रेडीओ
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घराला आता सारख्या वेगळवेगळ्या स्वतःच्या अशा खोल्या नव्हत्या .घर जरी १२/१४ खोल्यांच असल तरी बेडरूम म्हणावी अशा २ ते ३ च.पण एकदा उठल्यानंतर परत बेडरूम मधे जाउन झोपन काकांच्या आणि एकूणच घरच्या शिस्तीत बसत नसे.त्यामुळे जबरदस्तीने उठावाच लागे.लहानपणी रेडीओशी संबंध आला तो एवढाच.
नंतर शाळेच्या वयात देखील वर्गातील एखाद्या मैत्रिणीच गाण रेकॉर्ड झालाय किंवा सराच भाषण झालाय एवढाच . तसा आमच्याकडे टी वी लवकर आला त्यामुळे तेव्हा कधी रेडीओ ची गरजच नाही वाटली.
मी जेव्हा मुंबई ला पेयिंग गेस्ट म्हणून रहायला आले,तेव्हा रेडीओशी माझा अगदी जवळचा संबंध आला.मी मुंबईत दाखल झाले तेव्हा एफ एम च प्रस्थ फार वाढल होत.मी आले तेव्हाच ४/५ हिंदी गाण्याचे चॅनेल्स सुरु होते.मी तेव्हा एका बीपीओ मधे कमाला लागले होते .त्यामुळे तिथे शिफ्ट ड्यूटीज होत्या.मी जेव्हा सकाळच्या शिफ्ट ला जायचे तेव्हा ६.१५ ची ठाण्याहून बस असायची.मी ६लाच घर सोडायचे.तेव्हा (आता नाव लक्षात नाही)पण कुठल्यातरी मराठी चॅनेल वर सुंदर मराठी गाणी लागायची. बस ६.५० ला कंपनी च्या दारात उभी रहायची तोपर्यंत मी पुर्ण वेळ ती सगळी मराठी गाणी ऐकायचे.एरवी दिवसभर जाता येता एफ एम वर हिंदी गाण्यांचा रतीब चालूच असायचा.या सकाळच्या गाण्यांप्रमाणे माझा आणखी अगदी आवडता कार्यक्रम म्हणजे रात्री ९ वाजता लागणारा "पुरानी जिन्स ".रेडीओ मिर्ची किंवा रेडीओ सिटी किंवा अशाच कुठेतरी तो कार्यक्रम लागायचा.तो मात्र मला खूप आवडायचा.दुपारची शिफ्ट रात्री १० ला संपायची .तेव्हा परत येताना जो एफ एम चालू व्ह्यायचा तो अगदी घरी येऊन झोपेपर्यंत.मला मनापासून जुनी गाणी खूप आवडतात.त्यात किशोर कुमार माझा जास्त आवडीचा.त्यामुळे हा पुरानी जिन्स कार्यक्रम मला विशेष आवडे.कितीतरी जुनी पण खूप सुंदर गाणी त्यात लागत.अगदी उशिरा बरेच रेडीओ चॅनेल मग अशीच जुनी गाणी लावत.आणि मुख्य म्हणजे यात त्या आर जे ची बडबड नसे.बर्याच वेळा अस व्ह्यायच की तो आर जे बडबड करायला लागला की लगेच दुसरीकडे नवीन गाण सुरु करायच.त्यामुळे दर थोड्या वेळाने मोबाइल वरून बोट चॅनेल बदलत असायची. बर्याच वेळा रात्री फोन चार्जिंग ला लावायचा आणि हेडफोन्स कानात घालून गाणी ऐकत झोपायच हा माझा आवडता प्रकार होता.
२वर्ष मुंबईत घालवल्यावर मी पुण्याला शिफ्ट झाले.इथेही तोच प्रकार.पण इथले एफ एम चॅनेल्स हिंदी मिश्रित मराठी बोलायचे.गाणी सगळी हिंदीच.पण सोबत लागणारी बडबड मात्र हिंदी इंग्रजी आणि मराठी अशी एकत्र.पुण्यात आल्यावर हातात गाडी आली आणि मग टिपिकल पुणेकर मुलामुलींप्रमाणे मी कानाला हेडफोन्स लावून गाडी चालवायची सवय लवकरच करून घेतली.इथे सुध्हा मी पीजी म्हणूनच रहात होते.पण मुंबईत अनोळखी मुली सोबत राहून अगदी मस्त मैत्री जमली तर पुण्यात माझ्या चिपळूणकर मैत्रिणीच साथीला मग काय मजाच.इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.आणि दराबाहेर पडल की लगेच हेडफोन कानाला चिकतायचे.पुण्याचा ऑफीस मधे फोन डेस्क वर न्यायला परवानगी होती . त्यामुळे इथे सकाळची शिफ्ट असेल तर सकाळी ७ वाजता शिफ्ट सुरु होई तेव्हापासून ९ वाजता मॅनेजर येईपर्यंत फोन वर गाणी चालू असत.आणि जर दुपारची शिफ्ट असेल तर ६ वाजता मॅनेजर घरी गेला की मग रात्री १०ला शिफ्ट संपेपर्यंत एफ एम वर गाणी चालू असायची .शिवाय मी पुण्याहून चिपळूणला रात्रीच्या एस टी ने जायचे.तेव्हा अगदी सातार्यपर्यंत एफ एम चालायचा.त्यामुळे मला रेडीओ त्या प्रवासात सोबती वाटायचा.
आता परदेशी आले आणि रेडीओची साथच सुटली.आजकालचे फोन पण भरपूर मेमरी असलेले.शिवाय इथे हाय स्पीड इंटरनेट असल्याने हवी तेवढी गाणी हवी तेव्हा ऐकता येतात. पण आजही रेडीओ म्हटल की मला माझे मुंबई पुण्याचे दिवस आठवतात.तेव्हाची गाणी आता जुनी झाली.ती काही जुन्या काळातल्या लता,किशोर,रफी,आशा यांच्या गाण्यांसारखी अजरामर गाणी नाहीत.पिक्चर नवीन असताना ती गाणी सारखी ऐकून ऐकून आवडायला लागली होती.पण त्या सगळ्या गाण्यांबरोबर माझ्या काही आठवणी गुन्फल्या गेल्या आहेत इतकाच.
प्रतिक्रिया
आवडले.
मनापासून लिहिलेला
रेडिओ आणि माझं बालपण.
बरेचदा यु ट्युबवर "ceylone
सहमत
पेठकर काका --
जवळ जवळ असंच ...
बोर्नव्हिटा.
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय
हाहाहाहा
खरेच खत्री जाहीरात
सर्कारी रेडिओ चॅनल्सना पर्याय
आणि फिनोलेक्स्ची झायरात हो?
http://misalpav.com/comment
(सांगली/कोल्हापुर)
वारणाची दूधगंगा वाहते अखंड,
च्यायला, या जाहिराती
लाडा लाडा सब्मर्सिबलं पंपं..
@ धनधान्याची बरकतं, होई
अबे तो एकच शब्द आहे भेंडी.
सखु च्या टाक पावन्यास्नी
नाद्या बाद!!!!!
मला आधी ते- "धन धान्याची बरकत
राधिका... राधिका..
राधिका... राधिका.. हायस्कूल
१. फिनोलेक्सनं आणलं पाणी,
हेहे.. कुठले हो ते पत्रे??
चारमिनारचे पत्रे
ओ
कार्बोरंड्रम ओ ए 70 स्फटिक वापरून
हट्ट
ठ्ठो
(No subject)
मला सुधा नरवणेंना बघायचंय
मला सुधा नरवणेंना बघायचंयसही, लगे रहो मुन्नाभाई ;)सात पाच
मला वाटते संस्कृत बातम्या ६
+१
रेडिओ
जुन्या आठवणी जागवल्यात.
Kavitaa chhaan aahe.
जुन्या ट्रांझीस्टर रेडीओचे
जुन्या आठवणींना उजाळा
दर सोमवारी संध्याकाळी ७ वाजता
डॉक्टरांचा रेडिओ.
ह्या आमच्या डॉक्टरांवर एक वेगळा व्यक्तिचित्राचा धागा होऊ शकेल.
पेठकर काकांच्या पोतडीत अशा
सुरेख मालविका!
"बिनाका"
एकदम मस्त लिहीलयस मालविका..
+७८६
आणि कुठलं गाणं आहे हे म्युझिकवरून ओळखायची रूमिजची स्पर्धाहे बरेच जण करत असावेत, आमचेही करून झालेय. त्या गाण्यांबरोबर आपणही गाणे, सोबतीला सबमिशनच्या नाईटस या ईंजिनीअरींगमधील बेस्ट आठवणी .. बहुतांश ईंजिनीर्सनी अनुभवल्या असतीलच.Pagination