Skip to main content

उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी

लेखक raudransh_27 यांनी शुक्रवार, 16/05/2014 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे. असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये. इंटरनेट सिग्रेडी आणि RCC वाल्यांची एक पद्धत नेहमीची आहे they brings you down at their level and try to beat you by experience. तुमचे विचार तुम्हाला मुबारक. आम्हाला सिग्रेडी होऊन अशा २० % लोकामुंळे ८० % वर (एकुण ३%) गरळ ओकण्यापेछा काही दुसरे चांगली कामे करणे पसंत करू. योगायोगाने आजच लोकसभा निकाल लागले. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपत्री उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले हे तब्बल विक्रमी 5 लाख 22 हजार 531 मतांनी निवडून आले आहेत. ज्या भागात NDA ची एक जागा येत नव्हती तिथे आज राष्ट्रवादी हिंदुत्ववादी विचारसरणीचे shri. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पुणे, सांगली, सोलापुर वाहुन गेले (माढ्यात सदाभाऊ खोत थोडक्यात) त्याच पश्चिम महाराष्ट्रात उदयनराजे विक्रमी आघाडीने येतात हेच पुरेशे वाटते. उदयनराजे राष्टवादी नामक पार्टीच्या उमेदवारीमुळे निवडुन आले ही वस्तुस्थिति नाही. उदयनराजे पार्टी राजकारणा पलीकडचे व्यक्तित्व आहे. http://www.ibnlokmat.tv/archives/123983 तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले. महिमानगड, भुपालगड कोळदुर्ग, मच्छिंद्रगड ते वर प्रतापगड, केंजळ पर्यंत मुलुख फिरलो, उदयनराजें बद्दल आदर अधिकअधिक वाढत गेला. आधी फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड वर त्यांचे भाषण ऐकलेले, यंदाही राज्याभिषेक सोहळ्याला (०६ जुन २०१४) उदयनराजे येतीलच. जनतेचे ॠण फेडणार अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिल्याची http://livesatara.com/जनतेचे-ॠण-फेडणार-खा-उदयनर/ संकेतस्थळावर वाचायला मिळाली. उदयन महाराजानां ऩविन टर्म साठी शुभेच्छा. ग्रामीण भागास वाढीव निधि मिळावा ही त्यांची लोकसभेतील मागणी पुर्ण होवो, तसेच दुर्गसवंर्धन सारखी विधायक कामे होवोत हीच आई भवानी चरणी प्रार्थना. जय शिवराय....। जय सह्याद्री....। -- रौद्रांश Intoxicated With Wine Of Holy and Pride....

वाचने 46272
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

रच्याकने.. शिवरायांना "श्रीमंत" उपाधी लावल्याचे ऐकिवात नाही !! इथे तर श्रीमंत, छत्रपती, राजे, महाराज सगळं एकदम!!

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे अशक्य ही साफ खोटी गोष्ट आहे... पूर्वी गोपीनाथ आत्ता पवारसाहेब यांचा पाठिंबा आहे... नसतात तर मागची केस परत उपटली असती सहेबांचा पाठिंबा नव्हता तेव्हा विधानसभेला हरले होते उगा या गाबड्याला साहेबांपेक्षा मोठे करू नका

In reply to by आशु जोग

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे अशक्य ही साफ खोटी गोष्ट आहे... पूर्वी गोपीनाथ आत्ता पवारसाहेब यांचा पाठिंबा आहे... नसतात तर मागची केस परत उपटली असती सहेबांचा पाठिंबा नव्हता तेव्हा विधानसभेला हरले होते उगा या गाबड्याला साहेबांपेक्षा मोठे करू नका

In reply to by मालोजीराव

धनगर जातीचे महादेव जानकर असल्याने तिथल्या मराठ्यांनी जात बघून पवारला मत दिले ,जर विकासाच्या मुद्द्यावर मत दिले असते तर जानकर प्रचंड मताने निवडून आले असते.

In reply to by नानासाहेब नेफळे

ज्या गावाला टग्याने धमकावले असे म्हणतात ते गाव धनगर लोकवस्तीचे आहे.या राकाँचा जातीयवाद बघा किती खोलपर्यंत रुजलाय. यांना ब्राह्मण नकोत, धनगर नकोत, दलित नकोत ,मुस्लमान इफ्तारपार्टिपुरते पाहीजेत, अश्या एकाजातीचे मुजोर राजकारण करणार्यांना येणार्या विधानसभेत घरी बसवायला पाहीजे.

पूर्वाश्रमीची सरकार आणि जमीनदार्/वतनदार घराणी बरीच आहेत. आज त्यांच्या वारसांकडे काहीही नसले तरी स्थानिक पातळीवर बर्‍यापैकी मान असतो. काही ठिकाणी "काय सरकार, येताय का भांगलायला?" अशी विचारणा केली जाते. सबब आजच्या काळातही श्रीमंत, सरकार, सरदार इ.इ. बिरुदे लावली जातात; भले प्रॉपर्टी असो वा नसो. :)

मी स्वत: त्या मतदार संघातील मतदार असल्याने काही गोष्टी सांगाव्या वाटतात. फक्त वारस म्हणुन जन्माला आल्याने काही होत नाही, तो वारसा पुढे चालवावा पन लागतो. सकाळी उठल्यापासुन बाटली घेउन बसणारा ला आम्ही छत्रपतींचा वारसदार का मानायच??? उदयन राजे हे अतिशय अकार्यक्षम खासदार आहेत. २००९ आणि २०१४ या दोन्ही वेळी सीट गमावण्याच्या भितीपोटी शरद पवार यांनी उदयन राजेंना तिकिट दिले आणि दोन्ही वेळा ते राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे निवडुन आले आहेत, ज्यांना राजेंनी निवडुन आल्यावर कधी विचारलही नाही त्यामुळेच पक्षातुनच त्यांच्या उमेदवारी ला विरोध झाला. त्यांचा सो कॉल्ड फॅक्टर हा फक्त सातारा शहर आणि तालुक्याचा काही भाग एवढाच मर्यादित आहे पन या मतदार संघात सातार्‍या शिवाय कराड, पाटण, जावली, महाबळेश्वर्,वाई,खंडाळा,खटाव इ.भाग येतो. तिथे राजेंची काहीच ताकत नाही तसेच काम ही नाही. येथील थोडेजन स्वतःला राजे समर्थक म्हणतात पण मुळात ते राजेंचे टोल्,वाळु,खाणी या व्यवसायातले भागिदार आहेत. कराड सारख्या मोठ्या तालुक्यात जिथे २-२ विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे मागील ५ वर्षात ते फक्त ३-४ वेळा गेले आहेत म्हनजे ग्रामीण भागची तर गोष्टच सोडा. खासदार निधी अत्यल्प आणि ठराविक भागतच वापरला आहे.गारपीटी कडे लक्ष दिले नाहीच पण त्या आधीच्या भीषण दुष्काळाशी सामना करण्यात ही ते लोकांसोबत नव्हते. २००९ च्या निवड्णुकी आधी ज्या वीजेच्या मुद्द्यावरुन आंदोलन करुन त्यांनी पवारांवर दबाव आणला आणि तिकिट मिळवले त्याविषयी त्यांनी मागील ५ वर्षात एक अक्षर ही काढले नाही. इतरांप्रमाणे आम्हीही (जिल्ह्यातील लोकांनी) मोदी लाटेत यांना घरी बसवले असते पण महायुतिने बाय दिल्याप्रमाणे ही जागा रिपाई ला सोडली, सशक्त उमेदवार दिला नाही, लोकांना मतदानासाठी सशक्त पर्याय मिळाला नाही त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासारखे मतदान झाले नाही( ५८% फक्त, तर सांगली,कोल्हापुर्,बारामती ६८% पेक्षा जास्त) आणि पुन्हा एकदा
राजे सुखरुप गडावर पोचले

एक खासदार म्हणून उदयन भोसले यांना त्यांच्या कार्याप्रमाणे गौरवण्यात काहीच आक्षेप नाही. पण कितीही चांगले काम केले असले तरीही स्वतंत्र भारतात राजे/महाराज्/श्रीमंत्/छत्रपती या संबोधनांना काहीही स्थान नाही. मला महाराज म्हणू नका, किंवा कार्यकर्ते म्हणतात ही पळवाट झाली. भोंदु बाबाबुवा स्वतःचे महत्व वाढवण्यास असा पवित्रा घेतात. सर्वात महत्वाचे प्रसारमाध्यमांनी त्यांना राजे/छत्रपती म्हणणे थांबवावयास हवे. त्यांचे भाट लोक म्हणत राहतीलच, त्यांना थांबवता येणार नाही.