Skip to main content

हिंदु अस्मितेचा उदय

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 10/06/2014 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram… आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे . नाही तर उगाच कोणीही यावे टीकली मारुनी जावेटाईप जो उठसुट धर्मावर टीका करतोय हे पाहण्याचा कंटाळा आला होता ! कोणी हिंदुंच्या देवी देवतांची नग्न चित्रे काढतो तर म्हणे व्यक्तीस्वातंत्र आणि कोणी इंग्लंड मधे पुस्तक प्रकाशित केले तर त्याचावर पहिला बॅन आमच्या देशात ...तेव्हा व्यक्तिस्वातंत्र नाही तेव्हा अल्पसंख्यांच्या भावना दुखावणारे लेखन ! हिंदुंची मंदीरें ताब्यात घ्या ...अन इतरांना फंडींग करा आम्ही "हिंदुराष्ट्र" म्हणले की देषद्रोह आणि तिकडे मेघालय , नागालॅन्ड जाहीरपणे स्वतःला ख्रिश्चन स्टेट डीक्लीयर करतात तर ते देशप्रेमी ! कश्मीरमधे लाखो पंडीतं देशोधडीला लागले त्यांची काळजी नाही पण बांग्लादेषातुन आलेल्या बिच्चार्‍या घुसखोरांचे काय होणार ह्याची सरकारला चिंता !! ह्या धर्मातल्या अंधश्रध्दांविरुध्द बिनधास्त कायदे करा आणि महाराष्ट्रातील एक प्रख्यात "फादर" सेन्ट बनण्याच्या प्रक्रियेतल्या 'चमत्कारांचे' समर्थन करतात ते गुपचुप ऐकुन घ्या !! बस्स . बस्स . बस्स. आता असा दुटप्पीपणा चालणार नाही ...आता सगळ्यांना समान कायदा ...आता हिंदुंच्या भावनांचाही विचार करावा लागेल... उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे चालणार नाही आणि वाकडेतिकडे बोललात तर त्याची संपुर्ण जबाबदारी घ्यावी लागेल ! आणि हळु हळु लोकांच्या लक्षात येईल स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ... स्वातंत्रासोबत जबाबदारीही येत असते. Freedom comes with responsibility .....or Consequences !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18414
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली 'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका,' असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इतकंच नव्हे तर पुस्तकांचे लेखक आनंद यादव व मेहता प्रकाशनाला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पूर्ण माहिती द्या राव! घाबरलो ना मी.

माझ्याकडे "लोकसखा ज्ञानेश्वर" आहे, पण मी ते फाडणार नाही. माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.

In reply to by धन्या

मी स्वतः ह्या दोनपैकी एकही पुस्तक वाचलेले नाहीये , पण तुकाराम पुस्तकावरुन जोरदार गदारोळ झालेला हे ऐकुन आहे ... आपण सदरपुस्ताकाचा रिव्हिव्यु लिहावी अशी ह्या निमित्ताने विनंती करीत आहे ...
माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.
>>> धन्या , हिंदु किंग इन इस्लामिक इंडियाबाबत तुझे काय मत आहे ? किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ? माझ्या लेखना उद्देश इतकाच होता की आता असले भावना दुखावणारे लिखाण हिंदुंकडुन खपवुन घेतले जावु नये ... हिंदु सहिष्णु आहे ह्याचा अर्थ कोणीही उठसुठ वाट्टेल ती टीका करावी असा नव्हे ... प्लीज नोट : मी आधीही म्हणालो होतो की हरकत 'टीका करण्याला' नसुन 'अधिकार नसताना टीका करणे' ह्याला आहे. आनंद यादव हे जर "कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पुजनाचे ।। किंव्वा परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम किंव्वा मना बोलणे नीच सोशीत जावे " ह्यालेव्हलच्या संत अवस्थेत पोहचले असतील आणि मग त्यांनी तुकाराम ज्ञानेश्वर ह्यांच्यावर टीका केली असेल तर मी माझा लेख विनम्रपणे मागे घेत आहे ! पण तसे काही असेल असे वाटत नाही , उलट ते वरच्या कोर्टात गेलेत असे ऐकुन आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या , हिंदु किंग इन इस्लामिक इंडियाबाबत तुझे काय मत आहे ? किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ?
मी ही दोन्ही पुस्तके वाचली नाहीत. महापुरुष मान अपमानाच्या पलिकडे गेलेले असतात. किंबहूना ते त्यांच्या हयातीतही तसेच वागलेले असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात एखाद्या पुस्तकात काही लिहिले असल्याने त्याने त्यांचा अपमान होत नसावा असे माझे मत आहे.

In reply to by धन्या

मी दोनही पुस्तके वाचली आहेत आणि दोनही मला आवडली आहेत. फाडून टाकण्याइतके आक्षेपार्ह त्यात काहीच नाही, असे माझे मत आहे.

In reply to by धन्या

माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.
+१.
महापुरुष मान अपमानाच्या पलिकडे गेलेले असतात. किंबहूना ते त्यांच्या हयातीतही तसेच वागलेले असतात.
मंबाजीची गोष्ट आठवली. तुकारामाच्या म्हशीने मंबाजीच्या बागेतल्या झाडांची नासधूस केल्याबद्दल मंबाजीने त्याला बाभळीच्या फोकांनी फोडून काढलं.
किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ?
मी मनुस्मृती वाचलेली आहे. त्यात 'मोजकाच' मजकुर आक्षेपार्ह आहे असं म्हणणं म्हणजे विनोद आहे. ते सोडा. पण मनुस्मृतीच्या सर्व प्रती नष्ट करा, असं कुठच्या कोर्टाने सांगितलेलं आहे? ती आहे तशीच राहू द्या. विरोधकांनीही मनुस्मृतीचं प्रतिकात्मक ज्वलन केलं. असा विरोध दर्शवणं वेगळं आणि कोर्टाकडून बंदी येणं वेगळं. हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.

In reply to by राजेश घासकडवी

हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.
प्रचंड सहमत ... पण आताचे जाणते राजेच असे आहेत की काय बोलणार... रच्याकने ... आत्ताच्या काळात कोणालाही "जाणता राजा" म्हणणे म्हणजे त्या खरोखरच्या जाणत्या राजाचा आपणच करत असलेला अपमान नाही??? या बाबतीत कशा कोणाच्या भावना दुखावत नाहित ... अगदी खर्या जाणत्या राजच्या वंशजांच्या सुध्धा... आपल्या भारतीयांच्या कु**वर छडी मारणारा कोणी असल्याशिवाय आपण सरळपणे कधीच वागत नाही

In reply to by राजेश घासकडवी

>>>>हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे. अत्यंत स्तुत्य इच्छा आहे पण दुर्दैवानं ती पूर्ण होणं अवघडच! बहुसंख्य लोक हुल्लडबाजी नि दंगा ह्यामध्येच दंग होताना आढळतील. समत्वानं विचार होणं शक्य नाही. बाकी इतरांची क्रिया आपल्या हातात नसतेच. आपल्याला शक्य असते ती प्रतिक्रिया. नि तीच कशी व्यक्त करायची ते ठरलं की जमलं. व्यक्ति पातळीवर जमतं बर्‍याचदा पण समष्टी बद्दल विचार करता हे जमणं शक्य नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. कुणाला स्कोअर सेटल करायचे असतात तर कुणाला आपलं स्थान बळकट करायचं असतं. कुणाला पकड मजबूत करायची असते तर कुणाला आणखी काही!

In reply to by राजेश घासकडवी

मी मनुस्मृती वाचलेली आहे. त्यात 'मोजकाच' मजकुर आक्षेपार्ह आहे असं म्हणणं म्हणजे विनोद आहे.
मग मनुस्मृतीतील किती टक्के श्लोक जातीयतेचे समर्थन करतात ? ( हा तिरकस प्रस्न नाही , केवळ कुतुहल म्हणुन विचारतोय , मागे कोणीतरी पुरुषसुक्त जातीयतेचे समर्थन करते असे म्हणत होता त्याला मी पुराव्यानिशी सिध्द करुन दाखवले होते की त्यातील १०% पेक्षाही कमी श्लोक वर्णाश्रम व्यवस्थे विषयी बोलतात )
पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.
ओके . माझ्या अपेक्षा काही अशा आहेत ...http://en.wikipedia.org/wiki/Reconquista http://en.wikipedia.org/wiki/Reconquista#mediaviewer/File:Spanish_recon…

In reply to by प्रसाद गोडबोले

आयला काय अफाट लॉजिक आहे! म्हणजे दहा किंवा अमुक% पेक्षा (अ‍ॅज ष्टिप्युलेटेड बाय द हानरेबल गोडबोलेसाहेब) जास्त कंटेंट आक्षेपार्ह असला तरच ते पुस्तक वाईट मानण्यात येईल. मग हेच लॉजिक संतसूर्य तुकारामला लावा की. सदर्हू पुस्तकात किती टक्के भाग आक्षेपार्ह आहे? (हा तिरकस प्रश्न नाही, केवळ कुतुहल म्हणुन विचारतोय)

In reply to by चिन्मय खंडागळे

करेक्ट ! आता तुम्ही जरा कुठे समजुन घेवु शकाल ... पहिली गोष्ट
दहा किंवा अमुक% पेक्षा (अ‍ॅज ष्टिप्युलेटेड बाय द हानरेबल गोडबोलेसाहेब) जास्त कंटेंट आक्षेपार्ह असला तरच ते पुस्तक वाईट मानण्यात येईल.
असं मी कुठेही म्हणलेले नाही , केवळ कुतुहल म्हणुन विचारले आहे . दुसरी गोष्ट % इज जस्ट वन पॅरामीटर ... आता मनुस्मृतीच काय तर पुरुषसुक्त अन गीतेही काही आक्षेपार्ह श्लोक आहेतच ... एव्हन बुध्दाच्या साहित्यातही असतील , फुलेंचा गणपतीवर टीका करणारा अखंड प्रसिध्द आहे ( बुध्दाने स्त्रीयांना बौध्द धर्मात प्रवेश देवु नये असे सुचवुन ठेवले आहे असे ही ऐकुन आहे ) दा विन्सी कोडही काही ख्रिच्यॅनिटीच्या पायाभुत विस्वासांना तडा लावणारी पहिली कादंबरी नक्कीच नसेल ... म्हणण्याचे तात्पर्य इतकेच तसं पाहिलं तर प्रत्येक लेखनात कोणाच्याना कोणाच्या भावना दुखावणारे काही भाग असतीलच ... % हा काही एकमेव पॅरामीटर नाही क्वालिटी हाही पॅरामीटर आहे , शिवाय ज्या समाजाशी ते लेखन संबंधीत आहे त्यांची बौधिक अवस्था इव्होल्युशनरी स्टेट हाही एक पॅरामीटर आहे ! आजवर हिंदु गपगुमान ऐकुन घेत आले कोणीही या वात्टेल ती टीका करा हिंदु आपले चिडीचुप ऐकुन घेत होतो आजवर हिंदुंवर अनेक टीका झाल्या पण निधर्मी सरकारने त्या विरुध्द काय केले ? आज पहिल्यांदा काही तरी केले असे दिसत आहे ... कुठे तरी हिंदुंना जाणीव होत आहे की आपण गप्प बसलो म्हणुन ही लोक गप्प बसणार नाहीत ..(ऐकीव माहीती नुसार संतसुर्य ह्या कादंबरीत तुकाराम जुगार खेळायचे असा काहीसा उल्लेख होता म्हणे , हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियातील उल्लेख आपण जाणतोच ... आता ह्या गोष्टी काही सहिणु म्हणुन खपवुन घ्यायच्या नव्हेत ) ...म्हणुन ...."नाठाळाचे माथी काठी " हाणावीच लागेल ! ह्यामी वैयक्तिकली हिंदु अस्मितेचा उदय समजतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

(ऐकीव माहीती नुसार संतसुर्य ह्या कादंबरीत तुकाराम जुगार खेळायचे असा काहीसा उल्लेख होता म्हणे , हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियातील उल्लेख आपण जाणतोच ... आता ह्या गोष्टी काही सहिणु म्हणुन खपवुन घ्यायच्या नव्हेत )
ह्म्म्म.. म्हणजे कशाबद्दल लोकांनी आक्षेप घेतला ते तुम्हाला ठाउकच नाही, आणि तरीही तुम्ही ह्या निर्णयाचं समर्थन करताय. नक्की काय आक्षेपार्ह आहे ते समजेल का? मग आम्हालाही मोकळ्या मनाने हिंदु अस्मितेच्या उदयाचा आनंद घेता येईल, काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

महाराष्ट्र टाईम्स मधील वर दिलेल्या दुव्यात दिला आहे, तेवढाच मजकूर जर असेल, तर त्यात फारसे आक्षेप घेण्याजोगे वाटले नाही. अर्थात तसा उल्लेख तुकारामांच्या आत्मकथनपर कवनात आहे का, हेही बघणे अगत्याचे.

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्यवाद. उतार्यांत काही आक्षेपार्ह दिसलं नाही. ह्यात नक्की आक्षेप घेण्यासारखं काय वाटलं, ते मुद्देसूद सांगाल का?

In reply to by प्रसाद गोडबोले

कुठे लिहिले आहे? मलाही त्या उतार्‍यात तुकारामांना लागलेल्या व्यसनाविषयी लिहीलेले दिसले नाही. आणि माणसे संत म्हणून जन्माला येत नसतात, ती आपल्या कर्माने संतपदाला पोहोचतात. त्याआधी त्यांच्याकडूनही सामान्य माणसाकडून घडणार्‍या चुका झालेल्या असू शकतात. पण आपल्याकडे कुठल्याही 'मोठ्या' व्यक्तीमत्वाला अगदी देवत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवायचे आणि मग त्याच्या पुर्वायुष्याबद्दल कुणी आवाज काढायचा नाही की काढू द्यायचा नाही असली काहीतरी विचित्र पद्धत आहे. अरे संत असले तरी माणूस होते ना? अध्यात्माचा मार्ग घेण्यापुर्वी झाल्या असतील की काही चुका त्यांच्याकडून. त्यांचा संत तुकाराम म्हणून आदर करणार्‍यांना त्यांच्या सामान्य तुकाराम म्हणून जगलेल्या आधीच्या आयुष्याशी काय देणं घेणं असावं मग? पुस्तके फाडायला निघालेल्या या लोकांना बहुदा "निंदकाचे घर असावे शेजारी" कुणी म्हटले याचा विसर पडलेला दिसतो.

In reply to by थॉर माणूस

मी हे पुस्तक वाचले आहे . त्यात त्यांच्या व्यसन विषयी लिहिले आहे . तरुणपणी दुकानात येणाऱ्या मुलींशी लगट करायचे , त्या बदल्यात त्यांना उधार किंवा फुकट माल द्यायचे . उधारी घेण्याचे बहाण्याने मुलींचे आईवडील घरात नसताना घरात जावून बसायचे . शेवटी गावात याची चर्चा सुरु होते . असे लिहिले आहे . संत हेही माणूस होते . माणूस असला म्हणजे तो व्यसनी असलाच पाहिजे , तरुणपणी असे प्रकार केलेच पाहिजेत असे काही आहे का ? जर लेखकाला तसे आढळले असेल तर त्यांनी कोर्टात तसे पुरावे द्यायला हवे होते .

In reply to by सासवड्कर

संत हेही माणूस होते . माणूस असला म्हणजे तो व्यसनी असलाच पाहिजे , तरुणपणी असे प्रकार केलेच पाहिजेत असे काही आहे का ? जर लेखकाला तसे आढळले असेल तर त्यांनी कोर्टात तसे पुरावे द्यायला हवे होते . सहमत. अशा प्रवृत्तीचा निषेध व्हायलाच पाहीजे. लेखक झाले म्हणून काहीही लिहीतील काय? जसे दुर्योधनाला कोणी सज्जन माणूस सापडला नाही तसे कदाचित या लोकांना ते स्वतः सरळमार्गी नसल्याने कोणी अन्य सरळमार्गी असू शकेल असे वाटत नाही. असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जसे दुर्योधनाला कोणी सज्जन माणूस सापडला नाही
मग हे तरी कशावरुन खरे??? यालातरी पुरावा कुठेय? महाभारत लिखित स्वरुपात असले तरी ते पुराण आहे त्यात ५०% जरी खरे मानले तरीही वरचे वाक्य खरे मानता येणार नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

प्लीज नोट : मी आधीही म्हणालो होतो की हरकत 'टीका करण्याला' नसुन 'अधिकार नसताना टीका करणे' ह्याला आहे.
तुम्ही कोणावर टिका करता?? (उगाच आपली १ शंका :) )

In reply to by प्रसाद गोडबोले

@माझ्या लेखना उद्देश इतकाच होता की आता असले भावना दुखावणारे लिखाण हिंदुंकडुन खपवुन घेतले जावु नये. >> या बाबतीत सावरकरांचा एक लेख इथे द्यायला पाहिजे.जो त्यांनी सनातनांन्या ठणकावण्यासाठी लिहिलेला होता. त्यात त्यांनी..ह्याच भावना का दुखवता?-वाल्यांना,-- सद्भावना दुखवू नयेत..पण असद्भावना मात्र दुखविल्याच पाहिजेत!...बुद्धिभेद करु नये,पण दुर्बुद्धिभेद केलाच पाहिजे! ...असं ठणकावलेलं आहे. कारण जी दुखावते ती सद्भावना आहे..की असद्भावना आहे...याचा निवाडा आधी झाला पाहिजे. मला गोड खायला प्रचंड अवडतं.मग उद्या डॉक्टर नसलेल्या (अधिकार नसलेल्या) जरी कुणी- "मिठाईवर बंदी घातली पाहिजे,कारण ती डायबॅटिक लोकांना मारायसाठी तयार केलेली आहे." असं म्हटलं तर माझी सद्भावना दुखावली? का असद्भावना दुखावली??? निवाडा काय द्यायचा? (हे उदाहरण सगळ्या धार्मिक/सांस्कृतीक/सामाजिक क्षेत्रातल्या "भावनादुखी" साठी आहे. @हिंदु सहिष्णु आहे ह्याचा अर्थ कोणीही उठसुठ वाट्टेल ती टीका करावी असा नव्हे.>>> हिंदू आपापसात अत्यंत असहिष्णू रहात आलेले आहेत. त्यामुळे आपण सहिष्णू आहोत..हा भ्रम लवकरात लवकर सोडून दिलेला बरा! दुसरं म्हणजे... हिंदू आपापसात असहिष्णू आहेत,,म्हणून ते अहिंदूंच्या समोर विखुरलेले आणि दुर्बल रहातात. ती दुर्बलता किंवा भ्याडपणा आहे..सहिष्णूता नव्हे! @'अधिकार नसताना टीका करणे' >>> अधिकार म्हणजे ज्याच्यावर टीका करायची तेव्हढ्या पातळी आणि लायकी पर्यंत पोहोचलेले लोक असाच ना? मग असेच बरेच लोक आहेत...जे पूर्णतः अधार्मिक क्षेत्रातले आहेत. ज्यांनी केलेलं लेखन, हाच अधिकाराचा मुद्दा लाऊन धुडकाऊन दिलं जातं. म्हणजे मग शिवाजीच्या राज्यकारभारातली एखादी चूक काढणारा माणूस राज्यशास्त्र या विषयातला प्रविण असून भागायच नाही...तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो शिवाजीच्या पातळीचा हवा..नाही का? हे अत्यंत निरर्थक आणि चुकिचं आहे. शिवाय,चुक काढण्यासाठी अगर गैरगोष्टी दाखवून देण्यासाठी..., ज्या क्षेत्रातला अधिकार असायला हवा! असं तुंम्ही म्हणत असता..ती क्षेत्र अधिकार असण्याची नव्हे..तर त्यातला अभ्यास असण्याची असतात. अधिकाराचा काय संमंध???????? ज्ञानेश्वरांचा भिंत चालवण्याचा चमत्कार..या कथित घटनेवर भाष्य करण्यासाठी..कोणत्याही माणसला त्या क्षेत्रातला,म्हणजे संतपणा मधला अधिकार आवश्यक नसून,सदर घटनेच्या संदर्भातला(भैतिकशास्त्रातला-चमत्कार तपासायचा) अभ्यास आवश्यक असतो! म्हणूनच मी म्हणतो...
अधिकाराचा काय संमंध???????

In reply to by अत्रुप्त आत्मा

ज्ञानेश्वरांचा भिंत चालवण्याचा चमत्कार..या कथित घटनेवर भाष्य करण्यासाठी..कोणत्याही माणसला त्या क्षेत्रातला,म्हणजे संतपणा मधला अधिकार आवश्यक नसून,सदर घटनेच्या संदर्भातला(भैतिकशास्त्रातला-चमत्कार तपासायचा) अभ्यास आवश्यक असतो! म्हणूनच मी म्हणतो...
माझ्या मनात ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर आहे. मी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरीपाठाचे अभंग वाचलेले आहेत. अगदी ज्ञानदेव नाथ संप्रदायाचे अनुयायी म्हणून प्र. न. जोशींचा "नाथसंप्रदाय" हा अभ्यासपुर्ण ग्रंथही वाचलेला आहे. तरीही हा भींत चालवण्याचा चमत्कार माझ्या पचनी पडत नाही. तसे झाले असेल तर न्युटनचा गतीविषयक पहिला नियम निकालात निघतो. अर्थात ते होणे नाही. आता कुणी जर म्हणत असेल की ज्ञानदेवांनी आपल्या योगसामर्थ्याने भींत चालवली तर म्हणोत बापडे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

बाकी इतर मुद्द्यांचे खंडन करीत बसत नाही ....फक्त एक विचारतो ...
शिवाय,चुक काढण्यासाठी अगर गैरगोष्टी दाखवून देण्यासाठी..., ज्या क्षेत्रातला अधिकार असायला हवा! असं तुंम्ही म्हणत असता..ती क्षेत्र अधिकार असण्याची नव्हे..तर त्यातला अभ्यास असण्याची असतात. अधिकाराचा काय संमंध?
अधिकार आणि अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ! समजा तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही इंजिनियर कडे जाणार की मेकॅनिक कडे ?...( इंजिनियरचा अभ्यास असेल ...अन मेकॅनिककडे नसेल पण मेकॅनिक कडे अधिकार असेल ! ) रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते ...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बायदवे बुवा राग मानु नका पण
अधिकाराचा काय संमंध???????
हे पाहुन मला पु.लं देशपांडेंच्या मुंबैकर पुणेकर आणि नागपुरकर मधील डायलॉग ची आठवण झाली
"तुम्हाला जर पुणे कर व्हायचं असेल तर प्रत्येक विषयावर मत व्यक्त करता आलं पाहिजे ...आता 'अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी सुधारावी' ह्यावर बोलताना आपण पुणे मुन्सीपाल्तीत उंदीर मारायच्या कामावर आहोत हे विसरुन बोलता आले पाहिजे ... अमेरिकेची अर्थ व्यवस्था ..हं ...ठोका "
इकडे पिंपरी चिंचवड हिंजवडीला तशी काही अट नाही नाही ना बुवा :D

In reply to by प्रसाद गोडबोले

@बाकी इतर मुद्द्यांचे खंडन करीत बसत नाही ..>>> का बरं??? :D करा ना..तुम्हाला करता येतं की नाही..ते कळू दे की आंम्हाला! ;) @अधिकार आणि अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ! >>> हो आहेत..पण तुंम्ही ज्या क्षेत्राबद्दल चर्चा करत आहात,तिथे या दोन्ही गोष्टींचे तुमचे स्विकृत अर्थ भिन्न आहेत. हे बरोबर आहे की नाही? ते सांगा..तुमचं चर्चेचं क्षेत्र पारलौकिक आध्यात्मिक अनुभवांचं आहे...तिथे अधिकार या शब्दाचा अर्थ त्याक्षेत्रातील अधिकाधिक सिद्ध अनुभव असा होतो.त्यामुळे तिथे अभ्यास, हा शब्दसुद्धा अवाजवी आणि गैरलागू होतो...पण त्याच अधिकार शब्दाचा इहलौकिक अर्थ-त्या क्षेत्रातला अभ्यास ज्याला असतो..त्यालाच त्या क्षेत्राचे अधिकारी म्हणवता येते..असा आहे. त्यामुळे या चर्चा विषयाच्या अनुषंगानी जाताना,तुम्ही म्हणता त्या दोन गोष्टी फक्त वेगवेगळ्या न रहाता..वेगवेगळ्या क्षेत्रातल्याही होऊन बसतात..नै का? @समजा तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही इंजिनियर कडे जाणार की मेकॅनिक कडे ?...>>> का बरं असा गैरलागू प्रश्न विचारलात??? गाडी बंद पडली तर इंजिनियरकडे जातच नाहीत..मेकॅनिक कडे जातात गैरलागू उदाहरणः- खरतर आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातल्या वादविवादात इहलौकिक उदाहरण लागूच पडत नाहीत. असा निष्कर्ष मी काढलेला आहे. कारण इहलोक ही वस्तुस्थिती..तर धर्म आध्यात्म हा केवळ कल्पनाविलास..किंवा सत्याभास! पहिलं सत्य आणि दुसरा भ्रम..कशी होणार तुलना??आणि कसं मिळणार लागू पडणारं उदाहरण??? ..असो! @( इंजिनियरचा अभ्यास असेल ...अन मेकॅनिककडे नसेल पण मेकॅनिक कडे अधिकार असेल ! )>>> कैच्याकै निरर्थक विधान!..मॅकॅनिकचा अभ्यास नसतो????????????? आणि फक्त अधिकार असतो???????? बाप रे बाप!!!!!!!! आणि मॅकॅनिककडे अधिकार आलेला असतो,तो त्याच्या गाड्या दुरुस्त करण्याच्या अभ्यासातूनच!हे कसं विसरलात हो???? आणि मॅकॅनिक काही--"केवळ आपण गाडी दुरुस्त करतो आहे..करतो आहे..ती ठिक होते आहे..होते आहे..झाली..ठीक झाली..." असा ध्यानधारणेसारखा... ध्यान लाऊन मनात आभास निर्माण करून,गाडी दुरुस्त केल्याची अनुभूती आल्याचं भक्तांना सांगून अधिकाराचं प्रमाणपत्र मिळवत नाही... हे तर उघड आहे ना? त्यामुळे-एकदा तुमच्या आध्यात्मिक/धार्मिक क्षेत्रात अधिकार कशाकशाला म्हणतात? ते सांगा..म्हणजे..त्याचे घटक काय काय आहेत?..ते(आंम्हालाही ;) )कळू द्या! @रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! >>> हेच्च ते..! हा अधिकार अधिकार म्हणजे,त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात केलेली साधना(तिचा अनुभव) आणि त्यांची व्यक्ति म्हणून असलेली शुचिता हाच ना? मग..त्यांना देवानी दर्शन दिल्याची जी काय अनुभूती होती..तीची चिकित्सा केलेली व्यक्ति (किंवा अशा सगळ्याच घटनांच्या चिकित्सा/त्यावर टीका करणार्‍या व्यक्ति) ह्या अनैतिकही नव्हत्या..नसतात.(सामाजिक चळवळींमधल्या उथळ तसेच सूडबुद्धीच्या अपवादात्मक व्यक्ति सोडून) आणि अधिकार म्हणाल,तर त्यांना(विरोधकांना) ह्या सगळ्या संत महात्म्यांच्या आध्यात्मिक धार्मिक साधना/ध्यानधारणांच्या प्रक्रीयांचं मनोवैज्ञानिक-ज्ञान त्यांच्यापेक्षा अधिक होतं आणि आहे. @अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!>>> प्रचंड भंपक विधान. आभ्यासानी जर का फक्त बुद्धिची खाज भागते, असं असतं..तर अखिल जगतात..अंबेडकर/सावरकरांपासून ते अनेक इहलौकिक क्षेत्रातले नामवंत अभ्यासू समाज सुधारक समजाच्या उपयोगी आलेच नसते. आणि अधिकार कुणी कुणाला द्यायचा???...चिकित्सकानी/टीकाकारानी/लेखकांनी, ज्या व्यक्ति-विषयांवर टीका/अभ्यास करायचा त्यांच्याकडन,अधिकार-असल्याची प्रमाणपत्र आधी मिळवायची की काय? आणि ही प्रामाणं व त्याची पत्र कोणत्या निकषांवर मिळवायची???..त्यात..पुन्हा, धर्म/आध्यात्माच्या क्षेत्रात एकवाक्यता येणच शक्य नसतं कारण,तो प्रांत सगळाच्या..सगळा स्वसंवेद्य..म्हणजे केवळ आपापल्या(ज्याच्या/त्याच्या) अनुभवांवर आधारित..तिथे तुम्म्हाला अधिकारी असल्याची,प्रमाण किंवा किमान पातळीच ठरवता येत नाही..कारण आडातच नाही..तर पोहोर्‍यात कुठून येणार? मग कसं करणार तुंम्ही टीकाकाराच्या अधिकाराच मापन...आधी तुमच्याकडे त्याच माप असायला हवं ना..? ते आणा,आणि मग या अधिकाराचा वाद खेळायला! आता...या अधिकाराच्या बाबतीतला अजुन एक राहिलेला प्रश्न-तो म्हणजे व्यक्ति सदाचरणी म्हणजे इहलौकिक दृष्ट्या नितीमान असण्याचा*!...तर तुम्ही म्हणता त्या क्षेत्राच्या विरुद्ध बाजूचे अनेक अभ्यासक/टीकाकार/चिकित्सक ..हे नितिमान होते..सदाचरणीही होते..तरीसुद्धा मी आधी म्हटल्या प्रमाणे, हा अधिकाराचा गैरलागू आणि भंपक मुद्दा काढून त्यांची निरिक्षणं/परिक्षणं/निष्कर्ष..अशीच धुडकावून लावली जातात...त्याचं काय? याचा एकदा विचार करा. *(आध्यात्मिक धार्मिक पंथात,{वादविवादाच्या वेळी..} अधिकारा'च्या मुद्यात- हे ही एक लक्षण आवश्यक मानतात..बरोबर ना?)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मुबुवांचे मेगाबायटी प्रतिसाद पाहायला मिळत नाहीत. आज ते मिळालेत हीच ती अनुभूती.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ह्म्म ... एकुणच आपले ह्या विषयावर एकमत होईल असे दिसत नाही ... फक्त जाता जाता एक शेवटचा प्रश्न १)निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ? २)सेम होल्ड्स फॉर तुकाराम , तुकाराम स्वतःच्याच अभंगात म्हणतात की शुद्र याती जन्मलो सो त्यांचाही अभ्यास असण्याची धर्माचे अध्ययन असण्याची शक्यता फारच कमी आहे जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आणि कदाचित एकनाथी भागवत वाचलेले असावे ... त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ? अजुन खुप उदाहरणे देता येतील ... गोंदवलेकर महाराज , गाडगे बाबा , वगैरे लोकांनीही किती अभ्यास केला होता देव जाणे अ‍ॅस्ट्रोनॉट श्रेष्ठ की अ‍ॅस्ट्रोनॉमर असा हा वाद आहे ... आणि माझ्यामते अ‍ॅस्ट्रोनॉट हेच श्रेष्ठ आहेत ..अअ‍ॅन्ड वी कॅन अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री हीयर :)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुंज झाल्यानेच किंवा ब्राह्मण असल्यानेच सनातन धर्माचा अभ्यास होतो इ. वाचून अतिशय करमणूक झाली. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

सनातन धर्माचा अभ्यास होतो
वेद , पुराण , स्मृती , दर्शन वगैरे वगैरे ....किमा गीता , उपनिषदे आणि ब्रह्मसुत्र ह्या तीन ग्रंथांच्या अभ्यासाला मी सनातन धर्माचा अभ्यास मानतो , ज्ञानेश्वरांचा काळाचा रेफरन्स घेवुन पाहिले तर मुंज न झालेल्याला किंव्वा ब्राह्मण नसलेल्याला ह्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळत नसणार ... काळाचा संदर्भ सोडुन संतांच्या जीवनाचा अभ्यास करता येणार नाही ... असो फार बिषयांतर झाले करमणुक कराची पावती कोणत्या पत्त्यावर पाठवु *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

तुकोबा जेव्हा म्हणतात की मला काही कळत नाही, ते म्हंजे आईन्स्टाईनने मला काही फारसे कळत नाही असे म्हटल्यापैकीच आहे. ते एक वाक्य धरून आईन्स्टाईनला काही कळत नाही असे म्हणणे जितके ग्राह्य आहे तितकेच हेही आहे. अन काळाचा संदर्भच घ्यायचा झाला तर ब्राह्मणेतर लोकांना याचा अभ्यास करायला मिळत नव्हता हेही तितकेच असत्य आहे. भक्ती चळवळ दृढमूल झाल्यापासून अशी पॅरलल व्यवस्था तयार झालेली आहेच- त्याच्याही आधीपासून असावी. अन आज वाटतो तितका तो सरळधोपट प्रकार कधीच नव्हता. पण आज त्या काळचे फारसे कै उरलेले नसल्याने एकांतिक विचार करणार्‍यांचेही फावतेच..असो. बाकी चालूद्या.

In reply to by प्रसाद गोडबोले

@१)निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ?>>> पलटी खाल्ल्याबद्दल हबिनंदण हो !!! :D परत परत अधिकार अधिकार करत बसा..आणि तीच तीच निरर्थक /गैरलागू उदाहरणे देत बसा! पण...मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ नका...तेंव्हा एकं-दरीत..चालू द्या...! :D @त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ?>>> मंबाजी आणि इतर अभ्यासूही नाहीत..अधिकारीही नाहीत..टगे आणि दांभिक आहेत.. (मुद्दाम त्यांची पार्टी बदलू नका) आणि पहा बरं-पुन्हा एकदा तुंम्ही प्रस्तुत चर्चा विषयाच्या बाबतीत गैरलागू उदाहरण दिलत..(म्हणूनच ते अदखलपात्र आहे!) आणि तुकारामांचा अधिकारही जीवनाविषयीच्या अभ्यासातूनच आहे..तुम्म्ही म्हणता तसल्या पोकळ भंपक-अधिकारातून नाही.(हे विसरलात)त्यामुळे तुकारामांना आपल्या-बाजुला घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुम्ही म्हणता--तसल्या--अधिकाराची व्याख्या करा/सांगा(टाळू नका) मग त्यात व्याख्येत तुमच्याकडलं कोणकोण बसतं ते आपण ठरवू! ================= आणि ही इथली चर्चा सोडून द्या..(मी हरलो...असे माना.. :) ..) फक्त..मी सांगतो ती पुस्तके वाचा आणि जमलं तर त्यांचा प्रतिवाद इथे (क्रमवार) मांडा.. १) मनुस्मृती- काही विचार...(नरहर कुरुंदकर) २)मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती..(डॉ.आ.ह.साळुंखे) ३)विद्रोही तुकाराम...(डॉ.आ.ह.साळुंखे)

In reply to by अत्रुप्त आत्मा

मला तुमचा मुद्दाच कळाला नाही... अभ्यास आणि अधिकार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अन एकाने दुसरा येईलच असे नाही इतकेच मी म्हणत आहे . असो. बाकी तकारामानां मी कशाला माझ्या बाजुला ओढतोय उलट मीच त्यांच्या बाजुला जायचा प्रयत्न करतोय !! आणि जीवनविषयक अभ्यासाविषयी बोलाल तर त्यांच्या पेक्षा जास्त अभ्यास त्यांच्या पत्नीचा होता असेच म्हणावे लागेल.... मस्त प्रपंचात रहावे सावकारीचा व्यवसाय पहावा पोराबाळांचे पोट भरावे चवीपुरते देव देव करावे बस्स ! ============================= मी चर्चा हार जीत साठी करत नसतो ... "अधिकार नावाची गोष्ट नसतेच अभ्यासाने माणसाला ज्या गोष्टीचा अभ्यास आहे त्यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ! " असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते काही मला पटत नाही , ( प्रचिती , अनुभव आणि योगदान नसलेला अभ्यासी माणुस माझ्या साठी अनधिकारीच आहे ) , तुमचे मत तुम्ही पटवुन दीले तर आनंदाने मान्य करेन ! आ.ह. साळुखे अत्यंत वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे ... तुम्ही त्यांच्या मार्गाने जात असाल तर _/\_ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती ती आठवली आता ही तुकारांची आहे की नाही की प्रक्षिप्त आहे ह्यावर आपण नंतर कधी तरी वाद घालु "एका बाईचा मुलगा सारखा गुळ खात असतो , सगळे दात किडलेले असतात , आणि कितीही सांगुन तो काही ऐकत नसतो , मग शेवटी ती बाई विचार करते की तुकाराम बुवांसारख्या आदरणीय व्यक्तीने सांगितले तर कदाचित तो ऐकेल ... ती पोराला तुकारामांकडे घेवुन येते व म्हणते की 'महाराज , सारखा गुळ खातो हा , ह्याला जरा चार शब्द सांगा तुम्ही सांगितलं तर ऐकेल'... तुकाराम महाराज म्हणतात 'बाई तुम्ही ह्याला एक आठवड्याने माझ्या कडे घेवुन या मग मी सांगतो काय सांगायचे ते ' . बाई पोराला घेवुन येते एक आठवड्या नंतर ... महाराज त्या मुलाला जवळ घेवुन कुरवाळुन सांगतात 'बाळा , सारखा सारखा गुळ खात जाऊ नकोस त्याने दात किडतील ... ऐकणार ना माझं ?' आणि मग तो मुलगा नंतर खरचं गुळ खायचे सोडुन देतो . पण ती बाई आश्चर्यचकित होवुन महाराजांना म्हणते ' तुम्हाला हे एक आठवडा आधीच नव्हतं का सांगता येत ?' महाराज म्हणतात ' आलं असतं सांगता पण मला केवळ ते माहीत होतं ... गेला आठवडाभर मी स्वतः गुळ खाणे सोडुन पाहिले मग लक्षात आले की हे किती अवघड आहे पण तरीही शक्य आहे ... मग मला तसे सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला... उगाचच नुसत्या अभ्यासाने त्याला सांगितलं असतं तर त्याला ते पटलं नसतं आणि कदाचित माझं मन मला खात राहिलं असतं की जे स्वतःला जमत नाही ते दुसर्‍यांना उपदेशितो म्हणुन '!! " ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अगदी शेम हीच गोष्ट (फक्त गुळाऐवजी साखर) गांधीबाबा (राहुलबाबा नव्हेत, ते आपले नोटांवरले चिरपरिचित बाबा) बद्दलही सांगितली जाते, हे कसेकाय बुवा? अन्नू मलिक वगैरें मूजिक ढापतात, तसे त्यांनीपण तुकारामांची गोष्ट ढापली की काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

अ‍ॅस्ट्रोनॉट श्रेष्ठ की अ‍ॅस्ट्रोनॉमर असा हा वाद आहे
एकाही विषयातलं काहीही माहित नसताना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवलं की असंच काही(च्या काही) वाटणार. आजचा दिवस गडबोल्यांनी सत्कारणी लावला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>एकाही विषयातलं काहीही माहित नसताना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवलं की असंच काही(च्या काही) वाटणार. >> विक्षिप्त बाई, अहंकार सोडा. तुम्हाला सगग्ळ्यातलं सग्गळं कळतं असा जो अहंकार आहे ना. सोडा जरा. बाकी अनेकांना अनेक गोष्टी माहित अस्तात म्हटलं.

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्यो धर्म आणी धर्माब्यास म्हणजी काय रे भाउ,म्हणजी मुंजी वाले बामण सोडुन ती पुस्ताक कुनी वाचायचीच नाय का ? बाकी समदी आडाणी गोट का काय गुर्जी ? मंग माऴ्याचा जोतिबा आणी हरिजंनांचा बाबा पण तुह्या मते ठार आडाणी असल नार भावु. रागावु नका दादा पण मला कुणबाटाला जरा डोस्क्यात किडा वळवाळला म्हणुन इचारला. आपला- आडाणी गावचा अंगठेबहाद्दुर बाबाजी पाटील.

In reply to by धन्या

तुमच्या मनातले नाही होणार कदचित. पण एखाद्या लहान मुलाच्या हातात हे पुस्तक पडले तर? संवैधानिक मार्गाने बंदी आणणे केव्हाही योग्यच. नपेक्षा तुम्ही जे काही लिहिलेत त्याचे पुरावे द्या. बाकी एक प्रश्न आहे - या पुस्तकात जर ते "कालपनिक" चे डिस्क्लेमर टाकले तर त्यांना परत प्रकाशनाची अनुमती मिळेल का?

कसे काय बुवा तुम्ही अस्मिता बिस्मीता शोधता अशा प्रकरणांत ? अहो हा फक्त कोर्टाचा निकाल आहे. तो फक्त समोर आलेल्या पुराव्यांवर अवलंबून असतो. अवांतर : कोर्टाला मराठीत न्यायालय असा समानार्थी शब्द कोणी शोधला हो ? त्याला फार्फार तर निकालालय किंवा निवाडागृह म्हणणे ठीक.

या संदर्भात भाऊ तोसरेकर यांचा लेख 'मोदी जिंकले पण हरवले कोणाला?' वाचनीय आहे: http://panchanaama.blogspot.in/2014/05/blog-post_18.html त्यातील थोडासा भागः ..........अल्पसंख्य असलेल्यांनी बहुसंख्य असलेल्यांच्या भावना, श्रद्धा, इच्छा वा आकांक्षांवर कुरघोडी करणे; असे जे चित्र मागल्या तीनचार दशकात अट्टाहासाने व आक्रमकपणे निर्माण करण्यात आले होते, त्याच्या विरोधात हिंदू समाजामध्ये मोठीच नाराजी व क्रोध खदखदत होता. जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा आग्रह धरला जात होता... ... उगाच कोणाच्या अंगावर जायचे नाही, पण कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायला मागेपुढे पहायचे नाही, असा स्वभाव असलेल्या मोदींनी बारा वर्षात संयमाने त्यावरचे उपाय शोधले, कुठलीही हानी अपाय होऊ न देता तेच उपाय गुजरातमध्ये अंमलात आणले. त्यातून त्यांची हिंमत वाढली आणि दुसरीकडे त्यांच्या उपायांचे उर्वरीत भारतातल्या अशा दुखावलेल्या समाजाला आकर्षण वाटू लागले. त्यातूनच मग थेट देशाचे नेतृत्व करून अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले....

In reply to by चित्रगुप्त

@अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले....>>>बरोब्बर शब्दरचना..+++१११ अतिशय सहमत!

In reply to by चित्रगुप्त

पण एकदम चपखल. " जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा आग्रह धरला जात होता..." असे झाले होते खरे.

जबरदस्त! येऊ द्या प्रसाद साहेब, अजून असेच जाज्वल्यपूर्ण लिखाण येऊ द्यात! ही पुस्तके आपण वाचली काय न वाचली काय - त्याने काय फरक पडतो, नाही का? पुस्तक काय, मी तर म्हणतो कोणी आपल्या खाजगी वह्यांमध्ये सुद्धा असे अश्ल्याघ्य विचार लिहिता कामा नये. त्यावरही बंदी आणायलाच हवी. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान कुणीही लुंग्यासुंग्याने करावा आणि त्यांनी गप्प बसावे- ही परिस्थिती उरली नाही. आज जर कुणी असा वेडावाकडा विचारही केला, तर त्यांना त्याबद्दलही शिक्षा मिळालीच पाहिजे. असा जळजळीत लेख लिहून समस्त हिंदूंच्या भावनांना वाट फोडल्याबद्दल अभिनंदन!

भगव्यांना, खाकी हाफ पँट वाल्यांना शिव्या देणं, हिरव्यांच्या बोकड दाढ्या कुरवाळणं हिचं खरी धर्मनिरपेक्षता असते प्रसाद दादा....हिंदु मेला तरी चालेल...वोट बँक मेली तर कसं व्हायचं? नशिब खांग्रेस चं वाट्टोळं झालं आत्ता नाहीतर व्हॅट, एल.बी.टी., एजुकेशन टॅक्सेस, सेस बरोबर जिझिया पण लावला असता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही तर काय? हिंदु मेला तरी चालेल, पण शीख,जैन,बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन, आदिवासी, नास्तिक अशांना धक्का लागता कामा नये. हिंदू धर्मासारखा सर्वसमावेशक ( ते लोकायत वगैरे फालतू लोक सोडून द्या) धर्म दुसरा नाही, हे या देशाला कळेल तो सुदिन.

फार काळानंतर 'जाज्वल्य' हा शब्द वाचायला मिळाला. असेच जाज्वल्य लिखाण येऊ द्या प्रसाद्पंत. निवडणुकांपूर्वी नेहरूशाहीत पोसली जाऊन बुजबुजलेली तथाकथित 'इंटलेक्चुअले' मोदीविरोधात एकत्र येऊन काहीतरी करणार होती म्हणे, त्याचे काय झाले, याची बतमी आलीय का कुठे? आणि त्या चमत्कारी फादर बद्दल (त्यांचे काय नाव? लिहायला डरू नका प्रसादपंत) अंनिस, दाभोलकर यांनी आवाज उठवलेला आहे का?

In reply to by धन्या

संजय सोनवणींनी ब्लॉगवर प्रतिक्रीया नोंदवताना त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी न्या. सौ. के. पी. जैन यांनी दिलेला संपुर्ण निकाल वाचला आहे. कविता महाजनांचीही ब्लॉगवर प्रतिक्रीया आली आहे. प्रहार मध्येही या विषयावर लेख आला आहे. एकुण काय तर तुम्ही वाल्मिकी ऋषिंच्या वंशातले असाल तर पुराव्या अभावी होत असलेली संतनिंदा थांबवण्याची आता मागणी करू शकता. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय काय तो निकाल येत्या काळात देतीलच. पण या धागा लेखकाने काढलेला अन्वयार्थ माननिय न्यायाधिशांनाही त्यांच्या निवृत्ती नंतर सवडीने वाचण्यास जरूर मिळो, सध्या एवढीच शुभेच्छा.

हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली नाहीयेत . पण आत्ता एवढा वाद चाललाय म्हणल्यावर वाचेन .
अध्यात्माचा मार्ग घेण्यापुर्वी झाल्या असतील की काही चुका त्यांच्याकडून
सहमत .तुकाराम महारज देशोधडीला लागायच्या आधी सामान्य माणूसच होते . त्या काळात काही चुका केलेल्या असू शकतात . जशी जशी त्यांच्यापासून १ - १ गोष्ट दूर गेली तसे तसे वैराग्य वाढू लागले आणि सत्याचा शोध घेण्याची ओढ निर्माण झाली
पुरुषसुक्त अन गीतेही काही आक्षेपार्ह श्लोक आहेतच
काही म्हणजे नक्की कोणते श्लोक आहेत ते इथे स्पष्टपणे सांगा . चर्चा करता येईल
तरीही हा भींत चालवण्याचा चमत्कार माझ्या पचनी पडत नाही. तसे झाले असेल तर न्युटनचा गतीविषयक पहिला नियम निकालात निघतो. अर्थात ते होणे नाही.
तुम्ही पुस्तकं बरीच वाचली असतील पण स्वतःचा योगशास्त्राचा अभ्यास किती आहे? न्युटनचा किवा कुठलाही भौतिक शास्त्राचा नियम लावण्याचं तात्पर्य काय ? अध्यात्मशास्त्राचा नियम भौतिक शास्त्राला लावलेला चालेल का?
रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते ...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!
एकदम सहमत . खूप अभ्यासू आणि विद्वान असलेल्या विवेकानंदांना पहिल्याच भेटीत रामकृष्णांनी सत्याचा अनुभव करून दिला होता .
निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ?
पुस्तकी ज्ञान असणं आणि सत्याचं ज्ञान असणं ह्यात फरक अहे. गुरुचरित्रात ह्याविषयी १ अध्याय अहे. धर्मशास्त्रांचा , वेदांचा नुसताच पुष्कळ अभ्यास असणारे पण काडीचीही अक्कल नसणारे मोठे पंडित श्रीगुरुंशी वेदांवर वाद घालायला येतात आणि त्यांची कशी फजिती होते ह्यावरून पुस्तकी प्रकांद्पंडीत असण्याचा आणि 'अधिकारी' असण्याचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट होत. आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते तर ज्ञानेश्वरांच्या पुढे लोटांगण का घातला त्यांनी ? त्यांना तशी कुणी सक्ती केली होती का? १४०० वर्षे योगाभ्यास केलेले चांगदेव एवढे अभ्यासी होते तर ज्ञानदेवांना गुरु करून घेण्यासाठी का आले? ह्यांचीही उत्तरं द्या
सेम होल्ड्स फॉर तुकाराम , तुकाराम स्वतःच्याच अभंगात म्हणतात की शुद्र याती जन्मलो सो त्यांचाही अभ्यास असण्याची धर्माचे अध्ययन असण्याची शक्यता फारच कमी आहे जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आणि कदाचित एकनाथी भागवत वाचलेले असावे ... त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ?
प्रकांड पंडीत असण्याचा आणि महान असण्याचा काहीच संबंध नाही हे वर मी सांगितलाच आहे . तुमचा ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा काय 'अभ्यास ' आहे ते कळू द्या . नुसत्या शक्यता वगेरे मांडू नका . ठाम काहीतरी सांगा ईश्वर भक्ती , योगसाधना ह्यातला अधिकारी असण्यासाठी प्रकांड पंडित असावं लागतं असं कुणी सांगितला तुम्हाला ?

In reply to by म्हैस

सहमत! बाकी विषय '(इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' असा काहीसा असावा का की '(स्वधर्मीयांच्या विचारांच्या खंडनाच्या स्वरुपात) हिंदू अस्मितेचा उदय' असं अपेक्षित आहे असं लेखकाला नम्रपणं विचारु इच्छितो. ;)

In reply to by प्यारे१

हा महत्वाचा प्रश्ण विचारलात प्यारेजी ... आणि उत्तर आहे (इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' हिंदु लोक ऐकुन घेतात म्हणुन त्यांच्या संतांवर कैच्याकै टीका करा , त्यांच्या देवी देवतांची नागडी उघडी चित्रे काढा , "मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची" , "वारी बंद करा ", असली कैच्याकाइ विधाने करा , हिंदुंच्या अंधश्रधांविरुध्द कायदा करा अन इतरांना बिन्धास्त सोडुन द्या , गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण थोडक्यात काय तर येन केन प्रकारेण हिंदुंचे कसे चुकते अन हिंदु धर्म कसा बावळटांचा धर्म आहे हे ठसवत रहाणे ...सतत तेजोभंग करत रहाणे.... भले मग हिंदुंच्या भावना दुखावल्या तरी चालतील ... कारण ते अल्पसंख्य नाहीत ना !! हे आता बस्स झाले. "भले तरी देवु कासेची लंगोटी | नाठाळाची माथी काठी हाणु ||" " धटासी व्हावे धट | उध्दटासी उध्दट | खटनटासी खटनट | कैसा शोभे ||" आणि वितंडवाद्यांनी वाट्टेल तसा अर्थ काढु नये म्हणुन हे स्पष्टीकरण "हिंदु धर्मात वाईट प्रथा परंपरा आहेतच त्या निंद्यच आहेत आणि त्यांचे निर्मुलन व्हायलाच पाहेजे " पण ज्यांना हिंदु धर्माविषयी आस्था नाही , धर्माचा प्रसार प्रचार व्हावा अशी इच्छा नाही अशा लोकांनी आता बोलु नये. हिंदु लोक त्यांचे प्रॉब्लेम्स स्वतःच्या बळावर सोडवतील... सावरकरांसारख्यानी हिंदु धर्मावर टीका केली तर चालेल पण ना.वा. टिळकांसारख्यानी केली तर ती अजिबात खपवुन घेवु नये !!

In reply to by प्रसाद गोडबोले

"मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची"
मंदिरांपेक्षा शौचालये जास्त महत्वाची आहेत...भारतात ५०% पेक्षा जास्त जनता उघड्यावर शौचाला जाते...आणि त्यातल्या स्त्रीयांचे प्रमाण बघता .... जौदे जोपर्यंत तुमच्या ओळखितल्यापैकी कोणी या परीस्तिथीतुन जात नाही तो पर्यंत नाही कळणार
"वारी बंद करा "
असे कोण , कोणास, कधी, कुठे, कशासंधर्भात बोलले??? काही विदा आहे का? असला तर मला बघायला आवडेल...आणि पटले तर मी सुध्धा तुमच्या बाजुला
गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण
हे खरेच आहे...८०% लोकांनी सण साजरा करताना हजारो टन प्लास्टर ओफ ऑफ प्यारिस पाण्यात सोडले जाणे...४-५ दिवस हवा धुराने भरुन जाणे हे प्रदुषणच आहे आणि उरलेल्या २०% मधे...त्यांचे कान घरच्या सोनारानेच टोचले पाहिजेत (हे वाक्य समजले नाही तर हा प्रतिसाद वाचला नाही तरी चालेल)

In reply to by टवाळ कार्टा

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ? २.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ? तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !

In reply to by धन्या

रेव्हरंड टिळक. यांनी हिंदू धर्म त्यागून क्रिस्टियन धर्म स्वीकारला. यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतीचित्रे' हे पुस्तक अतिशय सुरेख आहे आणि ह्यात हा सर्व घटनाक्रम वर्णिला आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ? २.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
आपण या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, करत आहात आणि त्यामुळे तुम्हांला इतरांना ह्या नाही तर त्या क्याट्येगरीत घालण्याचा अधिकार आहे असे गृहीत धरू.
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
धर्माच्या बाबतीत सकारात्मक काम करणे किंवा योगदान देणे म्हणजे काय? आपल्याच धर्माच्या निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणार्‍या रूढीपरंपरा धर्मातून हद्दपार करणे हे सकारात्मक नाही काय? आणि समजा एखाद्याने काहीच न करता स्वतःच्या धर्माबद्दल काही मत - मग ते नकारात्मक का असेना - व्यक्त केले तर त्याला तुमच्या दृष्टीने अजिबात किंमत नाही. का बरं? धर्म, जात, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी मनुष्याच्या जन्मापासून त्याला चिकटतात. कोणी असे म्हणत नाही की माझे मूल सुजाण वयाचे झाल्यावर त्याचे त्याला ठरवू दे कुठला धर्म स्वीकारायचा ते. मी आत्तापासूनच माझ्या संततीला अमुक धर्माच्या पद्धतीनुसार वाढवणार नाही. मला असे म्हणायचे आहे की, समजा माझ्या धर्माबद्दल असे काही योगदान मी दिले नसेल तर त्याचा अर्थ मला माझ्या धर्मावर टीका करण्याचा हक्क नाहीये का? आहे. जरूर आहे. कारण मला माझा धर्म आहे तसा फॉलो करायचा नसला तरी जन्मापासूनच माझा धर्म निश्चित झाल्यामुळे त्याचा बरावाईट परिणाम माझ्यावर होतो. त्यापासून सुटका केवळ धर्मांतरामुळेच काही प्रमाणात शक्य आहे. त्याचेही ना घर का ना घाटका असं होऊन बसतं. एकूणच मानवसंस्कृतीत संपूर्ण धार्मिक निरपेक्षता प्रत्यक्ष व्यवहारात शक्य होत नाही. अशी परिस्थिती असताना मी गप्प का बसायचं? केवळ स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या हुल्लडबाजीला घाबरून? बादवे, ज्याला तथाकथित हिंदू धर्म म्हणलं जातं त्याबद्दल प्रबोधनकारांचे जे मत आहे तेच माझंही मत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
म्हणजे शौचालयांची गरज आहे ...ते सुध्धा खुप मोठ्या जनसमुदायासाठी हे तुम्ही(सुध्धा) मानता...मग मंदिरांची गरज आणि शौचालयांची गरज यातील कोणती गरज लवकर पुर्ण झाली पाहिजे??? १. लोकांनी उघड्यावर शौचास जाणे चालेल पण सर्व सार्वजनिक ठिकाणी मंदिर असले पाहिजे २. उघड्यावर शौचास जाणार्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली पण लोकांनी घरातल्या देवाच्या तसबीरीपुढे हात जोडले तरी चालतील शाळेत गेलेले एखादे शेंबडे पोरसुध्धा यातला २ पर्याय निवडेल
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
हे सगळे शाळेत्/कॉलेजात असताना केलेले आहे...आतासुध्धा जमेल तसे करतो आणि मी हे केले तरच माझा मुद्दा बरोबर ठरतो असा जर तुमचा समज असेल तर मग मलापण विचारावेसे वाटते की तुमच्या घरात शौचालय असले पाहिजे की देवघर???
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो '
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो
आधी मी कधी कुठे कोणाचा कशासाठीही "प्रचार" केला आहे त्याचा "अभ्यास" करा आणि मग जर त्यावर विचार केलाच तर आधी समोरच्याचे मतपरिवर्तन विचारानेच करता येते का ते पहा ...हे सगळे झाल्यावरच माझा निषेध करा उगाचच उंटाच्या.... (म्हण माहित नसेल तर अभ्यास करा)

In reply to by टवाळ कार्टा

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
>>> ह्या प्रस्नाला तुम्ही व्यवस्थित बगल दिली आहेत , त्या मुळे तुम्ही ह्यातले काहीच केलेले नाहीत असा संशय येत आहे .
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
>> ह्या बद्दल अभिनंदन ... हे कार्य वाढवावे , गणेशोस्तव बंद करा असे म्हनण्यापेक्षा मातीच्या मुर्ती वापरु असे जर तुम्ही समाजाला संदेश देत असाल तर तुम्हाला ह्या विषयावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ...मला हेच म्हणायचे होते :)
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
इथे तुम्ही प्रतइकात्मक आहात हो ... काहीच न करता उगाच नुसती भाषणे झाडणारी १०० माणसे मी तुम्हाला भेटवुन देईन ह्या येत्या गणेशोत्स्वात !!
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
बरं ! सध्या तुम्हाला अभ्यास आणि अधिकार ह्यातील फरक समजला , मला जो मुद्दा मांडायचा होता तो कन्वे झालाय , ह्यात आनंद मानतो ... बाकी माझ्या अभ्यासावर आणि अधिकारावर भेटल्यावर निवांत चर्चा करु :)

छे छे छे! किती तरी हिंदु व्यक्ती हिंदु धर्माबद्द्लच कस्सं कस्सं वैट्ट वैट्ट बोलताहेत. काही पोच्च राहिलेला नाही! हजारोवर्षांपूर्वीचा व जुना का असेना इतक्या पवित्र धर्माबद्दल असं बोल्लात तर नरकात जाल (ते शक्य नसेल तर जेल मध्ये जाण्याचेही दिवस दूर नाहित)

In reply to by बॅटमॅन

मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन क्यांप कधी सुरु होतात आणि त्यासाठी जमीन अधिग्रहण कधी सुरु होतय त्याची वाट बघतोय.

In reply to by अनुप ढेरे

बर्‍याच लोकांना काँटेक्स्ट आणि उपरोध समजत नाहीत, (त्यामुळे कॉमेंट टाकताना जरा जपून)