✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रत्न, खडे, गंडे हे प्लासिबो आहेत काय ?

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sat, 10/11/2008 - 10:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14097 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

छ
छोटुली Sat, 10/11/2008 - 12:04 नवीन

लेख आवडला

रत्नांचा खरा फायदा कुणाला होत असेल तर तो रत्ने विकणाऱ्यांना होतो ! :? हे लक्षात घेणे आवश्यक आहे.हल्ली आंतरजालावर देखिल अशा रत्नांचे "BID"चालू असते. विशेष म्हणजे सुशिक्षित लोक ह्या फॅडचे चाहते बनले आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 10/11/2008 - 12:41 नवीन

चैन

विशेष म्हणजे सुशिक्षित लोक ह्या फॅडचे चाहते बनले आहेत.
कारण ही चैन त्यांनाच परवडते. :)) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटुली
अ
अवलिया Sat, 10/11/2008 - 15:41 नवीन

खरं तर तो

खरं तर तो मानसोपचाराचा एक प्रकार आहे. मन करा रे प्रसन्न ... (प्रसन्न) नाना
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 10/11/2008 - 17:03 नवीन

रत्ने-दोरे

रत्ने-दोरे यावर लक्ष वेधण्यासाठी ही चर्चा चालू केलीत हे बरे झाले. आपल्या खिशात देवाचा अंगारा ठेवणे, फोटो ठेवणे हे सगळे आपल्या सोबत देवाचे आशिर्वाद आहेत हे स्वतःला पटवून देण्यासाठीच असते असे वाटते. देव असेल आणि आपण त्याचे लाडके असू तर तो 'जिथे जातो तेथे माझ्या सांगाती' असणारच. या स्थूल वस्तूंवर उर्जा-रेडिएशन असे आरोप करणे हा जोडलेला (ऍडिशनल) प्लासिबो :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/12/2008 - 08:40 नवीन

च्यामारी

च्यामारी कुठली रत्न वापरा, वा वापरू नका, ग्रहाच्या आंगठ्या घाला वा घालू नका, पत्रिका पहा वा पाहू नका, जे भोग वाट्याला यायचे असतात ते येतातच आणि ते भोगल्याशिवाय या जगातून जाता येत नाही.... आम्ही फक्त नियतीला मानतो.. तिला साला कुणीच हरवू शकत नाही, तिचा घाला कुणीच चुकवू शकत नाही..! आपला, (नियतीच्या पुढे सगळे खडे अन् सगळी रत्न निष्प्रभ आहेत यावर ठाम विश्वास असणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/12/2008 - 09:04 नवीन

नियती

आम्ही फक्त नियतीला मानतो.. तिला साला कुणीच हरवू शकत नाही, तिचा घाला कुणीच चुकवू शकत नाही..!
आमचे गुरु व मित्र कठोर फलज्योतिष चिकित्सक कै माधव रिसबुड हेच वेगळ्या भाषेत म्हणत. ते म्हणत," मानवी जीवनातील घटनांचे प्रेरकत्व कुणाचे - नियतीचे? पुर्वसंचिताचे ? ग्रहांचे? की माणसाचे स्वतःचे? माझे ठाम उत्तर आहे- 'नियतीचे'" प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अभिजीत Sun, 10/12/2008 - 09:08 नवीन

असुरक्षितता

मानवी मनात असलेली असुरक्षितता अशा प्रकारांना खतपाणी घालते असे मला वाटते. जगाचे चलनवलन हा एक 'एन्-पी प्रोब्लेम' आहे (संगण़क/गणित विषयाचे जाणकारांसाठी), ज्यात मानवी तर्काच्या (जो भावना, संबंध, आजुबाजुची परिस्थिती आणि व्यक्तिमत्व यावर अवलंबून असते) कक्षेबाहेरील व्हेरिएबल्सच कार्यरत असतात. पण मानवी मन यावर ताबा मिळवण्यासाठी अशाच अतार्किक शस्रांचा वापर करण्यास उद्द्युक्त होते. अर्थात, यावर एक संपूर्ण अर्थव्यवस्था मात्र पूर्ण तार्किकतेवर उभी आहे हे सांगणे न लगे. ;) (घरून जोडे पडणार हे नक्की :) ) असो. आपल्या एकूण मतांशी सहमत. - अभिजीत
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/12/2008 - 09:17 नवीन

तार्किक

अर्थात, यावर एक संपूर्ण अर्थव्यवस्था मात्र पूर्ण तार्किकतेवर उभी आहे हे सांगणे न लगे.
म्हणुन तर आम्हाला कुजबुज ऐकू येते. तुम्हाला पण आली असेल प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत
य
यशोधरा Sun, 10/12/2008 - 11:05 नवीन

आवडला लेख.

आवडला लेख.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/12/2008 - 11:43 नवीन

आवडला !!!

घाटपांडे साहेब, काथ्याकुटाचा विषय आवडला. खड्या-बिड्याचं लोकांचे वेड कमी व्हावे, असे प्रामाणिकपणे वाटते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/13/2008 - 10:20 नवीन

खडे / ताईत

खडे / ताईत दोर एहे प्लासीबो आहेत. प्लासीबो एफेक्ट मुळे एखाद्याची प्रगती होत असेल एखाद्याचा आत्मविष्वास वाढत असेल तर हरक्त का घ्यावी. श्रद्धा हीच एक मोठे प्लासीबो आहे. म्हणुन कोणी स्वतःवर सुद्धा श्रद्धा ठेवु नये का? खडे ताईत दोरे हे सगळे फालतु आहेत . आणखी एक अशीच वैज्ञानिक मुलामा असलेली पण लुच्चेगिरीची मांडणी म्हणजे ''ग्रहांपासून निर्माण होणारी रेडिएशन्स ही नेहमीच ऋण भाराची असतात व रत्नांची जी शक्ती असते ती नेहमीच धन भाराची असते त्यामुळे ग्रहांपासून निघणारी व्हायब्रेशन्स रत्नांपर्यंत पोहोचताच 'न्यूट्रलाईज` होतात.`` सगळया थापा! मंदीरे ही कॉस्मीक किरणे शोषुन घेतात म्हणून ती उर्जेची केंद्रे आहेत. ही देखील भोळ्या लोकाना फसविण्याची नवी शास्त्रीय युक्ती.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/13/2008 - 14:41 नवीन

सकारात्मक श्रद्धा

श्रद्धा हीच एक मोठे प्लासीबो आहे. म्हणुन कोणी स्वतःवर सुद्धा श्रद्धा ठेवु नये का?
ही सकारात्मक श्रद्धा आहे. ती माणसाला बळ देते. फक्त तारतम्य बाळगावे. ते सापेक्ष आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
भ
भडकमकर मास्तर Tue, 10/14/2008 - 01:50 नवीन

मी स्वतः

मी स्वतः कोणताही दागिना / अंगठ्या . गळ्यात चेन वगैरे वापरत नाही... चमकदार रंगीबेरंगी खडे अंमळ मजेशीर दिसतात. ...... विविध अंगठ्या / दोरे / साखळ्या वापरणारी हौशी मंडळी मोठी गंमतशीर वाटतात... बाकी आपल्याला त्यातलं काही कळत नाही... पण घाटपांडे काका मात्र खूप जणांचा धंदा बुडवताहेत , इतकं खरं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 10/31/2015 - 21:01 नवीन

काही दिवसांपूर्वी आमच्या होम

काही दिवसांपूर्वी आमच्या होम मिनिस्टर, ऑफिस मध्ये असेच एका खडा विक्रेत्याचा चमत्कार पाहून आल्या आहेत, त्या माणसाने खालील चमत्कार करून दाखवले. १) त्याच्याकडे बरेचसे खडे होते. त्यातला प्रत्येक खडा तो एका भांड्यात घेऊन ते भांडे तो ज्या व्यक्तीला खडा घ्याचा आहे त्याच्या हातात द्यायचा. मग एका काठीने माही मंत्र म्हणून ती काठी त्या भांड्याभोवती फिरवायचा. हि टेस्ट प्रत्येक खाद्यासोबत करयाची. एक खडा टेस्ट करताना काठी फिरवल्यानंतर लगेचच तो खडा त्या भांड्यात उड्या मारायला लागला. हा खडा आपल्याला उपयुक्त आहे. आसे सांगून मग त्याने तो खडा भांडे हातात धरणाऱ्या माणसाला विकला २) एक खडा त्याने आपल्या हातात घेतला. एक मुलीचा केस त्याने त्या खाड्याभोवती गुंडाळला. आणि लायटर ने तो केस पेटवला. केस जळला. हीच प्रोसेस त्याने दुसरा खडा वापरून केली. पण त्यावेळी तो केस जळला नाही. "बघा हा खडा तुमच्या केसाला इतके संरक्षण देतो. तर विचार करा तुम्हाला किती संरक्षण देईल " असा डायलॉग मारून त्याने तो खडा विकला. असे दोन चमत्कार (??? ) पाहिल्यानंतर मिसेस आता मागे लागलीये.. कि मला पण त्या व्यक्तीकडून खडा विकत घ्यायचाय. व्यक्तीशः मी असल्या थिल्लर गोष्टींना मानत नाही. त्यामुळे अनेक वेळा समजावून पण हा हट्ट थांबत नाहीये, मी एवढे देखील म्हणालो. कि खरच त्या माणसाला एवढे ज्ञान असते तर तो असा खडे विकत फिरत कशाला बसला असता?. पैसा मिळवण्याचा एखादा खडा स्वतः घालून गर्भश्रीमंत झाला नसत का ? आणि असे खडे जर आपले संरक्षण करत असते तर रोज हजारो अपघात झाले नसते. . पण आजूनही त्या चमत्काराच्या हंगओवर मधून ती बाहेर येत नाहीये, तिच्या ऑफिस मधल्या अनेक लोकांनी त्या खडा विक्रेत्याकडून खडे विकत घेतलेत. त्यामुळे आपण पण घेऊन पाहू. असे तिला वाटतेय. अश्या ट्रिक वापरून त्या व्यक्तीने एका दिवसात हजारो रुपयांचा गल्ला जमवला. अश्या घटना थांबणे गरजेचे आहे.,या असल्या फालतू ट्रिक मागचे विज्ञान कोणी सांगेल का.? जालावर शोधण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा