'सकाळ' मधे काही फोटो नित्यनेमाने येतात.
जसे
१. वर्षातुन एकदा-दोनदा येणारे फोटो
- राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन मधला फोटो. राष्ट्रपतीचा फुलाना हात लावतानाचा
- सारसबागेतील गणपतीचा स्वेटर घाललेला फोटो
- ३१ डिसेंबरला मावळत्या सुर्याचा फोटो
- परीक्षा संपल्यावर मुलान्चे आइस्क्रीम खाताना
- सकाळ कार्यालयामधला पानसुपारीचा फोटो
२. नेहमी येणारे फोटो
- ड्रेनेजच्या झाकणाचा फोटो
- पुलावरील नक्शीचे ग्रिल
- पवार कुटुबिय
असेच अजुन काही फोटो असतील तर येथे लिहावेत...
वाचने
7152
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
तै
ताईंचा "तनिश्का"बरोबरचा फोटो.
नाहीतर, विविध ठिकाणच्या तनिश्कांनी कायकाय केलं, त्याचा फोटो.
एखादा
पुण्यात कुठेतरी शेतीविषयक सम्मेलन असते.व्यासपीठावरच्या शेतीतज्ञांचा फोटो.
(सकाळ माजी वाचक्)माई
फोटोचं काय घेउन बसलात राव
फोटोचं काय घेउन बसलात राव बातम्या, राशिभविष्य, वरच हेडींग, जाहिराती, सोन्याचांदीचे भाव, आयपीएल चा स्कोअर थोड्याफार फरकाने सारखाच असतो.. ;) :)
- पावसाने फुगलेली मुठा नदी
- पावसाने फुगलेली मुठा नदी बघायला लकडी पुलावर जमलेले लोक (झेड्ब्रिज वरून काढलेला फोटो)
- सवाईच्या भरल्या मंडपाचा पाठिमागच्या स्टेजवरून काढलेला फोटो (दरवर्षी तोच दाबतात असा माझा समज होता, पण एकदा फोटोग्राफरला तो फोटो काढताना याचि देही पाहिलं आणि धन्य झालो.)
- पावसात भिजणार्या दुचाकीस्वाराचा फोटो ("वर्षासरींनी पुणेकरांची तारांबळ")
- कानटोपी घालून फिरायला निघालेल्या आजोबांचा फोटो ("थंडीच्या लाटेने पुणेकर गोठले")
- चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी)
- अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
अजितदादांना वाढदिवसाच्या
In reply to - पावसाने फुगलेली मुठा नदी by आदूबाळ
औरंगजेब आपला वाढदिवस म्हणे वर्षातून दोनदा साजरा करायचा- शम्सी आणि कम्री अशा दोन कालगणनांप्रमाणे. तसेच कैतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे लोक स्वतःलाच जाणते राजे
In reply to अजितदादांना वाढदिवसाच्या by बॅटमॅन
हे लोक स्वतःलाच जाणते राजे म्हणवतात.. राजांचा बड्डे तीनदा साजरा करायचा असतोच की.
अवरंगजेबावर मराठी पुस्तक
In reply to अजितदादांना वाढदिवसाच्या by बॅटमॅन
अवरंगजेबावर मराठी पुस्तक आहे का एकादे चांगलेसे?
सर जदुनाथ सरकार यांच्या '
In reply to अवरंगजेबावर मराठी पुस्तक by चित्रगुप्त
सर जदुनाथ सरकार यांच्या ' औरंगजेब' ह्या चरित्राचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. कोलारकर यांनी केलेला. www.sahyadribooks.com येथे मिळेल.
सकाळचा काळ.. आ.. दु..दु...
In reply to - पावसाने फुगलेली मुठा नदी by आदूबाळ
=)) सकाळचा काळ.. आ.. दु..दु... बाळ! =))
>>>> चंचला कोद्रे यांचा फोटो
In reply to - पावसाने फुगलेली मुठा नदी by आदूबाळ
>>>> चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी)
इस्कटून सांगा! ह्यो बाबा कोन?
बाकीचं समजलं.
म्हापौर
In reply to >>>> चंचला कोद्रे यांचा फोटो by प्यारे१
म्हापौर
- अजितदादांना वाढदिवसाच्या
In reply to - पावसाने फुगलेली मुठा नदी by आदूबाळ
हा हा हा =))
...
https://epaper3.esakal.com/24Feb2014/Normal/PuneCity/Pune1Today/index.h…
इथे पहा ना विकत का घेता...