ट ओपन करते मग दुसरी टीम दुसर काम करते अस काहीतरी .... हे मी केवळ ऐका ट्रेन मधल्या दोन जणांच्या संवादात अर्धवट अइकल होत. अस खरच होत का ? व नेमक कस होत असेल ? मला फ़ार उत्सुकता आहे जाणुन घेण्याची ही ऑपरेशन्स ची कशी पद्धत आहे व यात टीम्स च्या को ऑर्डीनेशन मध्ये चुक होत नसेल का ? १४- मुंबई च्या सिनेजगतात आता पुरुषांचही लैंगिक शोषण होत आहे का ? व याचे प्रमाण वाढतय असा निष्कर्श आपण सोनु निगम च्या बातमी वरुन काढु शकतो का ? की ही फ़ारच अपवादात्मक अशी बातमी होती ? १५- टुर डे फ़्रान्स व रेस अक्रॉस अमेरीका या सायकलींच्या रेसमध्ये सर्वश्रेष्ठ रेस कुठली आहे व कुठल्या कारणांमुळे ?

वाचने 45570
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

सॉरी शक्तिमान.. आमाला माहित नव्हते हो.. *biggrin* ( जल्ला मेला मिपावरच नव्हे या दुनियेतच हा लोचा आहे. कुठे काय वर्ज्य त्येचा कंफुजन होतंय सारखा.. ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

याचं मला ही कुतुहल आहे. या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला आणि चर्चा सुद्धा विधायक (पण रोमांचक) झाली. सो आय वंडर. प्रश्न पुनर्प्रकाशित होऊ शकतो का असा विचार मनात आला.

In reply to by संजय क्षीरसागर

>>या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला पुलंनी म्हटलंय, काय म्हटलंय पेक्षा कुणी म्हटलंय याला महत्त्व असतं. तसंच इथेही काय लिहीलंय पेक्षा कुणी लिहीलंय हा क्रायटेरिया असावा. तुम्ही नमूद केलेला धागा स्त्रीसदस्याने काढलेला असल्याने त्यात संबंधित मंडळींना निरागस भाव दिसला असावा. वरचा चौथा प्रश्न एका पुरुष आयडीने (पुरुष आयडी असल्याचं वाटतंय तरी) मांडला असल्याने तो थिल्लरपणा करण्यासाठीच काढला आहे असं वाटल्यास नवल नाही. ;) तस्मात सम आर मोअर इक्वल हे एकदा लक्षात ठेवलंत की मिपावर वावरताना असले प्रश्न पडणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

पोझिशन्स वरंच तर आक्षेप आहे! तिथला हा प्रतिसाद पाहा :
जसा Fuck हा शब्द नाम, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, विषेशण, क्रियाविषेशण असा कसाही वापरला जाण्याच्या ताकतीचा आहे, तसाच Sexy हा शब्द. त्याची व्याप्ती फार मोठी आहे.
आणि त्या खालचा हा उपप्रतिसाद !
"FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच. [इच्छुकांनी व्यनी करावा.]
चित्रगुप्तांनी तिथे फोटो पण एकदम भेदी टाकलेत. बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?

In reply to by संजय क्षीरसागर

बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?
अहो, एकदा का सम आर मोर ईक्वल हे ठरलं तर मग आमचा तो रोम्यांटिसिझम अन तुमचा तो पर्व्हर्ट बीभत्सिझम असंच होणार की. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही बोलता हे आणि हेच्च महत्त्वाचं असतं तिथे.

In reply to by बॅटमॅन

अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.
हे वाक्य, आणि तेही पिरानं म्हटलंय, म्हणजे प्रश्नोत्तरं सभ्यतेचे संकेत पाळून चालली असावीत असं वाटतं.

In reply to by संजय क्षीरसागर

काका तो तुमच्या साईडनीच बोल्तोय! आणि ह्या वेळेस चक्क मी पण..!! सभ्यतेचे संकेत पाळले जात होते हे मान्य आहे! पण काही प्रतिसाद उडाले वगैरे असतील तर माहीत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

लेखातूनच संपादित झाल्यानं तदनुषंगिक संपादन माझ्या आणि इतरांच्या प्रतिसादात झालंय. बाकी पुणे कट्ट्याचे फोटो पाहता, मी काका कॅटेगरित (कोणत्याही अंगानं) बसत नाही!

In reply to by संजय क्षीरसागर

मी तुमच्या "अपीअरन्स" ला काका नाही म्हणाले.. असो...

संक्षी आणि बॅटमॅनची कमाल आहे...जुगलबंदी जोरदार चाल्लेय