एम्ब्रेस्ड बाय लाईट, सेव्ह्ड बाय द लाईट, thi rTee मिनीटस इन हेवन अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास 'निअर डेथ एक्सपीरीअन्स"(NDE ) सारख्या साईट्वर घालवून अन त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक स्ट्रक्चरच , एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.
सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते. थोडा वेळ लागतो पण शेवटी ते प्रेत आपलेच प्रेत आहे हे या व्यक्तीच्या ध्यानात येते.शंका १- हवेत तरंगणे इतके सहज का गृहीत धरले जाते? म्हणजे normal आयुष्यात तर आपण सहसा असे अचानक तरंगायला लागत नाही. (आजकाल काहीही घडू शकते म्हणून लिहीले आहे - सहसा :)) मग मृत्युपश्चात NDEer ना मृत्यूचे भान यायला इतका वेळ का लागतो? शंका २- बरं स्वत:चं शरीर त्रिमितीमध्ये पाहून अनेकाना ही जाणीव होते की आपण स्वत:ला समाजत होतो तितके देखणे नाही. किंवा तितके बारीक नाही, सुडौल नाही यंव न त्यंव. मग परत आल्यानंतर किती NDEers स्वत:चा appearance सुधारण्याचा प्रयत्न करतात? निदान तसे खुले आम सांगतात? शून्य. बहुसंख्य NDEers मानवतावादी व अध्यात्मिक मूल्यांबाबतच बोलतात.
मृत झाल्याची एकदा व्यक्तीची खात्री पटली की लगेच एका काळ्या टनेल अर्थात बोगद्यातून तिचा प्रवास सुरु होतो.काहीजणांनी असे म्हटले आहे की अन्य जीव या बोगद्यातून प्रवास करत असल्याचे त्यांना जाणवले.शंका ३- मग इतक्या गर्दीत या बोगद्यात धक्काबुक्की होते का? बरे सर्वच जण चुपचाप मार्गाक्रमण का करतात? कोणी शीळ घालत नाही की वेळ जायला गाणे म्हणत नाही. मृत्युपश्चात परलोकात विनोदाचे वावडे असते का?असो.
पुढे थोड्या टिवल्याबावल्या झाल्यानंतर, प्रकाश दिसतो/ लक्षात येतो. आणि मग व्यक्ती एका BRILLIANT फार प्रखर नाही अशा तेजोमय प्रकाशाकडे आकर्षित होते.यावर शंका ४- मला जर प्रकाश आवडत नसेल जर मला कुंद पावसाळी ढगाळ हवा आवडत असेल तरी मी प्रकाशाकडेच आकर्षित व्हायचे का? कोणीही प्रकाशाव्यातीरीक्त अन्य सुंदर मेलो तेजाबद्दल बोलत नाही.
या प्रकाशाचे वर्णन करताना तर सर्व NDEers च्या जिभेवर साक्षात सरस्वतीच नृत्य करू लागते. तो प्रकाश किती दयाळू, समजूतदार, नॉन-जजमेण्टल आहे ते सांगायचे अहमहमिका सुरु होते .मग हाच प्रकाश या व्यक्तीला तिचाच जीवनपट दाखवतो व NDEer ने अन्य जीवांना दिलेले दु:ख , वेदना, यातना तो उलगडून दाखवतो इतकेच नव्हे तर NDEer त्या दुसर्या व्यक्तीच्या नजरेतून तेच दु:ख स्वत: भोगतात. मग NDEer ना जाणवते की ते किती आत्मकेंद्रॆत, स्वार्थी आयुष्य आजवर जगत आले वगैरे वगैरे. उपरतीच होते म्हणा ना.शंका ५- जर हा प्रकाश इतका दयाळू आहे तर क्षमा करून why does it not move on?????????
मग पुढे NDEers ना त्यांचे जन्मजन्मान्तरीचे सुहुद, मित्र भेटतात. व हे मित्र त्यांना ज्ञानामृत पाजतात.शंका ६- जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते? कोणीही NDEer ने परत आल्यावर या ज्ञानाच्या जोरावर एखादा गणिती सिद्धांत सोडवला आहे किंवा फार splendid नाही तर नको पण एखादा बारीकसा का होईना शोध लावला आहे असेही काही दिसत नाही.
सरतेशेवटी NDEer ना २ पर्याय दिले जातात परलोकातच रहाणे अथवा पृथ्वीवर परत जाणे. नाही जायचे म्हटले तरी त्याना "कार्य अपुरे आहे" या सबबीखाली सक्तीने पाठविले जाते. व परत आल्यावर "विशिष्ठ ध्येयाने झपाटून" ती व्यक्ती जीवन जगते वगैरे.शंका ७ - इतकं ध्येय आदि सापडल्यावरही हे NDEers पुस्तक वगैरे का लिहितात बरे स्वत:ची स्टोरी म्हणून लिहीले तरी मग त्या पुस्तकाचे उत्पन्न charity ला जायला हवे कारण इतकी उच्च व अजोड अध्यात्मिक उंचीची माणसे स्वत: कशाला उपभोग घेतील? पण ते उत्पन्न charity ला जाते असे एकाही NDEer ने लिहिल्याचे ऐकिवात नाही.
वाचने
7763
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्लँचेट करुन नेहरुला प्रश्न
माताय नेहरुसारख्याला बोलवुन
In reply to प्लँचेट करुन नेहरुला प्रश्न by आत्मशून्य
जय सनातन
कट्टा माफियाशी सहमत.
In reply to जय सनातन by मुक्त विहारि
पटेल तेवढे ठेवावे बाकीचे सोडुन द्यावे
समजा एखाद्या सिनेमाच्या
In reply to पटेल तेवढे ठेवावे बाकीचे सोडुन द्यावे by ज्ञानोबाचे पैजार
चुकून NDA वाचलं म्हणून धागा
"आपणास आहे मरण म्हणोन, राखावे बरेपण'
In reply to चुकून NDA वाचलं म्हणून धागा by आतिवास
असं कसं प्रचंड सहमत ?
In reply to "आपणास आहे मरण म्हणोन, राखावे बरेपण' by मुक्त विहारि
पण 'आपणास आहे मरण म्हणोन
In reply to चुकून NDA वाचलं म्हणून धागा by आतिवास
अध्यात्मिक किंवा metaphysical ज्ञान
जे ज्ञान दिले जाते ते नेहमी
In reply to अध्यात्मिक किंवा metaphysical ज्ञान by मित्रहो
हास्यास्पद विचारसरणी.
In reply to जे ज्ञान दिले जाते ते नेहमी by बॅटमॅन
मेनी लाईव्स मेनी मास्टर्स
बरेच NDEers त्यांच्या
In reply to मेनी लाईव्स मेनी मास्टर्स by कॅप्टन जॅक स्पॅरो
कॉनी विलीस नावाच्या लेखिकेची
वाचेन. मिळवण्याचा प्रयत्न
In reply to कॉनी विलीस नावाच्या लेखिकेची by आदूबाळ
मुळात निअर डेथ म्हणयचे की फार लाइफ म्हणायचे
शुचि मामी,
पण हे असं झाल्यावर छान वाटतं
माऊ, एन डी ई वाचायला तर फार
In reply to पण हे असं झाल्यावर छान वाटतं by कवितानागेश
हेहे. अगं आपल्याला मजाच येणार
In reply to माऊ, एन डी ई वाचायला तर फार by शुचि
शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास
बाप रे खरच???
In reply to शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास by तुमचा अभिषेक
काल्पनिकता
In reply to शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास by तुमचा अभिषेक
ईथे मात्र ते खरेखोटे कसे
In reply to शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास by तुमचा अभिषेक
खरा अनुभव आहे, काल्पनिकता
In reply to ईथे मात्र ते खरेखोटे कसे by आनन्दा
सूक्ष्मदेहीय प्रक्षेपण
In reply to खरा अनुभव आहे, काल्पनिकता by तुमचा अभिषेक
ओह्ह, म्हणजे असा
In reply to सूक्ष्मदेहीय प्रक्षेपण by मंदार कात्रे
आपला मेंदु शट डाउन व्हायला
In reply to खरा अनुभव आहे, काल्पनिकता by तुमचा अभिषेक
+१, सही फंडा.
In reply to आपला मेंदु शट डाउन व्हायला by आत्मशून्य
घड्याचा सेकंद्काटा फिरताना
In reply to आपला मेंदु शट डाउन व्हायला by आत्मशून्य
मेंदू शट डाऊन व्हायला तयार
In reply to आपला मेंदु शट डाउन व्हायला by आत्मशून्य
मेंदू शट डाऊन व्हायला तयार नाही
In reply to मेंदू शट डाऊन व्हायला तयार by तुमचा अभिषेक
ब्लॉगवरची माहिती वाचली, छान
In reply to मेंदू शट डाऊन व्हायला तयार नाही by थॉर माणूस
छातीवर कोणीतरी येऊन बसलेय,
In reply to ब्लॉगवरची माहिती वाचली, छान by तुमचा अभिषेक
अगदी असे नाही पण थोडेफार असे
In reply to छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, by टवाळ कार्टा
ते अनुभवले तेव्हा मी झोपेत
In reply to अगदी असे नाही पण थोडेफार असे by llपुण्याचे पेशवेll
येस्स सेम टू सेम
In reply to ते अनुभवले तेव्हा मी झोपेत by टवाळ कार्टा
जागेपणीचे स्वप्न असते असं
In reply to येस्स सेम टू सेम by तुमचा अभिषेक
अनुभव
In reply to जागेपणीचे स्वप्न असते असं by थॉर माणूस
हाहाहा
In reply to अनुभव by llपुण्याचे पेशवेll
हो कां बरं बरं असेल.
In reply to हाहाहा by आत्मशून्य
वेल यु नो...!
In reply to हो कां बरं बरं असेल. by llपुण्याचे पेशवेll
ईंटरेस्टींग आहे, पण शक्यतो
In reply to अनुभव by llपुण्याचे पेशवेll
सायन्स ऑफ डेथ डॉक्युमेंटरी
सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न
असं आहे ..
एन्डीई अनुभव
हे बघा
धन्यवाद. वाचते.
In reply to हे बघा by शिरपतराव्_टांगमारे
माझ्या वाचनात आलेल्या एका