आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली:
"....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत नेमके काय केले, याबाबतच इतिहास पुन्हा समोर आला पाहिजे', "
तर प्रश्न असा आहे की ही वरील वाक्ये कोणी म्हणली असावीत? खरं म्हणजे "आता मोदी सरकार(च) येणार" अशा (भाबड्या अथवा वास्तव ते १६ तारखेस कळेल पण) आशेवर आनंदाचे भरते आलेल्या "संघिष्टानेच" म्हणले असेल असे वाटू शकते की नाही? अर्थात हे संघिष्ट नक्की कोण आण कधी म्हणतात हे फक्त त्यांच्यावर डूख धरून असणार्या डाव्या / समाजवादी जे काही पण वास्तवात तथाकथीत निधर्मीच जाणोत. त्यांना विचारले की नक्की कोण तर म्हणणार की शाखेत जाणार्या शेजार्याकडून ऐकले किंवा तत्सम.. पण जर असल्या गल्लीतल्या संघिष्टाने म्हणले असते तर महाराष्ट्र टाईम्सने त्याला प्रसिद्धी दिली असती का? अर्थातच नाही.
मग म.टा.ने त्याला बातमीचे रूप देण्याचे कारण आहे, हे वक्तव्य अरुंधती रॉय यांचे आहे! काय गंमत आहे! भाषणाचे स्थळ काय होते? इंडीया पिस सेंटर. विषय काय होता? : 'निवडणुकीनंतर देशातील शांततेची स्थिती' म्हणजे या बाईंना मोदींना आणि संघाला झोडपण्याची मोठ्ठी संधी होती! पण ती गोष्ट आहे ना ज्यात माकडावर विश्वास ठेवून तलवार दिल्यास स्वतःचेच नाक कापले गेले... तसेच काहीसे या प्रसंगात घडले आहे. कदाचीत म्हणूनच ही बातमी, विश्वास ठेवा अथवा नका ठेवूत पण फक्त महाराष्ट्र टाईम्समधेच आली आहे! बाकी कुठेच नाही! याला म्हणतात सेक्यूलॅरीझमने सेक्यूलॅरीस्टचा सांभाळ करणे! ;)
हेच वाक्य जर भाजपा-विहिंप-संघ आदी मधील कुठल्याही दुसर्या-तिसर्या फळीतल्या कार्यकर्त्याने जाहीररीत्या केले असते तर बरखापासून सर्वांनी त्या व्यक्तीचा बुरखा फाडला असता. पण ह्या थोर विचारवंत महीलेच्या बाबतीत मात्र कोणी बोलायला तयार नाही!
या बाई केवळ तेव्हढेच बोलून थांबल्या नाहीत, तर पुढे, "'लोकसभा निवडणुकीनंतर देशात कुठलेही सरकार आले तरी त्यांचे लक्ष्य केवळ माओवाद व इस्लामिकवाद यांना लक्ष्य करणेच असेल." असे देखील म्हणाल्या! अच्छा म्हणजे इस्लामवाद म्हणले तर चालते पण कोणी राष्ट्राला प्रामाणिक रहा म्हणणारा हिंदूत्ववाद म्हणले तर मात्र फॅनॅटीक! पण त्या विचारवंत आहेत, त्यामुळे त्यांचेच खरे!
सर्वत्र विमानाने फिरणार्या, सेलफोन सकट सगळी अधुनिक तंत्रायुधे वापरणार्या अरुंधतीबाईचा भांडवलावादाला विरोध आहे. अर्थात त्याचे कारण आदीवासींनी आदीवासीच रहावे असे त्यांना वाटत असावे... आणि म्हणून गांधीजींंनी घेतलेल्या बिर्लांच्या मदतीस विरोध आहे. पण स्वतः मात्र Booker-McConnell Prize अथवा बुकर पारीतोषिक हे एका भांडवलवादी "largest food wholesale operator" कडून चालू झालेले बक्षिस घेताना मात्र गैर वाटत नाही...
ते जाउंदेत त्या भारतविरोधी आणि भोंदू आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि मोदी आल्यास त्यांची मैत्री असलेल्या हिंसाचारी माओवादी नक्षलवाद्यांचे काय होणार याची त्यांना काळजी वाटत असणार.
पण मुद्दा असा आहे, की इतर डाव्या आणि समाजवाद्यांना अरूंधतीबाईंच्या वक्तव्याबद्दल काय म्हणायचे आहे? म्हणजे बाईंचे "गांधीजींना महात्मा करण्याबाबतचा आक्षेप बरोबर वाटतो" का असेच जाहीरपणे म्हणणार्या छगन भुजबळांप्रमाणेच "बाई चूक आहेत" असे म्हणणे योग्य वाटते? का आळीमिळी गुपचिळी?
वाचने
14325
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
येन केन प्रकारे स्वतःला
+111111
कोण समाजवादी? कोण कम्युनिस्ट?
त्यांना मिपावरील म्हणायचे
In reply to कोण समाजवादी? कोण कम्युनिस्ट? by अर्धवटराव
मला वाटते
In reply to कोण समाजवादी? कोण कम्युनिस्ट? by अर्धवटराव
मिपावर
In reply to मला वाटते by विकास
मिपा आपलेच आहे
In reply to मिपावर by आजानुकर्ण
टिळकनीती
In reply to मिपा आपलेच आहे by विकास
??
हाद तिचायमायला, कोनाचा कोन
In reply to ?? by मिसळलेला काव्यप्रेमी
धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी या
मटा
माझ्या अंदाजाने आपण दिलेल्या
In reply to मटा by माईसाहेब कुरसूंदीकर
जरा जास्तच
चालायचंच ....
In reply to जरा जास्तच by राही
+/-
In reply to जरा जास्तच by राही
सहमत
In reply to जरा जास्तच by राही
मात्र मुस्लिमांचा अनुनय,
In reply to सहमत by आजानुकर्ण
अहो
In reply to मात्र मुस्लिमांचा अनुनय, by कॅप्टन जॅक स्पॅरो
आंबेडकर आणि 'कॅप्टन जॅक
In reply to अहो by आजानुकर्ण
चारुदत्त आफळे आणि आंबेडकर
In reply to आंबेडकर आणि 'कॅप्टन जॅक by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी आफळे आणि आंबेडकरांची
In reply to चारुदत्त आफळे आणि आंबेडकर by बॅटमॅन
पुरावे
In reply to आंबेडकर आणि 'कॅप्टन जॅक by कॅप्टन जॅक स्पॅरो
?
In reply to सहमत by आजानुकर्ण
+२५००००
In reply to ? by विकास
+५५,००,००,०००
In reply to ? by विकास
येथे आहे
In reply to ? by विकास
गांधींना मारणाऱ्यांनीच
In reply to सहमत by आजानुकर्ण
अच्छा?
In reply to सहमत by आजानुकर्ण
Reading Comprehension
In reply to अच्छा? by बॅटमॅन
एक साम्य
कठोर?
In reply to एक साम्य by हुप्प्या
दोन्ही
मुळात गांधी ह्यांची
समजा ते 'महात्मा' नव्हते, स्त्रीयांच्या प्रगतीत अडथळा कसे?
अजून स्रोतात बातमी गवसली !
इंग्लिश वृत्तपत्रांमध्येही ही बातमी आली आहे.
In reply to अजून स्रोतात बातमी गवसली ! by माहितगार
मराठी खास करून मिपाकर परिक्षण आल्यास वाचण्यास जरूर आवडेल
In reply to इंग्लिश वृत्तपत्रांमध्येही ही बातमी आली आहे. by आजानुकर्ण
साध्य आणि साधन
In reply to मराठी खास करून मिपाकर परिक्षण आल्यास वाचण्यास जरूर आवडेल by माहितगार
अच्छा!
In reply to साध्य आणि साधन by आजानुकर्ण
फारसे कौतुक नाही
In reply to अच्छा! by विकास
इरादे नेक नाहीत...
In reply to मराठी खास करून मिपाकर परिक्षण आल्यास वाचण्यास जरूर आवडेल by माहितगार
पण
In reply to अजून स्रोतात बातमी गवसली ! by माहितगार
'देशातील पहिले भांडवलदार
अस्पृश्यता आणि जातीयवाद
अरुंधती रॉयसारख्या लोकांवर
दुरुस्ती
आजपर्यंत
मार्मिक प्रतिसाद
In reply to आजपर्यंत by अवतार
समाजवादी
कंटाळा ...
फाळणी झाली ना भो कवाच!
In reply to कंटाळा ... by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to कंटाळा ... by प्रसाद गोडबोले