मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी .
टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही .
तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक..
तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू .
मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची ..
तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं .
तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले ..
तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले ..
(वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे )
खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) .
पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो .
(एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय)
मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं .
सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे .
१. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
(चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे )
मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते .
२. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात ..
३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात .
यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो.
४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो .
५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत)
६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात .
७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात ..
८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .
९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ).
असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात.
(हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी)
१०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात.
(पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .)
११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत .
( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .)
१२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो.
असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )
टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .
| लेखनविषय: |
|---|
वाचने
33393
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी प य ला "मुंबैकर"
हा हा हा
हाहा!
हम्म
छान लिहिलय. आपल्या दृष्तीने
शब्दाशब्दाशी सहमत. आताशा
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
मस्त लेख...
पुणेकर
शब्दाशब्दाशी सहमत!
In reply to पुणेकर by आदिजोशी
+ ७८६
In reply to पुणेकर by आदिजोशी
तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं. आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात.>>>>>>> +७८६ माहीमच्या पुढे मुंबई संपली. कुर्ल्यालाही उपनगर बोलले जाते. ते नक्कीच मुंबई उपनगरात राहायला असतील. कारण जे मुंबईत राहतात ते आरामात गर्दीच्या विरुद्ध दिशेने वार्याची खिडकी पकडून प्रवास करतात. जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही. *music2*>>जन्मापासून करतोय, आणि
In reply to + ७८६ by तुमचा अभिषेक
करेक्शन
In reply to >>जन्मापासून करतोय, आणि by सूड
बदलापूर हे मुंबैचं उपनगर आहे
In reply to करेक्शन by आदिजोशी
तुम्ही इथल्या बर्याच
In reply to करेक्शन by आदिजोशी
अॅड्या...
In reply to पुणेकर by आदिजोशी
मान्य
In reply to पुणेकर by आदिजोशी
कल्याण मुंबैत येतच नाही.
In reply to मान्य by चैतन्य ईन्या
कल्याण
In reply to कल्याण मुंबैत येतच नाही. by आदूबाळ
मुवि धावा!
In reply to कल्याण by राजेंद्र मेहेंदळे
आमची डोंबोली अशी पण बनवली असेल...
In reply to मुवि धावा! by पैसा
केवळ भराव हाच निकष असेल तर,
In reply to आमची डोंबोली अशी पण बनवली असेल... by मुक्त विहारि
केवळ भराव हाच निकष असेल तर, आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत.का? म्हणजे मुंबई सात बेटांची बनलेली आहे मलाही इतपतच इतिहास भूगोल माहीत आहे, ती सात बेटे काय फोर्ट परीसरातच होती का सारी? गूगाळायला हवे, मात्र आमच्या माझगावला डोंगर आहे, तसेच एकंदरीतच हिल एरीया आहे तर तो नक्कीच भर टाकून बनवलेला भाग नाही.१८व्या शतका पर्यंत...
In reply to केवळ भराव हाच निकष असेल तर, by तुमचा अभिषेक
मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली
In reply to १८व्या शतका पर्यंत... by मुक्त विहारि
फोर्ट परीसर हेड ऑफ मुंबई - तर - माझगाव हार्ट ऑफ मुंबई !!मध्यवर्ती
In reply to मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली by तुमचा अभिषेक
=))
In reply to मध्यवर्ती by सुनील
लय मज्या आला धागा आन प्रतिसाद
In reply to आमची डोंबोली अशी पण बनवली असेल... by मुक्त विहारि
मस्त निरिक्षण
८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त
मुंबई देशात अव्वल राहण्यायोग्य शहर.
टिनपाट सर्व्हे असेल तो
In reply to मुंबई देशात अव्वल राहण्यायोग्य शहर. by तुमचा अभिषेक
मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ
मुंबईकरांना त्यांच्या
मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )एकत हे चुकीचे विधान आहे किंवा मी त्याला अपवाद आहे. यातले नक्की काय ते ठरवत बसायला मात्र मला वेळ नाही ;)मुंबईमध्ये रिक्षा ????????
. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात ..मुंबईमध्ये रिक्षा ???????? मुंबईमध्ये रिक्षा ???????? मुंबईमध्ये रिक्षा ???????? आहो मुंबईत टॅक्सी चालतेओ भाऊ, ते तुमच्या अंधेर्नगरीत
In reply to मुंबईमध्ये रिक्षा ???????? by तुमचा अभिषेक
व वाचवलेल्या पैशातून चौपाटी
व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो.हे मात्र खरे, भेलपुरी खावी ती समुद्राच्या खार्या वार्यांच्या सोबतीनेच .. यासाठी +७८६ :)मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT
मुंबईचे क्लायमेट !
+११११११११११
In reply to मुंबईचे क्लायमेट ! by तुमचा अभिषेक
१^१११११११११
In reply to +११११११११११ by सानिकास्वप्निल
आवड्या
अभिषेक
धन्यवाद, पण ..
In reply to अभिषेक by राही
बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं.मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच. तसेच मी पुण्याविरुद्ध किंवा पुणेकरांविरुद्ध किल्ला लढवत नसून जन्मापासून आजपर्यंत मुंबईकर म्हणून मुंबईच्या प्रेमापोटी लिहितोय. असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ?पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहेअसो, मी विचारात पडलोय की
In reply to धन्यवाद, पण .. by तुमचा अभिषेक
>>>लेखकूंचा अनुल्लेख. पुणेरी
In reply to असो, मी विचारात पडलोय की by यशोधरा
खरे तर अगदीच बालिश लेख. असले
सहमत. अन्यथा पुणेरी लोक झेंडे
In reply to खरे तर अगदीच बालिश लेख. असले by प्रसाद१९७१
मस्त
छान लिवलय.
पुणे म्हणजे माधुरी दीक्षित ?
मुंबई हे एक जागतिक दर्जाचे
>>आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि
In reply to मुंबई हे एक जागतिक दर्जाचे by एम.जी.
+७८६
In reply to मुंबई हे एक जागतिक दर्जाचे by एम.जी.
आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहेएक्झॅक्टली ! म्हणूनच मी कुठेही माझ्या पोस्टमध्ये अमुकतमुक मुंबईमध्ये एखाद्या शहरापेक्षा चांगले आहे अशी तुलना करत नाहीये. अन्यथा एखाद्या शहरात मुंबईपेक्षा मिसळ छान मिळत असेल म्हणून तेथील रहिवाशी त्यावरून स्वताला मुंबईपेक्षा भारी समजायला लागले तर त्यांना उत्तर देण्यात काय शहाणपणा आहे सांगा. त.टी. - वरचे फक्त उदाहरण आहे, अन्यथा लहानपणी नाक्यावरच्या सदूशेटच्या द्कानात जी खाल्ली ती मिसळ जगात आणखी कुठे मिळत नसावी. फक्त एकच पंगा होता, सोबतीला स्लाईस ब्रेड द्यायचा, म्हणोन पाव आम्ही बेकरीतून मागवायचो, बाकी आमच्या माझगाव-भायखळा परिसरासारख्या बेकर्याही जगाच्या पाठीवर कुठे नसाव्यात पण उगाच विषय भरकटवायला नको :)मुंबई-पुणे हे भांडण फक्त
तुम्ही जाज्ज्वल्य हुंबैकर काय
In reply to मुंबई-पुणे हे भांडण फक्त by चिन्मय खंडागळे
मुंबईला कुणी एक भिकार म्हणलं
खरं आहे...
In reply to मुंबईला कुणी एक भिकार म्हणलं by पिलीयन रायडर
खर आहे
In reply to मुंबईला कुणी एक भिकार म्हणलं by पिलीयन रायडर
खरंय खरय,
In reply to खर आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत.ट्रामचे मला माहीत नाही, पण त्या दुमजली बसेसच्या वरच्या मजल्यावरच्या, पहिल्या सीटवर बसून समोरच्या सताड उघड्या खिडकीतून र्रप्पारप्प येणारा वारा अंगावर झेलायचा.. स्साली एस्सेलवर्ल्डची राईड झक मारेल .. शाळेचा गणवेष, संध्याकाळी आऊट शर्ट, कॉलर वर, वाढलेले केस, त्या सुसाट वार्यांवर उडायला लागले की स्टाईलमध्ये त्यांतून हात फिरवायचा.. बरेचदा खिडकीच्या बाहेर डोके काढायचा वा चक्क त्या खिडकीवर बसायचा मोह व्हायचा मग कंडक्टर मामांच्या शिव्या खायच्या.. हळवे तर ही पोस्ट टाईपताना पण व्हायला होतेय.. ज्यांनी हि मजा घेतली त्यांनाच मुंबई कळली ..एकदम मान्य. कुलाब्याला असताना
In reply to खरंय खरय, by तुमचा अभिषेक
अहाहा, मरीनड्राईव्ह मार्गे
In reply to एकदम मान्य. कुलाब्याला असताना by सुबोध खरे
डबल डेकर
In reply to अहाहा, मरीनड्राईव्ह मार्गे by तुमचा अभिषेक
८४ बस
In reply to डबल डेकर by सुनील
अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो....
In reply to ८४ बस by निनाद मुक्काम …
मुवि, अहो मध्ये तुम्ही गल्फला
In reply to अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो.... by मुक्त विहारि
>>१. नुतन वर्ष मिरवणूक ,
In reply to अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो.... by मुक्त विहारि
महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त
In reply to अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो.... by मुक्त विहारि
>>महाराष्ट्रातून सगळ्यात
In reply to महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त by निनाद मुक्काम …
डोंबिवली ही विद्येची नगरी आहे
In reply to >>महाराष्ट्रातून सगळ्यात by सूड
निनाद, उद्या जर्मनीला युरोपचे
In reply to डोंबिवली ही विद्येची नगरी आहे by निनाद मुक्काम …