साहित्यः एक डझन तयार पण घट्ट हापूस आंबे, साखर, लवंगा ४/५, वेलची दाणे( खरं तर या मुरांब्याला हापूस आंब्याचा इतका सुंदर सुगंध असतो की वेलची पण फिकी पडते.)
कृती: फोटोत दाखवल्याप्रमाणे आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून त्यावर उभ्या आडव्या रेघा मारून चमच्याने फोडी काढून घ्याव्यात. तयार फोडी मोजून घ्याव्यात, जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर, लवंगा, वेलची दाणे सगळे एकत्र मिसळून दोन तास झाकून ठेवावे. साखर विरघळली की मिश्रण कढण्यास ठेवावे.
मिश्रण अधून मधून ढवळत रहावे. पुरेसे घट्ट झालेय असे वाटले की डीशमध्ये थेंब टाकून पहावा. थेंब पसरत नाही असे वाटले की झाला मुरांबा तयार!
आत्ता आंबे मिळतायत तोपर्यंत मुरांबा बरणीत भरून ठेवावा, एकदा सिझन संपला की मुरांबा खाऊन आंब्याची कसर भरून काढता येते. कोणत्याही मोसमात आंब्याची मज्जा!

वाचने
12632
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुरांबा.. सह्ही.. हा तर खूप
हापूस आंब्याचा असा मुरांबा
वाह छान दिसतोय.
अहो यात शाही म्हणण्यासारखा...
स्वर्ग स्वर्ग म्हणतात हो हाच.
+१
In reply to स्वर्ग स्वर्ग म्हणतात हो हाच. by प्रभाकर पेठकर
आहाहा !! का आठवण करुन दिलीत
(No subject)
मस्तं गं
वॉव तोंपासु
पिकलेल्या आंब्यामध्ये...
नाही गं.. चवीबद्दल शंका नाही.
In reply to पिकलेल्या आंब्यामध्ये... by अनन्न्या
नाही होत रे. शंकाच असेल तर
In reply to नाही गं.. चवीबद्दल शंका नाही. by पिंगू
आहाहा..
मस्तच.
अनन्न्या...
तोंडाला पाणी सुटलं
फोडींइतकीच म्हणजे किती साखर?
ऑ... असा पण मोरांबा करतात ?
.........
मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ
In reply to ......... by अनन्न्या
मस्त !
मोरंबा..
येच
In reply to मोरंबा.. by स्वाती दिनेश
वावा..
In reply to येच by रामदास
अम्मळ जळजळ झाली.