आज शेवटच्या टप्प्यातले मतदान झाल्यावर नेहमीप्रमाणेच कमी मतदान असा आरडाओरडा सुरू झाला. ज्यात भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई सुद्धा होती. खरे तर मुंबईत गेल्यावेळी पेक्षा जास्त मतदान झाले. प्रत्येक विभागात ५० टक्के पेक्षा जास्त आणि सरासरी ५३ टक्के. (आकडे कमीजास्त असू शकतात, प्रमाण मानू नका) तरीही इतर राज्यांशी तुलना करत असमाधान आहेच. याचे एक कारण म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमाणसात असलेला प्रचंड असंतोष, मोदी सरकारची आलेली लाट, आपसारख्या नवख्या पक्षाने दाखवलेली आशा, सोशलसाईटवर युवा पिढीने दाखवलेला अवेरनेस पाहता लोकांच्या अपेक्षा देखील यंदा किमान ६०-६५ टक्के मतदान होईल अश्या होत्या. त्यामुळे त्यांना हे मतदान आणखी कमी वाटले.
असो,
तर आता या कमी मतदानाची कारणे कोणी मतदारांमधील उदासीनता देत आहे तर कोणी वोटींग लिस्टमधील नावांची गडबड. तर कोणी निसर्गाला दोष देत प्रचंड गरमीचे कारण पुढे करत आहे. कारण काहीही असले तरी सर्वत्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.
(यातही काही जणांचा सूर असा की सरकार पलटायचे आहे आणि तुम्ही मतदान न करता घरात बसून आहात. म्हणजे यातही अमुकतमुक पक्षालाच वोट द्या किंवा अमुकतमुक पक्षाला वोट देऊ नका असे आपले मत लादणे)
अर्थात हे ही चालायचेच, चूक की बरोबर ते नंतर बघू,
पण मला प्रश्न पडला आहे की मतदान न करणे हा एखादा प्रचंड गुन्हा किंवा सामाजिक अपराध आहे का? किंबहुना एवढे मोठाले शब्द न वापरताही ते चुकीचे वर्तन आहे का?
कोणालाही मत न देणे हे देखील एक मतच नाही झाले का?
किंबहुना ‘मला कोणीही चालेल, इथून तिथून सारेच सारखे’ असे एखाद्याचे मत असू शकत नाही का?
आणि लोकशाहीत आपण प्रत्येकाच्या मताचा आदर करायला हवा ना.
कुठलेही सरकार आले तरी माझी परिस्थिती काही बदलत नाही असे जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने मतदानाच्या बाबत उदासीनता दाखवण्यात गैर ते काय?
तसेच याउपर असते ती एक प्रायोरीटी. एखाद्याला ऑफिसला सुट्टी मिळतेय म्हणून तो आरामात मत देऊ शकतो, पण तेच ऑफिसमध्ये एखादे महत्वाचे काम असेल वा किंवा एखादे काम आजच केले नाही तर धंद्यामध्ये आर्थिका फटका बसू शकतो तर मी ते आधी बघणार नाही का. माझ्या एका मताने काय तो फरक पडणार आहे असा विचार करणे, थोडक्यात आपली प्रायोरिटी काय आहे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला नसावा का? हे त्याचे मतच झाले नाही का?
माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले. फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले. तसेच आजवर एक वेळ सोडून प्रत्येक वेळी मतदानाचा हक्क बजावला आहेच. पण ती एक वेळ जेव्हा मी मतदान बजावले नाही तेव्हा मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.
असो, इतरांची मते जाणून घेण्यास उत्सुक.
वाचने
17326
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
सामाजिक नव्हे नैतिक
नैतिक गुन्हा
In reply to सामाजिक नव्हे नैतिक by पिवळा डांबिस
माझ्या मते
In reply to नैतिक गुन्हा by तुमचा अभिषेक
नोटा
In reply to माझ्या मते by पिवळा डांबिस
जणू काही मतदान न करणे हा एक
नाही.
In reply to जणू काही मतदान न करणे हा एक by शुचि
मझ नव एथ्लया मददार यदित नहे.
In reply to नाही. by पिवळा डांबिस
प्रचंड गरमीचे कारण पुढे करत
>>आमच्या पुण्यात गरमी ला
In reply to प्रचंड गरमीचे कारण पुढे करत by शुचि
(शृगालनयन)
In reply to >>आमच्या पुण्यात गरमी ला by सूड
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा
In reply to प्रचंड गरमीचे कारण पुढे करत by शुचि
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतातआमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)उकाड्याला उकाडाच बोलतात
In reply to आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा by तुमचा अभिषेक
उकाड्याला उकाडाच बोलतातआमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)वाह क्या डायलॉग बोला है ..
In reply to उकाड्याला उकाडाच बोलतात by यसवायजी
आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात.थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)बोलणे, म्हणणे, सांगणे ही
In reply to वाह क्या डायलॉग बोला है .. by तुमचा अभिषेक
सदाशिवपेठेत
In reply to प्रचंड गरमीचे कारण पुढे करत by शुचि
उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात
अनैच्छिक जबरदस्ती
In reply to उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात by आतिवास
नक्कीच नैतिक गुन्हा आहे.
त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह.
In reply to नक्कीच नैतिक गुन्हा आहे. by बॅटमॅन
त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल
In reply to त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. by तुमचा अभिषेक
मतपेटीतून मत देऊन तो त्रास
In reply to चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल by धर्मराजमुटके
असो, आता मला सांगा, याआधी
In reply to चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल by धर्मराजमुटके
मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच.
In reply to असो, आता मला सांगा, याआधी by तुमचा अभिषेक
काही लोकांच्या मते बिपाशा
In reply to मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच. by धर्मराजमुटके
सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्यांनी च करावे.
In reply to त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. by तुमचा अभिषेक
टॅक्स बद्दल माहिती
In reply to सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्यांनी च करावे. by प्रसाद१९७१
मी मतदान न केल्याने मोठे
मी मतदान न केल्याने मोठे
In reply to मी मतदान न केल्याने मोठे by शुचि
निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन
In reply to मी मतदान न केल्याने मोठे by पिवळा डांबिस
रेफरन्स?
In reply to निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन by शुचि
.... आता हाय म्हनलं म्हण्जी
In reply to रेफरन्स? by पिवळा डांबिस
ओके
In reply to .... आता हाय म्हनलं म्हण्जी by शुचि
मला नाही आवडत एकही उमेदवार.
In reply to निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन by शुचि
नोटा च्या पर्याय चा काही तरी
In reply to मला नाही आवडत एकही उमेदवार. by प्रकाश घाटपांडे
टिका तर तुम्ही केली आहेच.
In reply to मी मतदान न केल्याने मोठे by पिवळा डांबिस
सॉरी
In reply to टिका तर तुम्ही केली आहेच. by तुमचा अभिषेक
>>टिका तर तुम्ही केली आहेच.
In reply to टिका तर तुम्ही केली आहेच. by तुमचा अभिषेक
मतदार याद्यांमध्ये घोळ
चेपू साभार
फसवा युक्तीवाद !
In reply to चेपू साभार by दिव्यश्री
हॅ हॅ हॅ...
In reply to फसवा युक्तीवाद ! by तुमचा अभिषेक
चुकीचे गृहितक
In reply to फसवा युक्तीवाद ! by तुमचा अभिषेक
सहमत आहे
In reply to चुकीचे गृहितक by हुप्प्या
हा गुन्हा वा अपराध वाटत नाही.
रोचक!
In reply to हा गुन्हा वा अपराध वाटत नाही. by ऋषिकेश
नाही !
अजिबार गुन्हा वगैरे नाही.
In reply to नाही ! by चित्रगुप्त
डांबिस काकांशी सहमत...
कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट
मग त्यातले पण १-१ क्यान्सल
In reply to कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट by असंका
हा हा भारीये हे पण ..
In reply to मग त्यातले पण १-१ क्यान्सल by विश्वनाथ मेहेंदळे
ज्याला समाजासाठी काही करायचे
मतदानाचा अधिकार / हक्क
फर्क तो पडता है...
माझ्या मताने फरक पडतो का ? तर
In reply to फर्क तो पडता है... by ब़जरबट्टू
माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतोडिपेंड्स. पडेलच असे नाही. मी कुठल्या भागात/समाजात राहतो? माझी/इतरांची जात कोणती आहे? इतरांची आर्थीक परिस्थीती कशी आहे? ते प्रलोभनाला बळी पडतात का? - शराब्/शबाब/कबाब उमेदवार काय लायकीचे आहेत? ते गावातला पाणी पुरवठा बंद करु शकतात का? वगैरे.. एक साधे उदा;- एका वर्गात २२ मुली आहेत आणी फक्त १३ मुलगे. वर्गप्रमुखाच्या निवडणुकीत दोन्हीबाजुनी १-१ उमेदवार आहेत. सगळ्या मुलग्यांनी १००% मतदान केले तरी त्यांचा प्रतिनिधी निवडून येणारच नाही अशी त्यांना खात्री आहे. म्हणून बहुतेकांनी मतदानच केलेच नाही. आणी साहजीक एक मुलगी निवडून आली. चूक कोणाची? - लोकशाही जिंदाबाद. -चूक मुलांची....
In reply to माझ्या मताने फरक पडतो का ? तर by यसवायजी
माझ्यामते तरी मत न देणार्या
मतदान सक्तीचे करणे घटनाबाह्य
आपण मतदान केले नाही, आणि
माझा मित्र असाच एकदा
In reply to आपण मतदान केले नाही, आणि by पिशी अबोली
प्राधान्यता कुठे ठेवायच्या एवढा विवेक आणि सुज्ञपणाशी समतोल साधणे
अथ दक्षिण बाग पुराणे..
.....अशा संवेदनशील लोकांनी
In reply to अथ दक्षिण बाग पुराणे.. by हाडक्या
हे वाचाच
Satire
माझे वैयक्तिक मत
वेगळा आणि चांगला मुद्दा
In reply to माझे वैयक्तिक मत by प्रसाद गोडबोले
मी म्हणतोय ...
In reply to वेगळा आणि चांगला मुद्दा by तुमचा अभिषेक
हो आपला मुद्दा समजला होता.
In reply to मी म्हणतोय ... by प्रसाद गोडबोले
सामाजिक गुन्हा किंवा अपराध