Skip to main content

...हमने इश्क किया है.(१)

लेखक रामदास यांनी बुधवार, 15/10/2008 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
झेंडूच्या उफाड्यावर दिवसभर, निलाजरी पुंडाई करणारा उनाड चतुर. नाईलाजाच्या वाटेने घरी येतो. तसा मी येतो तिनसांजेला. तेव्हा... तुझ्या ओंजळीतली गुलबाक्षी चिंबून गेली असते. बावळट... ***** अशीतशी इथे तिथे वाट बघू नको माझी. का? का? का?.. तुझ्या सात्वीक ओठाची गुलबाक्षी थरथर. (मी वसूल करतो माझी भ्रष्ट निराशा) का? काय बावळट.. का?..का? का? का?.. कारण.. का? का?.. कावळ्याची असते नजर -गस्त पिकत्या पपईवर.
Taxonomy upgrade extras

वाचने 5354
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

झेंडुच्या उफाड्यावर आणि निलाजरी पुंडाई हे शब्द फारच आवडले.. भारी कविता ! --लिखाळ.