Skip to main content

वंशवेल

लेखक सुब्बु यांनी गुरुवार, 24/04/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे. मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक. मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो. काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही . आणि मला दुसर्या वेळीही पुन्हा मुलगी झाली. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा सगळे जन नाराज होते. कुणी उनाशी बोलत न्हवत. आणि त्यावेळी वातावरण खूप गंभीर झालेला होते . माझे मिस्टर फक्त माझ्या जवळ बसले होते. थोड्या दिवसांनी हे वातावरण सुद्धा निवळले. नवीन बाल सुधा सगळ्यांचे लाडके बनले. मला सुद्धा २ मुली आहेत याचा अभिमान वाटायला लागला कारण खरच माझ्या निकिता आणि शिरीन खूप activ सुंदर आणि हुशार आहेत. मला मुलगा नाही ह्या बधल काहीच कमी वाटत न्हवती. पण काही दिवसांनी काही लोकां कडून मुलगा नाही म्हणून काही वक्तव्ये ऐकायला मिळाली. सगळेजन आमच्या property चा भावी वारसदार कोण असा विचार करू लागले. कुणी सांगितला माझा मुलगा दत्तक घ्या तर जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार. ह्या गोष्टीने मी पुरती हलली होती. पुन्हा पुन्हा तेच विचार डोक्यात घोळायला लागले. मला २ मुली आहेत म्हणून असा कुणी का म्हणून माझ्या मुलींच्या हक्का मध्ये आडवा येतंय. मी असा कधी होऊ देणार नाहीच. पण आला खूप प्रश्न पडतात माझ्या मुली आमच्या संसाराच्या वंश वेलीवरची २ सुंदर फुले आहेत. अजून सुद्धा मुलींना पाहिजे तो दर्जा मिळत नाही. उच्च शिक्षित माणसाने च असे विचार केले तर काय होईल? मला मुलगा नाही म्हणून माझ्या मुलींचे हक्क मी असे दुसर्या नातेवाईकाच्या मुलाला का द्यायचे? अजून खूप प्रश्न आहेत पण उत्तरे मिळत नाहीत. पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12834
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

असो . कितीही लिहाल तरी कमीच आहे . कारण माझा मुद्दा मला योग्यच वाटतोय तसाच तुमचा तुम्हाला . चर्चा भरकटण्या आधी थांबणे योग्य .

ह्यात चर्चा करण्यासारख काय आहे? :-(??

In reply to by नावातकायआहे

+१

जग कुठे चाललाय आपण कुठे चाललोय . दुसरे लोक इतके महत्वाचे असतात का आपल्या आयुष्यात कि आपण आपले महत्वाचे निर्णय त्यांच्यानुसार घ्यायचे/बदलायचे? तुम्ही सुशिक्षित दिसता . कायद्याच थोडाफार ज्ञान सगळ्यांनाच असत . कमीत कमी स्वतःच्या फायद्याच ग्यान तर नक्कीच . मग हे काय ???? स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशावर / मालमत्तेवर दुसरा कोणी कसा हक्क सांगू शकेल ? चांगला वकील बघा , चांगला सल्ला घ्या . तो जास्त उपयोगी पडेल तुमच्या असल्या फालतू आणि खालच्या दर्जाच्या विचारसरणीच्या माणसांपेक्षा . बाकी सगळ्यांनी योग्यच सांगितलं आहे . मुली आहेत मुलींसारख वागवा . कराटे शिकवा , टफ बनवा , दुनियादारी हळूहळू समजावा . एक मैत्रीण ढसाढसा रडत होती . वडील गेले जानेवारीत . आठव्या दिवसापासून मोठा भाऊ भांडतोय आईशी इष्टेटी साठी . आईकडे बघत नाही . नुसता छळवाद मांडलाय . बर त्याला काही कमी नाही परदेशात राहतो , नोकरी करतो त्यालाही एकाच मुलगा आहे . मनात म्हंटल थांब ग त्याच्यावर हि वेळ येयीलच कधीतरी .