गट्टे की सब्जी..
( साहित्य २ व्यक्तीना पुरेसे आहे. लागणारा वेळ- साधारण ४० मिनिटे)
१. गट्टे तयार करणे:
साहित्य : एक वाटी बेसन, १/२ चमचा मेथी, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा जिरे, २ चमचे टोमॅटो सॉस, लसूण पेस्ट १/२ चमचा, आल्याची पेस्ट १/४ चमचा, १/२ चमचा हळद, पाणी
वरील सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात अगदी थोडेसे पाणी घालून घट्ट मळून एक गोळा करावा. साधारण चकलीच्या पिठापेक्षाही थोडे घट्ट मळावे. नन्तर या गोळ्यापासून १/२ इन्च व्यासाचे साधारण ५ इन्च लाम्बीचे लाम्बट आकार हातावर मळून तयार करावेत. एवढ्या साहित्याचे साधारण ४-५ आकार तयार होतील.
पाणी उकळ्ण्यास ठेवावे. पाणी उकळू लागले की त्यात हे आकार एक एक करून सोडावेत. पाणी थन्ड असतानाच त्यात पिठाचे हे गोळे सोडू नयेत, अन्यथा ते तळाला चिकटतील. गोळ्याच्या वर साधारण दोन बोटे पाणी राहील याची दक्षता घ्यावी. ८ ते १० मिनिटात गोळे शिजतात. शिजले की ते पाण्यावर तरन्गायला लागतात आणि खडबडीत होतात.
शिजलेले लाम्बुळके आकार प्लेट मध्ये काढून घ्यावेत. त्यान्चे चाकूने लहान दन्डाकार तुकडे करावेत.. गट्टे तयार झाले.
२. सब्जी तयार करणे:
साहित्य : १ टोमॅटो आणि १/२ काकडी यान्च्या बारीक फोडी, २-४ चमचे तेल, १/२ वाटी कान्दा कापलेला, लसूण पेस्ट १/२ चमचा, आले पेस्ट गरजेनुसार, मीठ १/२ चमचा, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा मोहरी , १/२ चमचा जिरे,१/२ चमचा हळद, २-३ वाट्या पाणी
तेल तापवून मोहरी, जिर्याची फोडणी करावी. त्यात कान्दा, लसूण, आले घालून परतावे. हळद घालावी. खमन्ग परतले गेले की टोमॅटो आणि काकडीच्या फोडी टाकव्यात. त्यात मीठ आणि तिखट टाकावे. शिजलेले टोमॅटो उलथण्याने क्रश करत रहावे. गरजेनुसार २ वाटी पाणी टाकावे. काकडीच्या फोडी शिजत आल्या की त्यात गट्टे ही टाकावेत. एक वाफ येईल इतपत शिजवावे. केशरी रन्गाच्या प्यूरी मध्ये गट्टे शिजत असताना सुन्दर दिसतात... अगदी तन हुआ, मन हुआ केसरिया आठवते. केसरिया बालमाची आठवण करून देणारा हा राजस्थानी पदार्थ- गट्टे की सब्जी..
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
खरे तर हा पदार्थ दह्यामध्ये तयार करतात.. गट्टे तयार करतात. सब्जीची फोडणी झाली की त्यात पातळ दही , गट्टे घालतात व शिजवतात. याच पद्धतीने गट्टे की कढी करता येते. दही उपलब्ध नसल्याने वरील प्रकारे केली आणि छान झाली.. ( १ वाटी पाण्यात मिल्क पावडर एक चमचा आणि बेसन पीठ १ चमचा यान्च्या मिश्रणात गट्टे सोडण्याचा प्रकार करून बघितला, पण तो फसला.. ) आयुर्वेदानुसार बेसन पीठ अतिशय वातूळ आहे, त्यामुळे दही, दूध, ताक, लोणी, तूप यापैकी काही तरी बरोबर असणे अतिशय आवश्यक.. गट्टे थन्ड दह्यात क्रश करून कोशिम्बिर करता येईल.. पुलावात गट्टे घालून गट्टे पुलावही करता येतो.


वाचने
14335
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
फटु
फटू काढले
वा वाचून
हे घ्या
१ वाटी
छान आहे !!!
वा!!!
हा
मला गट्टे
रंग काय
आहाहा !!
सचित्र
उत्क्रुस्ट....
.
In reply to उत्क्रुस्ट.... by मसक्कली
केला पाहीजे
शेंगोळ्या
नमस्कार का
ह्या वीकांताला नक्की करून बघणार....