भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर (भाग १)
भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर (भाग १).
कोणत्याही कारणाने (किंवा कारणाशिवायही) कट्टा करायचा आणि मिपावर त्याचा वृत्तान्त टाकायचा (आणि इतर मिपाकरांनी त्या धाग्यावर मनसोक्त धुडगूस घालायचा) हा तर मिपाकरांचा मिपासिद्ध हक्कच आहे. (आम्ही तर असंही ऐकलं आहे की काही जण आधी वृत्तान्त तयार करतात आणि मग कट्टा करतात. पण ते असो.) या हक्काला जागून अनेक कट्टे झाले. काही अनाहिता कट्टेही जोरदार झाले (असंही आम्ही ऐकलं आहे. पण तेही असो). गप्पा आणि खादाडी याबरोबरच कट्ट्याचा काहीतरी उद्देश असावा, या विचाराने ओरिगामी कट्टा, जिजामाता उद्यान कट्टा, पुण्याच्या वल्लींसह घारापुरी लेणी कट्टा, रामदासकाकांसह फोर्ट कट्टा असे काही ‘सहेतुक’ कौटुंबिक कट्टेही पार पडले. याच्याच एक पाऊल पुढे टाकून दोन-तीन दिवसांचा सहकुटुंब ‘बाहेरख्याली कट्टा’ (म्हणजे मुंबईच्या बाहेर सहकुटुंब सहल) करावा, असा विचार आला. आमचं आख्खं कुटुंब जंगली. त्यामुळे जंगलात जायचं नक्की केलं. सौ व श्री भटक्या खेडवाला, त्यांची एक गिर्यारोहक (ट्रेकर) मैत्रीण अनघा, सौ. मुक्तविहारी (सौ मुवि), निहार (ज्यु. मुवि) आणि आम्ही तिघं (सुधांशुनूलकर, मोक्षदा आणि स्वानंदी) अशा आठ निसर्गप्रेमींचा कंपू जमला. ११-१२-१३ एप्रिलला भीमाशंकरला जायचा बेत ठरला.
११ तारखेला सकाळी निघालो. दोन आठवड्यांपूर्वीच स्वानंदी आणि निहार या दोघांची दहावीची परीक्षा संपली होती.
त्यामुळे ते दोघं आणि आम्ही ‘दहावीग्रस्त’ पालकही फुल्टू फ्रीकाउट मूडमध्ये होतो. सौ व श्री भटक्या खेडवालांच्या गावचा उत्सव आटोपून ते दोघं आदल्या दिवशीच परतले होते आणि लगेच भीमाशंकरला यायला तयार झाले होते. त्यांनी गावाहून आणलेल्या घरच्या ओल्या काजूंनी खादाडीला सुरुवात झाली. त्यांचा (काजूंचा) फोटो काढण्यापूर्वीच डबाभर काजू संपले. मग न्याहारीसाठी आणलेल्या सामग्रीचा यथासांग फन्ना उडवण्यात आला. तोपर्यंत गाडी माळशेज घाटात गाडी शिरली होती. माळशेज घाटात रांगड्या सह्याद्रीचं दर्शन झाल्यावर 'केवळ माझा सह्यकडा' या ओळी आपोआप ओठावर आल्या.
माझ्या वनअधिकारी मित्राला भेटण्यासाठी जुन्नरला वाट वाकडी केली. त्याच्या घरी जाताना रस्त्यापासून जरा दूर अंतरावर भरगच्च फुललेला नीलमोहर दिसला.जिजामाता उद्यानात याच्या फुलांचा फक्त एक छोटासा झुपका दिसला होता. मित्राच्या घरी पोहोचलो आणि अहो आश्चर्यम्! तो नीलमोहर त्याच्याच अंगणातला होता. मग सर्व बाजूंनी त्याचे मनसोक्त फोटो काढता आले.
आता जेवायची वेळ झाली होती. मित्रानेच सुचवल्यानुसार नारायणगावजवळ एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि खरं सांगतो, तिथल्या मराठमोळ्या जेवणाने समस्त मिपाकरांच्या आठवणीने आम्हा सर्वांना ठसका लागला, इतकं सुंदर जेवण! मुंबईला परत जाताना याच ठिकाणी जेवायचं असं सर्वानुमते ठरवून पुढे निघालो. (मिपा प्रथेप्रमाणे जेवणाचं वर्णन आणि फोटो टाकायचे असतात. ते शेवटी भाग २मध्ये टाकले आहेत.)
प्रवासाला निघण्यापूर्वी नारायणगावच्या रेडिओ दुर्बिणीसंबंधी (जीएमआरटीसंबंधी) ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी २००८मध्ये मिपावर लिहिलेला लेख वाचला होता. त्या प्रकल्पालाही भेट द्यावी, यासाठी (आदल्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी) परवानगी मिळवली होती. त्यामुळे मग गाडी त्या जीएमआरटी प्रकल्पाकडे वळवली आणि ही एक छान संस्मरणीय भेट ठरली. काही वर्षांपूर्वी मिपाकर अदिती इथे संशोधन करत होत्या, त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटला. मिपाकर कुठेकुठे पोहोचले आहेत...
स्वयंपाक तयार झाल्यावर सर्वांनी जेवणावर आडवा हात मारला आणि मग मस्तपैकी ताणून दिली.
भीमाशंकर... बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. पुणे-नाशिक रस्त्यावर, समुद्रसपाटीपासून अंदाजे ९०० मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीतलं एक निसर्गरम्य स्थळ. तेराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं असून नाना फडणवीसांनी अठराव्या शतकात याचा जीर्णोद्धार केला, अशी माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात मराठ्यांच्या पराक्रमाचा एक ऐतिहासिक दस्तावेज पाहायला मिळतो. चिमाजीअप्पांनी वसई मोहीम फत्ते केली, तेव्हा तिथल्या पाच चर्चवरच्या लोखंडी ओतीव घंटा काढून आणल्या. त्यातली एक घंटा इथे त्या पराक्रमाची आठवण जागवत आहे. या घंटेवर क्रॉस, चर्च इमारत आणि १७२७ (बनवल्याचं वर्ष) स्पष्ट दिसत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने भीमाशंकरचं महत्त्व आणि वनभटकंती भाग २मध्ये
क्रमशः
माझ्या वनअधिकारी मित्राला भेटण्यासाठी जुन्नरला वाट वाकडी केली. त्याच्या घरी जाताना रस्त्यापासून जरा दूर अंतरावर भरगच्च फुललेला नीलमोहर दिसला.जिजामाता उद्यानात याच्या फुलांचा फक्त एक छोटासा झुपका दिसला होता. मित्राच्या घरी पोहोचलो आणि अहो आश्चर्यम्! तो नीलमोहर त्याच्याच अंगणातला होता. मग सर्व बाजूंनी त्याचे मनसोक्त फोटो काढता आले.
जीएमआरटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ
भटक्या खेडवाला, सुधांशुनूलकर, निहार (ज्यु. मुवि), अनघा, मोक्षदा, स्वानंदी, सौ मुवि, सौ भ.खे.
जीएमआरटीच्या तीस टेलिस्कोपपैकी एक
मग दीडेक तासाच्या प्रवासानंतर भीमाशंकरला पोहोचलो. पूर्वी इथे एमटीडीसीचं रिसॉर्ट होतं, ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने वनविभागाने चालवायला घेतलं आहे. तिथे राहायचं आरक्षण केलं होतं.
भीमाशंकर... बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. पुणे-नाशिक रस्त्यावर, समुद्रसपाटीपासून अंदाजे ९०० मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीतलं एक निसर्गरम्य स्थळ. तेराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं असून नाना फडणवीसांनी अठराव्या शतकात याचा जीर्णोद्धार केला, अशी माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात मराठ्यांच्या पराक्रमाचा एक ऐतिहासिक दस्तावेज पाहायला मिळतो. चिमाजीअप्पांनी वसई मोहीम फत्ते केली, तेव्हा तिथल्या पाच चर्चवरच्या लोखंडी ओतीव घंटा काढून आणल्या. त्यातली एक घंटा इथे त्या पराक्रमाची आठवण जागवत आहे. या घंटेवर क्रॉस, चर्च इमारत आणि १७२७ (बनवल्याचं वर्ष) स्पष्ट दिसत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने भीमाशंकरचं महत्त्व आणि वनभटकंती भाग २मध्ये
क्रमशः
वाचने
13176
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
अंsssssssssssss असं काय ते?
In reply to अंsssssssssssss असं काय ते? by अत्रुप्त आत्मा
वरणभातच
In reply to वरणभातच by सुधांशुनूलकर
@मग प्राणिहत्या कशी करणार?>>>
In reply to @मग प्राणिहत्या कशी करणार?>>> by अत्रुप्त आत्मा
पहिल्या वरणभातानंतर...
गुप्त भिमाशंकर म्हणुन एक प्रकरण आहे तिथे.
महा०टुरिझमचे हॉटेल पुन्हा
In reply to महा०टुरिझमचे हॉटेल पुन्हा by कंजूस
महा०टुरिझमच्या निवासव्यवस्थेबद्दल
In reply to महा०टुरिझमच्या निवासव्यवस्थेबद्दल by सुधांशुनूलकर
धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल
नीलमोहोर!!
सुरेख सुरुवात.
In reply to सुरेख सुरुवात. by प्रचेतस
+१
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+२
छान.
फार पूर्वी येथेच भिमाशंकरवर
वा वृत्तांत आवडला
In reply to वा वृत्तांत आवडला by दिपक.कुवेत
येस
In reply to येस by मुक्त विहारि
हा हा हा
खुप चा छान पुभाप्र.
ह्म्म्म !! पुढल्या भागातली
पु.भा.प्र.
हाय रे कर्मा.. मला इथेही फोटो
मस्तच!
वाचताना सहलीत सहभागी झाले आहे
धन्यवाद
मस्त खुसखुशीत लिखाण!
भटकंतीत
संस्मरणीय सहल. या निमित्ताने
भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर
In reply to भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर by भ ट क्या खे ड वा ला
भटक्या खेडवाला...
भटक्या खेडवाला...
नीलमोहोर मस्तच. आणि डोंगर