हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते
हलकेच शिरशिरी मग ..
प्रत्येक वाट येथे काट्यावरुन जाते
प्रत्येक फूल येथे प्रेतावरुन जाते !
प्रेमात नेहमी या तू जिँकतोस मृत्यू
माणूस जात साली जातीवरुन जाते
सांभाळ या सुखांना तू जोजवीत गीते
माझेच दुःख माझ्या कंठावरुन जाते !
येशील का कधी तू, ते सांग आज राणी
सारी तुझी प्रतीक्षा जन्मावरुन जाते
जुल्फे तुझी मुलायम करतात गूज गाली
हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते
संधी अशीच येथे घाईत फार येते
घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते
आताच त्या सुखाने माझा लिलाव केला
सलगी अशी सुखाची अंगावरुन जाते
मी कामगार आहे, मजला सुटी कशाला
माझी सुटी तशीही घामावरुन जाते
भलती मुजोर आहे म्हणतात लोकशाही
खुर्चीवरुन येते, खुर्चीवरुन जाते
निश्चित टेबलाच्या खालून काम होते
सारीच काळजी बघ नोटांवरुन जाते
स्वस्तात फार आता विकलास तू महात्म्या
साली इमानदारी पोटावरुन जाते
करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची
पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते !
डॉ.सुनील अहिरराव
हा हा !
मस्त आहे!
सॉरी...
मी तर हलकीच शिरशिरी ओठांवरुन
करतात ते समीक्षा आता
@स्नेहांकिता, पैसा, जेनी
विस्कळीत गझलेत एक शेर आवडला
बर्याच दिवसांनी चांगलं काव्य आलं बोर्डावर.
+++१११ कडक!!!
+१
धन्यवाद स्वॅप्स,
संजय क्षीरसागर, अतृप्त आत्मा,