विमान ,रेल्वे ,बस ,टैक्सी
यासंबंधी बरे वाईट अनुभव आठवणी आणि बातम्यांसाठी वेगवेगळा अथवा एकत्रित धागा आहे का ?तो असावा असं मला वाटतं .
रेल्वे :-
या आठवड्यात रेल्वेने त्यांचे जे अधिकृत तिकीट एजंट (RTSA)होते त्यांचे लायसन्स अचानक रद्द केले .देशभरांत जवळपास असे पंधराशे जण होते .त्यांची नावे आणि पत्ते टाईमटेबलमध्ये छापलेले असतात . एकतर यांचा धंदा बुडालाच शिवाय जे लोक रेजर्वेशन सेंटर्सपासून दूर राहतात ,ज्याना येथे वेळेत येता येत नाही ,अथवा असमर्थ आहेत त्यांची पण एक सोय गेली . त्यांना कोणाची तरी मदत घेऊन इ तिकिट काढावे लागणार .
दुसरी एक गोष्ट करण्याच्या विचारात रेल्वे आहे ती म्हणजे इ रेजर्वेशनला जी काही ओळखपत्रे आणि त्याचा क्रमांक द्यावा लागतो त्यातून पैन कार्ड घेणार नाही .याबद्दल इँकमटैक्सवाल्यांकडून तशी सावधगिरीची सूचना आज रेल्वेला आली आहे .हा नंबर काही मोठी खरेदी करतांना द्यावा लागतो .रेल्वेच्या रे०स्लिपांतून नंबर मिळवून गैरवापर होईल .तसं झालं तर आधारकार्डाचे महत्त्व वाढेल कारण प्रत्येकाकडे पासपोर्ट /ड्रायविंग लायसन्स /वोटिंग कार्ड नसणार .
काही वेबसाइटस
मुंबई बेस्ट बसचे मार्ग आणि स्टॉप्स येथे मिळतील
http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php
पुणे बस PMT चे मार्ग आणि स्टॉप्स येथे मिळतील
http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html
सेंट्रल रेल्वे गाड्यांसाठी काही सूचना येथे करते
http://www.cr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,268
वाचने
4139
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
MSRTC चे संकेतस्थळ IRCTC इतके
ST स्टँडवर जेष्ठांसाठी
In reply to MSRTC चे संकेतस्थळ IRCTC इतके by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हा धागा एक डॉक्युमेटेशन म्हणून उपयुक्त ठरेल .
रेल्वेचे पक्के रेजर्वेशन
महाराष्ट्रात ST ने प्रवास