Skip to main content

नमो लाटेचे साईड ईफेक्ट

लेखक वॉल्टर व्हाईट यांनी शनिवार, 17/05/2014 03:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्‍याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात, १. शिवसेनेला जीवदान मिळाले २. मनसेची धुळ्दाण झाली ३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ? टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.

वाचने 52236
प्रतिक्रिया 204

प्रतिक्रिया

मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. ;-) (किंबहुना त्याकरताच हा नेत्रदीपक विजय त्यांनी मिळवला अशी कुजबूज आहे!)

In reply to by हुप्प्या

विनोदी असला तरी साईड ईफेक्ट आहे खरा. नोटेड.

In reply to by हुप्प्या

नवाज शरीफांनी निमंत्रण स्वीकारल्यास नमो लाटेच्या साईड इफेक्टमुळे त्यांना बिर्याणी खायला मिळू शकते. (नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. सुदैवाने तसे काही होत नाही अशी प्राथमिक चिन्हे दिसत आहेत.)

In reply to by आजानुकर्ण

नवाज शरीफ ढोकळा खायला येत असतील आणि परत परत तीच बिर्याणी ती देखील गुज्जू स्टाईल मधली खायला लागल्यामुळे भारत-पाक संबंध परत बिघडायचे. नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. =)) काँग्रेसचे धोरण? गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही. सगळा आनंदच होता. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन. :)

In reply to by विकास

गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही.
दहा वर्षे काही केले नाही? शक्य आहे...त्यामुळेच २००९ च्या निवडणुकांमध्ये मूर्ख जनतेने काँग्रेसला तरीही निवडून दिले. मात्र २०१४ मध्ये जनता अचानक शहाणी झाली असावी. असो. येथील परंपरेनुसार अभ्यास वाढवा इतकेच म्हणेन. GDP School Defence Employment
मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन
मोदी आणि भाजपांनी काँग्रेसच्या बिर्याणी पॉलिटिक्सचा निषेध केला होता, मात्र आता कोलांटउडी मारून तेच धोरण पुढे चालू ठेवले आहे असे दिसते. (मुळात धोरण चांगले होते तर त्यावेळी टीकाच करायला नको होती असे वाटते. चांगले धोरण पुढे चालू ठेवल्याचा आनंद आहेच.) modi

In reply to by आजानुकर्ण

वरील चित्रांचा/आकडेवारीचा आणि काँग्रेसचा काहीच संबंध नाही. India has progressed not because of Congress, but in spite of Congress.

In reply to by सुबोध खरे

जॉन स्टीवार्ट एक उत्तम कॉमेडीअन आहे. पण त्याने केलेल्या अमेरीकन हाऊसेस वरच्या सटायरीकल कमेंटला इथे क्वोट करण्यामागचे कारण कळले नाही.

दिल्ली चे तिकीट मिळाय्चे वांधे... ट्रेन चे ....

भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!! दे हॅव बिकम इररिलेव्हंट!!

In reply to by संपत

त्या अडवाणींच्याच खांद्यावर उभे राहून मोदींनी स्वत:चा राजकिय फायदा करून घेतलाय हे विसरता कामा नये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मान्य.पण अडवाणी हे माझे व्यक्तिगत सर्वात नावडते राजकारणी आहेत. त्यामुळे आनंद झाला. :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अडवाणींच्या खांद्यावर उभे राहुन कसला? आज जे मोदींना जमले ते बाजपाई आणि आडवाणींना २०-२५ वर्षा पूर्वी जमु शकले असते. पण ते अगदीच नालायक निघाले. बाजपाई तर काँग्रेस ची B Team असल्यासारखेच होते.

In reply to by पिवळा डांबिस

होय! नाही तर जावई रुसल्या सारखे हे ऐनवेळी मी पंतप्रधान होणार म्हणुन अडुन बसायचे.

In reply to by वेताळ

मायावती कुठे आहेत हो? हत्तीचे उभारलेले "पुतळे" मोजत बसल्या असतील ! आता वेळ घालवण्याचे तेच एक साधन उरले ना त्यांच्याकडे ! ;) बाकी... मोठ-मोठे माजलेले टोणगे-वळू या वेळी तबेल्यात गेले ते पाहुन फार बरे वाटले ! सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसचा सुपडा साफ झाला ! सत्तेची मस्ती चढल्यामुळे त्यांच्या मग्रुरीला कोणतीच सीमा उरली नव्हती ! त्यांना त्यांची "योग्य" जागा दाखवुन दिल्या बद्धल हिंदूस्थानी जनतेचे आभार मानावे तितके कमीच आहे ! जनतेला विकास हवा आहे, आणि त्यासाठी ते उत्साहाने मतदान करुन सत्ता परिवर्तन घडवुन आणु शकतात हे आज जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने दाखवुन दिले.

In reply to by मदनबाण

काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. किंबहुना आपलं तारु खडकावर आपटायच्या दिशेने चाललय हे काँग्रेसमधे ज्यांना कळायला हवं त्यांना कळत होतं. पण त्या तारुला योग्य दिशा देण्याचा वकुब असणार्‍यांना काँग्रेसने वापरलच नाहि. कंट्रोल होता नंबर मॅनेजर्स आणि तीसरी आघाडीचे वगैरे प्रयोगांवर विश्वास ठेवणार्‍या खुरट्या व्यक्तींकडे. काँग्रेसचा डाव स्वतःच्या कुवतीवर नव्हता. त्यांना आशा होति ति विरोधकांच्या फुटीची. त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने डोळे मिटुन दुध पिणार्‍या बोक्याला मतदारांनी ओळखले व कचकचुन कमरेत लाथ घातली बोक्याच्या. परिणाम दिसतोच आहे.

In reply to by अर्धवटराव

काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. हॅ.हॅ.हॅ... असं कसं म्हणता अर्धवटराव ? त्यांच्या सर्व प्रवक्त्यांची विधाने / भाषा कधी ऐकलीच नाहीत का तुम्ही ? लोक बोफोर्स घोटाळा विसरले, कोलगेटही विसरतील ! हे "गॄहमंत्री" सुशील कुमार यांचे वक्तव्य लक्षात आहे का ? मौत का सौदागर असा मोदींचा उल्लेख करुन सोनिया गांधींनी सगळ्यात खालच्या पातळीचा प्रचार करुन दाखवला. शिवाय राज बब्बर यांचे १२ रुं पोटभर जेवण मिळते हे विधान देखील विसरलात की काय ? शिवाय तो वायझेड दिग्गीराज पिसाळलेल्या कुत्र्या सारखा सगळीकडे तोंडाला काही येइल ते बरळत सुटला होता, त्याला कॉंग्रेस मधल्या कुणालाच आवरावेसे का वाटले नाही ?{ ओसामा बिन लादेन ला ओसामाजी म्हणणारा वायझेडच म्हंटला पाहिजे} ही सगळी दिर्घकाळ सत्ता हातात असल्यामुळे आलेली मग्रुरीच होती. कोणावरही कुठलेही आरोप करत सुटले होते, गडकरींवर देखील असे आरोप करणारे मनिष तिवारी यांना बिनशर्त माफी मागावी लागली होती. मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांनी अण्णा हजारेंच्या बाबतीत बोलताना असभ्य आणि एकेरी उच्चारण केले होते, त्यावर बीजेपीच्या सुशमा स्वराज यांनी त्यांना २ शब्द व्यवस्थित सुनवले होते.

In reply to by मदनबाण

फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय... हि मग्रुरीची भाषा, बेताल वाचाळता काँग्रेसमधल्या फुकट्यांची होती. जे लोकं घाम गाळुन काँग्रेसकरता मतांची बेगमी करायचे त्यांना काँग्रेसच्या चुका कळत होत्या. पण राणि, राजपुत्र आणि प्रधान पक्षहितापेक्षा घराणेशाहिला महत्व देताहेत म्हटल्यावर निवडणुकांची रणनिती घराण्याचा करिश्मा आणि विरोधकांच्या चुका या दोनच घटकांवर मर्यादीत राहिली. असो.

In reply to by अर्धवटराव

ह्म्म... इथे फक्त फुकट्यां ऐवजी प्रामाणिक / वफादारपणे चाटुगिरी करणारे असे म्हणीन ! जे मन लावुन तळवे चाटतात ते पदास पात्र होतात असे साधे सोपे गणित आहे... मग मड्डम सॉरी सॉरी हाय कमांड ने सांगितले ते फॉलो करा ! सुशील कुमार शिंदे यांनी गॄहमंत्री होताच त्यांचे विधान होते :- "The Gandhi family has always taken care of the welfare of backward castes. Dalits can also take bigger responsibility. The home ministry is a critical ministry. I have performed in the past and I will again prove through my work as the home minister," संदर्भ :- Shinde thanks Sonia, PM for giving a 'Dalit' home ministry म्हणजे वफादारी और दलित कार्ड २ नो एकसाथ ! बरं आपल्या देश मातेचे इतके कौतुक केल्यावर राजपुत्र ? कसे स्वस्थ बसतील ? तेही लगेच शिंदे काकांना भेट देण्यास पोहचले. ;) संदर्भ :- Rahul Gandhi visits Shindes for dal-chawal after Sushil Kumar Shinde proclaims his dalit heritage बरं आपण देशाचे गॄहमंत्री या पदावर आहोत याचे भान न-ठेवता,आरएसएस आणि बीजेपी हे भगवा दहशदवाद पसरवत आहेत असा अजब शोध लावुन बसले.बरं इतक्यावर हे गॄहमंत्री थांबले नाहीत तर आमच्या विरुद्ध वार्तांकन करणार्‍या मिडियाला आम्ही चिरडुन टाकु अशी धमकी देउन मोकळे झाले. होम मिनिस्ट्री इज क्रिटीकल मिनिस्ट्री असे मोठे विधान करणारे असं कसं वागु शकतात ? संदर्भ :- RSS, BJP camps promoting Hindu terror: Sushilkumar Shinde Sushil Kumar Shinde’s threat: Will crush ‘elements’ in media plotting against Cong ही तर काही ठराविक उदा. झाली पण दिग्गीरांजां सारख्या मर्कटालाही सुशील कुमार शिंदे यांनी मागे टाकले आहे याची कल्पना आपल्या असेल-नसेल म्हणुन सांगतो... मुंबई हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असणार्‍या हाफिद सइदचा मिस्टर हाफिद सइद आणि श्री.हाफिद सइद अशी विशेषण लावुन त्यांना उपकॄत केले. देशाचा गॄहमंत्रीच जर तुमच्या देशावर हल्ला करणार्‍याला अश्या उपाधी लावत असेल तर त्यांच्या "धर्मनिरपेक्षतेची" खात्री सार्‍या जगालाच पटेल नाही ? संदर्भ :-For home minister Shinde, Hafiz Saeed is 'Mr' and 'Shri' आणि अधिक हवे असेल तर इकडे :- Sushilkumar Shinde's GOOF UPs! When Sushilkumar Shinde was in news for wrong reasons जाता जाता :- इतके बेताल वक्तव्य इतक्या महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती कसा करु शकतो ? अर्थातच...कारण समजले असेलच तुम्हाला.बादवे :- पॄथ्वीबाबा पण मड्डम्म... सॉरी सॉरी हायकंमाडची वाट बघत आहेत म्हणे.

In reply to by मदनबाण

अरे अरे मदन बाणा तू तर त्यांच्या चडडीलाच हात घातलास. इथल्या कांग्रेस वाल्यांचे कसे होणार?

मिपावरच्या सुडो सेक्युलर लोकांच्या मजेशीर कमेन्ट्स वाचायला मिलणार नाहीत आता :( #मौत्_का_सौदागर

गांधीशाहीपेक्षा महाभयंकर राणेशाही संपली! आता विधानसभेत ना. राणे आडवे झाले की काम तमाम!!

कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शिद दिसणार नाहीत आता संसदेत!!!! लालु चारा खायला मोकळा विरोधी पक्ष म्हणून काम कराव इतके पण खासदार कोंग्रेस कडे नाहीत अरविंद केजरीवाल आता कुठे धरण्यासाठी बसायच याचा विचार करत असतील.

In reply to by मृणालिनी

अमेरिकादेखील माफी मागायला येतेच आहे. चीन मोदींना भिऊन दडी मारून बसलाय.. पाकिस्तान तर लपाछुपीच खेळतोय.. नाही का?

In reply to by भृशुंडी

ते त्या निकालांच्या दिवशी पाकिस्तान हूं की चूं न करता गप्प बसले त्यासाठी होतं. शेवट ते पाकिस्तान आहे. गप्प थोडेच बसणार? आपले रंग दाखवायला सुरुवात केलीच आहे परत त्यांनी.

आता मिपावर आंधळ्या पार्टीप्रेमाने आणि विनोदाने ओतप्रोत भरलेले लेख आणि प्रतिसाद वाचण्याला मुकणार की हो आम्ही :( :) ;) ते लेखकु लोगा ड्युआयडी काढणे शक्य केल्याने मिपाचे शतशः आभार मानत असणार (मनातल्या मनात) =))

काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट.

In reply to by अर्धवटराव

काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. सहमत. पण काँग्रेसला गांधी घराणे संपले आहे आणि एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. (अर्थात डाव्या विचारवंतांच्या मदतीने). पण संघाचे उद्दीष्ट सामाजीक आणि राष्ट्रीय आहे, तर काँग्रेसचे उद्दीष्ट हे केवळ राजकीय आहे (तसे असण्यात कहीच चूक नाही, पण ते कसे वापरले जाते यावर सगळे ठरते.) . पण थोडक्यात दोन विभिन्न गोष्टी आहेत. संघाला किमान प्रत्यक्षपणे काँग्रेसचे काही पडलेले नाही असे मला वाटते. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही, अगदी कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही. इतकेच तुर्तास म्हणतो. :)

In reply to by विकास

गांधी घराणे संपले आहे
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते
कोंग्रेसने ते केले असे वाटत नाही. संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. पण हा विचार जर व्यापक देशहितासाठी धोकादायक वाटत असेल तर संघाला विरोध राहणारच.
कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही
सहमत.

In reply to by संपत

प्रियांका लावो ,पार्टी बचाव प्रियांका इज इंडिया तिचा राजकारणातील अनुभव फक्त आईचा व भावाचा प्रचार करते व तेव्हाच जनतेपुढे येते ,मात्र ती राजघराण्यातील आहे व देश तिच्या घर्राण्याला दत्तक दिला आहे. तिचा पक्ष भले गफलेबाज असेल , नाकर्ता असेल तरी तो सेक्युलर आहे तेव्हा त्यांना मते द्या तूर्तास अर्णव ने तिची मुलाखत आपल्या कायक्रमाच्या वेळी घेऊ नये अशी कपिल ने त्यास विनंती केली आहे. एक म्यान मे दो तलवार ....

In reply to by संपत

राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे. दोन्ही वाक्यांशी सहमत. माझ्या मूळ वाक्यात लिहीताना गडबड झालेली दिसते... कारण वाक्याच्या शेवटी मला जे म्हणायचे ते आहे स्पष्ट होते: "(काँग्रेसला)...एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. " संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. 'हिंदुस्तान हिन्दुओ का' असे संघाच्या विचारात मी कधी ऐकलेले नाही. किंबहूना संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात. हे म्हणजे "संघाचा गांधीद्वेष जगजाहीर आहे", असे म्हणण्यासारखे झाले... :) त्याला काही बेसीस नाही. :(

In reply to by विकास

मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो आहे. खेळताना, शाखा संपताना, बौधीकानंतर ही घोषणा दिली जात असे. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे.

In reply to by पिशी अबोली

संघात हिंदुत्ववाद हा शब्द मी ऐकला आहे. पण आजपर्यंतच्या २९-३० वर्षात हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दलची घोषणा कधीही ऐकली नाही. किंबहुना महाराष्ट्रात जिथे जिथे शाखेत गेलो आहे तिथेही ऐकली नाही. अर्थात हिंदूराष्ट्र होऊ नये अशी माझी इच्छा नाही असे नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दल नाही हो..'हिन्दुओ का हिंदुस्थान' अशी घोषणा होती ती.. दादर आणि लालबाग ह्या दोन भागातील शाखाना मी गेलो होतो.

In reply to by पिशी अबोली

आम्हाला बुवा सांगायचे घोषणा द्यायला.. दादर आणि लालबागच्या शाखांमध्ये.. राष्ट्रासेविकाना घोषणा द्यायला नाही सांगायचे वाटते?

In reply to by पिशी अबोली

तुम्ही दोघेही संघाशी संबधित आहात असे दिसतंय (पिशि मावशी अर्थात राष्ट्रीय सेविका समितीत असतील, कारण माझ्या आठवणीत संघ शाखात मुलीना प्रवेश नव्हता), मग विचारधनबद्दल मी म्हटले तेही खोटे आहे काय? जालावर त्याची प्रत सापडली असती तर दुवा दिला असता.

In reply to by संपत

मी संघात चारेक वर्षे तरी गेलेलो आहे. संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही. हिंद्र्राष्ट्र ही कल्पना १९६२ चा सुमारास ऐकल्याचे आठवते पण आता इतक्या वर्षानी समावेशकता हा हिंदू संकृतीचा एक मोठा गुण आहे हे संघवाल्याना पटले असावे. संघाने अनेक उत्तम कामे केल्याचे भूतकाळात दिसले आहे तसे समाजवादी वा कॉग्ग्रेस यानी केल्याचे दिसलेले नाही. जसे अमेरिकेला " पैसा" ही एकच संस्कृति दिसते तशी काहीही करून सत्ता ही कोंग्रेस संस्कृति आहे. आजच विनय सहस्त्रबुद्धे यानी संघाची एक मुस्लीम सेल स्थापित झाल्याची माहिती दिली आहे .

In reply to by चौकटराजा

संघाने अनेक उत्तम कामे
सहमत. विशेषतः संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या अनेक संस्था उत्तम काम करतात ह्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः अनेक आदरणीय व्यक्तींना ओळखतो. संस्थाना मदत करताना त्या संघप्रणीत असतील तर मी विनियोगाब्द्दल अधिक निशंक असतो. पण माझा विरोध मूळ संघ तत्वांना आहे. ती केवळ मला पटणारी नाहीत म्हणून नसून ती देशाला विघातक आहेत अशी माझी बाबरी मस्जिद आणि त्यानंतर झालेल्या मुंबईमधील दंगली अतिशय जवळून पहिल्याने झालेली समजूत आहे.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे. (हे मत फक्त संघाबद्दल असून भाजपमधले लोक हे पक्के राजकारणी आणि चालू असतात. संघातून आयात केलेल्यांचा थोडाफार अपवाद.)
संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही.
आयला, म्हणजे मी ज्या शाखात गेलो फक्त तिथेच असे शिकवायचे काय? म्हणजे उघड संघ शाखेत मुसलमान विरोधी काही बोलले नाही तरी हिंदू राष्ट्राची भलावण चालायचीच.शाखा संपल्यानंतर मात्र दादा किंवा भैय्या स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडायचे. मला आलेला अनुभव स्थळसापेक्ष असेलही पण गोळवळकरांचा पुस्तकांचे काय? अर्थात आता संघ बदलला असेल अशी शक्यता असली तरी माझा विश्वास बसणे कठीण आहे.

In reply to by संपत

हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण हिंदू कुणाला म्हणतात संघ वाले ते पण बघा. अवांतरः इथे अल्जिरिया मध्ये लोक इन जनरलच इन्डियन म्हणजे 'हिन्दू' असंच बोलतात. प्रश्न विचारताना 'हिन्दु?' असा अस्तो.

In reply to by प्यारे१

मी मोरोक्कोमधे वर्षभर होतो. तिथेही Indian म्हणजे हिंद असंच म्हणतात. पण त्यांच्या दृष्टीने भारतीय जर मुसलमान नसतील तर ते बौद्ध असतात. भारतीय म्हणजे बौद्ध हे समीकरण आहे इथे. आणि मी बौद्ध नाही हिंदू आहे असं सांगितल्यावर " Hindoo?? What is that? Is it a religion? असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जायचा. त्या धक्क्यातून मी अजून सावरलो नाहीये.

In reply to by मिलिंद बोडस

हिंदू मुस्लीम द्वेष फक्त भारतात आहे. १८८५ साली कॉंगेस जन्माला आली अन १९२५ साली आर एस एस या काळात ( ४० वर्षात) असा कोण नेता कारणीभूत झाला यामुळे हा द्वेष पसरला ?

In reply to by संपत

देशाला विघातक आहेत अगदी बरोब्बर संपत जी. चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे सहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही.

In reply to by चौकटराजा

२००२ साली तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजींच्या सुचनेप्रमाणे मुस्लीम राष्ट्रीय मंच ची स्थापना केली गेली. त्याचे कां इंद्रेश कुमार यांच्याकडे देण्यात आले होते. त्याच्या आधी सुदर्शनजींच्या आणि संघाच्या इतर कार्यकर्त्यांच्या मुस्लीम नेतृत्वाबरोबर देखील बैठका झाल्या होत्या असे वाचल्याचे आठवते. मात्र नंतर गोध्रा घडले पाठोपाठ दंगली उसळल्या आणि जा मंच जरा मागे फेकला गेला. पण नंतर परत त्याचे स्थान तयार होऊ लागले. अशा वेळेस संघातून जी व्यक्ती मुस्लीम समुदायास जवळची वाटू लागली होती तिच्या म्हणजे इंद्रेशकुमारांच्या सभोवताल अजमेर बाँबचे संशयाचे वातावरण तयार केले गेले. आरोपपत्र कधीच ठेवले गेले नाही. पण त्यातून डाव्या विचारवंतांना अजून भेद करण्याची संधी दिली गेली. अर्थात असे किती दिवस फसवता येणार... मग ते सगळे मागे पडले. नंतर तेच इंद्रेश कुमार मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीत मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि मुस्लीम महीला फाउंडेशन बरोबर काम करत होते. बाकी आता इतिहास आहे.

In reply to by संपत

अहो संपतकाका, मी तुम्हाला काय विचारले ते बघता का ज़रा? बौद्धिकानंतर अशी घोषणा व्हायची का? बाकी इथे आधीच कुणीतरी सांगितल्याप्रमाणे 'हिन्दू' ची व्याख्यासुद्धा बघावी आधी. आणि संघ आणि संघप्रणित संस्थांमधे काम करणारे मुस्लिम/ ख्रिश्चन कार्यकर्ते तुम्ही कधीच पाहिले नाहित का?

In reply to by प्रीत-मोहर

तुम्ही दोघीं संघाच्या कुठल्या शाखेला गेल्या होत्या याचे कुतुहुल आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संघात स्त्रियांना प्रवेश नाही.(चू भू द्या घ्या)

In reply to by संपत

माझी आई १९२८ ला जन्मली व २०१३ ला निधन पावली. ती बालपणी संघाच्या महिला शाखेत जात असे त्याला समिती असे म्हणत असत.

In reply to by चौकटराजा

माहित आहे. राष्ट्रीय सेविका समिती. तसे मी वर म्हटलेही आहे. पण माझ्या आठवणीत संघ शाखांशी त्यांचा संबंध नसायचा.

In reply to by पिशी अबोली

जरा मलाही समजावून सांगा कि संघाची हिंदूची व्याख्या. म्हणजे मला जर रामाबद्दल आदर नसेन तर संघ मला हिंदू मानेल का?

In reply to by संपत

तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय न? जाहीर बौद्धिक म्हणून एक प्रकार असतो. त्याला महिलांना प्रवेश असतो. याव्यतिरिक्त मी समितीच्या मालवण, गोवा, पुणे अशा कमीत कमी तीन ठिकाणी शाखांना गेलेली आहे. प्रश्न हिंदूच्या व्याख्येचा. मला तुमचा दुवा आत्ता पाहता येत नाहिये. पण त्यावर खरोखर श्रीगुरुजींचे विचार दिलेले असतील, तर तुम्हाला याचे उत्तर तिथेच मिळावे..

In reply to by पिशी अबोली

जाहीर बौद्धिक नाही हो.. रविवारी सकाळी खास शाखा भरायची.तिथे कुणी महनीय आदरणीय वगैरे व्यक्ती (म्हणजे आसपासची किंवा बाजूच्या शाखेतील) बौद्धिक द्यायची :). हे पुस्तक मी पूर्वी वाचले आहे. त्यावेळी राम जन्मभूमी, शहाबानो इत्यादी विषय गाजत असल्याने ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चाही ऐकल्या आहेत. मला माझे उत्तर मिळाले आहे.त्या पुस्तकात दिलेल्या व्याखेच्या अनुषंगानेच मी हा प्रश्न विचारला आहे. बाकी तुम्ही हे पुस्तक वाचले नाही याचे आश्चर्य वाटते (खरच, उपरोध नाही). हे पुस्तक जवळपास कंपल्सरी रीडिंग होते. प्रचारक स्वताहून ह्याची प्रत फुकट वाटत असत. अवांतर : विंदांची पिशी मावशीची पिलावळ अशी कविता आहे बहुतेक.म्हणून माझा तुमच्या नावाबाबतीत गोंधळ उडाला असावा.