साहित्यः
१ किलो चिकन साफ करुन, किंचित हळद, तिखट, लिंबू रस लावून मॅरिनेट करुन ठेवणे
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
२ टेस्पून आले+लसूण पेस्ट
३ टेस्पून सावजी मसाला
( आवडीप्रमाणे कमी जास्तं)
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
सावजी मसाला साहित्यः
सावजी चिकन/ मटण हे झणझणीत, जहाल तिखट असते. मी तिखटाचे प्रमाण थोडे कमी, आमच्या चवीप्रमाणे बसवले आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी - जास्तं, तब्येतीला झेपेल असे प्रमाण बसवावे :)
३ टेस्पून सुके खोबरे
३ टेस्पून ज्वारीचे पीठ
६-७ लाल सुक्या मिरच्या
(आवडीप्रमाणे कमी - जास्तं)
१/२ टीस्पून धणे
१/२ टीस्पून बडीशेप
१/२ टीस्पून शहाजिरे
१/२ टीस्पून पेक्षा थोडी जास्तं टीस्पून खसखस
४ हिरवी वेलची
२ मसला वेलची
थोडे दगडफूल
४-५ लवंगा
९-१० काळीमिरी
१ जायपत्री
२-३ दालचिनीच्या काड्या तोडून
पाकृ:
एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, शहाजिरे, खसखस, हिरवी वेलची, मसला वेलची, दगडफूल, लवंगा, काळीमिरी, जायपत्री व दालचिनी कोरडेच मंद आचेवर भाजायला घ्या.
थोडे लालसर झाल्यावर त्यात सुके खोबरे व लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या.
शेवटी ज्वारीचे पीठ घालून मंद आचेवर थोडे लालसर भाजून घ्या.
गार झाले कि कोरडेच मिक्सरवर वाटून घ्या.

एका भांड्यात तेल गरम करुन आले+लसूण पेस्ट परतवून घ्या.
(मी तेल कमी वापरले आहे)
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून थोडा गुलाबी रंगावर परतवून घ्या.
त्यात सावजी मसला, मीठ व मॅरिनेट केलेले चिकन घालून चांगले परता.
गरजेनुसार पाणी घाला व झाकून चिकन शिजू द्या.
ज्वारीच्या पिठामुळे रस्सा दाट होतो, त्याप्रमाणे पाणी घाला.
चिकन शिजले की वरुन बारीक चिरलेली कोथींबीर पेरावी.
काही जणं सावजी चिकनमध्ये वरुन दोन चमचे खोबरेल तेल सोडतात, मी तसे न करता दोन चमचे तेलात (रोजच्या वापरातले तेल) सावजी मसाल्याची फोडणी देऊन ती फोडणी चिकनवर ओतली त्यामुळे छान तरी आली.
गरमा-गरम सावजी चिकन खाण्यासाठी तयार आहे :)

ह्या उकाड्यात खाणार असला तर सोबत सोलकढी ही होऊन जाऊ द्या ;)
प्रतिक्रिया
मस्तय !!! करून बघतो
हे दगड्फुल मिळत नाही ग आमच्या
खपलो.
मस्त
झकास!
हेच म्हणते ...
In reply to झकास! by अजया
खाण्याच्या नाही पण बघण्याच्या
In reply to झकास! by अजया
धन्यवाद
उचल रे देवा मला.
आणि...
In reply to उचल रे देवा मला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to आणि... by मुक्त विहारि
जबरदस्त फोटो व छान पाकृ!
फोटो नेहमीप्रमाणेच नेत्रसुखद
नीट भाजला
In reply to फोटो नेहमीप्रमाणेच नेत्रसुखद by दिपक.कुवेत
ओह धन्यु
In reply to नीट भाजला by सानिकास्वप्निल
फर्मास ! फोटो बघूनच पोट भरले
क आणि ल्ला पाकृ !!
हाहाहा!!! खरच कल्ला पाककृती.
In reply to क आणि ल्ला पाकृ !! by सुहास..
झक्कास.
यप्प... फाफू व्हायलाच हवी
In reply to झक्कास. by गणपा
सही
खल्लास!
मस्त...
In reply to खल्लास! by समीरसूर
चांगलं खाणं, चांगले चित्रपट,
In reply to खल्लास! by समीरसूर
आईचा घो.
In reply to खल्लास! by समीरसूर
जबरा प्रतिसाद..
In reply to खल्लास! by समीरसूर
नक्की नक्की
In reply to जबरा प्रतिसाद.. by मैत्र
झकास!
In reply to नक्की नक्की by समीरसूर
ये सब....
In reply to झकास! by पैसा
मस्त पाकृ...शेवटचा फोटो,
यातील शाकाहारी कृती सांगावी
+११११
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
सावजी बटाटा/सावजी पनीर???
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
सावजी बटाटा/सावजी पनीर???
In reply to सावजी बटाटा/सावजी पनीर??? by तुषार काळभोर
नशीब आट्यापाट्या म्हणालात...
In reply to सावजी बटाटा/सावजी पनीर??? by दिपक.कुवेत
+१
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
सुरण वापरुन बघा मटण, चिकन
In reply to +१ by कवितानागेश
उडुपी सांबार
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो व छान
जिथे चिकन मटण तिथे हजर आपण !
डाएट ला सुरुंग लावल्याबद्दल
मटारची उसळ आणि शिक्रण ही
In reply to डाएट ला सुरुंग लावल्याबद्दल by कॅप्टन जॅक स्पॅरो
अहा!
लाल काही जीवघेणे!
भ न्ना ट !
तों. पा. सु.
छान
आमच्या नावात कोंबडी प्रेम
ए! मी दगड्फुल आणलय भारतातुन.
अशक्य आहे हा प्रकार!
माझा मित्र आहे प्रॉपर सावजी