भारतीय वकीलातीतला अनुभव
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो .
मला पासपोर्ट वरील नाव बदलून घायचे होते. नवीन नावाने नवीन पासपोर्ट हवा होता . वकिलाती मध्ये सकाळी १० वाजता फोन केला. वेबसाईट वर १० वाजता ची वेळ दिलेली होती त्यानुसार . आधी कोणी फोन उचलला नहि. फोन घेणाऱ्या व्यक्तीने काय हवे विचारले. पासपोर्ट वरील नाव बदलण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती हवी म्हणून सांगितले . अत्यंत तुसडेपणाने उत्तर दिले कि वेबसाईट वर बघा . तिला सांगितले कि तिथे अर्धवट माहिती आहे . मग तिने तीच्या अंदाजाने काय कागदपत्रे लागतील ते सांगितले .इथे दुसर्या एक कंपनी (BLS )ला outsource केले आहे . म्हणजे सारख्या वकिलाती मध्ये खेपा घालाव्या लागु नयेत .कारण आम्ही राहतो तिथे बरेच भारतीय राहतात पण वकिलाती मात्र २ ते २. ३० तासांच्या अंतरावर आहे . आणि कामाची वेळ देखील सकाळी १० ते १२ फक्त.
फोन वरच्या बाईनी सांगितल्याप्रमाणे कागपत्रे घेवून शिवाय आम्हाला जी आवश्यक वाटली तीहि कागदपत्रे घेवून त्या ऑफिस मध्ये गेले . १०. १० ची वेळ दिली होती . १०. ३० ला आम्हाला विचारले गेले . कागद पाहून झाल्यावर शांतपणे म्हणाली कि तुम्हाला वकिलाती कडून affidavite आणावे लागेल . शिवाय लग्नानंतरचे नाव लावायाचे असल्याने नवरा बायकोचा एकत्र फोटो हवा तोदेखील पासपोर्ट साईझ फोटोग्राफ मध्ये. साईट वर कुठेही या गोष्टीचा उल्लेख नव्हता . शिवाय फोन वरील बाईने देखील याबद्दल काहीच माहिती दिली नव्हती .
शेवटी एक दिवस नवर्याने सुट्टी काढली . आम्ही असतील नसतील तेवढी सगळी कागदपत्र घेवून वकिलातीत थडकलो . भारतीय वकिलाती ज्या भागात आहे त्याच भागात इतर देशांच्या वकिलाती सुद्धा आहेत . पण भारतीय वकिलातीच्या इमारतीची अवस्था बघान्यासारखी होती . माझा वकिलातीला भेट देण्याचा पहिलाच प्रसंग .लहान मुलगा सोबत असल्याने तो बाबागाडीत होता . बंगलेवजा इमारत आहे पण मुख्य दरवाजा बंद . ८-१० पायर्या उतरून मागच्या बाजूने (मागच्या दरवाजाने ) प्रवेश होता . लिफ्ट किंवा स्लोप नसल्याने मुलाला उचलून घेतले आणि नवर्याने बाबागाडी उचलून खाली आणली . बरोबर १० आजता आम्ही दारात होतो , पण दार उघडले नव्हते . १०. १० ला दर उघडले . आत गेल्यावर एक छोटासा १० फुट रुंद आणि १५ फुट लांब एवढा hall होता . तिथे खुर्च्या मांडल्या होत्या .परंतु तिथून counter दिसत नव्हता . दार उघडते तिथे समोर दोन counter होते . हळूहळू करत एक एक जन आत येत होता . परतू counter वर कोणीच दिसेना . मग एक शिपाई वाटेल असा माणूस आला . त्याने सगळ्यांना एक एक करून तिथेच काय करायचे ते विचारले . मोठ्या आवाजात काहीही privacy न ठेवता . आणि एवढ विचारून साहेब येतील एवढ सांगून गायब झाला . तोपर्यंत १०. ३० झाले होते . १०.४० ला राणा नावाचा एक बडा अधिकारी आला . blazer वगैरे घालून होता आणि त्याच्या एकूण व्यक्तिमत्ववरुन हा माणूस इथला साहेब असावा आणि निदान याला सगळी माहिती असावी असे वाटले . आम्ही आपले आपला पहिला नंबर म्हणून आपल्याला पहिले विचारेल याची वाट पाहत बसलो तर तो आला कुणाकडे न बघत आपल्या केबीन मध्ये गेला . शेजारच्या एक दोघांना विचारल्यावर त्यांनी हा माणूस नक्की काम करेल असे सनगितले. मग परत त्याची वाट बघा . आता सगळी मानस त्याच्या केबिन च्या आसपास घुटमळत होती . कारण नंबर वगैरे प्रकार नाही . जो आधी नजरेस पडेल , जो आधी बोलेल त्याच काम होणार हे कळून चुकल होत . राणा साहेब केबिन मधून बाहेर पडल्यावर आधी माझ्या नवर्याने त्यांना पकडल . काय कागदपत्र हवीत नको विचारलं . सुदैवाने त्याला खरच सगळी माहिती होती . त्याने संगीतालन त्याप्रमाणे कागदपत्र तयार केली . तोपर्यंत तो बकिंच्याकडे जावून परत एकदा दुसर्या खोलीत गेला . आता सगळे जन त्या दुसर्या खोलीपाशी घुटमळायला लागले . परत तो बाहेर आला . कागदपत्रावरून नजर फिरवली . आणि नवीन document तयार करण्यासाठी त्याच्या केबिन मध्ये गेला . परत सगळ्यांचा मोर्चा त्याच्या खोलीकडे वळला . मग एकदा शेवटी affidavite झाल . मग जेव्हा त्याचे पैसे भरायची वेळ आली तेव्हा त्या दरवाजाच्या समोरच्या counter वर एक व्यक्ती आली . कार्ड पेमेंट केल . त्या राणा साहेबाला २ दा धन्यवाद म्हटलं आणि बाहेर पडलो . हे सगळ होईपर्यंत १२. ३० झाले होते .
नंतर दुसर्या दिवशी BLS च्या कार्यालयात जावून पासपोर्ट साठी फॉर्म भरला .
त्यापुढील आश्चर्य म्हणजे चक्क एका महिन्यात आला . कारण पासपोर्ट इथे प्रिंट होत नाही . त्यासाठी तो दिल्लीला पाठवतात . त्यामुळे आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती कि पासपोर्ट एवढ्या लवकर येईल . आला खरा .मात्र मधले दोन दिवस त्या वकिलातीत आणि दुसर्या BLS च्या ऑफिस मध्ये खेटे घालायला लागून खूप मनस्ताप झाला.
प्रतिक्रिया
परदेशात असताना माझ्या
सॅन फ्रान्सिस्को
नविन पासपोर्ट मिळाल्याबद्दल
नविन पास्पोर्ट मिळाल्याबद्दल
चांगला अनुभव
+१
गचाळ बिल्डींग, गचाळ बाग
त्याला नाईलाज आहे हो; श्रीमंत
उगीच भारतीय वकिलाती ह्या
इतका वाईट नसला तरी जरा काळजी
शिकागो वकिलात
हो. या वेळांमुळे कचेरिस
भारतीय वकिलातींमधिल व्यवस्था
अनुभव
दुबैला
अबुधाबी , लंडन येथे चांगला
स्वसंपादन करण्यापेक्ष्य एवढेच
सुदैवाने कुवेत मधेहि
शिकागो भारतिय वकिलात- चान्गला अनुभव
शिकागो वकिलातीचा चांगला अनुभव
वर्गणी
मुलाच्या पासपोर्टच्या
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार...
बहुगुणींनी सांगितलेले खरेच