नाव कसं हुच्च वाटतंय ना पाकृचं? फार काही नाही टॉमेटोची चटणी भरुन केलेलं थालीपीट आहे.
झालं असं की मेस दोन आठवडे बंद असल्याची बातमी आली मग दुपारच्या जेवणाचं काय करायचं याचा विचार करायला लागलो. रात्री टिफीन येतो त्याच्याकडून पहिला आठवडा टिफीन मागवला पण टिफीन एकदाही वेळेवर पोचला नाही दुपारी!! मग त्यानंतरच्या आठवड्यात शेवटी स्वत:च सैंपाकघरात पाऊल टाकायचं ठरवलं आणि काहीतरी वेगळं करायच्या नादात ह्या रेशिपीचा शोध लागला. तर, फार वेळ न दवडता सामुग्री येणेप्रमाणे:
दोन मध्यम आकाराच्या वाट्या थालीपीट भाजणी
ड्राय यीस्ट एक चमचा
कोमट पाणी
साखर चमचाभर
तेल चमचाभर
मीठ चवीपुरतं
सारणासाठी:
दोन मध्यम आकाराचे टॉमेटो
दोन मध्यम आकाराचे कांदे (उभे चिरुन)
मटार अर्धी वाटी किंवा फ्रीजमध्ये असतील तेवढे यांपैकी जे कमी असेल ते!!
चीज स्लाईस
दोन हिरव्या मिरच्या (उभ्या चिरुन)
लाल तिखट दीड टिस्पून
हळद अंदाजे
जीरे एक टीस्पून
मोहरी एक टिस्पून
लिंबाचा रस चमचाभर
हिंग चिमूटभर (सैंपाकघरात असेल तर, माझ्याकडचा संपला होता)
साखर चमचाभर
मीठ चवीनुसार
साजूक तूप
सर्वात आधी चमचाभर ड्राय यीस्ट थोडं कोमट पाणी घेऊन त्यात विरघळून घ्यावं. (हे मी केलं नव्हतं, त्यामुळे पीठ नीट आलं नाही असं मला वाटत होतं). आता थालीपीट भाजणी, पाण्यात कालवलेलं यीस्ट, साखर, मीठ, तेल असं सर्व एकत्र करुन कोमट पाण्याने घट्टसर मळून घ्यावं आणि अर्धा ते पाऊण तास झाकून उबदार जागी ठेवावं. आधीच घट्ट अशासाठी मळायचं की एकदा पीठ आलं की बर्यापैकी सैलसर होतं.
आता सारणाची तयारी. कढईत साजूक तूप घेऊन ते तापलं की त्यात मोहरी टाकावी, ती नीट तडतडली की मग जिरं घालावं. त्यानंतर मिरच्या घालून परतावं. हिंग घालणार असाल तर आता घालून मग कांदा घालावा. कांदा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतावा, त्यानंतर हळद व तिखट घालून नीट परतून घावं. मग मटार आणि चिरलेले टॉमेटो घालून परतावं आणि झाकण ठेवावं. त्यात वेगळं पाणी घालायची गरज नाही टॉमेटोला पाणी सुटून ते व्यवस्थित शिजतात. मटार शिजले की लिंबाचा रस घालावा. साखर व मीठ घालून एकदा परतावं आणि गॅस बंद करावा. सारण तयार आहे.
आता थालीपीटाच्या भाजणीचं जे मिश्रण आपंण मळून ठेवलं होतं त्याचे दोन भाग करुन ते भाकरीसारखे हातावर थापून घ्यावे. त्यातला एक भाग एका ताटात ठेवून त्यावर केलेलं सारण पसरावं.
आता त्यावर एक चीज स्लाईस ठेवावा.
आता थालीपीटाचा दुसरा भाकरीसारखा थापलेला भाग आहे तो त्यावर ठेवून कडा बंद कराव्यात.
आता एका खोलगट तव्यात (नॉनस्टिक असेल तर उत्तम) चमचाभर तूप घालून ते सगळीकडे सारखं पसरुन घ्यावं. तूप जरा उजव्याच हाताने घालावं जास्त झालं चालेल कमी पडता कामा नये. खोलगट तवा अशासाठी घ्यायचा कारण कडा पण शेकल्या गेल्या पाहिजेत. सारण भरुन कडा बंद केल्यामुळे याचा आकार बर्यापैकी फुगीर होतो, त्यामुळे नेहमीच्या पोळ्या शेकवायच्या पसरट तव्यावर हा पदार्थ केल्यास कडा कच्च्या राहू शकतात.
आता तूप बर्यापैकी तापलं की हे थालीपीट कालथ्याच्या मदतीने अलगद तव्यात सोडावं. तूप कमी वाटल्यास कडेने आणखी थोडं तूप सोडावं. आच मंद करुन झाकण ठेवावं. दोनेक मिनीटांनी झाकण उघडावं. एक बाजू नीट शेकली असेल तर उलटून दुसर्या बाजूनेही नीट शेकून घ्यावं.
तव्यातून काढल्यानंतर थालीपीट काहीसं असं दिसेल.
आता फडशा पाडावा. हे एक थालीपीट दुपारच्या जेवणाला अगदी पोटभर होतं. हे दुपारच्या जेवणाला खाल्लं की माझ्यासारखी खादाड माणसं संध्याकाळच्या स्नॅक्सपर्यंत आरामात तग धरु शकतात.
टीपा:
१) फोटो मोबाईलच्या क्यामेर्याने काढल्यामुळे यथातथाच आलेत त्यामुळे फोटोवर केलेल्या कमेंटी योग्य त्या ठिकाणी मारणेत येतील.
२) बाकी पाकृ माझ्या बाळबुद्धीला ऐनवेळी सुचेल तशी केलेली आहे त्यामु़ळे जाणकारांच्या कमेंट्स मोस्ट वेलकम.
३) पदार्थ घरात असलेल्या वस्तू वापरुन ऐनवेळी सुचेल तसा केला आहे, यात आपल्या आवडीनुसार पदार्थ कमीजास्त करु शकता.

याद्या
11424
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दिसतोय थालपिझ्झा !!
+१
In reply to मस्त दिसतोय थालपिझ्झा !! by अजया
टेस्टी दिसतय.
भारी दिसतय की, घरगुती
तुमच्याकडे ना हव्वी तशी भाजणी
थापता येतं
जबरी झालंय. कधी येउ खायला?
(No subject)
सूड मोड ऑन
@सूड मोड ऑन
In reply to सूड मोड ऑन by प्यारे१
तेल कमी वापरता का...हल्ली?
=)) खला...स! =))थालिपीठाला भोकं
In reply to सूड मोड ऑन by प्यारे१
पण डिश
In reply to थालिपीठाला भोकं by दिपक.कुवेत
>>तर थालिपीठ भाजताना आत
In reply to थालिपीठाला भोकं by दिपक.कुवेत
नवीन प्रयोग!
वाह!
यम्मी...
भावा,
चांगली पा. कृ.
थालीपीठ हे पिझ्झ्याचे खापर पणजोबा असल्याने....
In reply to चांगली पा. कृ. by Prajakta२१
एकदम भारी दिसतंय!!!
थालपिझ्झा भारी दिसतोय!
थालपीठा सोबत शिंगोळे
थालपीठा सोबत शिंगोळे नसल्यामुळे आपला पास.
In reply to थालपीठा सोबत शिंगोळे by जेपी
जबरी! बराच झांगडगुत्ता आहे पण
बाब्बो ब्याचलर माणसाच्या किचन
मस्त रे. पण थालीपीठ आतल्या
आता कधी पुन्हा बनवतोयेस.
@ खायला आणि फोटो काढायला
In reply to आता कधी पुन्हा बनवतोयेस. by पिंगू
ह्म्म्म!! वर बरेच जण
भारी हं.
बाकी सगळ ठिक आहे....
>>पण एव्हडा कांदा कसाकाय
In reply to बाकी सगळ ठिक आहे.... by बाबा पाटील
चला आता लगीन लौकरात लौकर जमेल
बरा दिसतोय हा प्रकार एकंदरीत.
भारी...