नमस्कार मंडळी!
जमिनीचा नकाशा
मराठवाड्यामधील एका तालुक्याच्या ठिकाणी माझी १२ एकर जमीन आहे आणि मला शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.
जमिनीसंबंधित तथ्ये:
मराठवाड्यामधील एका तालुक्याच्या ठिकाणी माझी १२ एकर जमीन आहे आणि मला शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.
जमिनीसंबंधित तथ्ये:
- जमिनीचा आकार सुमारे १२ एकर आहे. (नकाशात दाखविल्याप्रमाणे निळ्या रेषेची चतुःसीमा)
- गावापासून ही जमीन एक- दीड किमी अंतरावर आहे.
- मुख्य रस्त्यापासून जमीन २५० फूट अंतरावर आहे. (लाल रेषा) सध्या या शेतात जाण्याचा तोच मार्ग आहे.
- या भागातील जमिनीचा उपयोग सध्या शेतीसाठी होत असून नजीकच्या भविष्यात (५-१० वर्षांत) येथे घरबांधणी सुरु होईल कारण गावात दुसरीकडे फारशी जमीन उपलब्ध नाही.
- इतके दिवस आजूबाजूचे जुने शेतमालक इ.शी असलेल्या पूर्वापार संबंधांमुळे शेतात जाण्यासाठी अटकाव नव्हता. पण आता शेताच्या दोन बाजूच्या जमिनी विकल्या गेलेल्या आहेत. नवीन शेतमालकांपैकी एकाने (डाव्या बाजूचा शेजारी) आपल्या शेताभोवती काटेरी कुंपण घातले आहे आणि दुसऱ्याने (माझे शेत आणि मुख्य रस्त्यादरम्यानचा) घालण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या शेतात जाण्याचा मार्ग या दोघांच्या सामायिक धुऱ्यावरून जातो; तो बहुधा लवकरच बंद होईल.
- सदर जमिनीवरून (नारिंगी रेषा) ३० वर्षांपूर्वी मुख्य रस्ता जात होता, नंतर शासनाने तो रस्ता बदलून (पिवळी रेषा इथे) नेला. रस्ता बंद पडल्याने शेतकऱ्यांनी ती जमीन नांगरून काबीज केली आणि आपापले जमिनक्षेत्र वाढवून घेतले.
- मला शेतात जाणे-येणे सुरळीत चालू ठेवण्यासाठी तातडीने काय करता येईल?
- वाटणी, विक्री इत्यादिंमुळे तुकडे पडलेल्या आणि मुख्य रस्त्यांपासून दूर असलेल्या शेतात; दरम्यानच्या शेतांमधून बैलगाडी, ट्रक्टर, ट्रक, टेम्पो, गुरेढोरे इत्यादींना जाण्यासाठी मार्ग काढून देण्याची शासनाची जबाबदारी आहे का?
- या सर्व प्रकरणातील संबंधित कायदेशीर बाबी कोणत्या?
- रस्ता बंद पडल्याने शेतकऱ्यांनी जमीन नांगरून काबीज केली आणि आपापले जमिनक्षेत्र वाढवून घेतले. अश्या रीतीने शेतकऱ्यांनी काबीज केलेली जमीन परत ताब्यात घेण्याचा शासनाला अधिकार आहे का?
- तो अधिकार शासनाने बजावावा (म्हणजे माझ्या शेतीला जाण्यासाठी हमरस्ताच मिळेल!) यासाठी काय करता येईल?
वाचने
35891
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वहिवाट बंद करता येत नाही.
अनुमोदन.
In reply to वहिवाट बंद करता येत नाही. by बाबा पाटील
कायदे विसरुन जा
+७ १२
In reply to कायदे विसरुन जा by एसमाळी
बाहुबल शक्यतो वापरु नकाच...
In reply to कायदे विसरुन जा by एसमाळी
+१
In reply to बाहुबल शक्यतो वापरु नकाच... by बाबा पाटील
सहमत.
In reply to बाहुबल शक्यतो वापरु नकाच... by बाबा पाटील
वकिलाचा सल्ला घेतला का?
अप्रोच रोड देणे कायद्याने
सातबारा
तहसीलदाराला अर्ज दिला आहे...
असे जमेल का ?
असे जमेल का ?
>>>>अदलाबदल
In reply to असे जमेल का ? by ब़जरबट्टू
इझमेंट अक्ट १८८२ वापरा
143.Right of way over
प्रांताकडे तक्रार केल्यास