✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गॉसिप

स
स्पा यांनी
Mon, 01/30/2012 - 09:12  ·  लेख
लेख
Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे. 3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय. पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं. तो त्याला प्लान, एलीवेशन, इथून तिथून ढापलेले रेफरंसेस इत्यादी दाखवून समाधान करण्याचा प्रयत्न करी. पण माझी बिल्डींग, स्टोर, घर, हे झाल्यानंतर कस दिसेल हे त्या बिचार्याला शेवटपर्यंत कळत नसे. नंतर हळू हळू visualisation प्रकार वाढायला लागला. जे. जे ची वेग्रे मुल हाताने चित्र काढून बिल्डींग्स कशा दिसतील हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काम खूपच किचकट आणि वेळखाऊ होत. बर त्यात काही बदल करायचे म्हटले तर ते लगेच शक्य नसायचं, पुन्हा पहिल्यापासून चित्र काढा. फारच खर्चिक काम होत. पण जेव्हा या कामासाठी सोफ्टवेर ची मदत घेतली जाऊ लागली, तेंव्हा काम करण्याची पद्धतच बदलली, clients न आपल प्रोडक्ट कस दिसेल ते कळायला लागलं, त्यात हवे ते बदल लेवेन्थ अवर ला सुद्धा करता यायला लागले, कितीही ऑप्शन बनवा.. डोक्याला ताप नाही. सर्वात शेवटी जो ऑप्शन फायनल होईल, तो approve झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. झाली कि नाही पैशाची आणि वेळेची बचत !!!! आता नक्की यात होत काय ते खाली सविस्तर सांगतो -------------------------------------------------------------------------------------------- बरेच दिवस एकाच टाईप च काम करून कंटाळा आलेला, माझ्या एका designer मित्राने , मला एके दिवशी एक international ब्रांड(Gossip - Shoe brand ) साठी काम करशील का म्हणून विचारल. ऑफिस च भन्नाट प्रेशर होत, पण काहीतरी वेगळ करायला मिळेल, म्हणून होकार दिला. आम्ही अजून एक दोन जणांची टीम बनवली. सर्वात आधी concept , त्याशिवाय गाडी पुढे हलत नाही. काहीतरी international लेवेल च काम करायचं डोक्यात होत, साधी बुटांची दुकान लाखोने असतात, आपण काय वेगळ देऊ शकू. काही सुचत नव्हत १० वाजता हापिसातून घरी अल कि जेवून ..२ २ वाजेपर्यंत जागून स्केचेस बनवायला लागलो . नेत वर शोधाशोधी केली ,२ ३ वह्या भरल्या .. पण काही मजा येत नव्हती . शेवटी एक भन्नाट विचार मित्राच्या डोक्यात आला आणि खालील काही स्केचेस फायनल झाली. हा साईट चा प्लान १. २. ३. ४. ५. ६. लगेच 3d वर काम सुरु केल , त्यातही वेळ जात होता... चायला कितीही ऑप्शन केले तरी client ला अजिबात आवडत नव्हत, काय करू कळेनास झालेलं, शिवाय ऑफिस च्या कामामुळे जास्त वेळही देता येत नव्हता. पण हळू हळू काम जमायला लागलं. ३D सुरु होताच.. साईट वर हि काम सुरु झाल. ७. ८. ९. मध्ये मध्ये चेंजेस येतंच होते, काम सोडून द्यावास वाटत होत. मित्र कुत्र्यासारखा मागे लागलेला .... त्याला म्हणालो "साले तू मेरा दोस्त हे या दुश्मन.. त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.. त्याला अपेक्षित output येई पर्यंत तो 3D करून घेतंच होता . अतिशय हतबल झालेलो.. भिक नको पण कुत्र आवर तशी गत ... पण प्रयत्न सोडले नाहीत . हे मी केलेले 3DViews १०. ११. १२. १३. १४. १५. ३ ते ४ महिन्यानंतर १० दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये हे स्टोर उघडल . बघायला गेलो आणि डोळ्याच पारणच फिटल, मित्राला मिठी मारायचीच बाकी होती... भयानक कष्ट उपसून त्याने client ला दिलेला शब्द पाळला होता... हुबेहूब 3D मध्ये दाखवल्यासारख त्याने खरच स्टोर बनवलेलं होत . अक्ख्या मॉल मध्ये हेच एक स्टोर वेगळ दिसत होत .. हे खालचे साईट चे फोटू (मोबिल ने काढलेत , इतके खास दिसणार नाहीत कदाचित ) १६. १७. १८. १९. २०. २१. सर्वांनी आमच विशेष अभिनंदन केल .. पण स्टोर उघडेपर्यंत झालेली हालत आम्हालाच माहित होती.... काल त्याचा फोन आलेला, म्हणत होता साले लोचा हुआ हे स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. .. client कि हवा टाईट हो गयी हे :D २२.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
23442 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

ए ढिंक चिका ढिंक चिका ढिंक

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/08/2012 - 00:03 नवीन
Image removed. ए ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए हे...ए ए ए ह्हे... शंभर शंभर...ते दाखवायला माझा पहिला नंबर नंबर
  • Log in or register to post comments

हे जाम भारी आहे रे !!! सुन्दर

रेशा
गुरुवार, 04/05/2012 - 16:53 नवीन
हे जाम भारी आहे रे !!! सुन्दर :)
  • Log in or register to post comments

मालक - प्रणाम !!

पहाटवारा
गुरुवार, 04/05/2012 - 17:25 नवीन
मालक .. तुमच्या ३ डि चित्रांकडे पाहुन वाटत नाहिये कि ते नुसतेच सोफ्टवेअर ने बनवले आहे आणी रिअल नाहिये .. क्ला ....स !!
  • Log in or register to post comments

मस्त रे स्पावड्या. अभिनंदन.

मृत्युन्जय
गुरुवार, 04/05/2012 - 18:29 नवीन
मस्त रे स्पावड्या. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम आहे सगळं..!! आज

जेनी...
गुरुवार, 04/05/2012 - 21:02 नवीन
अप्रतिम आहे सगळं..!! आज मिसळ्पाव वर आल्याच खरच सार्थक झालं अस मुद्दामहुन नमूद करायची इच्छा झाली. खूप शुभेच्छा ...:)
  • Log in or register to post comments

मस्त

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/05/2012 - 21:48 नवीन
मस्त प्रोजेक्ट रे स्पा! आवडला... बाकी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये आहे म्हणतोस तर किमान दोन ग्राहिका तरी मिळवून देईन तुला! (आमची आपली फूल ना फुलाची पाकळी कॉन्ट्रीब्युशन!!) :) एक शंका: जर गॉसिप हे इंटरनॅशनल ब्रॅन्ड/ चेन आहे तर त्यांचे दुकानाचं डिझाईन कशा स्टाईलचं असावं याविषयी नियम नव्हते का? नाही म्हणजे टिफनी, गूची वगैरेंचे असतात म्हणून विचारलं... चूभूद्याघ्या...
  • Log in or register to post comments

जर गॉसिप हे इंटरनॅशनल

स्पा
Sat, 04/07/2012 - 08:36 नवीन
जर गॉसिप हे इंटरनॅशनल ब्रॅन्ड/ चेन आहे तर त्यांचे दुकानाचं डिझाईन कशा स्टाईलचं असावं याविषयी नियम नव्हते का? नाही म्हणजे टिफनी, गूची वगैरेंचे असतात म्हणून विचारलं... सदर ब्रांड हा तुम्ही दिलेल्या ब्रांड नामावली इतकाही मोठा नाहीये ;) टिफनी, गूची या सारख्या ब्रान्द्स च्या इन्हावउस टीम असतात . ते बाहेर काम देत नाहीत. मी जा हो ब्रांड केला.. त्या बाबतीत गोष्ट अशी होती कि.. त्याचं आधीच एक standard design होत पण त्यांना ते बदलायचं होत. आता हे नवीन design जर workout झाल, तर बाकीच्या stores मध्ये सुद्धा अस्च्या अस छापलं जाईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आता हे नवीन design जर workout

वपाडाव
Tue, 04/10/2012 - 09:06 नवीन
आता हे नवीन design जर workout झाल, तर बाकीच्या stores मध्ये सुद्धा अस्च्या अस छापलं जाईल
एक शंका :: तुला त्यात रॉयल्टी मिळेल का? तुझे काही राइट्स असतील की नाही त्या डिझाइन मध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

खूप छान!

विकास
गुरुवार, 04/05/2012 - 22:13 नवीन
एकदम आवडलं! पिडांसारखा मला देखील प्रश्न पडला: "इंटरनॅशनल ब्रॅन्ड/ चेन आहे तर त्यांचे दुकानाचं डिझाईन कशा स्टाईलचं असावं याविषयी नियम नव्हते का?" सॉफ्टवेअर कुठले वापरले होते? हा अनुभव केवळ कलादालनापेक्षा "जनातलं-मनातलं" मधे शोभला असता.
  • Log in or register to post comments

अद्भुत डिझाईन...

चित्रगुप्त
Wed, 04/11/2012 - 20:51 नवीन
अद्भुत डिझाईन... अश्याच अद्भुतरम्य जागा डिझाईन करत राहण्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सही

सुमीत भातखंडे
Sun, 09/09/2012 - 22:20 नवीन
सही यार... स्वतःचा व्यवसाय सुरु कर याबाबत सहमत...नक्की विचार कर
  • Log in or register to post comments

आज मिसळपाव वर आल्याचे सार्थक

बॅटमॅन
Mon, 09/10/2012 - 01:43 नवीन
आज मिसळपाव वर आल्याचे सार्थक झाले असे प्रकर्षाने वाटले. स्पांडुरंगा नमोस्तुते _/\_ तुमच्या चिकाटी, जिद्द आणि कलेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पोकळ वाचिवीरांच्या गर्दीत असे हे भरीव कामाचे धागे प्रकर्षाने लक्ष वेधून घेतात. पुन्हा एकदा नमोस्तुते _/\_ ( स्वतः वाचिवीर असलेला परंतु खर्‍या कर्त्यांचा ५ वर फिरणारा पंखा ) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

खत्तरनाक येकदम

एस
Sat, 05/31/2014 - 17:16 नवीन
स्पाशेट, दंडवत हो!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा