हाणा! मारा!! ठेचा!!!
http://www.misalpav.com/node/27742 अन http://www.misalpav.com/node/27744 वाचल्यावर आपले घरात बनणारे साधे सुधे प्रकारच जीभेला कसे गुलाम बनवतात याची सहज कल्पना यावी.
कितीही देशी विदेशी निरनिराळ्या पदार्थांची चव चाखली तरी अनिवार ईच्छा म्हणता येइल ती, अश्या अनवट पदार्थांचीच होते. अन एकदा का जीभेला त्या चवीची आठवण झाली की मग आपलं काही म्हणता काही चालत नाही त्यापुढे! नाही कां?
तशी ही जीभ एक महाभयानक प्रकरण आहे. हिच्यापुढे मोठमोठे वीर महावीर नामोहरम होत असतीलं. अगदी तलवारीचा घाव बरा होइल पण या जीभेचा तडाखा नको! अश्या वेदना ही जीभ देउ शकते. तसच शहाणपण सुद्धा शिकवु शकते. आता हल्ली नेटमुळे जीभेची जागा कळ्फलकाने घेतलीय म्हणायला हरकत नाही पण ते सुद्धा या जीभेचच एक एक्सेटेंशन म्हणु. कस्स्ला घावं घालतात माणसं या कळफलकानं की एखादी सेंसीटीव्ह व्यक्ती पलिकडे अक्षरशःघायाळ होउ शकते! म्हणजे जीभेला हाड नाही म्हणता म्हणता कळफलकाला हाड नाही म्हणायची पाळी येउ शकते.
ते ही असोच. तसा या जीभेचा पराक्रम अगदी रामायण, महाभारतापासुन आपल्याला माहीती आहेच. नवल या गोष्टीच वाटत की इतक्या वर्षांनीपण तिचा महिमा काय कमी झाला नाही. एक याच तर बाईसाहेब आहेत ज्या कधी सांभाळुन घेतात, कधी तडाखे देतात, प्रेम.....हे मात्र डोळ्यातुन सांडत्....स्पर्शातुन कळत...अन जीभेने पोसतं हो! तो एक वेगळाच विषय होइल. ..अन अगदी नामोहरम सुद्धा करतात. पुलंच्या हरी तात्यांसारख शाहिस्तेखानाला ,"हवी तर दुसर्या हाताची बोट तोड पण ही शिवी मात्र परत घे " अस म्हणायला लावायची शक्ती फक्त आणि फक्त या जीभेतच असु शकते नाही का?
त झाल काय हिरव्या मिरचीचा ठेचा हे शिर्षक वाचल्यावर माझी जीभ खवळली. अहो ठेचा म्हणता मग तो हिरव्या मिरचीचा कसा? त्याला खरडा म्हणतात. अस काही बाही बोलता बोलता माझी जीभ,"ठेचाऽऽ ठेचाऽऽ " करु लागली. शेवटी सगळ सोडुन बाजार गाठला अन झकास पैकी ओल्या लाल मिरच्या शोधुन काढल्या. आजकाल थाय फुडने आपली ओल्या लाल मिरच्यांची मात्र झकास सोय झाली हो!
काय विचार करुन हे नाव असाव या प्रकाराला? ठेचुन करतात म्हणुन? तशी आपली मराठी जरा रांगडीच नाही म्हंटल तरी. आमचं काय सुद्धा मलमलीत रेशमी नसतं. सगळं असंच. चवीला भन्नाट प्रकार पण बघा नावापायी मार खातात!!!
आता असो. मी पहिला माझीच जीभ...सॉरी...कळफलक आवरते अन झटक्यात पाककृती देउन मोकळी होते.
तर बिगी बिगी उठा अन बाजारात जावा. पाव किलो ओल्या लालं मिरच्या अन एक लिंबु एव्हढच आणा. बाकी सगळा माल मसाला घरचाच.
तर घ्या.
ओल्या लाल मिरच्या -एक दहा बारा नग.
एक लिंबु
हळद -अर्धा चमचा
हिंग- पाव चमचा
मिठ -चमचाभर
मेथी दाणे -पाव चमचा
फोडणी
तेल- चांगल अर्धा वाटी. (किंवा ठेचा ज्या बरणीत भराल त्यात ठेच्याच्या वर आल पाहिजे थोडस)
मोहरी-पाव चमचा
हिंग -चुटकीभर
हळद- चुटकीभर
मेथीदाणे- दहाबारा (हवे असतील तर जास्त घाला)
कृती
सगळ्यात आधी एका छोट्या फोडणीच्या भांड्यात अर्धा वाटी तेल चांगल धुर निघेतोवर गरम करुन घ्या. गॅस अथवा शेगडी बंद करुन तेल जरा निवु द्या. आता त्यात मोहरी घाला. जरा निवु दिलेल्या तेलात मोहरी जळत नाही पण तडतडते मात्र. तर त्या अंदाजाने तेल निवु द्या. मग त्यात हिंग, हळद अन मेथी दाणे घालुन ही फोडणी थंड व्हायला बाजुला ठेवुन दया.
मिरच्यांचे देठ काढुन त्यातल्या बिया सुरीने अथवा कात्रीने काढुन घ्या. हात लागु देउ नका चुकुनही. दिवसभर जरा चेहर्याला लागला की जळायला लागते चेहर्याची त्वचा!! नाका बिकाला तर हात लागला ना? ती "नाकाला मिरच्या झोंबल्या" ही म्हण साक्षात साकार होते भाऊ! सो बी केअरफुल.
आता या मिरच्या अन वरचा मेथी दाणे सोडुन सगळा मसाला एकत्र करुन जमल तर चर्नरवर नाही तर सरळ मिक्सरवर बारिक करुन घ्या. मेथीदाणे अगदी थेंबभर तेलावर हलके भाजुन घ्या. रंग तांबुस झाला की भाजणे बंद करा. अन हे एव्हढेच मेथी दाणे खलबत्त्यात कुटुन घ्या. मस्त जमतील तेव्हढे बारिक करा. आता ही मेथी पावडर मिक्सरच्या भांड्यातल्या आधीच्या मिश्रणात मिसळुन आणखी एक हलकीच गिरकी मारा.
सगळ व्यवस्थीत मिक्स झाले असेल तर आता हे एका साठवणीच्या बरणीत काढुन घ्या. वरुन लिंबु रस पिळा. अगदी भरपुर. अख्खा लिंबु!! आता यात साखरेचा उल्लेख चालायचा नाही कित्येकांना तरीही हवी असेल तर चिमटभर साखर याची चवं वाढवुनच जाते. अन एक अतिशय महत्वाच म्हणजे हा ठेचा जितका दिसतो ना, तेव्हढा तिखट नाही लागत!! लिंबु रसाने याचा तिखटपणा जरा का चांगलाच कमी होतो. ;)
थंड झालेली फोडणी आता यावर ओता. अन काय? अगदी कश्या कश्या बरोबरही हाणा.
फोडणीतली मेथी एक दोन दिवसात अगदी मस्त भिजते अन आणखीच चव वाढवते या ठेच्याची.
तर अद्वेय आम्ही बाई याला ठेचा म्हणतो. आता तुला काय राग लोभ असेल तो ठेचुन ही सेवा मान्य करु घ्या!
वाचने
34932
वाचनखूण
प्रतिक्रिया
105
झणझणीत एकदम.
फस्कलास!
आयला त्या ठेच्याच्या धाग्याने
मस्त!!! पाककृतीही आणि तुमचे
सहीच..
वाह ठेचा एकदम फर्मास
स्साला ते घाटी लोग हाय ने, ते
जे ब्बात!
In reply to जे ब्बात! by नंदन
नंदनशी सहमत. लाल मिरच्यांचा
In reply to जे ब्बात! by नंदन
सहमत!
हा ठेचा....
In reply to हा ठेचा.... by बाबा पाटील
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे
In reply to ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे by सखी
झकास ठेचा..!
In reply to झकास ठेचा..! by रॉजरमूर
अहो भावनांको समझा करो
क्या बात! क्या बात!! क्या बात
ए १
झणझणीत !
कल्ला !!
In reply to कल्ला !! by सुहास..
कैर्यांच्या फोडी कापून त्यात
सल्ला : फोटो जरा मोठे टाका !!
सही !
(No subject)
मस्त पा.क्रु.
चांगल ठेचुन काढलं की...
सुंदर फोटो. रंग मस्त आहे.
समस्त कोल्हापुरी पैलवानांची
In reply to समस्त कोल्हापुरी पैलवानांची by चिन्मय खंडागळे
णिषेध !
In reply to णिषेध ! by सस्नेह
आँ! वर त्या अपर्नातै
In reply to आँ! वर त्या अपर्नातै by चिन्मय खंडागळे
अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते
In reply to अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते by स्पंदना
वर्हाडी..
In reply to अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते by स्पंदना
हिर्व्या मिर्चीचा खर्डा
In reply to हिर्व्या मिर्चीचा खर्डा by बॅटमॅन
ब्याट्या, हे सर्व वाचताना
In reply to ब्याट्या, हे सर्व वाचताना by सूड
उद्देश सफल झाला तर म्हणजे
In reply to उद्देश सफल झाला तर म्हणजे by बॅटमॅन
(No subject)
In reply to हिर्व्या मिर्चीचा खर्डा by बॅटमॅन
खाटुक...
In reply to हिर्व्या मिर्चीचा खर्डा by बॅटमॅन
बॅटस!!
In reply to अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते by स्पंदना
आयला म्हणजे तो ब्रँडेड
In reply to समस्त कोल्हापुरी पैलवानांची by चिन्मय खंडागळे
बा चिन्मया !
आई ग्गं..कसला भारी फोटो आलाय
In reply to आई ग्गं..कसला भारी फोटो आलाय by अस्मी
+१
तुफ्फान.
In reply to तुफ्फान. by अर्धवटराव
>>> जिभेला कातिलाना झटके
In reply to >>> जिभेला कातिलाना झटके by पाषाणभेद
@नाहितर सकाळी वेगळेच झटके
जबराट पाकृ
सर्व ब्रँड फालतू...वर्हाडि
मस्तच
zakaas...
झक्कास
वर्णन, पाकृ आणि फोटो, सगळेच झक्कास.
मंडळी आधीच उन्हाळ्याने जेवण्
यस हाच ठेचा. पण अद्वेय ने
In reply to यस हाच ठेचा. पण अद्वेय ने by मृत्युन्जय
नाही हो!
अपर्ना ताइ, मे तुमचा फएन झलो.
In reply to अपर्ना ताइ, मे तुमचा फएन झलो. by बालगंधर्व
मि तर तुम्च कधिपसुन फन अहे.
In reply to अपर्ना ताइ, मे तुमचा फएन झलो. by बालगंधर्व
वाईच हलु हना मारा तेचा!!
In reply to वाईच हलु हना मारा तेचा!! by स्पंदना
'तेचा..???'
जम्या!!
In reply to जम्या!! by समीरसूर
आचारी पुणेरी नसतील
In reply to आचारी पुणेरी नसतील by यशोधरा
पुणेरी
In reply to पुणेरी by समीरसूर
धमकीवजा सूचना
In reply to धमकीवजा सूचना by मैत्र
पाट्या नव्हत्या
In reply to पाट्या नव्हत्या by समीरसूर
मला वेगळे कार्यालय वाटले होते..
In reply to पुणेरी by समीरसूर
बघा आता! आंबट बटाटा भाजीच्या
In reply to बघा आता! आंबट बटाटा भाजीच्या by यशोधरा
होय
In reply to होय by समीरसूर
अगदी खरे आहे.
मस्स्त पाकृ. पण जास्ती जळजळ
अपर्णा ताई लय भारी ठेचा बघ.
हा ठेचा खाल्ल्यानंतर
In reply to हा ठेचा खाल्ल्यानंतर by पिंगू
तिखटी की रावण पिठलं रे?
In reply to तिखटी की रावण पिठलं रे? by सूड
अरे मराठवाडी तिखटी. पण ती
मितानच्या तिखटीची पाककृती >>>
In reply to मितानच्या तिखटीची पाककृती >>> by त्रिवेणी
मीमवर होती. आता मीमचा बॅकअप
जबरा
लय झ्याक !
मिरचीच्या एकाहून एक लै भारी
खर्डा ठेचा वगॆरे.
In reply to खर्डा ठेचा वगॆरे. by भ ट क्या खे ड वा ला
जळ्ळं मेलं शमी ते.
In reply to जळ्ळं मेलं शमी ते. by बॅटमॅन
@ बॅटमॅन...
In reply to @ बॅटमॅन... by मुक्त विहारि
अहो माहिती अष्णारच. त्यांचं
In reply to अहो माहिती अष्णारच. त्यांचं by बॅटमॅन
माईनमुळा हा प्रकारच कैक मराठी लोकांनाही ठौक नसतो
In reply to माईनमुळा हा प्रकारच कैक मराठी लोकांनाही ठौक नसतो by मुक्त विहारि
सही आवडली
In reply to अहो माहिती अष्णारच. त्यांचं by बॅटमॅन
अहो आम्हाला अगदी लहाणपणीपासून
In reply to अहो आम्हाला अगदी लहाणपणीपासून by स्पंदना
होय तेही खरंच म्हणा.
In reply to होय तेही खरंच म्हणा. by बॅटमॅन
पण मुरलेल्यापेक्षा ताजा
In reply to पण मुरलेल्यापेक्षा ताजा by सस्नेह
हैन दन्का!
In reply to @ बॅटमॅन... by मुक्त विहारि
थोडक्यात मुवि, खरं मध्यवर्ती
In reply to थोडक्यात मुवि, खरं मध्यवर्ती by यशोधरा
अहो,
In reply to थोडक्यात मुवि, खरं मध्यवर्ती by यशोधरा
वॉव
In reply to वॉव by बॅटमॅन
चला हे एक बरे झाले....
In reply to जळ्ळं मेलं शमी ते. by बॅटमॅन
कसं दिसतं वो ते तुमचं